कुसुमाग्रजांच्या मराठीतील कविता | Kusumagraj Poems In Marathi

कुसुमाग्रज यांच्या 40+ प्रसिद्ध कविता | Kusumagraj Poems Marathi


मित्रांनो आज आपण कुसुमाग्रज यांच्या 40 प्रसिद्ध कविता बघणार आहोत. कवी कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य सृष्टी मध्ये आपल्या लेखन शैलीने स्वतःचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे मराठी मराठी साहित्य जगभर पसरवणाऱ्या मराठमोळ्या शिलेदारांमध्ये कुसुमाग्रजांचे नाव आदराने घेतले जाते.

मराठी साहित्याला नवी दिशा नवे वळण देण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते म्हणजे कुसुमाग्रज. आपण कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या काही कविता बघणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण कुसुमाग्रज यांच्या विषयी थोडक्यात माहिती बघून घेऊयात

कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती

कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी नाशिक येथे गजानन रंगनाथ शिरवाडकर या देशात ब्राह्मण कुटुंबात झाला.
1930 च्या आयुष्यात काहीसे उशिरा दत्तक घेतल्यावर त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर ठेवण्यात आले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव येथे झाले आणि उच्च माध्यमिक शिक्षण नाशिकच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये झाले. 1930 साली शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी आपली पहिली कविता रत्नाकर या मासिकात प्रसिद्ध केली होती.

वि .वा. शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज हे टोपण नाव का धारण केले?
असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो आणि या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता देखील बऱ्याच मराठी मनांमध्ये असते तर वि व शिरवाडकर
 यांना संपूर्ण भावंडांमध्ये एकच बहीण होती तिचे नाव होते कुसुम आणि वि वा शिरवाडकर हे कुसुम पेक्षा वयाने फार मोठे होते म्हणून त्यांनी त्यांचे टोपण नाव त्यांच्या बहिणीच्या सन्मानार्थ वाहिले होते कुसुमाग्रज म्हणजे कुसुमचा अग्रज म्हणजेच कुसुम पेक्षा मोठा असा त्याचा अर्थ होतो.
 

कुसुमाग्रजांच्या मराठीतील कविता

कविता 1

अखेर कमाई

मध्यरात्र उलटल्यावर

शहरातील पाच पुतळे

एका चौथऱ्यावर बसले

आणि टिपं गाळू लागले .

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो

फ़क्त माळ्यांचा.

शिवाजीराजे म्हणाले ,

मी फ़क्त मराठ़्यांचा.

आंबेडकर म्हणाले ,

मी फ़क्त बौद्धांचा.

टिळक उद़्गारले ,

मी तर फ़क्त

चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला

आणि ते म्हणाले 

तरी तुम्ही भाग्यवान.

एकेक जातजमात तरी

तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र

फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

 ---------------

कविता 2

 बर्फाचे तट पेटुनि उठले कुसुमाग्रज kusumagraj poems

बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते

रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते

असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे

अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे ?

कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे ?

साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते

सह्यगिरीतिल वनराजांनो या कुहरातुन आज पुढे

रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे

एक हिमाचल राखायास्तव करा हिमालय लक्ष खडे

समरपुराचे वारकरी हो समरदेवता बोलविते

खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले

कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले

काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले

शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते

कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे

कोटि कोटि देहांत आज या एक मनिषा जागतसे

पिवळे जहरी सर्प ठेचणे - अन्य मना व्यवधान नसे

एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे. धगधगते

---------------

कविता 3

तिमिरातुनी तेजाकडे kusumagraj kavita in marathi

 तिमिरातुनी तेजाकडे...

तिमिरातुनी तेजाकडे

ने दीपदेवा जीवना ॥

ज्योतीपरी शिवमंदिरी

रे जागवी माझ्या मना ॥

दे मुक्तता, भयहीनता

अभिमान दे, दे लीनता

दे अंतरा शुभदायिनी

मलयनिलासम भावना ॥

--------------

कविता 4

पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही

करावी किती भास्करा वंचना

किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी

कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे

न ती आग अंगात आता उरे

विझोनी आता यौवनाच्या मशाली

ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे

अविश्रांत राहील अन् जागती

न जाणे न येणे कुठे चालले मी

कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी

शिरी टाकिती दिव्य उल्काफुले

परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा

मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात

वेचूनिया दिव्य तेजःकण

मला मोहवाया बघे हा सुधांशू

तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैस

ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव

पिसाटापरी केस पिंजारुनी हा

करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी

पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ

करी प्रीतीची याचना लाजुनी

लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून

घेऊ गळ्याशी कसे काजवे

नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा

तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून

येतो कधी आठवाने वर

शहारून येते कधी अंग तूझ्या

स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे

मिळोनी गळा घालुनीया गळा

तुझ्या लाल ओठातली आग प्यावी

मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्

मला ज्ञात मी एक धुलिःकण

अलंकारण्याला परी पाय तूझे

धुळीचेच आहे मला भूषण 

--------------

कविता  5

जीर्ण पाचोळा kusumagraj kavita

आडवाटेला दूर एक माळ

तरू त्यावरती एकला विशाळ

आणि त्याच्या बिलगूनिया पदास

जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपीत जीवनासी

निशा काळोखी दडवु द्या जगासी

सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा

मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने

हसे मुठभर ते गवतही मजेने

वाटसरु वा तुडवीत त्यास जात

परि पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत

येइ धावत चौफेर क्षुब्ध वात

दिसे पाचोळा घेरुनी तयाते

नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी

पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी

----------

कविता 6

वेडात मराठे वीर दौडले सात

 वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥

“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता

रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता

अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता

भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील

जाळीत चालले कणखर ताठर दील”

माघारी वळणे नाही मराठी शील

विसरला महाशय काय लावता जात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ

छातीवर तुटली पटबंधाची गाठ

डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ

म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥

“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ

जरी काल विसरलो जरा मराठी जात

हा असा धावतो आज अरि-शिबिरात

तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले

सरदार सहा, सरसावूनी उठले शेले

रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले

उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना

अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना

छावणीत शिरले थेट भेट गनिमांना

कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी

समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी

गर्दीत लोपले सात जीव ते मानी

खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥

दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा

ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा

क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा

अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ 

 -----------------

कविता 7

चार होत्या पक्षिणी त्या kusumagraj poems

चार होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी

चार कंठी बांधलेली एक होती साखळी

दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एक ती

आणि एकीला कळेना जात माझी कोणती

बाण आला एक कोठुन जायबंदी हो गळा

सावलीला जाण आली जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले ? गीत झाडांना दिले

आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले

या स्वरांचे सूर्य झाले, यात सारे पावले

---------------

कविता 8

क्रांतीचा जयजयकार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार

अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत

पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?

सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश

पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश

तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार

कधीही तारांचा संभार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान

कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान

संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान

बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान

मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?

अहो हे कसले कारागार?

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती

होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती

कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे

बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे

एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार

होता पायतळी अंगार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत

अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत

सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात

बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात

तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार

तयांना वेड परि अनिवार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात

तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात

चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार

देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर

देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार

आई वेड्यांना आधार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल

सरणावरती आज अमुची पेटता प्रेते

उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते

लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार

आई, खळखळा तुटणार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

आता कर ॐकारा तांडव गिळावया घास

नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास

रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर

पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर

शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार

मरणा, सुखेनैव संहार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार

 ----------------

कविता 9

प्रेम कर भिल्लासारखं-कवी kusumagraj kavita

पुरे झाले चंद्र-सुर्य, पुरे झाल्या तारा,

पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा राहा,

जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा

सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?

डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,

जास्तीत-जास्त बारा महिने बाई बसेल झुरत

नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,

प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,

प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,

मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,

बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!

----------------

कविता 10

कणा

ओळखलत का सर् मला पावसात आला कोणी

कपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन

गंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन

माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचली

मोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली

भिंत खचली चूल वीझली होते नव्हते नेले

प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले

कारभारणीला घेऊण संगे सर आता लढतो आहे

पडकी भिंत बान्धतो आहे चिखल गाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरि मोडला नाहि कणा

पाठीवरती हात ठेउन नुसते लढ म्हणा.

----------------

Kusumagraj Poems In Marathi

कविता 11

 स्वातंत्र्यदेवीची विनवणी

पन्नाशीची  उमर गाठली अभिवादन मज करू नका ।

मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।

काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।

अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।

एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।

करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।

मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।

कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।

करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।

इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।

भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥

 ---------------

kusumagraj yanchi kavita

कविता 12

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळुदे तारे!

विराट वादळ हेलकावुदे पर्वत पाण्याचे ढळुदे दिशाकोन सारे!

ताम्रसुरा प्राशून मातुदे दैत्य नभामधले दडुद्या पाताळी सविता

आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला कराया पाजळुदे पळिता!

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान

जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान!

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालू दे फुटूदे नभ माथ्यावरती

आणि तुटुदे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती!

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम

नक्षत्रापरि असीम नीलांमधे संचरावे दिशांचे आम्हाला धाम!

काय सागरी तारू लोटले परताया मागे असे का हा अपुला बाणा

त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी जपावे पराभूत प्राणा!

कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन् मरती जशी ती गवताची पाती

नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती!

मार्ग ना आमुचा रोधू शकती ना धन, ना दारा घराची वा वितभर कारा

मानवतेचे निशाण मिरवू महासागरात जिंकुनी खंड खंड सारा!

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला

“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!”

– कुसुमाग्रज

---------------

कविता 13

एकदा ऐकले काहींसें असें

असीम अनंत विश्वाचे रण

त्यात हा पृथ्वीचा इवला कण

त्यांतला आशिया भारत त्यांत

छोट्याशा शहरीं छोट्या घरांत

घेऊन आडोसा कोणी 'मी' वसें

क्षुद्रता अहो ही अफाट असें!

भिंतीच्या त्रिकोनी जळ्मट जाळी

बांधून राहती कीटक कोळी

तैशीच सारी ही संसाररीती

आणिक तरीही अहंता किती?

परंतु वाटलें खरें का सारें?

क्षुद्र या देहांत जाणीव आहे

जिच्यात जगाची राणीव राहे

कांचेच्या गोलांत बारीक तात

ओतीत रात्रीत प्रकाशधारा

तशीच माझ्या या दिव्याची वात

पाहते दूरच्या अपारतेंत!

अथवा नुरलें वेगळेंपण

अनंत काही जेंत्याचाच कण!

डोंगरदऱ्यांत वाऱ्याची गाणीं

आकाशगंगेत ताऱ्यांचे पाणीं

वसंतवैभव उदार वर्षा

लतांचा फुलोरा

केशरी उषा....प्रेरणा यांतून सृष्टीत स्फुरे

जीवन तेज जें अंतरी झरे

त्यानेच माझिया करी हो दान

गणावे कसे हें क्षुद्र वा सान?

--------------

कविता 14

नज़र

मार्क्स रसेल सारखे

सर्व नास्तिक

विश्वाच्या उत्पत्तीवर रहा

नियमाजवळ

उदय नाही अंत नाही

आकार नाही रंग नाही

या मार्गाने नाही, त्या मार्गाने नाही

अशा पृथ्वीवरील कायद्याच्या जवळ

एक स्वयंपूर्ण संवेदनाहीन अस्तित्व जवळ

माझे तर्क सहमत आहे

आणि तरीही असे दिसते

की हे नास्तिक

मध्यरात्री वर

कधीही पहिले नाही

ताऱ्यांनी भरलेले

धुके असलेले आकाश

माझ्याद्वारे उजवीकडे.

---------------

कविता 15

 कोलम्बसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या

समुद्रा, डळमळू दे तारे !

विराट वादळ हेलकावूदे पर्वत पाण्याचे

ढळुदे दिशाकोन सारे !

ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले

दडुद्या पाताळी सविता

आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला

करायला पाजुळुदे पलीता !

की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान

मिळाया प्रमत्त सैतान

जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती

करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भिषण नर्तन असेच चालु दे

फुटू दे नभ माथ्यावरती

आणि, तुटु दे अखंड ऊल्का वर्षावत अग्नी

नाविका ना कुठली भिती

सहकाऱ्यानो, का हि खंत जन्म खलाशांचा

झूंजण्या अखंड संग्राम

नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे

दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारू लोटले परताया मागे

असे का हा आपुला बाणा

त्याहुनी घेऊ जळी समाधि, सुखे कशासाठी

जपावे पराभुत प्राणा ?

कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती

जशी ती गवताची पाती

नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली

निर्मीतो नव क्षितिजे पूढती !

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन, ना दारा

घराची वा वितभर कारा

मानवतेचे निशाण मिरवू महासागरात

जिंकुनी खंड खंड सारा !

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती

कथा या खुळ्या सागराला

“अनंत अमुची ध्येया  सक्ती अनंत अन आशा

किनारा तुला पामराला”

---------------

कविता 16


स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या, राजस राजकुमारा

अपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा

सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरती

वैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती

मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारा

रात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला

जागही नव्हती, नीजही नव्हती, नव्हता अर्थ कशाला

हारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा

--------------

कविता 17


संस्कृति

आणि शेवटी

संस्कृती आहे

माझ्या मनाची शक्ती

जे अनंत आहे

त्याला देण्यासाठी सीमा

वैश्विक देवत्वाकडे

मंदिराची… मूर्तीची…

मृत्यूच्या बाणरहित समुद्राकडे

मोक्षाचा… भक्तीचा…

प्रेमाचा… शक्तीचा…

ही संस्कृती

मला वायर

मलाही मारत आहे

 --------------

कविता 18

 बर्फाचे तट पेटुनी उठले 

बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते

         रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते  I I धृ I I 

असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे

अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे ?

कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे ?

साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडत

सह्यगिरीतिल वनराजांनो या कुहरातुन आज पुढे

रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे

एक हिमालय  राखायास्तव करा हिमालय लक्ष खडे

समरपुराचे वारकरी हो समरदेवता बोलविते

खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले

कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले

काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले

शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते

कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे

कोटि कोटि देहांत आज या एक मनिषा जागतसे

पिवळे जहरी सर्प ठेचणे – अन्य मना व्यवधान नसे

एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे. धगधगते

 ---------------

कविता 19

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या

समुद्रा, डळमळू दे तारे !

विराट वादळ हेलकावूदे पर्वत पाण्याचे

ढळुदे दिशाकोन सारे !

ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले

दडुद्या पाताळी सविता

आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला

करायला पाजुळुदे पलीता !

की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान

मिळाया प्रमत्त सैतान

जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती

करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भिषण नर्तन असेच चालु दे

फुटू दे नभ माथ्यावरती

आणि, तुटु दे अखंड ऊल्का वर्षावत अग्नी

नाविका ना कुठली भिती

सहकाऱ्यानो, का हि खंत जन्म खलाशांचा

झूंजण्या अखंड संग्राम

नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे

दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारू लोटले परताया मागे

असे का हा आपुला बाणा

त्याहुनी घेऊ जळी समाधि, सुखे कशासाठी

जपावे पराभुत प्राणा ?

कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती

जशी ती गवताची पाती

नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली

निर्मीतो नव क्षितिजे पूढती !

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन, ना दारा

घराची वा वितभर कारा

मानवतेचे निशाण मिरवू महासागरात

जिंकुनी खंड खंड सारा !

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती

कथा या खुळ्या सागराला

"अनंत अमुची ध्येयसक्ती अनंत अन आशा

किनारा तुला पामराला”

-----------------

कविता 20


पेड़

तू पाऊस आहेस

तू सूर्यप्रकाश आहेस

मी फक्त एक झाड आहे

आकाशात कोरलेले

तुझे पावसाचे थेंब

तुमचा सनबर्न

तुझे वादळ

शरीरावर त्रास

थकलेले

 -----------------

कविता 21

जाता जाता गाईन मी

गाता गाता जाईन मी

गेल्यावरही या गगनातील

गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे

कधी मनाचे कधी जनाचे

कधी घनाशय कधी निराशय

केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ

वा रागांचा संकर गोंधळ

कधी आर्तता काळजातली

केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन

कधी स्मशानामधले क्रंदन

अजणातेचे अरण्य केव्हा

केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा मले नाही

खेद खंत ना उरले काही

अदृष्यातील आदेशांचे

ओझे फक्त वाहणे

---------------------

कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता

कविता 22

गाभारा 

दर्शनाला आलात? या..

पण या देवालयात, सध्या देव नाही

गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.

सोन्याच्या सम्या आहेत, हिऱ्यांची  झालर आहे.

त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.

वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या

पाहीलात ना तो रिकामा गाभारा?

नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे

काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,

दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा

दोन तास वामकुक्षी घ्यायचा

सार काही ठीक चालले होते.

रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग

पडत होते

पायाशी.

दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते

मंत्र जागर गाजत होते

रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.

बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.

सारे काही घडत होते.. हवे तसे

पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव

उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला

कोणी एक भणंग महारोगी

तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”

आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय

गाभारा रिकामा

पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..

परत? कदाचित येइलही तो

पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर

त्याला पुन्हा..

प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,

आमच्या ट्रस्टींना,

पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी

पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.

तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,

कारण गाभारा सलामत तर देव पचास.

 ---------------

कविता 23

डाव  kusumagraj kavita

तिन्ही सांजच्या धुक्यात

किती कळशी घेऊन

कुंकाउ कापली भरून

 गेलीस तू

वाट पाहून माझे

शेवाळलेले डोळे

पाय भयभीत वाले नदीकडे

तेथे काळे तुझा डाव

घाट पदे घाटावर

रेषा कुंकवाच्या चार पाण्यावरी

--------------

कविता 24

स्वायत्त

तुझ्या संतप्त शब्दांचा स्पर्श

तुझ्या ओठांनी नकार दिला

आणि तटस्थ स्वायत्तता

ते थरथर कापले

माझ्या ओठांना

अंतर भरून काढण्यासाठी

-----------

कविता 25


निरोप

गर्दीत बाणासम ती घुसोनि

चाले, ऊरेना लव देहभान

दोन्ही करांनी कवटाळूनीया

वक्ष:स्थळी बालक ते लहान

लज्जा न, संकोच नसे, न भीती

हो दहन ते स्त्रीपण संगरात

आता ऊरे जीवनसूत्र एक

गुंतोनी राहे मन मात्र त्यात

बाजार येथे जमला बळींचा

तेथेही जागा धनिकांस आधी

आधार अश्रूसही दौलतीचा

दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

चिंध्या शरीरावरी सावरोनी

राहे जमावात जरा उभी ती

कोणी पहावे अथवा पुसाव?

एकाच शापातून सर्व जाती

निर्धार केला कसला मानसी

झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे

फेकूनिया बाळ दिले विमाने

व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

“जा बाळा जा, वणव्यातुनी या

पृथ्वीच आई पुढती तुझी रे

आकाश घेईं तुजला कवेंत

दाही दिशांचा तुज आसरा रे”

ठावे न कोठे मग काय झाले

गेले जळोनीं मन मानवाचे

मांगल्य सारे पडले धुळीत

चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!

 -----------

कविता 26

माझे जीवनगाणे kusumagraj kavita

माझे जगणे होते गाणे

सुरेल केंव्हा, केंव्हा बेसुर

तालावाचून वा तालावर

कधी तानांची उनाड दंगल

झाले सुर दिवाणे

कधी मनाचे कधी जनाचे

कधी धनास्तव कधी बनाचे

कधी घनाशय कधी निराशय

केवळ नादतराणे

आलापींची संथ सुरावळ

वा रागांचा संकर गोंधळ

कधी आर्तता काळजातली

केंव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन

कधी स्मशानामधले क्रन्दन

अजाणतेचे अरण्य केंव्हा

केंव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही

खेद खंत ना उरली काही

अदॄश्यातिल आदेशांचे

ओझे फक्त वाहणे

सुत्रावाचून सरली मैफल

दिवेही विझले सभागॄहातिल

कशास होती आणि कुणास्तव

तो जगदीश्वर जाणे

-------------

कविता 27

चिड़िया

फांदीवर पक्षी

राखाडी पांढरा

रडणे –

माझ्याकडे बघत आहे

आकाशाकडे पहात आहे

रडणे –

फांदीवर पक्षी

राखाडी पांढरा

रमझुम नाचते

माझे मन थकून जाते –

पक्ष्यांची हालचाल

आकाशात घडते

मग त्याच्याकडे खूप आहे

ज्ञात आहे.

-----------

कविता 28

दाँव

संधिप्रकाश धुक्यात

कमरेवर फुलदाणी धरून

कपाळावर सिंदूर लावणे

तू गेलास

मार्ग पाहून

माझे दगड डोळे

घाबरलेली पावले

नदीच्या खाली

तुमची पण माहिती आहे

कलश बाणावर पडला

कुमकुमच्या चार ओळी

पाण्यावर

----------

कविता 29

अजूनही kusumagraj kavita in marathi

अजूनही

निळया जांभळ्या नदीला

आंबेवनाची सावली

भेट पहिलीवहिली

अकल्पित

... भेट दुरस्थपणाची

गर्भरेशमी क्षणाची

सौदामिनीच्या बाणाची

देवघेव.

गुलबक्षीच्या फुलानी

गजबजले कुपण

वेचू लागला श्रावण

मोरपिसे।

ओल्या आभाळाच्या खाली

इद्रचापाचे तुकडे

तुझा करपाश पडे

जीवनास.

कधी रेताडीचे रस्ते

कधी मोहरली बाग

कधी प्रासादास आग

कर्पुराच्या।

सप्तसुरातुनी गेले

माझ्या जीवनाचे गीत

तुझ्या सारगीची तात

साथ झाली.

बर्फवाट शिशिराची

आता पुढलिया देशी

तुझ्या मिठीची असोशी

अजूनही.

--------------

Kusumagraj Poems In Marathi

कविता 30

आश्चर्य

ती आदिवासी वृद्ध स्त्री

नश्वर भीतीने writhing

डोंगराच्या काठावर गेला

आणि बाजूला उभा राहिला

दगडासारखा सरडा

नग्न शरीर

हजार सुरकुत्या असलेल्या त्वचेत पुरले

हाडांचे वृद्धत्व

मी क्षणभर आदिवासी झालो

आणि त्याच्याकडे पाहिले,

अरे आश्चर्य

तिच्या एका चहातून

आमची संसद लटकत होती

आणि दुसऱ्या बंडलला लटकत होता

आमचे साहित्य संमेलन.

----------------

कविता 31

दुशाला

ही सुरुवात नसलेली खोल जमीन बर्फाने झाकलेली आहे

मला क्षितिजापलीकडे काही दिसत नाही

फक्त बर्फ

रुपसगंधाचे सारे महासागर

अनंत रहस्यांचा तरल तिच्या मौनात साठवून ठेवणारी

जो भावनाहीन हसत जगाच्या आणि युगांच्या सीमा गोठवतो

फक्त बर्फ

या बर्फाच्या मैदानाच्या मध्यभागी ती छोटीशी चंद्रशाळा उगवली होती

जो सात रंगांचे हजारो धागे विखुरतो

रुपनगरची राजकुमारी

या क्राफ्ट फ्लॉवरने त्या सार्वत्रिक बर्फाचा पराभव केला आहे

आणि तिच्या नग्नावस्थेत कलाबत्तूची दोरी फेकली

नावाचे

अस्तित्वाचे

आणि अर्थाचा देखील.

--------------

कवी कुसुमाग्रज यांच्या १० प्रसिद्ध कविता   

कविता 32

समझ

आणि अ-

मी असा विचार करत होतो

जीवनाचे कोनशिले

प्रेम पसरले

मी कोणाला तरी

मला कधीच जमणार नाही

पण तू तुझा

हाडांचे हात

मला सुपूर्द केले

आणि मृत्यूची नदी कायम आहे

आणि अद्याप

स्मितच्या मृत्यूचा प्रयत्न

डोळ्यांनी

माझ्याकडे बघतच राहिले,

मग-

त्यालाही समजलं…

-------------

कणा: ओळखलत का सर मला (Kana Marathi Kavita) – कुसुमाग्रज

कविता 33

निरोप kusumagraj kavita in marathi

गर्दीत बाणासम ती घुसोनि

चाले, ऊरेना लव देहभान

दोन्ही करांनी कवटाळूनीया

वक्ष:स्थळी बालक ते लहान

लज्जा न, संकोच नसे, न भीती

हो दहन ते स्त्रीपण संगरात

आता ऊरे जीवनसूत्र एक

गुंतोनी राहे मन मात्र त्यात

बाजार येथे जमला बळींचा

तेथेही जागा धनिकांस आधी

आधार अश्रूसही दौलतीचा

दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

चिंध्या शरीरावरी सावरोनी

राहे जमावात जरा उभी ती

कोणी पहावे अथवा पुसावे?

एकाच शापातून सर्व जाती

निर्धार केला कसला मानसी

झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे

फेकूनिया बाळ दिले विमाने

व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

"जा बाळा जा, वणव्यातुनी या

पृथ्वीच आई पुढती तुझी रे

आकाश घेईं तुजला कवेंत

दाही दिशांचा तुज आसरा रे"

ठावे न कोठे मग काय झाले

गेले जळोनीं मन मानवाचे

मांगल्य सारे पडले धुळीत

चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!

--------------

कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता (kusumagraj yanchi kavita)

कविता 34

 कणा  

“ओळखलत क सर मला?’ पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे, चिख्लगाळ काढतो आहे ,

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा !

 --------------

वि.वा शिरवाडकर कविता (kusumagraj poems on nature)

कविता 35

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा

हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात

ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात

नाही पसरला कर, कधी मागायास दान

स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान

हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही

हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही

माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन

स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान

रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी

चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी

रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर

येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर

माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान

हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा

हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा

– कुसुमाग्रज मराठी कविता

---------------

कुसुमाग्रज प्रेम कविता (kavi kusumagraj prem kavita in marathi)

पूर्ण झाले चंद्रसूर्य, पुऱ्या झाल्या तारा

पुऱ्या झाल्या नदीनाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा रहा

जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा

शेवाळलेले शब्द आणिक

यमकछंद करतील काय ?

डांबरी सडकेवर श्रावण, इंद्रधनू बांधतील काय ?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत,

जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत

नंतर तुला लगिनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय ?

म्हणून म्हणतो जागा हो, जाण्यापूर्वी वेळ

प्रेम नाही अक्षरांच्या, भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,

प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहण.

प्रेम कर भिल्लासारख, बाणावरती खोचलेल

मतीवरती उगवूनसुद्धा, मेघापर्यंत पोहचलेल

शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस.

उधळून दे तूफान सगळं

काळजामध्ये साचलेलं

प्रेम कर भिल्लासारख

बाणावरती खोचलेल..

– कुसुमाग्रज

---------------

कुसुमाग्रज प्रेम कविता

कविता 36

गाभारा kusumagraj poem in Marathi

दर्शनाला आलात? या..

पण या देवालयात, सध्या देव नाही

गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.

सोन्याच्या सम्या आहेत, हिर्यांची झालर आहे.

त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.

वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या

पाहीलात ना तो रिकामा गाभारा?

नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे

काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,

दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा

दोन तास वामकुक्षी घ्यायचा

सार काही ठीक चालले होते.

रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग

पडत होते पायाशी..

दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते

मंत्र जागर गाजत होते

रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.

बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.

सारे काही घडत होते.. हवे तसे

पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव

उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला

कोणी एक भणंग महारोगी

तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”

आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय

गाभारा रिकामा

पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..

परत? कदाचित येइलही तो

पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर

त्याला पुन्हा..

प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,

आमच्या ट्रस्टींना,

पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी

पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.

तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,

कारण गाभारा सलामत तर देव पचास.

-------------

kusumagraj kavita कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता | kusumagraj poems in Marathi


कविता 37

गीदड़

आकाश

लाल भडका

रक्तरंजित मांस कट

गर्दी –

आणि

जमिनीवर

त्या आकाशाकडे

एकटक

कोल्हाळ-

गतिहीन

असंख्य

या क्षितिजापासून

त्या क्षितिजापर्यंत.

-------------

Kusumagraj Poems In Marathi

कविता 38

हसरा नाचरा, जरासा लाजरा,

सुंदर साजिरा श्रावण आला

तांबुस कोमल पाऊल टाकीत

भिजल्या मातीत श्रावण आला

मेघात लावीत सोनेरी निशाणे

आकाश वाटेने श्रावण आला

लपत छपत हिरव्या रानात,

केशर शिंपीत श्रावण आला

इंद्रधनुच्या बांधीत कमानी

संध्येच्या गगनी श्रावण आला

लपे ढगामागे, लपे माळावर,

असा खेळकर श्रावण आला

सृष्टीत करीत सुखाची पेरणी

आनंदाचा धनी श्रावण आला…

– कवी कुसुमाग्रज यांची प्रसिध्द कविता

-------------

कुसुमाग्रजांच्या मराठीतील कविता (Kusumagraj Poems In Marathi)


कविता 39

वादळवेडी kusumagraj poems

नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा

कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात

... उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी

कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात

हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी

कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात

ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया

हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्यात

-----------

मित्रांनो तुम्हाला यापैकी कुठली कविता आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा  . तसेच तुम्हाला आणखी कोणत्या कवीच्या कविता वाचायला आवडतील याविषयी मला कमेंट करून नक्की कळवा.

 तसेच कुसुमाग्रज याच्या 40 प्रसिद्ध कविता या पोस्टमध्ये काही सुधारणा असतील तर त्या सुद्धा कमेंट मध्ये सांगा आम्ही त्या लगेच अमलात आणू धन्यवाद

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post