मी वाचवतोय स्वाध्याय मराठी इयत्ता नववी | Mi Vachavtoy Swadhyay 9th
1. कोष्टक पूर्ण करा:
SOLUTION:
पूर्वीचे व्यवसाय पूर्वीचे खेळ
1. लोहारकाम 1. विटीदांडू
2. कुंभार [मडकी बनवणे] 2. लगोरी
3. भांड्यांना कल्हई करणे 3. आट्यापाट्या
2. आकृती पूर्ण करा:
प्रश्न 1. आकृती पूर्ण करा:
SOLUTION:
3. सकारण लिहा:
प्रश्न 1. सकारण लिहा:
SOLUTION:
जुन्या गोष्टींपैकी वाचाव्यात अशा वाटणाऱ्या गोष्टी | त्या गोष्टी वाचवण्याची तुमच्या मते कारणे |
1. कविता | 1. मन समृद्ध होते |
2. आई | 2. प्रेम, माया, जिव्हाळा लाभतो |
3. बोली | 3. विचार व्यक्त करता येतात |
4. भूमी | 4. मूल्यांवर निष्ठा असते |
4. कव्यसौंदर्य.
प्रश्न [अ]
तुम्हांला जाणवलेली कवीच्या मनातली खंत स्पष्ट करा.
SOLUTION:
जुन्या जमान्यातील काही चांगल्या गोष्टी हरवत व दुरावत चालल्या आहेत, यांची खंत कवीला वाटते. बदलत चाललेल्या समाजातील वास्तव कवीच्या मनाला खटकते. आपण आईला ‘आई’ अशी साद घालत नाही. वासरासाठी गोठ्यात गायही हंबरत नाही. मॉलच्या नवीन झगमगीत संस्कृतीमुळे किराणा व भुसार हरवत चाललेयत. गावगाड्यातील व्यवसाय लोप पावतायत. मुले मातीतले खेळ खेळत नाहीत. कुणी लेखन करीत नाही. मातृभाषेत कुणी या भूमीतली संस्कृती जपत नाही. अशा प्रकारे सांस्कृतिक वैभव नष्ट होण्याची खंत कवीला बोचते आहे.
प्रश्न [आ]
‘शब्द बापुडे केवळ वारा’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य शब्दबद्ध करा.
SOLUTION:
पूर्वीच्या कविता किंवा साहित्य उच्च सांस्कृतिक मूल्य जपणारे होते. जीवनानुभूतीतून आदर्श व प्रेरणा जनमानसाला मिळत होत्या. परंतु आता लिहिणाऱ्या हातातून सकस साहित्यनिर्मिती होत नाही, हे कवीला सांगायचे आहे. जो शब्दपसारा दिसतो तो भावनाशून्य व पोकळ आहे, असे कवीला म्हणायचे आहे. शाश्वत राहणारे अभिजात साहित्य निर्माण होत नाही, याची खंत व्यक्त करताना कवी म्हणतात की, आताचे शब्द केविलवाणे झाले आहेत व ते वाऱ्यावर विरून जात आहेत. आता लिहिल्या जाणाऱ्या शब्दांची नश्वरता व तात्कालिकता कवीला या ओळीतून सांगायची आहे.
प्रश्न [इ]
सामाजिक बदलाबद्दल कवितेतून व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
SOLUTION:
पूर्वी गावगाडा होता. नैतिक मूल्ये जपणारी गावची संस्कृती होती. हळूहळू समाज बदलत गेला. शहरे वाढू लागली. सगळ्या वस्तू झगमगीत मॉलमध्ये, सुपरमार्केटमध्ये मिळू लागल्या. त्यामुळे छोटी छोटी किराणा, भुसार मालाची दुकाने हरवून गेली. लोहाराचा भाता बंद पडला. कुंभाराचे चाक फिरायचे थांबले. तांब्या-पितळेच्या भांड्यांचा वापर लयाला गेल्यामुळे कल्हईची झिलई निघून गेली. चुलीची जागा गॅसच्या शेगड्यांनी घेतली. आधुनिक समाजव्यवहारांमुळे मायेची माणसे दुरावली. अशा प्रकारे या कवितेत सामाजिक बदलाविषयी कवीने सांगितले आहे.
5. स्वमत
प्रश्न [अ]
‘माझी बोली’ या संकल्पनेतून तुम्हांला समजलेला कवीचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडा.
SOLUTION:
‘माझी बोली’ म्हणजे मायबोली किंवा मातृभाषा होय. वेगाने बदलत जाणाऱ्या समाजात जी नवीन पिढी शिकते आहे; त्यांच्यावर शिशुवर्गापासूनच इंग्रजीचे संस्कार होत आहे. पूर्वीचे घरचे मराठमोळे वातावरण झपाट्याने बदलत आहे. आधुनिकीकरणामुळे नवीन पिढीच्या तोंडी इंग्रजी रुळत जाते आहे. आईची जागा ‘मम्मी’ने घेतली आहे. मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण हळूहळू मंदावत आहे. मातृभाषा हेच विचार व भावना मांडण्याचे नैसर्गिक माध्यम असते. ते माध्यम बंद पडत चालल्यामुळे कवीने खंत व्यक्त केली आहे. अशा प्रकारे ‘माझी बोली’ या संकल्पनेतून कवींची खेदजनक भावना व्यक्त झाली आहे.
प्रश्न [आ]
‘मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो,’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
SOLUTION:
शहरे वाढली तसतसे लोकांच्या गरजा पुरवणारे ‘मॉल’ वाढले. पूर्वी शहरामध्येसुद्धा छोटे छोटे दुकानदार होते. विशिष्ट प्रकारच्या वस्तू विशिष्ट दुकानांत मिळायच्या. मॉलमध्ये सर्व वस्तूंची दुकाने एकत्र असतात. शिवाय खादयपान सेवेची हॉटेल्स व सिनेमागृहेही असतात. मॉलच्या एकंदर झगमगाटाचे आकर्षण माणसांच्या ठायी निर्माण झाले. महागड्या वस्तू म्हणजे दर्जेदार वस्तू असा गैरसमज फोफावला. त्यातच आकर्षक जाहिरातींची भर पडल्यामुळे लोकांना मॉलचे आकर्षण निर्माण झाले. साहजिकच माणसांचा मॉलमध्ये राबता सुरू झाला आणि त्यांनी छोट्या दुकानांकडे पाठ फिरवली. अर्थात मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसतो, हे खरे आहे.
उपक्रम:
तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या सामाजिक बदलांची पुढील मुद्द्यांच्या आधारे नोंद करा व कोष्टक तयार करा:
बदल
परिणाम
तुमचे मत
1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 2 : [आकलन]
प्रश्न 1.
शब्दजाल पूर्ण करा:
SOLUTION:
1. हाकेतून हद्दपार होत आहे.
[1] हंबरायच्या थांबल्या आहेत.
2. लोहाराचा भाता
[1] कुंभाराचा आवा
प्रश्न 3.
चौकटी पूर्ण करा:
SOLUTION:
[i] किराणा [ii] भुसार
रटरटणारी आमटी
कल्हईची झिलई
आईची बोली
बापुडे शब्द
परकरी मुली
कृती 3 : [दोन ओळींचा सरळ अर्थ]
प्रश्न 1.
हरवत चाललाय किराणा आणि भुसार सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर
SOLUTION:
बदलत चाललेल्या परिस्थितीचा आढावा घेताना कवी सतीश काळसेकर म्हणतात की, शहरात मोठमोठे मॉल व सुपर मार्केट निर्माण झाल्यामुळे पूर्वीची किराणामालाची व भुसारीची दुकाने भूतकाळात जमा झाली आहेत.
कृतिपत्रिकेतील प्रश्न 2 [आ] साठी…
प्रश्न 1.
पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:
कविता - मी वाचवतोय.
SOLUTION:
मी वाचवतोय.
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → सतीश काळसेकर.
2. कवितेचा विषय → वेगाने बदलत जाणाऱ्या महानगरीय समाजाचे वास्तव चित्रण हा कवितेचा विषय आहे.
3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →
- हाक = साद
- आई = माता
- विस्तव = आग
- राख = रक्षा
- वारा = वात.
4. कवितेतून मिळणारा संदेश → चांगली जुनी संस्कारक्षम मूल्ये हरवू नयेत; आईची बोली पारखी होऊ नये; भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होता कामा नये; हा संदेश प्रस्तुत कविता देते.
5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन महानगरीय बदलते वास्तव यांतील अंतर्विरोध कवींनी चपखल शब्दांत मांडला आहे. कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे. यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे. मुक्त गदय शैली आशयाला पूरक आहे. कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारी आहे. कवितेचा शेवट परिणामकारक झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात.
6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → यंत्रयुगातील नवीन बदलांमुळे जुनी मूल्ये ढासळत चाललीयत. ती वाचवणे व सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
→ बदलत जाणाऱ्या वास्तवामध्ये ममी-डॅडी या परकीय शब्दांमुळे
आईची मायेची हाक आता ऐकू येत नाही. गोठ्यातल्या गाईसुद्धा 3 आता नैसर्गिक हंबरणे विसरत चालल्या आहेत.
8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → जुनी मूल्ये नामशेष होण्याची खंत कवींनी आर्तपणे व तेवढ्याच परखडपणे मांडली आहे. नवीन पिढीचा निरुद्देश चंगळवाद अधोरेखित केला आहे. आई, आईची बोली, भूमी आणि कविता वाचवण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला आहे. या सर्व कारणांमुळे ही कविता मला खूप आवडली.
कृतिपत्रिकेतील प्रश्न 2 [इ] साठी…
प्रश्न 1.
पुढील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:
‘हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई.’
SOLUTION:
आशयसौंदर्य: यंत्रवत असलेल्या महानगरीय जीवनात जुनी जीवनमूल्ये नष्ट होत आहेत. क्रय वस्तूंच्या बेगडी झगमगाटात जुनी चूल, जुने खेळ, बोली व संस्कृती यांचा नवीन पिढीला विसर पडत चालला आहे, या वास्तववादी आशयाचे विदारक चित्रण कवी सतीश काळसेकर यांनी ‘मी वाचवतोय’ या कवितेत केले आहे.
काव्यसौंदर्य: बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दांत चितारताना प्रस्तुत ओळींमध्ये कवी म्हणतात की ‘मम्मी-डॅडी’ या उसन्या परिभाषेमुळे ‘आई’. अशी हाक आता ऐकू येत नाही. जणू ती हाक सीमेबाहेर गेली आहे. गोठ्यातल्या मायेचा वारसा असलेल्या गाईसुद्धा आता नैसर्गिक हंबरणे विसरल्या आहेत. त्या आता आपल्या वासरांसाठी हंबरत नाहीत. म्हणजेच आई-लेकरांचे संबंध मायाममतेचे राहिले नाहीत, ही खंत कवींनी व्यक्त केली आहे. भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होते, याची बोचणी प्रस्तुत ओळींमध्ये स्पष्टपणे दर्शवली आहे.
भाषिक वैशिष्ट्ये: जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन महानगरीय बदलते वास्तव यांतील अंतर्विरोध कवीने चपखल शब्दांत मांडला आहे. कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे. यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे. मुक्त गदय शैली आशयाला पूरक आहे. कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारी आहे. योग्य परिणामकारकता शब्दाशब्दांत अभिव्यक्त झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात.
भाषाभ्यास:
[अ] व्याकरण घटकांवर आधारित कृती:
1. समास:
प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा :
- सत्यासत्य
- सप्तसागर
- पूर्वपश्चिम
- रक्तचंदन
SOLUTION:
- वैकल्पिक द्वंद्व
- द्विगू
- इतरेतर द्वंद्व
- कर्मधारय.
2. वाक्प्रचार:
प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:
1. दंग असणे
2. दुरावणे.
SOLUTION:
1. दंग असणे - अर्थ : मग्न असणे.
वाक्य: जेव्हा बघावे तेव्हा मंदार खेळामध्ये दंग असतो.
2. दुरावणे - अर्थ : लांब जाणे.
वाक्य : परदेशी गेल्यामुळे ममताला आईवडिलांची संगत दुरावली.
[आ] भाषिक घटकांवर आधारित कृती:
1. शब्दसंपत्ती:
प्रश्न 1.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा:
1. लिहिता-वाचता येणारा → …………………..
2. लिहिता-वाचता न येणारा → ………………..
SOLUTION:
1. साक्षर
2. निरक्षर.
प्रश्न 2.
अनेकवचन लिहा:
- गाय
- खेळ
- कविता
- सुट्टी.
SOLUTION:
- गाई
- खेळ
- कविता
- सुट्ट्या
प्रश्न 3.
पुढील शब्दांतील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द लिहा:
1. वाचवतोय
2. समाजाचे
SOLUTION:
1. चव, वय
2. मास सजा
2. लेखननियम:
प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:
1. बोलचाली, बोलाचाली, बोलाचालि, बोलचालि.
2. दूरर्दशन, दुरदर्शन, दूर्रदर्शन, दूरदर्शन.
SOLUTION:
1. बोलाचाली
2. दूरदर्शन.
3. पारिभाषिक शब्द:
प्रश्न 1.
मराठी प्रतिशब्द लिहा:
- Lyric
- Magazine
- Category
- Index
SOLUTION:
- भावगीत
- मासिक-पत्रिका
- प्रवर्ग
- अनुक्रमणिका.
मी वाचवतोय Summary in Marathi
कवितेचा आशय:
समाजाचे वास्तव वेगाने बदलत चालले आहे. जुने व्यवसाय, जुने खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. यंत्रयुगाच्या आधुनिक झगमगाटात आईची बोली कोणी बोलत नाही. नवीन पिढी यांत्रिक वस्तूंच्या आहारी गेली आहे. या सर्व बदलांची खंत या कवितेत कवींनी व्यक्त केली आहे. जुन्या काही चांगल्या गोष्टी या बदलातून वाचवणे गरजेचे झाले आहे.
शब्दार्थ:
- वाचवतोय - बचाव करतोय.
- मुकाट - शांतपणे, निमूट.
- विस्तव - निखारे.
- धग - ऊब.
- रटरटणारी - शिजणारी.
- सहित - सोबत, बरोबर, संगती.
- बोलाचाली - संभाषण.
- बोली - भाषा.
- दंगा - [इथे अर्थ] गोंधळ, आरडाओरडा.
- परकऱ्या - परकर घालणाऱ्या [मुली].
- लिहिते हात - लेखनाचा सराव.
- बापुडे - गरीब, केविलवाणे.
- भूमी - धरती.
टिपा:
- हंबरणे - गाईचा आवाज [ओरडणे].
- किराणा-भुसार - अन्नधान्याच्या वस्तू.
- सुपर मार्केट - अन्नधान्य, भाजीपाला, खाण्याचे तयार पदार्थ, तसेच अन्य अगणित वस्तू एका छपराखाली मिळतील असे, भव्य दुकान ; मोठमोठाले मॉल.
- लोहाराचा भाता - लोखंडी वस्तू बनवण्यासाठी लोहार वापरत असलेल्या भट्टीला वारा घालण्याचे साधन.
- कुंभाराचा आवा - ओल्या मातीच्या गोळ्याला मडक्यांचा आकार देण्यासाठी कुंभार वापरत असलेले लाकडी गोल चाक.
- गावगाडा - गावची जुनी संस्कृती व्यवहार.
- कल्हईची झिलई - तांब्या-पितळेची भांडी कळकू नयेत म्हणून कथिलाची तार तापवून त्याच्या रसापासून तयार केलेलामुलामा.
- आईची बोली - मातृभाषा.
- विटीदांडू - लाकडाची छोटी विटी व मोठा दांडू यांचा जुना मैदानी खेळ.
- लगोऱ्या - दगडांच्या चकत्या एकावर एक रचून चेंडूने फोडण्याचा जुना मैदानी खेळ.
- आट्यापाट्या - जमिनीवर आडव्या-उभ्या रेघा आखून खेळता येणारा सांघिक खेळ.
- पिंगा - मान गोल गोल फिरवून घुमण्याचा खेळ.
- क्राइम-थ्रिलर - गुन्हेगारी जीवनाचे चित्रण करणाऱ्या दूरदर्शनवरील मालिका.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:
- हद्दपार होणे - सीमेबाहेर सोडणे [जीवनातून निघून जाणे].
- दुरावत जाणे - लांब जाणे.
- दंग असणे - गुंगणे, मग्न असणे.
- विरून जाणे - विरघळून जाणे, नाहीसे होणे.
कवितेचा भावार्थ:
बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दांत चितारताना कवी म्हणतात - ‘आई’ अशी हाक आता ऐकू येत नाही. जणू ती सीमेबाहेर गेली आहे. गोठ्यातल्या गाईसुद्धा आता हंबरणे विसरल्या आहेत. त्या आता वासरासाठी हंबरत नाहीत. [आई-लेकरांचे संबंध मायेचे राहिले नाहीत.]
मोठमोठे मॉल्स व सुपर मार्केट निर्माण झाल्यामुळे त्यांच्या झगमगाटी दुनियेत आता पूर्वीच्या किराणा व भुसाराची दुकाने हरवून जात आहेत. पूर्वीच्या गावच्या संस्कृतीत [गावगाड्यात] असलेले [जुने व्यावसायिक] लोहार, कुंभार नि त्यांचे भाते व चाके गावगाड्याबरोबरच निमूटपणे नाहीशी झाली आहेत. पूर्वीच्या भांड्यांची कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली आहे. चुलीच्या जाळावर शिजत असलेली आमटी राखेसकट दूर गेली. आता धुराशिवाय ती गॅस शेगडीवर शिजत असलेली दिसते.संभाषणातून-संवादातून हल्ली [माझी] मातृभाषा [आईची बोली] निघून चालली आहे.
आता मुले सुट्ट्यांमध्ये पूर्वीसारखी विटीदांडू आणि लगोरीचे खेळ खेळत नाहीत. त्यांचा गिल्ला आता थांबलाय. आता आट्यापाट्या किंवा पिंगा असले जुने खेळ नाहीसे झाले आहेत. परकर घालणाऱ्या लहान मुली आता पूर्वीचे मातीतले खेळ खेळताना दिसत नाहीत. आता मुले दूरदर्शनच्या स्पोर्ट चॅनेलवर क्रिकेटची मॅच पाहण्यात रमून जातात किंवा गुन्हेगारी विश्वातील मालिका बघत राहतात. आता कुणाकडूनही पूर्वीसारख्या गोष्टी लिहिल्या जात नाहीत. लिहिणाऱ्या हातांचा सराव थांबलाय. शब्द केविलवाणे होऊन फक्त वाऱ्यासारखे विरून जातात.
अशा या बदलत्या भयानक वास्तवात मी माझी कविता सांभाळतोय आणि कवितेसोबतच माझी आई, माझी भाषा नि माझी भूमी यांचा { मी या आधुनिक वास्तवापासून बचाव करतो आहे.
मी वाचवतोय स्वाध्याय मराठी इयत्ता नववी | Mi Vachavtoy Swadhyay 9th
सतीश काळसेकर (१९४३) : प्रसिद्ध कवी. ‘इंद्रियोपनिषद’, ‘साक्षात’, ‘विलंबित’ हे कवितासंग्रह; ‘कविता लेनिनसाठी’
या लेनिनवरच्या जगभरातील कवितांच्या अनुवादांच्या संग्रहाचे संपादन. ‘तात्पर्य’, ‘मागोवा’, ‘लोकवाङ्मय’ या
नियतकालिकांच्या संपादनात सहभाग.
वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव चित्र प्रस्तुत कवितेतून कवीने रेखाटले आहे. कवी त्यांच्या स्वतंत्र
अस्तित्वाच्या गोष्टी वाचवू इच्छितात. महानगरी जीवनातील अस्तित्वाच्या अवकळेचे, भोवतालच्या सामाजिक स्थितींचे
चित्रण काळसेकर यांच्या कवितेत आहे. प्रस्तुत कविता साधना दिवाळी अंक २००५ या मासिकातून घेतली आहे.
मी वाचवतोय स्वाध्याय मराठी इयत्ता नववी | Mi Vachavtoy Swadhyay 9th
हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
हरवत चाललाय किराणा आणि भुसार
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर
लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा
निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट
कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली
मागच्या धगीवर रटरटणारी आमटी
राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर
बोलाचालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली
सुटीत आता खेळत नाहीत मुलं
विटीदांडू आणि लगोऱ्या
थांबून गेलाय त्यांचा दंगा,
आट्यापाट्या आणि पिंगा
परकऱ्या मुली खेळत नाहीत आता
आधीचे मातीतले खेळ
पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर
बघत क्रिकेटची मॅच
आणि उलगडत क्राइम-थ्रिलर
लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते
शब्द बापुडे केवळ वारा
तसे विरून जातायत
मी वाचवतोय माझी कविता
आणि माझी आई
आणि माझी बोली
आणि माझी भूमी
मी वाचवतोय स्वाध्याय मराठी इयत्ता नववी | Mi Vachavtoy Swadhyay 9th
- Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 9 मी वाचवतोय Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
- Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 9 मी वाचवतोय [कविता]
- 9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 9 मी वाचवतोय Textbook Questions and Ansers
- मी वाचवतोय मराठी कविता
- मी वाचवतोय कविता
- मी वाचवतोय कवितेचा भावार्थ
- मी वाचवतोय कवितेचा विषय
- मी वाचवतोय रसग्रहण
- मी वाचवतोय कविता रसग्रहण
- मी वाचवतोय या कवितेचा विषय
- मी वाचवतोय कवितेचे रसग्रहण
- मी वाचवतोय स्वाध्याय