रसग्रहण : शब्द या कवितेचे रसग्रहण करा | Shabd Kavita Rasgrahan 11th Marathi

रसग्रहण : शब्द या कवितेचे रसग्रहण करा | Shabd Kavita Rasgrahan 11th Marathi


रसग्रहण : 1

अतिशय खडतर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शब्दांची साथ होती, शब्दांनीच माझ्या आयुष्याचा डळमळता डोलारा सांभाळला असा आशय व्यक्त करणारी कवी यशवंत मनोहर यांची 'शब्द' ही कविता आपल्याला शब्दांच्या संगतीने सकारात्मक व समृद्ध जीवन जगण्याची प्रेरणा देते. 

विषमतेने अंकित झालेल्या मूल्यव्यवस्थेमध्ये जिवाची काहिली करत जगताना शब्दांनी नकारांशी सामना करण्याची जिद्द दिली, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. जगण्याला सकारात्मक दिशा देण्याचे सामर्थ्य शब्दांमध्ये व पर्यायाने साहित्यात असते, हा अनमोल संदेश देणारी ही कविता आहे.

पदोपदी जगण्याचे बळ देणारे शब्द किती मौल्यवान आहेत, ही जाणीव स्वानुभवातून कवींनी आत्मीय व भावपूर्ण शब्दांमध्ये साकारली आहे. त्यांच्या या सुबोध पण काळजाला भिडणाऱ्या शब्दशैलीतून कवितेचा आशय सघन झाला आहे. 

शब्दांचे अपूर्व सामर्थ्य विशद करताना त्यांनी अनेक हृदय प्रतिमा वापरलेल्या आहेत. 'निरुत्तर निखारे, शब्दांचा उजेड, आठवणींची आग, चिडके ऊन, शब्दांची बिजली, शब्दांनी दिलेला किनारा,' अशा अनोख्या पण आशयघन प्रतिमातून कवितेचा भावार्थ दुग्गोचर होतो.

चार-चार ओळींचा सैल यमकप्रमाध पदबंध असलेली ही कविता थट विधानात्मक असल्यामुळे रसिकांच्या काळजाचा ठाव घेते. प्रासादिक असलेली शब्दकळा विचारगर्भतेला पूरक ठरली आहे. ठोस व दृढ जीवनाशय देणारी 'शब्द' ही कविता मला अत्यंत आवडली.

रसग्रहण : शब्द या कवितेचे रसग्रहण करा | Shabd Kavita Rasgrahan 11th Marathi

रसग्रहण : 2

माणूस शब्दाविना जगाला पारखा आहे. हेच शब्द एका लेखकाचे/कवीचे जीवन सर्वस्व असतात. कवी यशवंत मनोहर एक विचारवंत, समीक्षक आहेत. त्यांच्या ‘शब्द’ या कवितेतून प्रत्ययकारी प्रतिमांनी समृद्ध अशी ओजस्वी लेखनशैली व्यक्त होते.

 त्यांची कविता शोषणाचा, जगातल्या विषमतांचा निषेध करते. कवींच्या जगलेल्या, भोगलेल्या जीवनाचा जीवनानुभव यातून व्यक्त होतो. कवींनी आपल्या मनातील त्वेष व्यक्त करण्यासाठी ‘शब्दांचा आधार घेतला आहे.

कवींना जेव्हा जेव्हा समाजातील मूल्यव्यवस्थेची चीड आली किंवा एखादया प्रसंगाने मन उदविग्न झाले तेव्हा मनाच्या आकांताला वाट फोडण्यासाठी शब्दांचाच आधार मिळाला. कवींनी मांडलेल्या मनातील उद्वेगाला मिळाले नाही.

 तेव्हा मनातील राग शांत करण्यासाठी माऊलीने आपल्या लेकरास पोटाशी घेऊन समजवावे तसेच मनातील निखाऱ्यांना शब्दांनी मायेची कुंकर घातली. लोकांच्या वागण्यातला संधिसाधपणा, समाजात पसलेले विषमतांचे जाळे, समाजातला वाढत जाणारा असंतोष यामळे कवींच्या आले.

तेव्हा शब्दांनीच त्यातून बाहेर येण्यासाठी उजेडाचा मार्ग दाखवला. आयुष्यात घडून गेलेली जिव्हारी लागलेली आग ओक लागली तेव्हा शब्दांनीच मनातील विचारांचा हल्ला झेलला. शब्दांनीच त्यातून बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखविला. 

समाजातील कवीला सहन न होणाऱ्या विषमतांमुळे मनातील ऊन, चीड बाहेर पडून बघत होती. तेव्हा शब्दांनीच व्यक्त होण्यास मनाची समजूत घालण्यास मदत केली, सायली धरली. मनातील चीडचिडीमुळे दिवसाही अंधारल्यासारखे व्हायचे.

आपण हतबद्ध आहोत असे वाटायचे तेव्हा शब्दांनीच यातून बाहेर पडण्यासाठी प्रकाशाचा मार्ग दाखविला. कवींच्या आयुष्यात काही क्षण हे मन प्रसन्न करणारे आले. त्यांना ते क्षण आयुष्यातून दूर घालवायचे होते, विसरायचे होते, शब्द हे वेळोवेळी मार्गदर्शक ठरले. 

वाहणाऱ्या नदीच्या जोरावर प्रवाहात अडकलेला माणूस मरणाच्या धारेत वाहत असतो, तशा परिस्थितीत काही वेळा कवी अडकले तेव्हासुद्धा शब्दांनीच त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन केले.

जेव्हा कवी आयुष्यात कोणीच नव्हते, प्रसिद्ध नव्हते तेव्हा स्वतःविषयी त्यांच्या मनात भीती होती. तेव्हा शब्दांनी एखादया मित्रासारखा आधाराचा पाठीवर हात ठेवला, कधी जगाच्या वाऱ्याबरोबर ते टिकू शकले नाहीत. कोणी आप्तांनी निवारा दिला नाही, आधार दिला नाही तेव्हा कवीला आपलेसे वाटणारे शब्दच होते. या शब्दांनीच त्यांना आधार दिला.

कवींच्या आयुष्यातील शब्दांचे महत्व अनन्यसाधारण आहे. कारण ते त्यांचं शस्त्र आहे. शब्दांमुळेच कवी आज प्रसिद्ध आहेत. ‘ आयुष्यातील प्रत्येक वळणावर साथ देणारे शब्द यांनी मला सर्व काही दिले आहे असे कवी म्हणतात. या श्रीमंत शब्दांना मी काय देक? 

मी त्यांचा कसा उतराई होऊ? असे कवीला वाटते. मी शब्दांना आपले शस्त्र बनवून त्यावर माझ्या मनातील जहर, चीड उतरवली व शब्दांनी तीही पचवली, या शब्दांना काही देण्याची ताकद माझ्यात नाही, असे त्यांना वाटते. आपण या शब्दांचे कर्जदार आहोत. या शब्दसंपत्तीपुढे आपण भिकारी आहोत असे त्यांना वाटते.

एका कवीच्या मनातील शब्दांविषयीची भावना अतिशय योग्य प्रकारे कवी यशवंत मनोहरांनी ‘शब्द’ या कवितेत व्यक्त केली आहे. शब्दबद्ध केली आहे.

रसग्रहण : शब्द या कवितेचे रसग्रहण करा | Shabd Kavita Rasgrahan 11th Marathi

आकान्ताने हाका घातल्या माझ्या 
तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले, 
माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना 
माउलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले.

डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा 
शब्दांच्याच उजेडाने हात दिला,
 एखादी आठवण आग घेऊन धावली 
तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला...

चिडून चिडून सांडत होते ऊन
 तेव्हाही शब्दांनीच सावली धरली, 
दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा 
शब्दांनीच हातात बिजली दिली.

जगू न देणारे काही विसरायचे होते 
तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला, 
मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा 
शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.

रसग्रहण : शब्द या कवितेचे रसग्रहण करा | Shabd Kavita Rasgrahan 11th Marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post