श्रावणमास कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे!
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! ताे उघडे,
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे.
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा;
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा.
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते.
फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती;
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती.
खिल्लारे ही चरती रानी, गोपहि गाणी गात फिरे,
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे.
सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला,
पारिजातही बघता भामा, रोष मनीचा मावळला!
सुंदर परडी घेउनि हाती पुरोपकंठी शुद्धमती,
सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले-पत्री खुडती.
देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयात,
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत!
- निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध. बालवयातच कवितालेखनाला प्रारंभ.
- १९०७ साली जळगाव येथे भरलेल्या कविसंमेलनात ‘बालकवी’ म्हणून गौरवण्यात आले. ‘बालकवींची कविता’ हा
- काव्यसंग्रह प्रसिद्ध.
- प्रस्तुत कवितेत कवीने श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय व सुंदर वर्णन केले आहे.
श्रावणमास कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
Tags:
मराठी कविता
![श्रावणमास कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] श्रावणमास कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg5dB47ivCAi7AiN2Sop3mf2BnALi1Ja_R1Ckv2PeCTpJPAOnYVUnYPFekdXVkMFI_6b5X5V6QwcDSSr2Jlzj61AfdLX29Z8qCaT4HLa-5bs3so5sA56QgyRQ1ly6vLC79SNkmoR-3JNLA/s16000-rw/%25E0%25A4%25B6%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25A3%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B8++%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BE+7%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A0%25E0%25A5%2580+%255B+%25E0%25A4%2595%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A7%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AF+%25E0%25A4%25B5+%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B8%25E0%25A4%2597%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25A3+%255D.jpg)