जय जय महाराष्ट्र माझा कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।।धृ.।।
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ।।१।।
भीति न आम्हां तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला, जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरींतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ।।२।।
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा ।।३।।
- प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार. ‘माझिया माहेरा जा’,
- ‘हसले मनी चांदणे’, ‘क्रांतिमाला’, ‘मखमल’ इत्यादी गीतसंग्रह प्रसिद्ध; ‘गीतगोविंद’, ‘गाथासप्तशती’, ‘मेघदूत’ इत्यादी
- काव्यांचे अनुवादही प्रसिद्ध. प्रस्तुत गीतातून कवीने महाराष्ट्राची थोरवी सागिं तली आहे
जय जय महाराष्ट्र माझा कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
Tags:
मराठी कविता