मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध - Mi mukhyadhyapak zalo tar marathi nibandh
मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध
शाळेतील विदयार्थी दिन जवळ येत चालला होता. एका दिवसासाठी शाळेचा संपूर्ण कारभार आम्ही विद्यार्थी सांभाळणार होतो. सगळे दोस्त मला आग्रह करीत होते की, मीच मुख्याध्यापक म्हणून काम करावे. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, एक दिवसाचा मुख्याध्यापक होण्याऐवजी मी कायमचा मुख्याध्यापक झालो, तर...? मी मुख्याध्यापक झालो तर मी माझी शाळा आदर्श करण्याचा कसोशीने प्रयत्न करीन. विदयार्थी, शिक्षक व पालक या प्रमुख घटकांच्या सहकार्यातून शाळेचा दैनंदिन कारभार चालत असतो. या तीनही घटकांत समन्वय घडवून आणण्याचे काम मुख्याध्यापक म्हणून प्रथमतः मी करीन.
माझ्या सर्व विदयार्थ्यांना शाळेविषयी आपुलकी, प्रेम वाटेल असेच वातावरण मी माझ्या शाळेत ठेवीन. ही शाळा माझी आहे व मी शाळेचा आहे, असेच माझ्या शाळेतील प्रत्येक विदयार्थ्याला वाटावे, यासाठी मी अथक प्रयत्न करीन. त्या विदयार्थ्यांना विद्यादान योग्य प्रकारे करण्यासाठी शक्य तेवढ्या सर्व सोयी मी माझ्या शाळेत करीन. शालेय विषय शिकताना ते आकर्षक वाटतील व त्यांत विदयार्थ्यांना कुतूहल वाटेल, अशा प्रकारची सर्व साधने मी शाळेत आणून ठेवीन.
शालेय विषयांव्यतिरिक्त सहशालेय उपक्रमांतही माझ्या शाळेतील विदयार्थ्यांना योग्य संधी मिळेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल, याची मी स्वतः जातीने काळजी वाहीन. त्यासाठी मी माझ्या शाळेसाठी प्रशस्त इमारत व विस्तीर्ण क्रीडांगण मिळवीन. शाळेचे आधारस्तंभ म्हणजे शाळेतील शिक्षक. शाळेतील कोणताही उपक्रम मी या माझ्या सहकाऱ्यांच्या सल्ल्याशिवाय व सहकार्याशिवाय करणार नाही. शिवाय माझ्या या शिक्षकांच्या वैयक्तिक अडचणींच्या वेळी मी स्वत: त्यांच्या पाठीशी राहीन. अशा खेळीमेळीच्या वातावरणात मी, माझे शिक्षक आणि माझे विदयार्थी यांत एकसूत्रता राखण्याचा प्रयत्न करीन.
विदयार्थ्यांच्या पालकांना शाळेविषयी आपुलकी वाटली की, शाळेच्या कोणत्याही अडचणीच्या वेळी त्यांची मदत होऊ शकते. त्यांना शाळा आपली वाटावी म्हणून मी त्यांना वेळोवेळी शाळेत बोलावून त्यांच्याशी विचारविनिमय करीन, पालक-मेळावे भरवून त्यांच्या अडचणी समजावून घेईन व त्या दूर करण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करीन. प्रत्येक व्यक्तीत काही ना काही चांगले गुण असतातच, असे मी मानतो. त्यामुळे मी सर्वांना सन्मानाने वागवीन. मुख्याध्यापक म्हणून माझ्या कारकीर्दीतील प्रत्येक क्षण मी शाळेच्या उत्कर्षासाठीच वेचेन. स्वावलंबी आदर्श विदयार्थी घडावा, हेच माझे ध्येय असेल आणि तोच माझा ध्यास असेल.
For All
⏩ मी मुख्याध्यापक झालो तर निबंध
⏩ मी मुख्याध्यापक झालो तर निबंध मराठी
⏩ मी मुख्याध्यापक झालो तर निबंध इन मराठी
⏩ मी मुख्याध्यापक झालो तर या विषयावर निबंध
⏩ मी मुख्याध्यापक झालो तर मराठी
⏩ मी मुख्याध्यापक झालो तर भाषण
⏩ मी मुख्याध्यापक झालो तर मराठी भाषण
⏩ मी मुख्याध्यापक झालो तर माहिती
I Were Headmaster Essay In Marathi. - मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध
| मराठी निबंध | LINKS |
|---|---|
| मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा | www.nirmalacademy.com |
| चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
| माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
| पहिला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
| रम्य पहाट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
| छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
| निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
| माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
| खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध - Mi mukhyadhyapak zalo tar marathi nibandh
Tags:
मराठी निबंध लेखन
