चित्रपट बंद केले तर निबंध - Citrapaṭa banda kēlē tara nibandha

चित्रपट बंद केले तर निबंध - Citrapaṭa banda kēlē tara nibandha

चित्रपट बंद केले तर निबंध 


    माझी परीक्षा चालू होती. उदया गणिताचा पेपर होता आणि नेमका आज एक गाजलेला चित्रपट दूरचित्रवाणीवर दाखवला जात होता. आई सोडून घरातील सर्वजण चित्रपट बघण्यात दंग होते. आई मात्र छोट्या विनयचा अभ्यास घेत बसली होती. आईला घरातल्या सर्वांचा आणि चित्रपटाचा राग आला होता. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले-“खरोखर, हे चित्रपट बंद केले तर किती बरे होईल !" खरोखर मलाही कधी कधी वाटते की, हे चित्रपट बंदच झाले पाहिजेत. माणसे, विशेषतः सर्व तरुण चित्रपटांच्या भुलभुलैयात हरवतात. चित्रपटांतील रंगीबेरंगी स्वप्निल दुनिया त्यांना खरी वाटते. हीच दुनिया ते वास्तवात शोधू लागतात आणि त्यांचा भ्रमनिरास होतो. त्यांना जीवनाबद्दल वैफल्य वाटू लागते.

      आत्महत्येसारख्या भीषण घटना घडतात. अनेकदा चित्रपट निर्माते चित्रपटाकडे धंदा म्हणून पाहतात. चित्रपट हा विकाऊ माल बनतो. भरपूर पैसा मिळवण्यासाठी तो भडक बनवला जातो. व्यसनाधीनता, लैंगिकता, हिंसा असल्या विकृत प्रवृत्तींनी चित्रपट बरबटवला जातो. या सगळ्यांचा प्रेक्षकांच्या मनावरपरिणाम होतोच. प्रेक्षक या प्रवृत्तींच्या आहारी जातो किंवा या प्रवृत्तींकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन निबर बनत जातो. समाजाला हे घातक आहे. म्हणून चित्रपट बंद झालेच पाहिजेत. पण... पण... चित्रपट खरोखरच बंद झाले तर...? पहिला परिणाम दूरदर्शन वाहिन्यांवर होईल. 

      आजकाल कोणतीही वाहिनी पाहिली, तर त्या वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय कार्यक्रमचित्रपटांवरचा असतो. काही वाहिन्या तर चित्रपट नसतील, तर बंदच पडतील. पण त्यावाहिन्यांचे राहू दया, मनोरंजनाचा केवढा मोठा खजिना चित्रपटांमुळे उपलब्ध होतो, तो सर्व बाद होईल. लोक मनोरंजनाला पूर्णपणे मुकले नाहीत, तरी मनोरंजनाचे फार मोठे क्षेत्र नाहीसे होईल. साधे पाहा... सहलीत गेलेल्यांना सहलीत कोणती गाणी म्हणायची, हा प्रश्न पडेल. गाण्याच्या भेंड्यासारख्या साध्या साध्या आनंदाला मुकावे लागेल.


      बंद केले, तर मोठमोठी चित्रपटगृहे ओस पडतील. चित्रपटांमुळे उपजीविकेची खूप साधने उपलब्ध होतात. निमति, दिग्दर्शक, नट, गायक यांना पैसे मिळतातच; वादक, दुय्यम कलाकार, लहानमोठे तंत्रज्ञ, विविध प्रकारच्या वस्तू तयार करणारे, त्यांचा पुरवठाकरणारे, जाहिरातदार, चित्रपटगृहे, तेथील कर्मचारी, अवतीभोवतीचे विक्रेते... ही यादी खूपच वाढू शकेल. या साऱ्यांचा उदरनिर्वाह चित्रपटांवर अवलंबून असतो. चित्रपट बंद झाले, तर हे सर्व  उपाशी राहतील आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांवरही उपासमारीची चित्रपटांचा एक चांगला परिणाम नेहमी दुर्लक्षिला जातो.

      चित्रपटांचे चित्रीकरण जगभरातील विविध ठिकाणी केले जाते. त्यामुळे जगाचे दर्शनच आपल्याला घडते. तिथला परिसर, तिथली माणसे, त्यांची जगण्याची रीत, त्यांची सुख दुःखे हे सारे चित्रपटांतून आपल्यापुढे येते. चित्रपट बंद झाले, तर माणसाचे हे विविध दर्शन घडणारच नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम किती सहजगत्या सर्वसामान्यांपर्यंत चित्रपटांमुळे पोहोचले ! चित्रपट नसतील, तर हे मार्ग बंद होतील. व्ही. शांताराम, सत्यजित राय यांसारख्या दिग्दर्शकांनी सर्वसामान्यांचे फार मोठे प्रबोधन केले. लोकांच्या जाणिवा प्रगल्भ केल्या. हे सर्व अशक्य होईल. तेव्हा चित्रपट बंद करणे, हा उपाय होऊ शकत नाही; तर चित्रपटाविषयीची दृष्टीच अधिकाधिक निकोप केली पाहिजे.

चित्रपट बंद केले तर निबंध - Citrapaṭa banda kēlē tara nibandha

मराठी निबंध LINKS
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा www.nirmalacademy.com
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध www.nirmalacademy.com
पहिला पाऊस मराठी निबंध www.nirmalacademy.com
रम्‍य पहाट मराठी निबंध www.nirmalacademy.com
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी www.nirmalacademy.com
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध www.nirmalacademy.com
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध www.nirmalacademy.com
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध www.nirmalacademy.com

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post