आळाशी कविता 8वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...
नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया
कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया
भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...
हातापायाला चिखल बाप घामामधी ओला
पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला
बाप आरोळी मारता तान्हा रडत उठतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...
बाप रगात होऊन रोज पाटातून व्हातो
मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो
दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...
येता भरात जोंधळा बाप काढणी करतो
स्वत: राहून उपाशी पोट जगाचं भरतो
जातो आळाशी होऊन तरी ‘आळा’ का तुटतो?
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...
- प्रसिद्ध कवी व गीतकार. शेती, निसर्ग, निसर्ग ग्रामीण भाग व शेतकरी हे त्यांच्या लेखनाचे आवडते विषय. विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अकयांसा ठी कथा, कविता व ललितलेखन. अनेक चित्रपट व अल्बम यांसा ठी गीतलेखन.
- याशिवाय त्यांचा ‘काकरी’ हा कवितांचा अल्बम प्रसिद्ध आहे. त्यांचा ‘भेगा भुईच्या सांदतसां ना’ हा काव्यसंग्रह प्रकाशित असून या काव्यसंग्रहाला आजपर्यंत १७ पुरस्कार मिळाले आहेत. शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून नभालाही पाझर फुटतो. त्याच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळते.
- भरघोस पीक यावे यासाठी शेतकरी पुन्हा पुन्हा रात्रंदिवस चिखलपाण्यात राबत राहतो. त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावर जगाचे पालनपोषण होते.
- त्यामुळे आपण शेतकऱ्यांविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे, हे या कवितेतून स्पष्ट होते. प्रस्तुत कविता ‘भेगा भुईच्या सांदतसांना’ या काव्यसंग्रहातून घेतली आहे.
आळाशी कविता 8वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
Tags:
मराठी कविता