भारत आणि युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय | Bharat ani yuropiy vasahatvad swadhyay

भारत आणि युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय |  bharat ani yuropiy vasahatvad swadhyay 

भारत आणि युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय |  Bharat ani yuropiy vasahatvad swadhyay

प्र.१ (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.

१. वास्को-द-गामा हा ______ या देशाचा दर्यावर्दी होता.
OPTIONS
पोलंड
इंग्लंड
फ्रान्स
पोर्तुगाल
SOLUTION
वास्को-द-गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर्दी होता.

२. इंग्लंडच्या ______ ने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला.
OPTIONS
सर जॉर्ज ऑक्झिंडेन
एलिझाबेथ राणी
राजकन्या ब्रागांझा
दुसरा चार्ल्स
SOLUTION
इंग्लंडच्या एलिझाबेथ राणी पहिली हिने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला.

(ब) पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

'अ' गट

'ब' गट

१. अर्सबिश्पु

- मुख्य कार्यकारी अधिकारी

२. शान्सेलर

- न्यायाधीश

३. वेदोर द फझेंद

- मालमत्तेवरील अधिकारी

४. कपितांव

- कॅप्टन

SOLUTION
दुरुस्त केलेली जोडी : 
(१) अर्सबिश्पु - मुख्य धर्मगुरू.

प्र.२ पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
SOLUTION
भारत आणि युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय |  Bharat ani yuropiy vasahatvad swadhyay

प्र.२ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

१. भारतीय सत्ताधीशांना कार्ताझ घेणे गरजेचे होते.
SOLUTION
(१) पोर्तुगिजांनी पश्चिम किनाऱ्यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि हिंदी महासागरावर वर्चस्व प्रस्थापित केले.
(२) भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायची असतील तर पोर्तुगिजांचे कार्ताझ म्हणजे परवाना घेणे त्यांनी आवश्यक केले.
(३) परवाना न घेता प्रवास केल्यास पोर्तुगीज ते जहाज जप्त करीत किंवा बुडवत असत.
(४) पोर्तुगिजांचे आरमारी सामर्थ्य मोठे असल्याने आदिलशाही व कुतुबशाही या सत्तांनासुद्धा कार्ताझ घेणे गरजेचे असे. पोर्तुगीज आरमाराचा मुकाबला करणे कोणाही भारतीय सत्तांना शक्य नसल्याने त्यांना कार्ताझ घेणे गरजेचे होते.

२. पोर्तुगिजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते.
SOLUTION
अरब आरमाराचा पराभव करून पोर्तुगिजांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली.
(१) दक्षिण हिंदुस्थानातील राजांमध्ये सतत होणाऱ्या भांडणांचा फायदा घेऊन पोर्तुगिजांनी आपल्या वसाहतींच्या संरक्षणासाठी किल्ले उभारले.
(२) त्यांचे प्रबळ आरमार छापा मारून शत्रूचे आरमार व प्रदेश उद्ध्वस्त करीत असत. भारतीय सत्तांकडे स्वत:चे आरमारही नव्हते.
(३) पोर्तुगिजांचे प्रबळ आरमार, त्यांची युद्धनीती आणि भारतीय राजांमधील संघर्ष या कारणांमुळे पोर्तुगिजांशी लढा देणे भारतीय राजांना अवघड झाले होते.

प्र.४ खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

१. भारतात पोर्तुगिजांनी कोठे कोठे वसाहती स्थापन केल्या?
SOLUTION
पोर्तुगिजांनी भारतात पुढील ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या -
(१) पोर्तुगिजांनी प्रथम अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवर वर्चस्व निर्माण केले.
(२) आपल्या आरमारी सामर्थ्यावर त्यांनी पश्चिम किनाऱ्यावर वसाहती स्थापन केल्या
(३) दीव, दमण, चौल, गोवा (साष्टी व बारदेश), वसई येथे मुंबईला लागून वसाहती स्थापन केल्या.
(४) पश्चिम किनारपट्टीवर होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडुंगल्लूर, कोची आणि कोल्लम या कर्नाटकच्या प्रदेशांत वसाहती उभारल्या.
(५) भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नागपट्टिणम, मयिलापूर आणि बंगालमध्ये हुगळी येथेही पोर्तुगिजांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या.


२. डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले?
SOLUTION
इसवी सन १६०२ मध्ये पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या 'युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी'ला डच सरकारने पुढील अधिकार दिले .
(१) पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार कंपनीला देण्यात आला.
(२) कंपनीच्या कामासाठी नोकर भरती करण्याचा अधिकार दिला. या नोकर भरतीत स्थानिक लोकांचीही भरती करण्याची परवानगी होती.
(३) डच सरकारसाठी सर्वत्र वखारी स्थापन करण्याचा अधिकार.
(४) वसाहतींच्या संरक्षणासाठी किल्ले बांधण्याचा अधिकार.
(५) स्थापन केलेल्या वसाहतींत आपली नाणी पाडण्याचा अधिकार.
(६) पौर्वात्य देशांशी युद्ध वा तह करण्याचा अधिकार.
या कामांना जबाबदार म्हणून कंपनीने गव्हर्नर जनरल हा अधिकारी नियुक्त केला होता.

भारत आणि युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय |  Bharat ani yuropiy vasahatvad swadhyay 

  • Chapter 3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद
  • ३.भारत आणि युरोपीय वसाहतवाद संपूर्ण स्वाध्याय
  • वर्ग १२ वा इतिहास पाठ ३ . भारत आणि युरोपीय वसाहतवाद
  • प्र.३ भारत आणि युरोपीय वसाहतवाद | स्वाध्याय (प्रश्नोत्तरे 
  • इतिहास Chapter ३ भारत आणि युरोपीय वसाहतवाद 
  • Maharashtra Board Class 12th इतिहास Chapter ३ भारत आणि युरोपीय वसाहतवाद
  •  Bharat Ani yuropiy Vasahatvad bhag -1 भारत आणि युरोपीय वसाहतवाद भाग -१. भारत व युरोपीय ...
  • इयता 12 वी इतिहास भारत आणि युरोपीय वसाहतवाद । bharat ani yuropiy vasahatvad

भारत आणि युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय |  Bharat ani yuropiy vasahatvad swadhyay 

Balbharati solutions for History 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास
Chapter 2: युरोपीय वसाहतवाद
Chapter 3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद
Chapter 4: वसाहतवाद आणि मराठे
Chapter 5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
Chapter 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
Chapter 7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post