रसग्रहण : झाडांच्या मनात जाऊ रसग्रहण कविता 11वी मराठी | Zadanchya Manat Jau Rasgrahan 11th Marathi

रसग्रहण : झाडांच्या मनात जाऊ कविता 11वी मराठी | Zadanchya Manat Jau Rasgrahan 11th Marathi


झाडांच्या मनात जाऊ रसग्रहण कविता 11वी मराठी | Zadanchya Manat Jau Rasgrahan 11th Marathi

'झाडांच्या मनात जाऊ' ही कवी नलेश पाटील यांची कविता 'हिरवं भान' या कविता संग्रहातील घेतली आहे. या कवितेत निसर्गाच्या चैतन्याचा अनुपम सोहळा उत्कट प्रतिमांमधून कवींनी रंगवला आहे. 

झाडांच्या मनात शिरून त्याचे हृदगत जाणून घ्यायचे व आपणच अंती एखादे झाड होऊन निर्जन रानात डोलायचे, असा या कवितेचा प्रवास रसिकांना आनंददायी व समृद्ध करणारा ठरला आहे. 

वसंत ऋतूचे लोभसवाणे दर्शन या चराचरातील वनश्रीत कसे झाले आहे, याचे वर्णन कवींनी अनेक प्रतीके व प्रतिमा यातून दुग्गोचर केले आहे. फुल पाखरांचा थवा म्हणजे भिरभिरणारे पताकांचे तोरण, डोळ्यांत झऱ्याचे पाणी, देवाघरची गाणी, तुषारांचे रोप, सूर्य ओंजळीतल्या पाण्यात पोहणे, सावलीला पंख फुटून त्यांचे झालेले काऊ' अशा नितांत सुंदर प्रतिमा व प्रतीकांतून कवितेचा आशय समृद्ध झाला आहे व कवितेत नितळ सौंदर्याचा आविष्कार झाला आहे. 

'ईश्वरा, मला झाड बनवून निर्जन रानात टाक' ही कवींची अंतिम इच्छा खूपच भावपूर्ण व हृदयस्पर्शी आहे.
निसर्ग चित्र रेखाटतांना अम्लान शब्द कळे तून उमटलेला उत्कट भाव - रसिकांना मोहन टाकणारा आहे. जणू आपणच निसर्गाच्या घटकात तादात्म्य पावून निसर्ग डोळ्यांत व हृदयात साठवतो आहोत, अशी अनुभूती रसिक मनाला प्रत्ययास येते. 

कवीचे शब्द सामर्थ्य अनोख्या व उल्हसित प्रतिमांतून प्रकट झाले आहे. ध्रुपद व अंतरा असलेली ही गीतरचना यमकप्रधान आहे. प्रत्येक कडव्यात अनोखी भावस्थिती वर्णिली आहे. प्रासाद व माधुरी या काव्यगुणांनी मंडित झालेली ही गीतरचना मला हृदयस्थ भावली.

रसग्रहण : झाडांच्या मनात जाऊ कविता 11वी मराठी | Zadanchya Manat Jau Rasgrahan 11th Marathi

कवी नलेश पाटील हे निसर्ग कवी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कवितेत निसर्ग, त्याच्या रंगरूपासह अवतरतो. निसर्गातील अनेक गोष्टी मानवाला केवळ आनंद देत असतात. त्याची देण्याची अमर्याद शक्ती आहे. 

निसर्गाच्या या शक्तीला आपण ओळखलं की आपण त्याच्याशी एकरूप होत जातो, कवी निसर्गाकडून अनेक गोष्टींचा आनंद घेत जगत आहे. झाडांच्या मनात जाऊ या कवितेत कवी या निसर्गातील अनेक गोष्टींचे वर्णन करून आपल्याला त्याच्या ताकदीचे दर्शन घडवत आहे.

झाडांच्या मनात जाऊन कवीला त्याच्या फांदयांवर असणारी पाने आहेत. त्यांच्या मनापर्यंत पोहोचवायचे आहे. झाडांचे असलेली पोपटी श्वास त्याला आपलेसे करायचेत आणि त्या झाडावर असलेल्या कोकिळेसारखे सुरेख सुरेल गाणे गायचे आहे. वसंतातील बहरामध्ये तो सावळ्या कोकिळेचा सूर ऐकत ऐकत मनाला रिझबू. 

वसंत ऋतूमध्ये झाडांना आलेला बहर हा विविध रंगांच्या फुलांचा आहे. त्या फुलांमधील सुगंध सर्वत्र पसरल्यामुळे मन आनंदी झालं आहे. नैसर्गिक फुलांचा गंध जणू काही आपल्या जन्माला अत्तर मिळालं आहे असं कवीला वाटतं. त्या कोकिळेच्या सरासोबत गाणं गात अत्तराचा फाया कानी ठेवन, आपले जगणे आनंदी करावे असं कवीला वाटते.

बागेत, रानात अनेक फुलपाखरे आहेत, त्याच्या पंखांवर विविध त-हेचे रंग आहेत, ते पाहून जणू काही ते निसर्गपंचमी खेळून आले आहेत असे कवीला वाटते. विविध फुलांवर बसलेली ही फुलपाखरे त्याचा रंग आपल्यावर धारण करतात की काय असं वाटू लागतं. 

त्या फुलपाखरांचा थवा सर्वत्र फिरताना दिसत आहे. हे तोरण रानावनात सर्वत्र भिरभिरत आहे. हे तोरण आपल्या दाराला लावण्याची तीव्र इच्छा कवीला होत आहे, त्या फुलपाखरांच्या पंखांना पताका ही उपमा फार सजगतेने वापरली आहे.

हा तर उत्सव आहे या पाखरांचा, त्या पाखरांच्या थव्याचे तोरण आपल्या दाराला लावावे म्हणजेच आपल्या दारीसुद्धा हा उत्सव साजरा व्हावा असं कवीला वाटत आहे. रानातील झरे निर्मळपणे वाहत आहेत. ते पाणी अश्रू बनूनही एखादयाच्या डोळ्यात उतरते. दोन्ही ठिकाणी पाण्याचीच रूपे आहेत. पण एक आहे ते निर्मळपणाने वाहत आहे. तर दुसरे पाणी कुणाच्या तरी करणीने डोळ्यात उतरले आहे.

 झऱ्याच्या पाण्याचा खळखळाट ऐकून कवीला असं वाटतेय की हे पाणी आनंदाचे गीत गात आहे. अथवा देवाघरची गाणी गात आहे. या गाण्याच्या ऋतूमध्ये आपणही खळाळत वाहत जाऊ, कोणतेही पाश न ठेवता वाहत जाणं, प्रवाही होणं हे कवीला सुंदर वाटत आहे.

कवी हे खळाळते पाणी पाहून खुश होतो आणि अलगद त्याचे मन त्या पाण्यातील एका खडकावर जाऊन बसते. ही कल्पनाच किती संदर आहे. मन पाण्याचा भाग होऊन खडकावर जाऊन बसतं आणि मग जे पाणी खळाळते होते तेच पाणी थई थई नाचताना दिसते. 

हा कवीच्या तरल मनाचा आणखी एक अविष्कार दिसतो की सुरेल गाण्याची लकेर होऊन त्याचे मन पाण्यात बसते आणि मग ते पाणी नाचतानाही दिसते. त्या मनमुक्त नाचण्याचा आनंद घेत असताना एक तुषाराचे रोप म्हणजेच खडकांवर पडणारे पाणी कवीच्या अंगावर पडून स्वत:च्या मायेची पखरण करत आहे, त्याला न्हाऊ घालत आहे.

आदिमानवाच्या काळापासून आपण पंचमहाभूतांना प्रमाण मानून त्यांची पूजा करत आलो आहोत. हेच तत्त्व कवी कवितेत दाखवून म्हणत आहे आकाशतत्त्व मी ऑजळीत जरासे धरले. ते ही जरासे कारण आकाश विस्तीर्ण आहे ते ऑजळीत मावू शकणार नाही.

 आपली तेवढी कुवत नाही, पण या आकाशाला ओंजळीत धरून अवघ्या पाण्याला सूजनत्व देण्याकरता त्या पाण्याचीच ओटी आकाशाने भरली. ओटी भरणं हे सृजनशीलता आहे, ती ओटी भरताना आकाशातील ऊन हातात दुचमळते आणि सूर्य त्यात पोहायला लागतो, म्हणजे आकाशासमवेत त्याची ही बिंबसुद्धा त्या पाण्यासोबत विलीन होतात.

हे फांदीवरील पक्षी त्यांना बदलणारा ऋतू कळतो, बदललेली हवा कळते, सृष्टीतले सूक्ष्म बदल कळतात कारण ते हा हंगाम जगतात. ते स्या हंगामात खरे साक्षीदार आहेत. झाडांच्या बुंध्याशी जी सावली हलत असते ती इतकी जिंवत असते की जणू ती सावली आपल्या रूपातून स्वतःला नव्हे तर उन्हाला उजाळा देत असते. 

सावल्यांमधून दिसणारे ऊन हे सावलीत अभावाने दिसणारे ऊन नव्हे तर सावलीत मुद्दामहून काढलेली नक्षी आहे आणि झाडावर दिसणारे कावळे हे या काळ्या सावलीलाच सावलीचे काळे पंख फुटून तयार झालेले कावळे आहेत. कावळ्यांचा जन्म निर्माणाचा हा वेगळाच काव्यात्मक अनुबंध शोधला गेलाय. अशा रूपकांसाठीच नलेश पाटील लोकप्रिय होते.

निसर्गाच्या अस्तित्वाचे असे वेगळे विभ्रम ही कवी नलेश यांच्या कवितेची ओळख आहे. एका सच्चा चित्रकाराने निसर्गाकडे किती काव्यात्मक नजरेने पाहावे याचा वस्तुपाठ म्हणजे नलेश यांची कविता. कवी शेवटी म्हणतो की मानवी स्पर्श जिथे नसतील, फुलपाखरांची संगत लाभेल अशा रानात ईश्वर मला तू टाक, माझे बाहू पसरून मी झाड होऊन जगेन, माझे जगणे केवळ सृष्टीमय होऊन जाईल. 

मला स्वतःला बहर येईल, या शब्दांतील एकावेळी कोणतेही एक अक्षर बदलून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. नवीन शब्दातील एक अक्षर बदलून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा, शेवटच्या टप्यापर्यंत कमीत कमी शब्दांत पोहोचा.

रसग्रहण : झाडांच्या मनात जाऊ कविता 11वी मराठी | Zadanchya Manat Jau Rasgrahan 11th Marathi

झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ
पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ...

बहरात वसंतामधल्या, तो सूर सावळा ऐकत
जातील फुलेही रंगून, जन्माला अत्तर घालत
चल सुराबरोबर आपण, तो फाया कानी ठेवू...


खेळून रंगपंचमी, फुलपाखरे भिजली सारी
हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी
हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू...

ही कोणाची रे करणी डोळ्यांत झऱ्याचे पाणी
हे उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी
गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू...


पाण्यात उतरूनी माझे, मन खडकावर बसताना
थुई थुई नाचरे पाणी, मज दिसते रे हसताना
एक रोप तुषाराचे मज, मायेने घाली न्हाऊ...

ओंजळीमध्ये मी अलगद, आकाश जरासे धरता
आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता
हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पाेहू...


हे फांदीवरले पक्षी की हंगामांचे साक्षी
झाडांच्या पायी काढी, सावली उन्हावर नक्षी
मग तिलाच फुटले पंख, नि त्यांचे झाले काऊ...

मानवी स्पर्श ना जेथे, असतील फुले-पाखरे
रानात अशा तू मजला, ईश्वरा जरा टाक रे
मी झाड होऊनी तेथे, पसरीन आपुले बाहू..

झाडांच्या मनात जाऊ कविता | Jhadanchya manat jau Rasgrahan 11th Marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post