रसग्रहण मराठी 11वी | 11th Marathi Rasagrhan

रसग्रहण मराठी 11वी | 11th Marathi Rasagrhan 

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण अकरावी वर्गात असलेल्या सर्व कवितांचे रसग्रहण बघणार आहोत. रसग्रहण हे परीक्षेमध्ये दहा मार्क साठी विचारले जाऊ शकते त्यामुळे रसग्रहण हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्या पेपरमध्ये विचारलेला असतो. तुम्ही या पाचपैकी कुठलेही तीन रसग्रहण नीट केले तर तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये रसग्रहण या प्रश्नांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकता.

आम्ही तुमच्यासाठी खूप सोप्या भाषेमध्ये रसग्रहण घेऊन आलो आहे जेणेकरून तुम्हालाही परीक्षेमध्ये आठवण्यास नक्की मदत होईल खाली मी पासही कवितांचे रसग्रहण दिले आहे त्यापैकी तुम्हाला ज्या कवितेचे रसग्रहण पाहायचे आहे त्याच्या नावावर फक्त तुम्हाला क्लिक करायचे आहे. आणि मी त्यात नावाच्या खाली त्या कवितेविषयी थोडक्यात माहिती देखील सांगितली आहे.

१. रसग्रहण : प्राणसई या कवितेचे रसग्रहण करा

मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांनी पाऊस पडण्याआधीची ग्रामीण मनाची अस्वस्थता प्राणसई या कवितेमध्ये साकारली आहे.

२. रसग्रहण : शब्द या कवितेचे रसग्रहण करा 

शब्द ही कविता मनोहर यशवंत यांनी लिहिलेली असून शब्दांच्या संगतीने सकारात्मक व समृद्ध जीवन जगण्याची प्रेरणा ही कविता देते. आपल्याला जगण्यासाठी पदोपदी बळ देणारे शब्द किती मौल्यवान आहे ही जाणीव ही कविता करून देते त्याचप्रमाणे कविता ही विधानात्मक असल्यामुळे रसिकांच्या काळजाचा ठाव घेते.

३.रसग्रहण : पैंजण या कवितेचे रसग्रहण करा

पैंजण या कवितेत कवित्री नीलम मानगावे यांनी श्री स्वातंत्र्याचा विचार मांडला आहे प्राचीन काळातील स्त्रीचे जगणे ते आधुनिक काळातील स्त्रीचे जगणे यातला फरक कवित्री सहजपणे स्पष्ट करून जाते.

४.रसग्रहण : झाडांच्या मनात जाऊ कविता 11वी मराठी 

झाडांच्या मनात जाऊ ही कवी नलेश पाटील यांची कविता हिरवं भान या कवितासंग्रहातील आहे हा कवितेसंग्रह प्रचंड नावाजलेला कवितासंग्रह आहे. या कवितेमध्ये झाडांच्या मनात शिरून त्यांचे मनातील विचार जाणून घ्यायचे. या कवितेमध्ये प्रत्येक कडव्यात अनोखी भाव स्थितीवर निली आहे प्रसाद व माधुरी या काव्यगुणांनी मंडित झालेली ही गीत रचना मला हृदयस्तव भावली.

५.रसग्रहण : दवांत आलिस भल्या पहाटीं कवितेचे रसग्रहण करा

दवांत आलीस भल्या पहाटे ही बा.सी. मर्ढेकर यांची प्रेमाची भावना प्रकट करणारी कविता. ही कविता यमक प्रधान रचना केलेली आहे भाषिक प्रयोग करण्याचा कवी बा .सी. मर्ढेकर हातखंडा या कवितेतही दिसून येतो.

रसग्रहण मराठी 11वी | 11th Marathi Rasagrhan

इयता अकरावी मराठी कुमारभारती कवितेचे रसग्रहण | 11th Marathi Rasagrhan 

या सर्व कवितांचे रसग्रहण मी खूप सोप्या भाषेमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले आहे तुम्ही एकदा परीक्षेला जाण्याआधी देखील हे रसग्रहण वाचले तरी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रचंड मदत होईल आणि रसग्रहण या प्रश्नांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यास मदत होऊन जाईल.

मित्रांनो यामध्ये आपण सर्व कवितांचे रसग्रहण बघितले तुम्हाला जर आणखी कवितांची रसग्रहण बघायची असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल.

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post