मराठी पत्र लेखन - patra lekhan marathi [ letter writing in marathi ]

मराठी पत्र लेखन - patra lekhan marathi [ letter writing in marathi ]

मित्रांनो आज आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये मराठी पत्र लेखन कसे करायचे हे बघणार आहोत मराठी पत्र लेखन  (patra lekhan marathi) करत असताना  त्यामध्ये कोणते कोणते मुद्दे महत्त्वाच्या आहेत यावर सुद्धा आपण भर देणार आहोत उदाहरणार्थ 

  • marathi letter format
  • formal letter in marathi
  • informal letter format in marathi

पत्र लेखन करत असताना पत्रलेखनाचे दोन प्रकार पडतात anopcharik patra , aopcharik patra हे सर्व मी तुम्हाला आमच्या पोस्टमध्ये समजावून सांगितले आहे तर चला बघूया मराठी पत्र लेखन कसे करायचे

पत्रलेखनाचे प्रकार पत्रलेखनाचे स्थूलमानाने दोन प्रकार : patra lekhan marathi

( १ ) औपचारिक पत्रे 
( २ ) अनौपचारिक पत्रे . 

मराठी पत्र लेखन - patra lekhan marathi [ letter writing in marathi ]

( १ ) औपचारिक पत्रे : पत्रलेखन मराठी 

औपचारिक पत्रे - दैनंदिन जीवनात आपल्या काही अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला शासकीय कार्यालयांत किंवा खाजगी कंपन्यांच्या कार्यालयांत जावे लागते . आपली कामे व्हावीत म्हणून या कार्यालयांत आपल्याला पत्रे सादर करावी लागतात . या पत्रांना ' औपचारिक पत्रे ' म्हणतात . कधी कधी आपल्याला त्रयस्थ व्यक्तींनाही काही कामानिमित्त पत्र लिहावे लागते . हेही ' औपचारिक पत्र'च होय 

आपली कामे कोणालाही त्रास न होता , बिनचूक व त्वरेने होण्यासाठी अशी पत्रे विशिष्ट पद्धतीने लिहिली जातात . त्यांची एक ठरलेली रूपरेषा असते . त्यात शिष्टाचार व उपचार पाळावे लागतात . या पत्रांत पाल्हाळ , फापटपसारा नसतो . 

कामाचे स्वरूप थोडक्यात व अत्यंत नेमकेपणाने स्पष्ट केलेले असते . मित्रांना किंवा नातेवाईकांना लिहिलेल्या पत्रात जशी सलगी व्यक्त होते , तशी सलगी औपचारिक पत्रात नसते . ही औपचारिक पत्राची वैशिष्ट्ये आहेत . औपचारिक पत्रांचे स्थूलमानाने पुढीलप्रमाणे काही उपप्रकार मानले जातात : 

( १ ) निमंत्रणपत्र 
 ( २ ) आभारपत्र 
( ३ ) अभिनंदनपत्र किंवा गौरवपत्र 
( ४ ) चौकशीपत्र 
( ५ ) क्षमापत्र
( ६ ) मागणीपत्र 
( ७ ) विनंतिपत्र 
( ८ ) तक्रारपत्र



औपचारिक पत्र लिहिताना बाळगायची दक्षता : patra lekhan marathi

( १ ) पत्राच्या वरच्या भागात ' श्री ।। ' वगैरे शुभदर्शक काहीही लिहिण्याची गरज नाही . 
( २ ) आपली ओळख पटवणारा कोणताही मजकूर - खूण , आकृती , शुभचिन्ह इत्यादी - लिहू नये .
 
( ३ ) पत्राची सुरुवात करताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा .
( ४ ) प्रेषक व प्रति यांचे पत्ते प्रश्नपत्रिकेत दिलेले असतील ; तर तेच लिहावेत : पत्ते दिलेले नसतील , तर ते  काल्पनिक लिहावेत . 

( ५ ) प्रेषक व प्रति यांची नावे दिलेली असल्यास तीच लिहावीत . अन्यथा अ.ब.क. किंवा तत्सम अक्षरे लिहावीत .  सही करू नये . 
( ६ ) औपचारिक पत्रात मायना लिहिल्यावर त्यानंतरच्या ओळीत विषय लिहावा . ' संदर्भ ' दयायचा असेल , तर तो  विषया नंतरच्या ओळीत लिहावा . 

( ७ ) त्यानंतरच्या ओळोत आवश्यकतेप्रमाणे महोदय ' महोदया हे संबोधन लिहावे आणि स्वल्पविराम दयावा . 
 ( मा . महोदय महोदया ' किंवा ' माननीय महोदय महोदया ' असे लिहू नये . फक्त महोदय ' / ' महोदया 'एवढेच लिहावे . ) 

( ८ ) त्यानंतरच्या ओळीत मजकुराला सुरुवात करावी . 
( ९ ) " आपला विश्वासू ' , ' आपला कृपाभिलाषी ' या शब्दांनी शेवट करून त्याखाली आवश्यकतेप्रमाणे अ.ब.क. किंवा नाव आणि पत्ता लिहावा . 

अभ्यासक्रमातील पत्रांचे स्वरूप : 


१. कौटुंबिक पत्रे : पत्रलेखन मराठी

कौटुंबिक पत्रे : आई , वडील , भाऊ , बहीण , अन्य आप्त , मित्रमंडळी वगैरेना विविध कारणांनी लिहिली जाणारी पत्रे ही कौटुंबिक पत्रे होत . या माणसांशी असलेले नाते आपुलकीचे , जिव्हाळ्याचे असते . प्रत्येक व्यक्तीशी आपला जसा संबंध असतो , तसे पत्र लिहिले जाते . म्हणून ही पत्रे चाकोरीबद्ध नसतात . 

ती मोकळीढाकळी असतात . तरीही या प्रकारच्या पत्रलेखनाचे काही संकेत निर्माण झाले आहेत . साधारणपणे खुशाली , अभिनंदन , परीक्षा वगैरेंमधील यश , जन्म - मृत्यू यासंबंधीची माहिती अशा अनेक बाबी ( ज्याच्या संबंधात संबंधित व्यक्तींना जिव्हाळा वाटत असतो त्या बाबी ) एकमेकांना कळवण्यासाठी , भावनाविचारांची देवाणघेवाण करण्यासाठी पत्रे लिहिली जातात . व्यक्तिगत जीवनातील सर्व वाची कौटुंबिक पत्रात येऊ शकतात . 

मराठी पत्र लेखन - patra lekhan marathi [ letter writing in marathi ]

२. मागणीपत्र : पत्रलेखन मराठी


मागणीपत्र - एखादया वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र म्हणजे ' मागणीपत्र ' होय . सार्वजनिक जीवनात सौजन्याने वागण्याचे संकेत असतात , म्हणून पत्रात विनंतीची भाषा वापरली जाते . मात्र , पत्राच्या केंद्रस्थानी मागणीच असते .

मागणीपत्राची काही वैशिष्ट्ये : 
( १ ) मागणी पुरवणाऱ्याला योग्य तो मोबदला देण्याची आपली तयारी असते . 
( २ ) पैशाच्या बदल्यात वस्तू - सेवा देण्याघेण्याचा रोकडा व्यवहार . त्यात भावनेचा अंश कमी असतो . 
( ३ ) वस्तूचा दर्जा चांगला असावा , किंमत वाजवी असावी , विक्रीनंतरची सेवा उपलब्ध असावी इत्यादी उपेक्षा असतात . 

मराठी पत्र लेखन - patra lekhan marathi [ letter writing in marathi ]

३. विनंतिपत्र : पत्रलेखन मराठी



( १ ) एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला लिहिलेले कोणत्याही स्वरूपातील मदत करण्याची विनंती करणारे पत्र म्हणजे ' विनंतिपत्र ' होय . मदत करणे हे त्या संबंधित व्यक्तीच्या पूर्णपणे इच्छेवर अवलंबून असते . म्हणून संबंधित व्यक्तीला विनंतीच करावी लागते . मुख्य विषयाबरोबर विनंतीची भावनाही केंद्रस्थानी आहे . म्हणून हे विनंतिपत्र होय . 

( २ ) निमंत्रणे देणे , देणगी मागणे , स्थळभेटीसाठी परवानगी घेणे , एखादया तज्ज्ञ व्यक्तीच्या ज्ञानाचा , व्यासंगाचा , अनुभवाचा लाभ व्हावा म्हणून त्या व्यक्तीला निमंत्रण देणे . अग्निशमनदलासारख्या संस्थांना मार्गदर्शनासाठी बोलावणे , शालेय समिती मध्ये सहभागी होण्यासाठी नगरसेवक किंवा सरपंच यांना आमंत्रित करणे , विदयार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकांना आवाहन करणे यांसारख्या प्रसंगांत विनंतिपत्रे लिहिली जातात . पत्रलेखन

मराठी पत्र लेखन - patra lekhan marathi [ letter writing in marathi ]

( 4 ) अनौपचारिक पत्रे :  anopcharik patra format

अनौपचारिक पत्रे - आई , वडील , भाऊ , बहीण वा इतर कोणी आप्त आणि मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे , ही अनौपचारिक पन्ने होत . हल्ली संदेशवहनातील प्रचंड क्रांतीमुळे अनौपचारिक पत्रे लिहिण्याची गरज जवळजवळ संपुष्टात आली आहे . त्यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार हल्ली फारच कमी प्रमाणात होतो . इंटरनेट , संगणक , मोबाइल फोन यांमुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार मंदावला आहे .

 हे खरे असले , तरी त्यांच्यामुळे पत्रव्यवहार चालूसुद्धा राहिला आहे . काही वेळा माणसे कामात असतात . संपर्क होऊ शकत नाही . अशा वेळी ई - मेलद्वारे पत्रे पाठवली जातात . किंबहुना आता तंत्रज्ञानाचा प्रभाव व सुलभता यांमुळे ई - मेलचा प्रसार खूपच वाढला आहे .

 ई - मेलवरील पत्रलेखनाची एक विशिष्ट पद्धत आहे . पारंपरिक पत्रलेखनाहून थोडी वेगळी आहे . ई - मेलवरील पत्रलेखनाचे संकेतही थोडे वेगळे आहेत . यापुढे तंत्रज्ञानाच्या आधारेच पत्रव्यवहार प्राधान्याने होणार असल्याने त्या पद्धतीचा परिचय होणे आवश्यक आहे . म्हणून पत्राचे प्रारूप ई - मेल पद्धतीनुसार स्वीकारले आहे . या वर्षापासून दहावीच्या अभ्यासक्रमात कौटुंबिक स्वरूपाच्या पत्रांचा समावेश केलेला आहे . 

अनौपचारिक पत्र लिहिताना बाळगायची दक्षता : aupcharik patra in marathi

( १ ) अनौपचारिक पत्रात एखादया व्यक्तीला लिहिलेल्या पत्राचा नमुना तयार करायचा आहे . उदा अभिनंदनपर  पत्र . 
( २ ) पत्राच्या वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात तारीख लिहावी . 

( ३ ) पत्राचा विषय लिहिण्याची आवश्यकता नाही . 
( ४ ) पत्र कोणत्या व्यक्तीला लिहीत आहोत , हे लक्षात घेऊन मायना लिहावा . 

( ५ ) आईवडिलांना ' शिरसाष्टांग नमस्कार ' किंवा ' शि . सा . नमस्कार ' आणि कुटुंबातील इतरांना सा . न . / साष्टांग नमस्कार / नमस्कार / आशीर्वाद यांपैकी योग्य ते शब्द लिहावेत . 
( ६ ) पत्रातील मजकूर लिहिताना योग्य तेथे परिच्छेद पाडावेत . 

( ७ ) पत्राची भाषा सहज बोलल्यासारखी व घरगुती असावी . 
( ८ ) पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा . समारोपाचा मायना योग्य असावा .

मराठी पत्र लेखन - patra lekhan marathi

 ⏩ Patra Lekhan Marathi Nibandh
 ⏩ Marathi Patra Lekhan Namuna
 ⏩ Marathi Patra Lekhan Informal
 ⏩ Patra Lekhan in Marathi Examples
 ⏩ Marathi Patra Lekhan App

मराठी पत्र लेखन - patra lekhan marathi [ letter writing in marathi ]



पत्रलेखन ही कला आहे. आपल्या मनातले भाव/विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे तसेच आपल्या 
भावना/विचारांचे चांगल्या भाषेत संक्रमण करण्याचे पत्र हे एक उत्तम लिखित साधन आहे.
तुम्ही मागील वर्षीही ‘पत्रलेखन’ या घटकाचा अभ्यास केलेला आहे. ते पत्रलेखन तुम्ही पारंपरिक 
पद्धतीने करत होतात. आता तुम्ही तंत्रज्ञान युगात वावरत आहात. संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, मेल यांद्वारे तुमची तंत्रज्ञानाशी गट्टीही झाली आहे.

‘फोन’चा वापर वाढल्यानंतर पत्रलेखनाची गरज काहीशी कमी झालेली आहे. असे असले तरी 
अनौपचारिक पत्रात आपल्या भावना शब्दांत प्रभावीपणे व्यक्त करता येणे, हे आवश्यक कौशल्य आहे. तसेच औपचारिक पत्रासाठी आपले म्हणणे, विचार, मागणी, तक्रार, विनंती इत्यादी गोष्टी योग्य व कमीत कमी शब्दांत संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, हे आवश्यक कौशल्य आहे. 

आजही पत्रलेखन ही कला अात्मसात करणे आवश्यक आहे. यापुढे तंत्रज्ञानाच्या लेखनपद्धतीने आपले लेखन कौशल्य प्रकट व्हायला हवे. पत्रलेखनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. यापुढील काळात तुम्हांला मेल पाठवण्याचे तंत्र अवगत करावे लागणार आहे. म्हणूनच या वर्षी आपण पत्राचे प्रारूप हे नवीन तंत्रज्ञानानुसार, मेल पाठवण्याच्या पद्धतीनुसार लक्षात घेणार आहोत.


अनौपचारिक
कौटुंबिक  जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवले  जाणारे पत्र

औपचारिक
मागणी, विनंती कार्यालयीन व व्यावसायिक पत्र

औपचारिक
  • (१) प्रति, लिहिल्यानंतर व्यक्तीचा योग्य तो हुद्दा लिहिणे.
  • (२) पत्राचा विषय लिहिणे.
  • (३) अचूक शब्दांत नेमका आशय मांडणे. 
  • (४) पत्रात शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणे.

अनौपचारिक
  • (१) व्यक्तीचा उल्लेख योग्य/नात्याप्रमाणे/सन्मानपूर्वक करणे.
  • (२) व्यक्तीचे क्षेमकुशल विचारणे.
  • (३) भावना प्रभावी शब्दांत मांडणे.
  • (४) नात्यातील जिव्हाळ्यानुसार विस्तृत लेखन करणे.
  • (५) पत्राचा विषय लिहिण्याची गरज नाही.
  • (६) पत्रात शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणे आवश्यक.

मराठी पत्र लेखन - patra lekhan marathi [ letter writing in marathi ]

Application format in marathi - formal letter in marathi

प्रश्न 1 . पन्नाचा एक नमुना पुढे दिला आहे . हे पत्र व्हॉटस्अॅपवर आले आहे , अशी कल्पना करा आणि त्या पत्राच्या आशयात अंतर्भूत असलेला महत्त्वाचा विचार समजून घेऊन दिलेल्या सूचनेनुसार कृती करा

दिनांक : ४ जानेवारी २०१ ९ 
प्रति , 
वरद / वरदा ढोक , 
रामनगर , वर्धा . 
प्रिय चिन्मय / चिन्मयी , 
सप्रेम नमस्कार . 

पत्र लिहिण्याचे कारण की , माझ्या ताईचे लग्न ठरलेले असून ते शुक्रवार , दि . २५ जानेवारी २०१ ९ रोजी होणार आहे ताईच्या मते , सुंदर चित्रे असलेल्या पत्रिका लग्नानंतर कुठेही पडतात किंबहुना कधी पायदळी तुडवल्या जातात . म्हणून ताई लग्नपत्रिका छापण्यास तयार नसून , लग्नपत्रिकांच्या छपाईसाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम ‘ आदर्श विदयालय , वरोडा येथील शाळेस वृक्षारोपणासाठी देणार आहे . तरी हेच निमंत्रण समजून लग्नाला अवश्य यावे . तीर्थस्वरूप काका - काकूना साष्टांग नमस्कार . लहानांना शुभाशीर्वाद 

विवाह : वार व दिनांक : बुधवार , २५-०१-२०१९ 
वेळ : सकाळी ११ वा . १५ मि . 
सहभोजन : दुपारी १२ ते दु . ३ पर्यंत 
कार्यालय : ' शुभमंगल ' कार्यालय , जलारामनगर , वर्धा तुझा / तुझी , 
वरद / वरदा . 


मराठी पत्र लेखन - patra lekhan marathi [ letter writing in marathi ]


प्रश्न 2 तुमच्या जवळच्याच एका सॉफ्टवेअर कंपनीला इलेक्ट्रॉनिक लग्नपत्रिकेच्या नमुन्याची मागणी करणारे पत्र लिहा .
किंवा

 
दिनांक : १०-१-२०१९ 
प्रति , 
माननीय व्यवस्थापक , 
राही इन्फोटेक , 
वर्धा -४४२ ००१ . 

विषय : लग्नपत्रिकेची आज्ञावली ( Programme ) तयार करून देणे . 

महोदय , 
आम्हांला एक लग्नपत्रिका व्हॉटस्अॅप / ई - मेल या स्वरूपात सर्व निमंत्रितांना पाठवायची आहे . या पत्रिकेची एक आज्ञावली आम्हांला आपल्याकडून तयार करून हवी आहे , तीत पुढील सुविधा हव्या आहेत 
( १ ) पत्रिका युनिकोडमध्ये तयार करावी . 
( २ ) निमंत्रितांची यादी जोडण्याची सुविधा असावी . 
( ३ ) पत्रिका व यादी यांच्यात एक दुवा ( link ) असावा . या दुव्याच्या आधारे पत्रिकेवर निमंत्रिताचे नाव देता येईल , 
( ४ ) पत्रिकेत पत्रोत्तरासाठी आणखी एक दुवा हवा . या दुव्याच्या द्वारे निमंत्रित व्यक्ती त्यांच्याकडून किती व्यक्ती येणार याची नोंद करतील . 

कृपया आपले शुल्क कळवावे , ही विनंती . 
आपला 
अ . ब . क . 

पत्ता : 
१५ , महात्मा स्मृती , 
वर्धा - ४४२००१ . 
ई - मेल : xxx XX X X @ gmail.com 
भ्रमणध्वनी : ९९ XX XXX


प्रश्न 3 विद्यार्थिनी या नात्याने तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना हे पत्र काचफलकात प्रदर्शित करण्याची विनंती करणारे पत्र लिहा .

 विनंतिपत्र : 

दिनांक : १५-१-२०१९ 
प्रति , 
मा . मुख्याध्यापक , 
प्रगत विद्यामंदिर , 
महात्मा गांधी मार्ग , 
वर्धा -४४२००१ . 

विषय : सध्याच्या काळात आवश्यक असा विचार देणारे एक पत्र शाळेच्या काचफलकात लावणे . 

महोदय , 
माझ्या मैत्रिणीने व्हॉटस्अॅपवर मला पाठवलेल्या पत्राची प्रत मी सोबत जोडत आहे . त्या पत्रातील विचार अनेकांपर्यत पोहोचावा असे मला वाटते . म्हणून हे पत्र शाळेच्या काचफलकात लावण्यास परवानगी दयावी , ही विनंती . माझ्य मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नाचे हे निमंत्रण आहे . ते तिने मला व्हॉटस्अॅपवर पाठवले आहे . 

या पद्धतीने लग्नाचे निमंत्रण व्हॉटस्अॅपवर दिल्यास कागद वाचेल , त्यामुळे झाडे वाचतील . पर्यावरणाची हानी टळेल . यात आणखीही फायदे आहेत . सध्याचे मोबाइल तंत्रज्ञान सर्व माणसांना अवगत आहे . कोणीही कोणत्याही प्रसंगी हे तंत्रज्ञान वापरू शकतो . दिन त्यामुळे निमंत्रण क्षणार्धात व विनामूल्य पोहोचते . 

आपला वेळ , श्रम व पैसा यांची बचत होते . असा हा बहुगुणी विचार खूप लोकांपर्यंत पोहोचावा , म्हणून हे पत्र शाळेच्या काचफलकात लावण्याची कृपया परवानगी दयावी , अशी पुन्हा एकदा नम्र विनंती करते . 
 विदयार्थिनी
आपली आज्ञाधारक 
अ . ब . क .

अ . ब . क . 
२० , कामगार वसाहत , 
महात्मा गांधी मार्ग , 
वर्धा - ४४२ ००१ 
ई - मेल : XXXXXXXXXX 
दूरध्वनी : xxxxxxxx

3) जिगरी मित्राला वाढदिवसाचे आमंत्रण पत्र – Birthday invitation Letter in Marathi For Friend


12, मुक्ताई कॉलोनी 
गंगा नगर, हडपसर 
 पुणे-  13
 प्रिय विवेक,

जसे की तुला माहित आहे 15 जुलै रोजी माझा वाढदिवस येत आहे आणि हा वाढदिवस माझा तिसावा वाढदिवस असल्याकारणाने माझ्या आई-वडिलांनी हा वाढदिवस मोठा करण्याचे योजिले आहे.  तरी तू माझा जिगरी मित्र असल्याकारणाने तू माझ्या वाढदिवसाला यावे अशी विनंती करतो.  तू व काका-काकू नक्की माझ्या वाढदिवसाला या.

यावेळेस माझ्या आईवडिलांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला माझ्यासोबत पाहिजे त्यामुळे तू नक्की माझ्या वाढदिवसाला ये अशी विनंती मी तुला करतो 

तुझा प्रिय मित्र 
अभिषेक 

मराठी पत्र लेखन विषय, प्रकार, नमुना, मायना, उदाहरण

 ⏩ patra lekhan
 ⏩ informal letter format in hindi
 ⏩ anopcharik patra
 ⏩ letter writing in marathi
 ⏩ anopcharik patra format
 ⏩ patra lekhan marathi
 ⏩ formal letter in marathi
 ⏩ abhinandan patra
 ⏩ application format in marathi
 ⏩ patra lekhan marathi
 ⏩ aupcharik patra in marathi

मराठी पत्र लेखन विषय, प्रकार, नमुना, मायना, उदाहरण

मराठी निबंध LINKS
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा www.nirmalacademy.com
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध www.nirmalacademy.com
पहिला पाऊस मराठी निबंध www.nirmalacademy.com
रम्‍य पहाट मराठी निबंध www.nirmalacademy.com
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी www.nirmalacademy.com
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध www.nirmalacademy.com
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध www.nirmalacademy.com

4 Comments

Thanks for Comment

  1. Thanks For The Great Content sir. I will also share with my Friends and once again Thanks a lot.
    https://www.eletterwriting.com

    ReplyDelete
  2. तालुका स्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात तुमच्या शाळेला सहभागी करून घेण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा

    ReplyDelete
Previous Post Next Post