युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय | Yuropiy Vasahatvad Swadhyay 12th

युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय | Yuropiy Vasahatvad Swadhyay

युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय | Yuropiy Vasahatvad Swadhyay 12th

प्र.१ (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.

१. 'स्वातंत्र्याचा जाहिरनामा' ______ याने तयार केला.
OPTIONS
जॉर्ज वॉशिंग्टन
थॉमस जेफरसन
लॉर्ड अमहर्स्ट
लॉर्ड कॉर्नवॉलिस
SOLUTION
'स्वातंत्र्याचा जाहीरनामा' थॉमस जेफरसन याने तयार केला.


२. दुसरे ब्रह्मी युद्ध ______ च्या काळात लढले गेले.
OPTIONS
लॉर्ड ॲम्हर्स्ट
लॉर्ड डफरीन
लॉर्ड डलहौसी
ॲशले एडन
SOLUTION
दुसरे ब्रह्मी युद्ध लॉर्ड डलहौसी याच्या काळात लढले गेले.


 पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

'अ' गट

ब' गट

१. टोगोलँड

- जर्मन वसाहत

२. इजिप्त

- ब्रिटिश वसाहत

३. आरेंज फ्री स्टेट

- डच वसाहत

४. आयव्हरी कोस्ट

- पोर्तुगीज वसाहत


प्र.२(अ) ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

१. अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता - ______
SOLUTION
अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता - स्पेनच्या

२. या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले - ______
SOLUTION
या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले - राणी एलिझाबेथ पहिली

 (ब) दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.

१. म्यानमार वर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. कारण -
OPTIONS
(अ) ब्रिटिशांना साम्राज्यविस्तार करायचा होता.
(ब) म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. 
(क) ब्रिटिशांना युरोपीय वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते.

प्र.2 म्यानमारचा राजा थिबा याला त्यांना धडा शिकवायचा होता.
SOLUTION
म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते; कारण म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यांवर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.

प्र.३ संकल्पनाचित्र पूर्ण करा.
SOLUTION
युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय | Yuropiy Vasahatvad Swadhyay

प्र.४ टीपा लिहा.

१. वसाहतवादाचे स्वरूप
SOLUTION
(१) प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे, या प्रक्रियेला 'वसाहतवाद' असे म्हणतात.
(२) वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक प्रकार आहे.
(३) अज्ञात भूमीचा शोध घेऊन त्यावर आपली सत्ता स्थापन करणे, तेथील सोन्याच्या, खनिजाच्या खाणींचा शोध घेणे, आपल्या धर्माचा तेथे प्रसार करणे या बाबी वसाहतवादाचीच वेगवेगळी रूपे आहेत.
(४) वसाहतींमधील कच्चा माल आपल्या देशात नेणे व पक्का माल वसाहतीत विक्री करणे, हक्काची बाजारपेठ म्हणून तिचा उपयोग करणे हे वसाहतवादाचेच लक्षण आहे. औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवाद वाढीस लागला. 


२. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध
SOLUTION
(१) १७७४ मध्ये भरलेल्या फिलाडेल्फिया अधिवेशनात वसाहतींनी ब्रिटिशांविरुद्ध लढा पुकारला.
(२) ४ जुलै १७७६ मध्ये तेरा वसाहतींनी एकत्र येऊन 'स्वातंत्र्याचा जाहीरनामा' प्रसिद्ध केला.
(३) इंग्लंडविरुद्ध वसाहतींचा स्वातंत्र्यलढा चालू झाला. जॉर्ज वॉशिंग्टन याच्या नेतृत्वाखाली वसाहतींनी हा लढा दिला.
(४) या लढ्यात फ्रान्स व स्पेन यांनी वसाहतींच्या बाजूने भाग घेतला.
(५) अखेरीस सॅराटोगा येथील लढाईत ब्रिटिश सैन्याचा पराभव होऊन सेनापती लॉर्ड कॉर्नवॉलिस शरण आला आणि अमेरिका स्वतंत्र झाली.

प्र.५ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

१. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली.
SOLUTION
(१) औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन यंत्रांच्या साहाय्याने होऊ लागले; त्यामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली.
(२) उत्पादन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कमी किमतीत मिळण्याची गरज निर्माण झाली.
(३) यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. हे अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी या राष्ट्रांना नव्या आणि हक्काच्या बाजारपेठांची आवश्यकता होती.
अशा रितीने औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली.

२. युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या.
SOLUTION
अमेरिका खंडाचा शोध लागल्यानंतर तेथे वसाहती स्थापन करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांत विविध कारणांसाठी चढाओढ सुरू झाली.
(१) पोर्तुगाल आणि स्पेन यांना तेथे सोन्याचे साठे सापडले. खाणींमधून अफाट खनिज संपत्ती मिळू लागली.
(२) स्थानिक रेड इंडियन्स आणि आफ्रिकेतून आणलेले गुलाम यांच्याकडून ते ऊस, तंबाखू यांचे उत्पादन तयार करून घेऊ लागले.
(३) स्पेन, पोर्तुगाल यांची झालेली भरभराट पाहून इंग्लंड, हॉलंड व फ्रान्स यांनी अमेरिका खंडात आपल्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली.
(४) अमेरिकेतून कच्चा माल आपल्या देशात नेऊन तेथून पक्का माल तयार करून अमेरिकन वसाहतींत विकला जाऊ लागला. हक्काची बाजारपेठ म्हणून युरोपियनांनी येथे आपल्या वसाहती स्थापन केल्या.

युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय | Yuropiy Vasahatvad Swadhyay

 • २.१ वसाहतवाद : अर्थ आणि स्वरूप
 • २.२ वसाहतवाद
 •          २.२.१ उदयाची कारणे
 •          २.२.२ परिणाम
 • २.३ युरोपीय वसाहतवाद
 •          २.३.१ अमेरिका
 •          २.३.२ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
 •          २.३.३ आशिया
 •          २.३.४ आफ्रिका
    
    प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे, या प्रक्रियेला वसाहतवाद' असे म्हणतात, वसाहतवाद हा साम्राज्यवादाचा एक प्रकार आहे. इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन इत्यादी देशांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिका या खंडातील देशांवर कब्जा करून तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. भारत ही इंग्लंडची वसाहत होती. वसाहतीमधील कच्चा माल आपल्या देशात नेऊन पक्क्या मालासाठी वसाहतींचा बाजारपेठ म्हणून उपयोग करणे हे वसाहतवादाचे प्रमुख लक्षण आहे.

 वसाहतवाद हा निव्वळ राजकीय व आर्थिक गुलामगिरीच निर्माण करतो असे नसून तो मानसिक
गुलामगिरीही निर्माण करतो. वसाहतवादी देशांची वंशश्रेष्ठत्ववादी विचारसरणी आणि वागणूक यांमुळे
वसाहतीतील लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला, त्यांना स्वतःच्या संस्कृती व इतिहासाबद्दल कमीपणा वाटायला लागला, त्यांचा आत्मविश्वास नष्ट झाला. इंग्लंडने एका शतकात एवढा साम्राज्यविस्तार केला की त्यांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता असे म्हटले जाऊ लागले. जगातील आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या चार खंडांत ब्रिटिशांचे साम्राज्य विस्तारले होते.

   १५ व्या शतकात युरोपात व्यापारी क्रांती घडूनआली. युरोपीय दर्यावर्दीनी नव्या जलमार्गाचा शोध लावल्यानंतर पारंपरिक व्यापारपद्धतीमध्ये बदल घडू आला. या युरोपीय व्यापाऱ्यांनी जगभरात आपले पा रोवायला सुरुवात केली

  २.१ वसाहतवाद : अर्थ आणि स्वरू
    धाडसी कृत्ये करणे, कीर्ती संपादन करणे, अज्ञा भूमीचा शोध घेणे, धर्माचा प्रसार करणे, सोन्याच्या खाणींचा शोध घेणे अशा विविध कारणांनी युरोपी लोक जगभर पोचले. पुढे व्यापार वाढत गेला आ युरोपीय राष्ट्रांमध्ये एका नव्या स्पर्धेचा उदय झाला युरोपीय व्यापारी जिथे जिथे गेले, तिथे तिथे त्यांनी वसाहती स्थापन केल्या. त्या वसाहतीमध्ये स्वत: आर्थिक, सामाजिक, राजकीय वर्चस्व प्रस्थापि करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. युरोपीय लोक अमेरिका ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे गेले. तेथे त्यांना राहण्या अनुकूल हवामान होते. आशिया खंडात त्यांना हवामानाशी जुळवून घेणे अवघड गेले. हवामान अनुकूल असो किं नसो, युरोपीय लोकांनी स्थानिकांना हुसकावून लावले वसाहतींमधील स्थानिक लोकांचे मानसिक खच्चीकर करण्यात इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच यांनी पुढाकार  घेतला.

   एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडचा व्यापार औदयोगिक क्रांतीमुळे भरभराटीस आला होता. आरमारी सामर्थ्याच्या जोरावर इंग्लंडने आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. व्यापारातून अतिरिक्त नफा, अतिरिक्त नफ्याची गुंतवणूक, गुंतवणुकीसाठी वसाहत आणि वसाहतींशी व्यापार, त्यातून नफा अशी ही साखळी होती. इंग्लंडप्रमाणेच फ्रान्स, बेल्जियम, इटली आणि जर्मनी हे देशही वसाहती स्थापन करण्यात आघाडीवर होते.

युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय | Yuropiy Vasahatvad Swadhyay

 • युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय | Yuropiy Vasahatvad Swadhyay
 • Chapter 2: युरोपीय वसाहतवाद
 • २.युरोपीय वसाहतवाद संपूर्ण स्वाध्याय Exercise
 • प्र.२.युरोपीय वसाहतवाद | स्वाध्याय (प्रश्नोत्तरे) इतिहास १२ वी
 • वर्ग १२ वा इतिहास पाठ ३ . भारत आणि युरोपीय वसाहतवाद
 • 12th इतिहास Chapter २ युरोपीय वसाहतवाद
 • Maharashtra Board Class 12th इतिहास Chapter २ युरोपीय वसाहतवाद
 • Yuropiy Vasahatvad भाग -2 #युरोपीय वसाहतवाद भाग

युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय | Yuropiy Vasahatvad Swadhyay

Balbharati solutions for History 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास
Chapter 2: युरोपीय वसाहतवाद
Chapter 3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद
Chapter 4: वसाहतवाद आणि मराठे
Chapter 5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
Chapter 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
Chapter 7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post