गे मायभू कविता 8वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला.
मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग काशी.
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी!
- सुप्रसिद्ध कवी, गझलकार. सुरेश भट यांचे खरे यां सामर्थ्य त्यांच्या राजकीय, सामाजिक आशयाच्या कवितांतून जाणवते. ‘रूपगधं’, ‘रग मझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झझंवात’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘गझल’ या रचनाबधंचा निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार केला. त्यांच्यामुळे ‘गझल’ हा प्रकार मराठीत अत्त लयंकप्रिय झाला.
- ‘काफला’ या संपादित संग्रहात त्यांच्या काही निवडक गझलांचा समावेश आहे.
- मातृभूमी आपणाला वाढवते, सर्वांगाने घडवते. आपल्या जीवनात आईइतकेच मातृभूमीला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय नि किती करावे असे कवीला सतत वाटत राहते.
- प्रस्तुत कवितेत आपल्या अत:करणातील मातृभूमीविषयीचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला आहे.
गे मायभू कविता 8वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
Tags:
मराठी कविता