अन्नजाल कविता 8वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
कडीस जोडोनि दुज्या कडीला
मनुष्य बनवीतसे साखळीला
जरी तोडिले त्यात मधल्या कडीला
तरी भंगुनी जाइ संपूर्ण माला! ।।१।।
पाहा कसे कोळि विणतात जाळे
धाग्यास एका बहू जोडलेले
बहुतांस त्या जोडलेले कित्येक
बिघडते न जरिही तुटले अनेक ।।२।।
एकीस खायी दुजी प्राणिजात
दुजीस तीजी अशी साखळीत
जर का दुजी जात मेली समस्त
उभी साखळी होउनी जाय नष्ट! ।।३।।
निसर्गनारायणें देखिले हे
अन् वीणिले अन्नजालासि पाहे!
जरी प्राणिजाती किती लोपल्या रे
तरिही टिकोनी महाजाल राहे! ।।४।।
तगले असे की महाजाल रे ते
तरीहि जाणा ते क्षीण होते!
मारीत जाता बहू प्राणिजाती
तुटोनि संपेल ते जाल पुढती! ।।५।।
- प्रसिद्ध कवी व लेखक. सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांतून भटकताना वाढलेल्या जाणिवांमधून परिस्थितीकीचा अभ्यास करण्याची गरज जाणवली. पलाश आणि इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांचा परिस्थितीकीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला.
- कॉलेजच्या दिवसांत निर्माण झालेली गद्य आणि पद्य लेखनाची आवड पुढे वाढत गेली. वर्तमानपत्रांतून भटकंतीवर लिखाण केले.
- पुढे ‘वनाचे श्लोक’ हे परिस्थितीकीवरचं आगळंवेगळं लेखन त्यांनी केले. आज ते त्यांच्या कवीभूषणाच्या काव्यावरील अभ्यास व व्याख्याने आणि ‘वनाचे श्लोक’ यासाठी ओळखले जातात.
- निसर्गात सर्वसजीव आणि निर्जिवांत परस्परसंबंध असतात. ते उत्तरोत्तर गाढ अाणि क्लिष्ट होत जातात. जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात अन्नसाखळ्या तुटत गेल्याने निसर्गानेच अन्नजाल निर्माण केले.
- म्हणजेच प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला. त्यामुळे या अन्नजालातल्या काही जीवजाती नष्ट झाल्या, तरी ते पूर्ण नष्ट होत नाही मात्र ते नक्कीच कमकुवत होतं. हेच या ‘वनाचे श्लोक’मधून घेतलेल्या पद्याचे सार आहे.
अन्नजाल कविता 8वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
Tags:
मराठी कविता