माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | Maza Avadta Mahina Shrawan Marathi Nibandh

माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | Maza Avadta Mahina Shrawan Marathi Nibandh

 विद्यार्थी मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध  (maza avadta mahina shravan essay in marathi) या विषयावर निबंध लेखन करणार आहोत ही पोस्ट अत्यंत उत्कृष्ट दर्जाची होणार आहे कारण यामध्ये आपण आपला आवडता महिना श्रावण या महिन्या विषयी तसेच या निबंधा विषयी देखील माहिती बघणार आहोत निर्मळ याकडे मी तुमच्यासाठी नवनवीन पोस्ट घेऊन येतच आहेत तरी तुम्ही आमच्या या निर्मळे अकॅडमी ला सपोर्ट आम्हाला अजून प्रोत्साहन देऊ शकता

 या पोस्ट मधील माझा  आवडता महिना श्रावण मराठी निबंध याविषयी आपण माहिती घेतल्यानंतर आम्ही तुमच्या साठी खाली काही निबंध आणि तसेच त्यांच्या लिंक्स देखील दिलेल्या आहेत तुम्ही ते निबंध देखील अत्यंत काळजीपूर्वक बघावे जेणेकरून पेपरला कोणत्याही प्रकारचा निबंध आल्यानंतर तुम्ही तो निबंध सोप्या आणि सरळ शब्दांमध्ये लिहू शकाल चला तर आता पाहूया माझा आवडती महिना श्रावण मराठी निबंध लेखन (maza avadta mahina shravan essay in marathi)

माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध

माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | Maza Avadta Mahina Shrawan Marathi Nibandh

निबंध -1 
चैत्रापासून सुरू होणाऱ्या मराठी महिन्यांचे रंगरूप आगळेवेगळे असते. कुणाला चैत्राच्या पालवीची मोहिनी पडते; तर कुणाला वैशाखवणवा आवडतो. कुणाला मेघश्याम आषाढ हवाहवासा वाटतो; तर कुणी सोनेरी आश्विनासाठी झुरतात. मला स्वतःला मात्र हवाहवासा वाटतो तो, 'हिरवा श्रावण. श्रावणात सृष्टीत सर्वत्र हिरव्या रंगाची उधळण झालेली आढळते. हिरव्या रंगातही किती विविध छटा असतात ! कुठे गर्द हिरवा, तर कुठे प्रसन्न हिरवा; तर कुठे पोपटी ! या सर्व रंगछटांतून चैतन्याचा, सर्जनतेचा आणि सौंदर्याचा साक्षात्कार घडत असतो.

श्रावण हा मराठी महिन्यांतील पाचवा महिना. उकाड्याने हैराण करणारे चैत्र-वैशाख गेल्यावर ज्येष्ठ-आषाढात पावसाचा धुवांधार वर्षाव सुरू होतो, वातावरण कुंद आणि ढगाळलेले असते. घराबाहेर पडणेदेखील पुष्कळदा अवघड होते. अशा वेळी माणसाला दिलासा लाभतो तो श्रावणात ! श्रावणातील पावसाचे वर्णन करताना बालकवी म्हणतात श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे। श्रावणातील ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ पाहून मन हरखून जाते. अवचित कधीतरी सप्तरंगी इंद्रधनुष्याचे मंगल तोरण नभोमंडपाला आगळी शोभा आणते. या सुंदर श्रावणमासाचे वर्णन करताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात - हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजरा श्रावण आला

श्रावणाचे हे चैतन्य मुला-माणसांत, पशु-पक्ष्यांत, पाना-फुलांत सर्वत्र ओसंडून जाताना आढळते. श्रावणात फुलणारा तेरडा रंगीबेरंगी गुच्छांचा नजराणा घेऊन आलेला असतो. शेतात डोलणाऱ्या तुऱ्यांवर श्रावणाचे सोनेरी ऊन पडते आणि त्यांचा तजेला नव्या उत्साहाने डोलत राहतो. श्रावणसरीच्या स्पर्शाने उल्हसित झालेली पिके भावी सुबत्तेची आशा पालवू लागतात. दरम्यान शिवारात राबणाऱ्या शेतकऱ्यांना जरासा विसावा मिळतो. अशा या प्रसन्न श्रावण महिन्यात सर्वत्र उत्साह ओसंडत असतो.

श्रावणमास म्हणजे व्रत-वैकल्यांचा, सणावारांचा काळ. श्रावणातील सोमवारांचे केवढे माहात्म्य ! मंगळवारी मंगळागौरीची पूजा, शुक्रवारी जिवतीमातेचे व्रत; तर शनिवारी मारुतीची आराधना. या श्रावणात माणूस आपल्या उपकारकर्त्या निसर्गबांधवांनाही विसरत नाही. म्हणून तर पिकांचे उंदरांपासून रक्षण करणाऱ्या नागांची नागपंचमीला पूजा केली जाते; तर नारळीपौर्णिमेला सागराला भक्तिभावाने नारळ अर्पण केला जातो. असा हा श्रावणमास! सर्वांच्या मनात आनंदाची हिरवळ फुलवणारा आणि आगामी समृद्ध जीवनाचे ओझरते दर्शन घडवणारा ! मला वाटते, माझ्याप्रमाणे आपणा सर्वांनाही तो खूप खूप आवडत असावा!

माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | maza avadta mahina shravan essay in marathi

 मित्रांनो आपल्याला ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची तसेच प्रेरणादायी देखील आहेत तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारचा निबंध हवा असेल ते देखील आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये कळवा आम्ही तुमच्यासाठी लवकरात लवकर तो निबंध येण्याचा प्रयत्न करूच तुम्ही हि पोस्ट तुमच्या मित्र परिवाराचे जरूर शेअर करावी आणि आमचा या पोस्टला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणजेच विद्यार्थ्यांना या पोस्टला जास्तीत जास्त फायदा होईल धन्यवाद

maza avadta mahina shravan essay in marathi - माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध 

मराठी निबंध LINKS
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा www.nirmalacademy.com
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध www.nirmalacademy.com
पहिला पाऊस मराठी निबंध www.nirmalacademy.com
रम्‍य पहाट मराठी निबंध www.nirmalacademy.com
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी www.nirmalacademy.com
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध www.nirmalacademy.com
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध www.nirmalacademy.com

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post