ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय | Olympic Vartulacha Gofh 9th

 

ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय | Olympic Vartulacha Gofh Maharashtra State Board 9th Marathi Solution 

ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय | Olympic Vartulacha Gofh


1. आकृती पूर्ण करा:

प्रश्न 1.
  
SOLUTION:
  

प्रश्न [आ]
  
SOLUTION:
  

2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा:

प्रश्न 1. पहिले ऑलिंपिक व्हिलेज ……….. येथे वसले.
[अ] ग्रीस
[आ] मेलबोर्न
[इ] फ्रान्स
[ई] अमेरिका
SOLUTION:
पहिले ऑलिंपिक व्हिलेज मेलबोर्न येथे वसले.

प्रश्न 2. पहिले ऑलिंपिक सामने ……… साली झाले.
[अ] 1894
[आ] 1956
[इ] इ. स. पूर्व 776
[ई] इ. स. पूर्व 394
SOLUTION:
पहिले ऑलिंपिक सामने इ. स. पूर्व 776 साली झाले.

3. पुढील वाक्य वाचा. त्यातील शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखादया शब्दाला पुढील मुद्दे लागू नसतील, तर तिथे - हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ या शब्दासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे - हे चिन्ह येईल.

प्रश्न 1. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.
  
SOLUTION:
  

4. स्वमत:

प्रश्न 1. ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’ ही संकल्पना स्पष्ट करा.
SOLUTION:
ऑलिंपिक सामन्यात पृथ्वीवरील बहुसंख्य राष्ट्रांचे खेळाडू सहभागी होतात. ते त्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात. संपूर्ण जगाचे या सामन्यांकडे लक्ष असते. या क्रीडास्पर्धा आहेत. त्यांत जातिभेद, धर्मभेद व वर्णभेद नसतो. सगळेजण समान असतात. अमेरिका हा गौरवर्णीय लोकांचा देश. तरीही जेसी ओवेन्स या आफ्रिकी वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने केवढा गौरव केला! त्या खेळाडूचा अमेरिकेला केवढा अभिमान वाटला! या क्रीडास्पर्धांमुळे माणसामाणसांतील द्वेष, वैर या भावना नष्ट होतात. माणसे एकमेकांशी प्रेमाने, बंधुभावाने वागतात. म्हणून ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व होय.
 

उपक्रम:


प्रश्न 1. सन 2016 साली झालेल्या ऑलिंपिक सामन्यातील सुवर्ण, रजत व कांस्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती आंतरजालाचा वापर करून पुढील तक्त्यात लिहा:
  

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Additional Important Questions and Answers

उतारा क्र. 1

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : [आकलन]

प्रश्न 1. कोष्टक पूर्ण करा:
ब्रीदवाक्यातील शब्दअर्थ
1. सिटियस1. ………………….
2. ……………………..2. ………………….
3. ……………………..3. तेजस्विता

उत्तर:

ब्रीदवाक्यातील शब्दअर्थ
1. सिटियस1. गतिमानता
2. ऑल्टियस2. उच्चता
3. फॉर्टियस3. तेजस्विता
 

कृती 2 : [आकलन]

प्रश्न 1. माहिती लिहा:
ऑलिंपिक ध्वजावरील वर्तुळांचे रंग:
…………………
…………………
…………………
…………………
काळा.
SOLUTION:
 • लाल
 • पिवळा
 • निळा
 • हिरवा
 • काळा.

प्रश्न 2.  विधाने पूर्ण करा:
ऑलिंपिक ध्वजावरील पाच वर्तुळे म्हणजे जगातील
…………………
…………………
…………………
…………………
युरोप हे पाच खंड.
SOLUTION:
 • आफ्रिका
 • अमेरिका
 • आशिया
 • ऑस्ट्रेलिया
प्रश्न 3. ऑलिंपिक ध्वजाचा पांढराशुभ्र रंग म्हणजे
SOLUTION:
ऑलिंपिक ध्वजाचा पांढराशुभ्र रंग म्हणजे विशाल अंतराळ.

कृती 3 : [स्वमत/अभिव्यक्ती]

प्रश्न 1. ऑलिंपिकच्या खेळांचा तुमच्या मते असलेला फायदा समजावून सांगा.
SOLUTION:
माणूस हा मुळात प्राणीच आहे. त्याच्या मनात हिंसा ठासून भरलेली आहे. या ना त्या कारणाने मनातली हिंसा स्फोटासारखी बाहेर पडते आणि माणसे एकमेकांच्या जिवावर उठतात. आदिमानवाच्या काळापासून हे चालू आहे. परका एखादा माणूस दुसऱ्या माणसाला दिसला, तरी ते एकमेकाला ठार मारायला धावत. आतासुद्धा धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने माणसे लढाया करतात हे थांबावे, आपापसात प्रेम वाढावे, जगात शांतता नांदावी यासाठी ऑलिंपिकसारखे खेळ भरवले जातात. या खेळांमुळे जिंकण्याची इच्छा पूर्ण होते. दुसऱ्यांना हरवण्याचे समाधान मिळते. जगात बंधुभाव निर्माण होण्यास मदत होते, ऑलिंपिक खेळांचा हा फार मोठा फायदा आहे.

उतारा क्र. 2

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1 : [आकलन]

प्रश्न 1. आकृती पूर्ण करा:
  
SOLUTION:
  

2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा:

प्रश्न 1. ……………. या वर्षी ऑलिंपिक सामने बंद पडले.
[अ] इ. स. पू. 1936
[आ] इ. स. पू. 18965
[इ] इ. स. पू. 394
[ई] इ. स. पू. 776
SOLUTION:
[३] इ. स. पू. 394 या वर्षी ऑलिंपिक सामने बंद पडले.

कृती 2 : [आकलन]

प्रश्न 1. आकृती पूर्ण करा:
  
SOLUTION:
  

प्रश्न 2. आकृती पूर्ण करा:
  
SOLUTION:
  

प्रश्न 3. सूचनेनुसार कृती करा:
इसवी सन पूर्व काळातील ऑलिंपिकमधील यशस्वी खेळाडूंचा सन्मान करण्याच्या रिती लिहा.
…………………………….
……………………………
……………………………
SOLUTION:
 1. इसवी सन पूर्व काळातील ऑलिंपिकमधील यशस्वी खेळाडूंचा सन्मान करण्याच्या रिती:
 2. ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येई.
 3. अनेक शहरे भेदभाव विसरून यशस्वी खेळाडूंचे प्रचंड स्वागत करीत असत.
 4. राष्ट्रीय सणांच्या वेळी या खेळाडूंना मानाचे स्थान देण्यात येई.

कृती 3 : [स्वमत/अभिव्यक्ती]

प्रश्न 1. ऑलिंपिक स्पर्धांचा तुम्हांला जाणवणारा महत्त्वाचा गुण सांगा आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करा.
SOLUTION:
विराटता हा ऑलिंपिक स्पर्धांचा महत्त्वाचा गुण आहे, असे मला वाटते. पृथ्वीवरील जवळजवळ सर्व देश यात सहभागी होतात. त्यामुळे ऑलिंपिकच्या स्पर्धा संपूर्ण जगाला व्यापून टाकतात. या स्पर्धांचे आयोजनही विराट असते. एक विशाल ऑलिंपिक गाव वसवले जाते. खेळांसाठी एक विशाल मैदान केले जाते. त्याभोवती एक प्रचंड प्रेक्षागार उभारले जाते. रहदारीसाठी खास सडका, लोहमार्ग बांधले जातात.

खेळाडूंसाठी असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे उभारली जातात. त्याच्या जोडीने विशाल उपाहारगृहे बांधली जातात. संपूर्ण जगातून आलेले पाच-सहा हजार खेळाडू सहभागी होतात. लाखभर प्रेक्षक मैदानातील खेळ प्रत्यक्ष पाहतात. संपूर्ण जगाचे प्रातिनिधिक रूप तिथे अवतरते. या विराटतेमुळे आपण कोणा एका देशाचे, धर्माचे राहत नाही. सर्व मानवजात एक बनते. संकुचितपणा कमी होतो. वैर नाहीसे होते. संपूर्ण जगातील लोकांना एका माळेत गुंफण्याचे कार्य ऑलिंपिक स्पर्धा करतात. हे ऑलिंपिक स्पर्धांचे सर्वांत मोठे कार्य आहे.

तारा क्र. 3

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : [आकलन]

प्रश्न 1. कोण ते लिहा:
1. आधुनिक ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन करणारा.
2. 1936 सालच्या ऑलिंपिकमधील अमेरिकेच्या यशाचा मोठा शिल्पकार ठरला.
SOLUTION:
1. कुबर टीन
2. फ्रान्समध्ये

प्रश्न 2. कुठे ते लिहा:
1. 1894 साली ऑलिंपिक काँग्रेस भरवण्यात आली.
2. 1936 साली ऑलिंपिक स्पर्धा भरल्या.
SOLUTION:
1. जेसी ओवेन्स.
2. बर्लिनमध्ये.

कृती 2 : [आकलन]

प्रश्न 1. का ते लिहा:
1. 1894 सालच्या ऑलिंपिक काँग्रेसमध्ये प्राचीन ऑलिंपिक सामन्यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा भरवाव्यात असे ठरले.
2. क्रीडेच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळते.
SOLUTION:
1. शरीरसंपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि विविध देशांतील मैत्री वाढवण्यासाठी.
2. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही म्हणून.

उतारा क्र. 4

1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : [आकलन]

प्रश्न 1. कोणी ते लिहा:
1. ‘मानवी रेल्वे इंजिन’ अशी ख्याती मिळवली.
2. अनवाणी पायाने मॅरेथॉन शर्यत जिंकली.
SOLUTION:
1. एमिल झेटोपेक याने.
2. अबेबे बिकिला याने.

प्रश्न 2. कोण ते लिहा:
1. 1948 साली ऑलिंपिकचे मैदान दणाणून सोडणारी.
2. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू.
SOLUTION:
1. फॅनी बँकर्स
2. ध्यानचंद.

कृती 2 : [आकलन]

प्रश्न 1. आकृती पूर्ण करा:
  
SOLUTION:
  

प्रश्न 2. आकृती पूर्ण करा:
  
SOLUTION:
  


कृती 3 : [स्वमत/अभिव्यक्ती]

प्रश्न1. खेळामुळे एकात्मतेचा संदेश देणारा तुमच्या आठवणीतील प्रसंग लिहा.
SOLUTION:
सचिन तेंडुलकर हा माझा अत्यंत लाडका क्रिकेट खेळाडू अवस्था झाली होती. पाकिस्तानातील क्रीडारसिकही तन्मयतेने त्याचे आहे. माझा एकट्याचाच नव्हे, तर तो सर्वांचाच, सर्व क्रीडारसिकांचा भाषण ऐकत होते. ही खरी एकात्मता. ती सचिन या अलौकिक . लाडका खेळाडू आहे. त्याला भारतरत्न देण्याची सूचना जेव्हा पुढे का खळाडू आह. त्याला भारतरत्न चाचा सूचना जहा पुन , खेळाड़मळे निर्माण झाली होती.

भाषाभ्यास:

[अ] व्याकरण घटकांवर आधारित कृती:

1. समास:

प्रश्न 1. तक्ता भरा:
SOLUTION:
सामासिक शब्द समास
1. त्रिभुवन              द्विगू
2. छोटेमोठे             वैकल्पिक द्ववंद्ववं
3. गंधफुले             समाहार द्ववंद्ववं
4. गुणिजन             कर्मधारय
5. अहिनकुल      इतरेतर द्ववंद्ववं

2. शब्दसिद्धी:

प्रश्न 1. तक्ता भरा: [सामाजिक, राष्ट्रीय, अनंत, विशेष]
SOLUTION:
उपसर्गघटित =  प्रत्ययघटित
अनंत       = सामाजिक
विशेष = राष्ट्रीय

3. वाक्प्रचार:

प्रश्न 1. पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
 • पर्वणी असणे
 • हास होणे
 • ख्याती मिळवणे
 • प्रशंसा करणे.
SOLUTION:
1. पर्वणी असणे- अर्थ: आनंदसोहळा असणे.
वाक्य: ऑलिंपिक सामने म्हणजे क्रीडाशौकिनांसाठी एक पर्वणी असते.

2. -हास होणे- अर्थ : नाश होणे.
वाक्य : पुढे ग्रीक सत्तेचा -हास झाला.

3. ख्याती मिळवणे- अर्थ : प्रसिद्धी मिळवणे.
वाक्य : ‘मानवी रेल्वे इंजिन’ अशी झेटोपेकने ख्याती मिळवली.

4. प्रशंसा करणे- अर्थ : स्तुती करणे.
वाक्य: ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सगळे विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली.

[आ] भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1. प्रतिशब्द लिहा:
 • ध्वज
 • धवल
 • श्रम
 • देश.
SOLUTION:
 • ध्वज = झेंडा
 • धवल = पांढरे
 • श्रम = कष्ट
 • देश = राष्ट्र.
प्रश्न 2. वचन ओळखा:
 • वर्तुळ
 • गोफ
 • क्रीडा
 • खेळ.
SOLUTION:
 • नपुंसकलिंग
 • पुल्लिग
 • स्त्रीलिंग
 • पुल्लिग.

2. लेखननियम:

प्रश्न 1. पुढील शब्द शुद्ध करून लिहा:
 • वसतीगृहे
 • तेजस्वीता
 • अंतरराष्ट्रिय
 • बलंसर्वधन
 • ईतीहास
 • वीश्वबंधूत्त्व
SOLUTION:
 • वसतिगृहे
 • तेजस्विता
 • आंतरराष्ट्रीय
 • बलसंवर्धन
 • इतिहास
 • विश्वबंधुत्व.
 

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1. योग्य विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा:
1.  साऱ्या जगाने या खेळाडूचा केवढा गौरव केला केवढे कौतुक केले
2. रहदारीसाठी अनेक सडका लोहमार्ग पुरुष व स्त्री-खेळाडू यांच्या निवासासाठी इमारती वसतिगृहे बांधली.
SOLUTION:
1. साऱ्या जगाने या खेळाडूचा केवढा गौरव केला! केवढे कौतुक केले!
2. रहदारीसाठी अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री-खेळाडू यांच्या निवासासाठी इमारती, वसतिगृहे बांधली.

4. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1. पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा:
1. Government Letter
2. Medical Examination.
SOLUTION:
1. शासकीय पत्र
2. वैदयकीय तपासणी.

ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Summary in Marathi

प्रस्तावना:
बाळ ज. पंडित हे ख्यातनाम क्रीडासमालोचक होते. विशेष म्हणजे ते मैदानावरही क्रिकेट प्रत्यक्ष खेळले होते. रणजी चषक सामन्यांत त्यांचा सहभाग होता. त्यांना महाराष्ट्र संघातही स्थान मिळाले होते. मात्र, समालोचक म्हणून ते जास्त प्रसिद्ध झाले. त्यांनी मराठीतून अत्यंत रोचक भाषेत क्रिकेटचे समालोचन केले आणि मराठी समालोचन लोकप्रिय केले. खेळ व खेळाडूंवर त्यांनी भरपूर लेखन केले. साध्यासोप्या भाषेत लेखन करणे हा त्यांचा विशेष होता.

प्रस्तुत पाठात लेखकांनी ऑलिंपिकचे स्वरूप मोजक्या शब्दांत कथन केले आहे. ऑलिंपिकचा इतिहास, खेळांसाठी केली जाणारी अवाढव्य तयारी, जगभरातील राष्ट्रांचा सहभाग, ऑलिंपिकचे महत्त्व, ऑलिंपिकमधील गाजलेले काही खेळाडू इत्यादी माहिती त्यांनी प्रस्तुत पाठात दिली आहे. ऑलिंपिकमुळे बंधुभाव निर्माण होण्यास फारच मदत होते, हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

शब्दार्थ:

 • अनन्यसाधारण - एकमेव, त्याच्यासारखे तेच.
 • ब्रीदवाक्य - घोषवाक्य.
 • शिकस्त - प्रयत्न.
 • बलसंवर्धन - सामर्थ्याची जोपासना.
 • बसवण्याची - स्थापन करण्याची, निर्माण करण्याची.
 • पुनरुज्जीवन - नूतनीकरण, जीर्णोद्धार, मृतवत असलेली गोष्ट सुधारणा करून पुन्हा सुरू करणे.
 • अनवाणी - पायात चपला वगैरे काहीही न घालता.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:
1. पुनरुज्जीवन करणे - बंद पडलेली, स्थगित असलेली गोष्ट सुधारणा करून पुन्हा सुरू करणे, मृतवत पडलेली गोष्ट जिवंत करणे.
2. ज्योत तेवत ठेवणे - चांगले प्रयत्न सतत चालू ठेवणे.

ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय | Olympic Vartulacha Gofh Maharashtra State Board 9th Marathi Solution 

बाळ ज. पंडित (१९२९-२०१५) : प्रसिद्ध लेखक. क्रिकेट सामन्यांचे समालोचक. ‘पहिले शतक’, ‘कुमारांचे खेळ’, ‘क्रिकेटमधील नवलकथा’ इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. ऑलिंपिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली? हे सामने भरवण्यामागील उद्‌दिष्टे कोणती? ऑलिंपिक वर्तुळांचा अर्थ काय? या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतला आहे. प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिंपिक क्रीडास्पर्धांविषयीची माहिती दिली आहे.

ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय | Olympic Vartulacha Gofh Maharashtra State Board 9th Marathi Solution 

मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्वस्तरांवर खेळले जाणारे क्रीडासामने हे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. संपूर्ण जगभरातील क्रीडासामन्यांत ‘ऑलिंपिक क्रीडासामन्यांना’ एक मानाचे स्थान आहे. विजयाचे उद्‌दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून, त्यांत पारंगत होऊन आपल्या देशाला ‘ऑलिंपिक विजयाचे मानकरी’ होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया ऑलिंपिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्तेहोते. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले, तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. 

खूपच उंच अशा स्तंभावर एक भलामोठा ध्वज फडफडत असलेला आम्हांला दिसला. ऑलिंपिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्याशुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली होती. जणू पाच मित्रच हातांत हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते! ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि त्यांची शुभ्रधवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. 

या ध्वजावर ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे- ‘सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस.’ म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे; अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत, असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. ऑलिंपिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडाशौकिनांसाठी एक पर्वणीच असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रांतील सुमारे पाच ते सहाहजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. स्त्री-खेळाडूंचीही संख्या दोन हजारांच्या आसपास असते. प्रेक्षागारात सुमारे सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे पंचवीस हजार लोकांनाहे सामने उभे राहून पाहता येतात. 

पोहण्याच्या शर्यतीसाठी चार-पाच तलावही बांधलेले असतात. खेळांचे विशाल मैदान, त्याभोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री-खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपाहारगृहे-असे हे एक मोठे गावच असते! याला ‘ऑलिंपिक व्हिलेज’ असे म्हणतात. ‘ऑलिंपिक व्हिलेज’ वसवण्याची कल्पना इ. स. १९५६ मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली. पहिले ‘ऑलिंपिक व्हिलेज’ तिथलेच. 

ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी होतात. हे सामने पाच दिवस चालत. इ. स. पूर्व ७७६ मध्येहे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. त्या वेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा, ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून, गौरव करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परांतील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत. या सामन्यांतील खेळाडूंना राष्ट्रीय सणसमारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याबरोबर इ. स. पूर्व ३९४ मध्ये हे सामने बंद पडले. 

मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिंपिक सामन्यांची त्यानंतर इ. स. १८९४ साली आधुनिक जगाला आठवण झाली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ‘ऑलिंपिक काँग्रेस’ भरवण्यात आली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. कुबर टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. शरीरसंपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशांतील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिंपिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा भरवाव्यात असे ठरले. १८९६ पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात. 

त्या निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. या सामन्यांत निरनिराळ्या एकवीस खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती नेमलेली असते. या स्पर्धांत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे एक ते तीन प्रतिनिधी या समितीत असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिंपिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो.

 हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू. १९३६ मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत त्याने चार अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे, तर त्या चारही बाबतींत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे, तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्या वेळी केवढा गौरव केला! केवढे कौतुक केले! ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्वविसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू.

 १९५२ साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. तेथे त्याने ५,००० मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील एक ‘मानवी रेल्वे इंजिन’ अशी झेटोपेकने ख्याती मिळवली. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच; पण त्याबरोबर झेकोस्लोव्हाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. आफ्रिकेतील इथियोपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन-लांब पल्ल्याची शर्यत जिंकली! एवढे मोठे अंतर त्याने २ तास १५ मिनिटांत काटले. 

फॅनी बँकर्स या स्त्री- खेळाडूने तर १९४८ साली ऑलिंपिकचे मैदान दणाणून सोडले. १०० व २०० मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्षे अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्षे जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिंपिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात, तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात; तर त्याच्या शेजारीच क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. 

ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय | Olympic Vartulacha Gofh Maharashtra State Board 9th Marathi Solution 

 • Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Kumarbharti Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
 • Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
 • 9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Textbook Questions and Answers
 • olympic vartulacha gof
 • olympic vartulacha gof information in marathi
 • olympic vartulacha gof question answers
 • olympic vartulacha gof in marathi
 • olympic vartulacha gof workbook answers
 • olympic vartulacha gof swadhyay
 • olympic vartulacha gof pdf
 • olympic vartulacha go
 • olympic vartulacha
 • olympic vartulacha gof in marathi question answer
 • olympic vartulacha gof in marathi swadhyay pdf
 • ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय
 • ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ माहिती
 • ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ pdf
 • ६. ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ स्वाध्याय | Olympic Vartulacha Gofh Maharashtra State Board 9th Marathi Solution 


Maharashtra State Board 9th Std Marathi Kumarbharati Textbook Solutions
Chapter 1 वंद्य ‘वन्दे मातरम्’ (गीत)
Chapter 2.1 संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव
Chapter 2.2 संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई
Chapter 3 कीर्ती कठीयाचा दृष्टान्त
Chapter 4 नात्यांची घट्ट वीण
Chapter 5 एक होती समई
Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)
Chapter 6 या झोपडीत माझ्या (कविता)
Chapter 7 दुपार
Chapter 8 अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या
Chapter 9 मी वाचवतोय (कविता)
Chapter 10 यंत्रांनी केलं बंड
Chapter 10.1 इंग्लंडचा हिवाळा (स्थूलवाचन)
Chapter 11 मातीची सावली
Chapter 12 महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया (पोवाडा)
Chapter 13 थोडं ‘आ’ भारनियमन करूया
Chapter 14 आदर्शवादी मुळगावकर
Chapter 15 निरोप (कविता)
Chapter 15.1 ‘बिग ५’ च्या सहवासात (स्थूलवाचन)
Chapter 16 वनवासी (कविता)
Chapter 17 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
Chapter 18 हसरे दुःख
Chapter 19 प्रीतम
Chapt er 20 आपुले जगणे…आपुली ओळख! (कविता)
Chapter 20.1 विश्वकोश (स्थूलवाचन)
उपयोजित लेखन

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post