माझी मराठी कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
माझी भाषा माझी आई
अर्थ भावनांना देई,
तिच्या राहावे ऋणात
होऊ नये उतराई.
तिच्या एकेका शब्दाला
रत्न-कांचनाचे मोल,
कधी तप्त लोहापरी
कधी चांदणे शीतल.
रानवाऱ्याच्या गंधात
माझी मराठी भिजली,
लेऊनिया नाना बोली
माझी मराठी सजली.
माझ्या भाषेचे अमृत
प्राशेल तो भाग्यवंत,
तिचा नाही दुजाभाव
असो कोणताही पंथ.
माझ्या मराठी भाषेची
काय वर्णावी थोरवी,
दूर देशी ऐकू येते
माझ्या मराठीची ओवी.
- आकाशवाणी व दूरदर्शनव रील विविध कार्यक्र माचं लेखन. ‘सीमंतिनी’ हा कवितासग्रं ह प्रसिद्ध.
- मातृभाषेविषयी आपल्या मनात आपुलकी असते. आपल्या आईविषयी सर्वनांप्म रे असते, तसे प्म रे मराठी भाषेविषयी सर्वनां वाटते.
- आपल्या मराठी भाषेतील शब्दांचे महत्त्व, बोलींचे महत्त्व, मराठी भाषेची थोरवी प्रस्तुत कवितेतून सांगितली आहे.
Tags:
मराठी कविता
![माझी मराठी कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] माझी मराठी कविता 7वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgunLfNWJaMbh4fgPU_6UhX35RvwHY_FBMEWIlhZtQjF5orAXlfnrNQ3vhJgac_sgaDbufV0UFieDDVI8Lgd6fEWGuOBwDx00JNRBK5XR8hpI6V_Nty_ZCEH55cPIfamDqqA7516DcCBtY/s16000-rw/%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259D%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A0%25E0%25A5%2580+%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BE+7%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A0%25E0%25A5%2580+%255B+%25E0%25A4%2595%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A7%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AF+%25E0%25A4%25B5+%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B8%25E0%25A4%2597%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25A3+%255D.png)
Meaning pan ... Sanga
ReplyDelete