हास्यचित्रांतली मुलं स्थूलवाचन स्वाध्याय | Hasyachitratli mul Swadhyay 9th

 

हास्यचित्रांतली मुलं स्थूलवाचन स्वाध्याय | Hasyachitratli mul Swadhyay 9th


हास्यचित्रांतली मुलं स्थूलवाचन स्वाध्याय | Hasyachitratli mul Swadhyay 9th

1. खालील फरक लिहा:

प्रश्न 1. खालील फरक लिहा:
व्यंगचित्र हास्यचित्र
SOLUTION:

व्यंगचित्रहास्यचित्र

उत्तर:

व्यंगचित्रहास्यचित्र
हास्याबरोबर काही गमतीदार विचार मांडलेला असतो.केवळ हसवणे हा मुख्य हेतू असतो.
 

2. वैशिष्ट्ये लिहा:


प्रश्न 1. वैशिष्ट्ये लिहा:
 1
SOLUTION:
व्यंगचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे.
केवळ हसवणे हा हेतू नसतो.
आपल्याला काहीतरी सांगू पाहते.
गमतीदार विचार मांडलेला असतो.

3. ‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे.’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.

प्रश्न 1. ‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे.’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
SOLUTION:
व्यंगचित्राचा केवळ हास्य हा हेतू नसतो. व्यंगचित्रामध्ये एखादा विचार गमतीशीर पद्धतीने मांडलेला असतो. माणसाच्या विसंगत वर्तनावर बोट ठेवण्याचा नेमकेपणा व्यंगचित्रात असतो. व्यंगचित्र प्रभावीपणे व्यक्तीचे गुणदोष मांडते. उदाहरणार्थ, प्रस्तुत पाठात हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे व्यंगचित्र याची साक्ष पटवते. इथे पहिल्या चित्रात लहान मुलगा स्टुलावर चढून भलेमोठे व्हायोलीन वाजवत आहे व दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठेपणी लहान व्हायोलीन वाजवत आहे.

या चित्रांतून-(1) लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते; ते बाह्य आकाराला भुलतात, हे सांगितले आहे व (2) वय वाढल्यावर वृत्तीत प्रगल्भता येते. बाह्य आकाराचे आकर्षण संपते. छंद अधिक खोल व सूक्ष्म होतो, या गोष्टींचे मर्म सांगितले आहे. म्हणजेच, व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे, हे सिद्ध होते.

4. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वत:च्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वत:च्या शब्दांत लिहा.
SOLUTION:
मला ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी काढलेले लहान मुलीचे व्यंगचित्र खूपच भावते. शि. द. फडणिसांची रेषा भूमितीय असूनही खूप आकर्षक व ठळक आहे. लहान रोपटे व लहान मुलगी यांचा भावबंध त्यांनी अचूक टिपला आहे. रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी देतानाच्या तिच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस भाव केवळ अप्रतिम आहेत.

भलीमोठी दुधाची बाटली तिने सावरली आहे व कमरेत वाकून रोपट्याला पाणी घालताना तिची ओतप्रोत माया तिच्या डोळ्यांतूनही टपकते आहे. रोपट्याला लहान बाळ समजणे व आपली आई आपले जसे पोषण करते, तसे रोपट्याचे पोषण करणे, हा सर्जनशील संदेश यातून चित्रकारांनी दिला आहे. रोपट्याची आई होण्यातील ममत्व ही निरागस शालीनतेची निशाणी ठरते.

5. ‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.

प्रश्न 1. ‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.
SOLUTION:
व्यंगचित्र रेखाटणे ही अद्वितीय कला आहे. त्याला निर्मळ मन लागते, म्हणजे तुमची रेषाही निर्मळ राहते. व्यंगचित्रकाराला जीवनातली विसंगती टिपता आली पाहिजे. तसेच विषयाविषयी अपार करुणा असली पाहिजे. गुण-दोष दाखवताना माणसांची खिल्ली न उडवता, समंजसपणा असायला हवा. रेषा नाजूक तरीही ठाशीव असायला हवी. गमतीशीर विचारांची पखरण हवी. जीवन समृद्ध करणारे भाष्य व्यंगचित्रकाराला रेषांतून यशस्वीपणे मांडता आले पाहिजे. चित्र रेखीव व अनेक अर्थांचे सूचन करणारे हवे.

6. ‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे,’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

प्रश्न 1. ‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे,’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
SOLUTION:
लहान मुले निरागस असतात. त्यांच्या सवयी व आवडीनिवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे चित्रकाराला गरजेचे आहे. लहान मुलांचा चेहरा, त्यावरचे भाव व त्यांच्या हालचाली रेषांमधून अचूक टिपता यायला हव्यात. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार शरीराच्या प्रमाणबद्धतेत लहान करावा लागतो. लहान मुलांच्या बारीकसारीक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती हास्यचित्रकाराला अवगत असायला हवी. लहान मुलांचे मानसशास्त्र पूर्णपणे समजणे ही चित्रकारासाठी पहिली अट आहे. या सर्व कारणांमुळे लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड असते असे मलाही वाटते.

उपक्रम:

प्रश्न 1. 5 मे या जागतिक व्यंगचित्र दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये विविध व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवा व त्यांचा आस्वाद घ्या.

प्रश्न 2. खालील चित्राचे निरीक्षण करा. विचार करा. सांगा:

शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते?
ही समस्या का निर्माण झाली असावी?
पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर… कल्पना करा व लिहा.
ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
या समस्येसंदर्भात घोषवाक्ये तयार करा.

 2
SOLUTION:
1. पाणीटंचाईची गंभीर समस्या प्रतिबिंबित होते.

2. योग्य मार्गाने पाण्याचा साठा न करणे; पाण्याचा गैरवापर करणे ; पाणी प्रदूषित करणे; उतारावरून वाहणारे पाणी न अडवणे या कारणांमुळे ही समस्या निर्माण झाली.

3. पाण्यासाठी वारेमाप पैसा खर्च करावा लागला, तर इतर गरजेच्या गोष्टी घेण्यास त्रास होईल व महिन्याचे पैसे खर्च करण्याचे कोष्टक बिघडून जाईल. पाण्यासाठी रांगेत उभे राहिल्यामुळे वेळेचा अपव्यय होईल. इतर कामांसाठी वेळ अपुरा पडेल. माणसाच्या राहणीमानावर विपरीत परिणाम होईल.

4. पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी पुढील उपाय करावे लागतील:
  • पाण्याची बचत करणे.
  • पाण्याचा गैरवापर टाळणे.
  • पाण्याचा योग्य साठा करणे.
  • जलप्रदूषण टाळणे.
  • पाणी वाया न दवडणे.
  • पाण्याविषयी जनजागृती तयार करणे.
  • पाण्याचे महत्त्व जनमानसाला पटवून देणे.

5. घोषवाक्ये:
  • पाण्याचा गैरवापर करू नका
  • जलप्रदूषण थांबवा
  • पाणी साठवा, पाणी वाचवा
  • पाणी वाया दवडू नका
  • पाणी आहे, तर जीवन आहे पाणी नाही, तर मरण आहे
  • पाण्याची बचत म्हणजे
  • जीवनाची बचत
  • जल-अभियान सुरू करा
 

भाषाभ्यास:

1. चेतनगुणोक्ती अलंकार:

1. खालील ओळी वाचा व समजून घ्या.
उदा., “नित्याचेच दुःख होते
उशागती बसलेले
…. तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार ।” (कृ. ब. निकुम्ब)

1. वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या ? [ ] [ ]
2. अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात? [ ] [ ]
3. अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का? [ ] [ ]

चेतनगुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये -

1. अचेतन वस्तूंना सचेतन मानले जाते.
2. त्या वस्तू सजीव प्राण्याप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे वागतात.

2. अचेतन वस्तूवर जेव्हा सचेतनेचा किंवा मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्माचा आरोप केला जातो, तेव्हा ‘चेतनगुणोक्ती’ अलंकार होतो.

3. खालील वाक्य वाचून दिलेल्या चौकटीत उत्तरे लिहा.

मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे.

1. प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट - [ ]
2. अचेतन गोष्टीने केलेली कृती - [ ]
3. अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे? - [ ]

हास्यचित्रांतली मुलं Summary in Marathi


पाठाचा परिचय:
या पाठात लहान मुलांसाठी/मुलांवर रेखाटलेल्या कार्टून्स किंवा हास्यचित्रांबद्दल लेखकांनी गमतीशीर व मार्मिक विचार मांडले आहेत. त्यासाठी हास्यचित्रांची विविध उदाहरणे दिली आहेत.

पाठातील महत्त्वाचे मुद्दे:

1. सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय. व्यंगचित्र हा हास्यचित्रामधील पुढचा टप्पा आहे. व्यंगचित्र व हास्यचित्र यांत फरक आहे. व्यंगचित्रात केवळ हसवणे हा हेतू नसतो. व्यंगचित्रातून काही गमतीदार विचार मांडलेला असतो.
2. मुलांची हास्यचित्रे काढणे ही सर्वांत कठीण गोष्ट आहे. त्यात व्यंगचित्रकाराचे कौशल्य पणाला लागते. मुलांसाठी विनोद , करणे सोपे असते पण व्यंगचित्रातील मूल हे मुलांसारखे दिसणे ही कठीण गोष्ट आहे.

काही हास्यचित्रांचे विश्लेषण:


1. शि. द. फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांनी काढलेले हे हास्यचित्र आहे. या चित्रात फ्रॉक घातलेली एक मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी घालते आहे. तिचा निरागसपणा या चित्रातून रेखाटला आहे.

2. पहिल्या चित्रात उद्गारासकट एक रांगणारे मूल दाखवले आहे. दुसऱ्या चित्रात एक बालक देवाला ‘बॅडमिंटनचे शटल’ (फूल) वाहतो आहे. दोन्ही बालकांच्या बोलण्यातून सदयः परिस्थितीवर गमतीशीर भाष्य केले आहे. चित्र व हास्यचित्र यांत मूलभूत फरक - चित्रात हुबेहूब माणूस काढावा लागतो, तर हास्यचित्रात चित्राचीच गमतीदार है हुबेहूब नक्कल असते.

3. डेव्हिड लँग्डन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही दोन हास्यचित्रे आहेत. पहिल्या चित्रात एक चतुर मुलगा ‘लहान मुलांसाठी बचत करण्याचा असलेला डबा’ फोडतो आहे. या चित्रात त्याच्या चेहऱ्यावरील भाव - बिचकणे, घाबरणे, कुणी पाहत नाही ना, तरीही फोडण्याची शिताफी - हे सर्व पाहून हसू येते. दुसऱ्या चित्रात भोकाड पसरणारा, मोठमोठ्याने रडणारा मुलगा अहे. काहीतरी मिळावे म्हणून एरव्ही लक्षवेधी रडणे मुले मुद्दाम करतात. पण इथे त्याच्या चड्डीत अडकलेली ‘सेफ्टी पिन’ टोचत असल्यामुळे तो मोठे तोंड पसरून रडतो आहे, हे जेव्हा लक्षात येते तेव्हा हसू फुटते.

4. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे हे हास्यचित्र आहे. यात एक मोठा माणूस व छोटा मुलगा आहे. मुलाला जमिनीवर बसवून केस कापण्याचा हा प्रसंग पूर्वी खेड्यात सर्रास दिसत असे. या चित्रात मोठ्या माणसाच्या चेहऱ्यावर केस कापण्याचा उत्साह व केस कापून घेणाऱ्या लहान मुलाच्या मुखावरील कंटाळ्याचे व वैतागलेले भाव, यांचा गमतीशीर विरोधाभास जाणून हास्य निर्माण होते.

5. ही चिंटूची चित्रमालिका आहे. यात पहिल्या चित्रात बाबांना वाटते चिंटू, ‘नदीचे पाणी कुठे जाते?’ असा जिज्ञासापूर्वक प्रश्न विचारतो आहे. ते उत्साहाने उत्तर देतात. परंतु पुढच्या चित्रात ‘नदीत चावी पडली, म्हणून विचारतोय.’ या चिंटूच्या खुलाशामुळे चिंटूचा निरागस खोडकरपणा व बाबांचा झालेला भ्रमनिरास यांची जुगलबंदी गमतीशीर आहे.

6. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे हे व्यंगचित्र आहे. पहिल्या चित्रात एक लहान मुलगा स्टुलावर चढून भलेमोठे व्हायोलीन वाजवतो आहे. दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठा झाल्यावर लहान व्हायोलीन वाजवतो आहे. लहान मुलांना ‘मोठ्या’ वस्तूंचे आकर्षण असते, तर वाढत्या वयाबरोबर जपलेला छंद अधिक खोल व सूक्ष्म होत जातो व बाह्य आकाराचे आकर्षण कमी होते - हा विचार किती खुबीने सांगितला आहे!

7. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचे हे हास्यचित्र आहे. या चित्रात एक स्काउटचा मुलगा बुटात मध्यभागी घुसलेली अणकुचीदार वस्तू काढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. या चित्रात मुलाच्या तोंडावरील भाव व त्याचा वेडावाकडा झालेला देह (शरीर) हे इतके अप्रतिमपणे रेखाटले आहे की चित्रकलेवर हुकमत मिळवली की हास्यचित्रात खूप जादू करता येते, हे सिद्ध होते.

अशा प्रकारे, लहान मुलांचे चित्र काढताना पुढील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात:

लहान मुलाचा केवळ लहान आकार महत्त्वाचा नसतो तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणे आवश्यक असते.
हातापायांची बोटे लहान काढली की नखे आपोआप लहान होतात.
नाकाचा, ओठांचा आकार काढल्यावर कळते की लहान मुलांच्या भुवया लहान व एका रेषेत असतात.
लहान मुलांना दाढी-मिशी नसते.
व्यंगचित्रे बघताना व काढताना अशा बारीकसारीक गोष्टींची नोंद घेणे गरजेचे आहे.

हास्यचित्रांतली मुलं स्थूलवाचन स्वाध्याय | Hasyachitratli mul Swadhyay 9th

मधुकर धर्मापुरीकर (१९५४) : कथालेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक - अभ्यासक. १९७६ पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथालेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन. किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या ‘अन्कॉमन मॅन आर. के. लक्ष्मण.’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. 

आर. के. नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी ॲण्ड फ्रेंडज’ या पुस्तकांचे मराठी अनुवाद केलेले आहेत. ‘अप्रूप’, ‘रूप’, ‘विश्वनाथ’, ‘चिनकूल’ हे कथासंग्रह; ‘रेषालेखक वसंत सरवटे’, ‘हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडले’ ही पुस्तके प्रसिद्ध. हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय? ती कशी वाचायला पाहिजेत? हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे. हास्यचित्रे, व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्रे व व्यंगचित्रे यांमधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे. प्रस्तुत लेख ‘वयम् २०१६’च्या दिवाळी अंकातून घेतला आहे. 

हास्यचित्रांतली मुलं स्थूलवाचन 

आपण दररोज कार्टून्स पाहतो, ती आपल्या इतक्या सवयीची झालेली आहेत, की कार्टून्सच्या ऐवजी त्याला कुणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं, की आपण थबकतो. शिवाय, आपण सहसा जी पाहत असतो, ती असतात ‘स्ट्रीप कार्टून्स’ (म्हणजे चित्रमालिका).

 ‘चिंटू’ हे त्याचे सर्वांत महत्त्वाचे असे उदाहरण. अशा चित्राच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं, मग त्याच्या दुसऱ्या- तिसऱ्या भागांत त्या सांगण्या-बोलण्यातून उलगडणारी गंमत असते! कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खुदकन हसू येतं आपल्याला. असं चित्र हे हास्यचित्र असतं; पण हास्यचित्र म्हणजे काय, असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल? 

कुणी सांगेल, वेडंवाकडं चित्र काढलं, की ते झालं कार्टून! कुणी म्हणेल, त्यात एक जोक असतो आणि कुणी सांगेल, त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं, वगैरे... हे सगळं सांगणं-बोलणं बाजूला ठेवून, आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल - ‘सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र, म्हणजे हास्यचित्र’. हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय, तर ते पाहिलं, की आपल्याला हसू येतं! व्यंगचित्र म्हणजे, हास्यचित्राचा पुढला टप्पा. व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं; पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो, तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो, 

हे आपल्या लक्षात येतं. मुलांची हास्यचित्रं काढणं ही सर्वांत अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे, केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात, ती मुलं काढणं फार अवघड असतं, का ? तुम्ही काढून पाहा, तेव्हा लक्षात येईल. कारण, लहान मुलाचं चित्र-आकारानं लहान काढलं, तर ते थोडंच लहान मुलाचं वाटणार! एखादा उंच माणूस काढला, तर तो त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का, छे! मग... दाढीमिश्या नसल्या, की होईल का चित्रातलं पोरगं-नाही बुवा! तसंही होणार नाही. त्याला शर्ट-चड्डी घातली, की होईल का ते पोरगं... चित्र काढायचा प्रयत्न केला, की आपल्या या अडचणी लक्षात येतात. 

मोठ्या माणसाकडे आणि मुलाकडे आपण बारकाईनं पाहिलेलंच नाही, हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल! आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं; पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वांत कठीण! आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी, आपापल्या व्यंगचित्रांत-हास्यचित्रांत लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे, ते पाहूया. हास्यचित्र मधुकर धर्मापुरीकर (१९५४) : कथालेखक, ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक - अभ्यासक. १९७६ पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथालेखनासोबतच व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन. 

किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या ‘अन्कॉमन मॅन आर. के. लक्ष्मण.’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. आर. के. नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी ॲण्ड फ्रेंडज’ या पुस्तकांचे मराठी अनुवाद केलेले आहेत. ‘अप्रूप’, ‘रूप’, ‘विश्वनाथ’, ‘चिनकूल’ हे कथासंग्रह; ‘रेषालेखक वसंत सरवटे’, ‘हसऱ्या रेषेतून हसवण्याच्या पलीकडले’ ही पुस्तके प्रसिद्ध. हास्यचित्र, व्यंगचित्र म्हणजे काय? ती कशी वाचायला पाहिजेत? हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे. हास्यचित्रे, व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्रे व व्यंगचित्रे यांमधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे. प्रस्तुत लेख ‘वयम् २०१६’च्या दिवाळी अंकातून घेतला आहे. |हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन) 18 म्हटलं, की आधी आठवण येते, ती शि.द. फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्रांची. 

शाळेतल्या चौथी-पाचवीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची हास्यचित्रे होती, ती पाहताना गणिताचा ‘बाऊ’ कमी झाला होता मुलांचा! त्यांचं हे हास्यचित्र पाहा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात, असा आपला समज. मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे, तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे, तेही किती काळजीने-दुधाच्या बाटलीने! श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यचित्रकार. त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट-नाजूक आणि लवचीक अशी! त्यांच्या या हास्यचित्रांत पाहा. 

अगदी रांगणारं मूल काढलं आहे, त्याची हालचाल जाणवते, नाही का! शिवाय देवाला ‘फूल’ देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा! हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक असतो. चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या-बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो, तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते. डेव्हीड लँग्डन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही चित्रं पाहा. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे, हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. तर दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं; त्याला व्यंगचित्र म्हणता येईल. का बरं?... चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं, ते काळ्या रंगाकडे-मुलाच्या मोठ्याने रडण्याकडे. आपल्याला वाटून जातं, की लहान मुलं उगीचच रडत असतात, तसंच हा रडतो आहे, बाकी काही नाही; पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसते, ती सेफ्टी पिन... आणि विचार येतो, 

अरे! ही पिन याला टोचत असणार आणि म्हणून याने भोकाड पसरले असणार. तसेच असावे, कारण मुलांच्या रडण्याला काही ‘कारण’ असतं! इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत, पाहा. 19 लहान मुलं लहान कशी दिसतात चित्रात? त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल, तर ज्या व्यंगचित्रात -हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत, अशी चित्रं पाहावीत. हे आहे, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी रेखाटलेलं व्यंगचित्र. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे, मुलाला जमिनीवर बसवून त्याचे केस कापले जायचे. इथे पाहा, तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा, कंटाळलेला, वैतागलेला मुलगा... तेच हात-पाय, तेच नाक-डोळे; पण फरक कुठे आहे ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे मूल, लहान मूल वाटतं? 

आकाराने लहान-मोठेपण आहेच; पण त्याशिवाय अधिक काय आहे? ही चिंटूची चित्रमालिका पाहा. इथेही हा फरक आपल्याला दिसतो. शिवाय, पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्याच्या बाबांप्रमाणे आपल्यालाही स्पष्ट कळत नाही, मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा ‘अर्थ’ समजतो. त्या अर्थानं हे उत्तम असे व्यंगचित्र आहे, नाही का! आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर याचे हे व्यंगचित्र. चित्र पाहताच आपल्याला वाटते, ही दोन वेगवेगळी चित्रं आहेत- एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस; पण भिंतीवर लावलेले तेच चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते, की हा लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवतो आहे आणि आता मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवतो आहे. लहान मुलांना ‘मोठ्या’ वस्तूंचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल-सूक्ष्म असा होत जातो, बाह्य आकाराचं आकर्षण कमी होत असतं, असं या व्यंगचित्रकाराला सांगायचं आहे. 20 आता हे हास्यचित्र. 

चित्रकलेवर हुकूमत मिळवली, की हास्यचित्रात काय जादू करता येते, त्याचं उदाहरण. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं. मुलाची कॅप, त्याचा शर्ट आणि सॉक्स - बूट पाहून लक्षात येतं, की हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तूअगदी तयार असतात. इथे, त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसलं आहे अन् ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पाहा ना, कसा वेडावाकडा झालेला आहे, शिवाय त्याचा चेहरा...आपल्याला अगदी गुंतवून टाकणारं हे हास्यचित्र. आता आपल्या लक्षात आलं असेल, की लहान मुलाचं चित्र काढताना, त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा लहान आकारच महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. 

म्हणजे, हाता-पायांची बोटं, ती लहान काढली, की आपोआप नखं लहान होतात. नाकाचा, ओठांचा आकार काढल्यावर कळतं, की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेच्या असतात आणि लहान मुलांना दाढी-मिश्या नसतात, हे तुम्हांला सांगायची गरज नाही! यापुढे व्यंगचित्रं-हास्यचित्रं पाहताना आणि काढताना, अशा बारीकसारीक गोष्टींची नोंद तुम्हीसुद्धा घेऊ शकाल.

हास्यचित्रांतली मुलं स्थूलवाचन स्वाध्याय | Hasyachitratli mul Swadhyay 9th

  • Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
  • Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुल (स्थूलवाचन)
  • 9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं Textbook Questions and Answers
  • हास्यचित्रांतली मुलं स्थूलवाचन स्वाध्याय,
  • हास्यचित्रांतली मुलं स्थूलवाचन,
  • हास्यचित्रांतली मुलं स्थूलवाचन स्वाध्याय 9th,
  • हास्यचित्रांतली मुलं स्वाध्याय,
  • हास्यचित्रांतली मुलं स्थूलवाचन स्पष्टीकरण,
  • हास्यचित्रांतली मुलं इयत्ता नववी स्वाध्याय,
  • हास्यचित्रांतली मुलं स्थूलवाचन स्वाध्याय 9 वी

हास्यचित्रांतली मुलं स्थूलवाचन स्वाध्याय | Hasyachitratli mul Swadhyay 9th


Maharashtra State Board 9th Std Marathi Kumarbharati Textbook Solutions
Chapter 1 वंद्य ‘वन्दे मातरम्’ (गीत)
Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव
Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई
Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त
Chapter 4 नात्यांची घट्ट वीण
Chapter 5 एक होती समई
Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)
Chapter 6 या झोपडीत माझ्या (कविता)
Chapter 7 दुपार
Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या
Chapter 9 मी वाचवतोय (कविता)
Chapter 10 यंत्रांनी केलं बंड
Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)
Chapter 11 मातीची सावली
Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया (पोवाडा)
Chapter 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया
Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर
Chapter 15 निरोप (कविता)
Chapter 15.1 ‘बिग ५’ च्या सहवासात (स्थूलवाचन)
Chapter 16 वनवासी (कविता)
Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
Chapter 18 हसरे दुःख
Chapter 19 प्रीतम
Chapt er 20 आपुले जगणे…आपुली ओळख! (कविता)
Chapter 20.1 विश्वकोश (स्थूलवाचन)
उपयोजित लेखन

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post