रसग्रहण : प्राणसई या कवितेचे रसग्रहण करा | Pransai kavita Rasgrahan 11th Marathi

प्राणसई या कवितेचे रसग्रहण करा | Pransai kavita Rasgrahan 11th Marathi


मराठीतील प्रख्यात कवयित्री इंदिरा संत यांनी पाऊस पडण्यापूर्वीची ग्रामीण मनाची सर्व अस्वस्थता 'प्राणसई' या कवितेमध्ये भावोत्कर शब्दांमध्ये साकारली आहे. आभाळात दाटलेल्या काळ्या ढगांना त्यांनी प्राणप्रिय सखी मानून या प्राणसईशी त्यांनी हृदय-संवाद साधला आहे.

 कडक उन्हाळ्यामुळे झालेली घरादाराची व परिसराची वाताहत. शेतकऱ्याचे पावसासाठी व्याकुळ होणे व आतुरलेल्या मनाची तडफड ही या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. कवयित्रींनी स्वत:ला मेघमालेची मैत्रीण मानले आहे व मैत्रीच्या नात्याने मेघमालेला मनापासून विनवणी केली आहे.

अष्टाक्षरी छंदात गुंफलेली कविता ही यमक प्रधान असून, अत्यंत । साध्या शब्दकळेत मनातील भाव साकार करण्याची किमया कवयित्रींनी सहजगत्या साधली आहे.

स्थूलमानाने कवितेचे दोन भाग पडतात. पहिल्या पाच कडव्यांत पावसाअभावी झालेल्या दुर्दशेचे चित्र प्रत्ययकारी शब्दात रंगवले आहे. नंतरच्या कडव्यांतून 'प्राणसई' धरतीवर आल्यावर तिचे स्वागत कसे केले जाईल, याचे वर्णन उत्फुल्ल व प्रसन्न शब्दशैलीत साकारले आहे. 

उन्हाचा तडाखा सांगताना कवयित्रींनी 'विहिरीच्या तळीचे भिंग' ही सार्थ प्रतिमा वापरली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची स्थिती 'ठाणबंद बैल' या प्रतिमेत प्रत्ययकारी ठरली आहे. तसेच पावसाच्या आगमनाचे स्वागत करताना 'स्वप्नांवर पांघरलेला हिरवा शेला' ही समर्पक प्रतिमा योजली आहे. त्यातून आर्ता आणि आनंद यांचा उत्तम मेळ साकारला आहे.

आर्तता, भावपूर्णता नि उत्कटता हे या कवितेचे स्थायीगुण आहेत. प्रसाद आणि माधुर्य हे काव्यगुण दिसून येतात. साध्या पण संपन्न शब्दकळेमुळे या कवितेतील भाव रसिकांच्या काळजाला थेट भिडतो. म्हणून अष्टाक्षरी छंदातील ही नादमय कविता मला खूप आवडली आहे.

प्राणसई या कवितेचे रसग्रहण करा. | 11 वी प्राणसई || कविता रसग्रहण || मराठी

उत्तर:
कवयित्री इंदिरा संत या मराठी साहित्यविश्वातील एक ख्यातनाम ज्येष्ठ कवयित्री आहेत. प्राणसई ही त्यांची कविता पावसाला उद्देशून आहे. उन्हाळ्यामुळे वातावरण तापलेले आहे. राक्षसासारखे ऊन कडाडले आहे. ते अक्षरशः वातावरणाचे पीठच काढते आहे.

 तीव्र उन्हाळ्याचे चटके कोणालाही सहन होईनासे झाले आहेत हे एका प्रतीकातून इंदिराबाई स्पष्ट करतात ‘पीठ कांडते राक्षसी पीठ कांडते’ हे कष्टमय काम पण ते भरपूर प्रमाणात केले जाते तेव्हा त्याला राक्षसी म्हटले जाते. अशावेळी प्राणसई म्हणजे पाऊस कुठे बरी गुंतून राहिली? असा प्रश्न कवयित्रीला पडतो.

सई म्हणजे सखी हा शब्द योजताना कवयित्रीच्या मनात पाऊस हा सगळ्यांचाच प्राण आहे त्यामुळे कवयित्रीने प्राणसई ही उपमा पावसासाठी उपयोजिली आहे. 

प्राणसईने भेट दयायला फारच दिरंगाई केली त्यामुळे कवयित्रीने आपल्या सखीला भेटण्याकरता पाखरांसवे बोलावणे पाठवले आहे, या पावसांच्या सरींना ती घनावळी म्हणतेय, व्याकूळ मनाला घनावळीच साद देऊ शकतात. आपल्यातील सख्य, मैत्रपणा आठवून आता या पृथ्वीवर धावत ये, दौडत ये अशी विनवणी कवयित्री करत आहे.

प्राणसखी धनावळी भेटायला येण्याचा काळ ओसरून गेला परंतु ती आली नाही.पाऊस आला की सगळे वातावरण ओले चिंब होते. भाज्या, धान्य यांच्या बी-बियाण्यांच्या आळी जमिनी भाजून करून ठेवल्या आहेत. ती आली की या बियाण्यांमधून रोपे तयार होतील आणि त्याच्या वेली सर्वत्र पसरतील, पावसाळ्यात डासांचा, कीटकांचा त्रास होतो. अशावेळी शेणकुळी जाळल्या जातात.

त्यासाठी घरातील कोपरा रिकामा करून तिथे शेणी ठेवल्या आहेत. तीव्र उन्हाळ्यामुळे बैलही ठाणबंदी झाले आहेत. कामासाठी ते तयार नसल्यामुळे मालकालाही काहीच सुचेनासे झाले आहे. तप्त झालेल्या धरणीतून गरम वाफा येतात त्यामुळे वाराही तप्त झालेला आहे. वरून उन्हें आग ओकत आहेत. 

याचा परिणाम कोवळ्या जीवावरही होऊ लागला आहे. लहान बाळांचे कोवळे जीव कासावीस झाले आहेत. त्यांचे चेहरे कोमेजून गेले आहेत हे स्पष्ट करताना कवयित्री ‘तोंडे कोमेली बाळांची’ अशी रचना करते.

उन्हाळ्याचे चार महिने संपले की आपसूकच ओढ लागते पावसाची. पण पावसाचे दिवस सुरू झाले असताना पावसाची’ एकही सर आली नाही त्यामुळे व्याकुळलेली कवयित्री आपल्या पाऊस सखीला पृथ्वीवर येण्यासाठी विनवणी करते आहे. ती प्राणसई न आल्यामुळे विहिरीचे पाणीदेखील अगदी तळाशी गेले आहे. ते भिंगासारखे दिसू लागले आहे.

असं कवयित्री म्हणते. भिंग ज्याप्रमाणे सूक्ष्म असलेली गोष्ट मोठी करून दाखवते त्याप्रमाणे हे पाण्याचे भिंगदेखील येणाऱ्या सूक्ष्म संकटाची चाहूल देत आहे असे कवयित्रीला वाटत आहे. हे संकट भीषण रूप धारण करायच्या आगोदर माझ्या घरी, शेतावर तू दौडत ये असं कवयित्री पाऊस धारेला विनवणी करते, तू आलीस की आमच्या या शेतावर हिरवळ येईल, मातीत ओलावा येईल आणि मातीतील बी-बियाण्यांना अंकुर फुटेल. मालकांच्या मनातीलही स्वप्नं पूर्ण होतील.

पावसाच्या सरी वायसवे झुलत-सुलत येतात म्हणून कवयित्री म्हणते की तू वाऱ्यासोबत झुलत झुलत माझ्या घरापाशी ये. माझ्या घराजवळ आलीस की माझी पोरं तुझ्या पावसाच्या सरींना झोंबतील. इथे कवयित्री पावसाच्या धारा-सरी यांना जरीची उपमा देते. सोनेरी जरीमध्ये स्वतःची ताकद असते, ती सहसा तुटत नाही. ती मौल्यवान असते. तसंच ही पावसाची सरही मौल्यवान आहे. तिच्या जरीचा घोळ म्हणजे पावसाचे साठलेले पाणी या पाण्यात कवयित्रीची पोरं खेळतील.

भोपळ्याची, पडवळाची आळी, मालकाने कधीपासून तयार करून ठेवली आहेत. प्राणसईच्या येण्याने ती भिजतील, त्यांना कोंब फुटेल. तू आलीस की तुझ्या जलसाठ्याने त्या विहिरींना पण तुडुंब भर. घरदार संपूर्ण सृष्टी चिंब भिजायला हवी आहे कारण पाण्याविना काहीच चैतन्य नाही. 

अशी धावत धावत ही प्राणसई आली की कवयित्री तिच्यासोबत खप गप्पा मारणार आहे. तिच्याशी आपल्या सख्याच्या गजगोष्टी सांगणार आहे. त्याचं कौतुक आपल्या मैत्रिणीला सांगताना तिला अभिमान वाटणार आहे.

पावसाच्या या धनावळीने आता वाकडेपणा सोडावा आणि भूतलावर अगदी तीव्रतेने धावत यावं असं कवयित्रीला वाटतं. आमच्या सगळ्यांकडे अशी पाठ करून तू काय साधशील बरं? असा त्रास देण्यापेक्षा प्रेमानं तुझ्या धारांमध्ये भिजवलंस तर सगळेजण आनंदी होतील. च मिळेल, त्यामुळे वाऱ्यावर भरारी मारून अगदी लवकर भेटीयला ये अशा आत्यंतिक जिव्हाळयाने कवयित्री आपल्या सखीला बोलावते.


प्राणसई या कवितेचे रसग्रहण | Pransai kavita Rasgrahan Balbharati for Marathi 11th

SOLUTION

मराठीतील प्रख्यात कवयित्री इंदिरा संत यांनी पाऊस पडण्यापूर्वीची ग्रामीण मनाची सर्व अस्वस्थता 'प्राणसई' या कवितेमध्ये भावोत्कर शब्दांमध्ये साकारली आहे. आभाळात दाटलेल्या काळ्या ढगांना त्यांनी प्राणप्रिय सखी मानून या प्राणसईशी त्यांनी हृदय-संवाद साधला आहे. _कडक उन्हाळ्यामुळे झालेली घरादाराची व परिसराची वाताहत. शेतकऱ्याचे पावसासाठी व्याकुळ होणे व आतुरलेल्या मनाची तडफड ही या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. कवयित्रींनी स्वत:ला मेघमालेची मैत्रीण मानले आहे व मैत्रीच्या नात्याने मेघमालेला मनापासून विनवणी केली आहे.

अष्टाक्षरी छंदात गुंफलेली कविता ही यमक प्रधान असून, अत्यंत । साध्या शब्दकळेत मनातील भाव साकार करण्याची किमया कवयित्रींनी सहजगत्या साधली आहे.

स्थूलमानाने कवितेचे दोन भाग पडतात. पहिल्या पाच कडव्यांत पावसाअभावी झालेल्या दुर्दशेचे चित्र प्रत्ययकारी शब्दात रंगवले आहे. नंतरच्या कडव्यांतून 'प्राणसई' धरतीवर आल्यावर तिचे स्वागत कसे केले जाईल, याचे वर्णन उत्फुल्ल व प्रसन्न शब्दशैलीत साकारले आहे. उन्हाचा तडाखा सांगताना कवयित्रींनी 'विहिरीच्या तळीचे भिंग' ही सार्थ प्रतिमा वापरली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची स्थिती 'ठाणबंद बैल' या प्रतिमेत प्रत्ययकारी ठरली आहे. तसेच पावसाच्या आगमनाचे स्वागत। करताना 'स्वप्नांवर पांघरलेला हिरवा शेला' ही समर्पक प्रतिमा योजली आहे. त्यातून आर्ता आणि आनंद यांचा उत्तम मेळ साकारला आहे.

आर्तता, भावपूर्णता नि उत्कटता हे या कवितेचे स्थायीगुण आहेत. प्रसाद आणि माधुर्य हे काव्यगुण दिसून येतात. साध्या पण संपन्न शब्दकळेमुळे या कवितेतील भाव रसिकांच्या काळजाला थेट भिडतो. म्हणून अष्टाक्षरी छंदातील ही नादमय कविता मला खूप आवडली आहे.

प्राणसई या कवितेचे रसग्रहण करा | Pransai kavita Rasgrahan 11th Marathi

पीठ कांडते राक्षसी
तसें कडाडतें ऊन :
प्राणसई घनावळ
कुठे राहिली गुंतून?
दिला पाखरांच्या हातीं
माझा सांगावा धाडून :

ये ग ये ग घनावळी
मैत्रपणा आठवून...
पडवळा-भोपळ्यांचीं
आळीं ठेविलीं भाजून,
हुडा मोडून घरांत
 शेणी ठेविल्या रचून,

बैल झाले ठाणबंदी,
झाले मालक बेचैन,
तोंडे कोमेलीं बाळांचीं
झळा उन्हाच्या लागून,
विहिरीच्या तळीं खोल
 दिसूं लागलें ग भिंग,
मन लागेना घरांत :

कधी येशील तू सांग?
ये ग दौडत धावत
आधी माझ्या शेतावर :
शेला हिरवा पांघर
मालकांच्या स्वप्नांवर,
तशी झुलत झुलत
 ये ग माझिया घराशीं :

भाचे तुझे झोंबतील
तुझ्या जरीच्या घोळाशीं,
आळें वेलाचें भिजूं दे,
भर विहीर तुडुंब :
सारें घरदार माझें
 भिजूं दे ग चिंब चिंब;
उभी राहून दारांत

तुझ्या संगती बोलेन :
सखा रमला शेतांत
 त्याचे कौतुक सांगेन...
कां ग वाकुडेपणा हा,
कां ग अशी पाठमोरी?
ये ग ये ग प्राणसई 
 वाऱ्यावरून भरारी.

प्राणसई कविता 11वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]



Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post