भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा स्वाध्याय | Bharat samajik Ani dharmik sudharna swadhyay
प्र.१(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.
OPTIONS
जातिप्रथा
बालविवाह
सती
पडदा पद्धती
SOLUTION
राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले.
२. आर्य समाजाची स्थापना ______ यांनी केली.
OPTIONS
स्वामी विवेकानंद
महात्मा जोतीराव फुले
स्वामी दयानंद सरस्वती
रामस्वामी नायकर
SOLUTION
आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली.
(ब) पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
'अ' गट | 'ब' गट |
१. ब्राह्मो समाज | - राजा राममोहन रॉय |
२. सत्यशोधक समाज | - महात्मा जोतीराव फुले |
३. परमहंस सभा | - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे |
४. रामकृष्ण मिशन | - स्वामी विवेकानंद |
SOLUTION
दुरुस्त केलेली जोडी :
(३) परमहंस सभा - दादोबा पांडुरंग तर्खडकर.
प्र.२ ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नावे लिहा.
१. मुघल शासकाने राजा राममोहन रॉय यांना दिलेला किताब - ______
SOLUTION
मुघल शासकाने राजा राममोहन रॉय यांना दिलेला किताब - राजा
२. मुहम्मदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेजची स्थापना करणारे - ______
SOLUTION
मुहम्मदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेजची स्थापना करणारे - सर सय्यद अहमद खान
३. वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे - ______
SOLUTION
वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे - रामास्वामी नायकर
४. कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे - ______
SOLUTION
कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे - राजर्षी शाहू महाराज
प्र.३ टीपा लिहा.
१. प्रार्थना समाज
SOLUTION
(१) डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, न्यायमूर्ती म. गो. रानडे, डॉ.रा.गो. भांडारकर यांनी प्रार्थना सभेची स्थापना केली. प्रार्थना सभेने जनहिताची अनेक कामे केली.
(२) प्रार्थना सभेने मूर्तिपूजेस विरोध केला एकेश्वरवादास प्राधान्य दिले. कर्मकांडाला विरोध करून प्रार्थनेवर भर दिला. पारमार्थिक जीवनापेक्षा ऐहिक जीवनाला अधिक महत्त्व दिले.
(३) कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या, स्त्री-शिक्षण संस्थांची स्थापना केली आणि स्त्री-पुरुष समानतेची चळवळ सुरू केली.
(४) समाजातील जातिभेदांना विरोध केला, अनाथालये सुरू केली.
२. सत्यशोधक समाज
SOLUTION
महात्मा जोतीराव फुले यांनी १८७३ साली पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाने पुढील विचारसरणीचा पुरस्कार केला -
(१) एकेश्वरवाद व मूर्तिपूजेला विरोध.
(२) वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारणे आणि विवेचक बुद्धीचे प्रामाण्य स्वीकारणे.
(३) पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थीला विरोध.
(४) चमत्कारांवर अविश्वास व तीर्थयात्रेला विरोध.
(५) परलोक कल्पनेला विरोध.
प्र.४ खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
१. राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचा आग्रह धरला होता?
SOLUTION
भारतातील आद्य समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजा राममोहन रॉय यांनी पुढील सुधारणांचा आग्रह धरला -
(१) त्यांनी सती पद्धतीला विरोध केला. प्राचीन संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी हे सिद्ध केले की, धर्मग्रंथांमध्ये सती जाणे हे धर्मकर्तव्य असल्याचा कोठेही उल्लेख नाही.
(२) समाजातील बालविवाह पद्धतीला त्यांनी विरोध केला.
(३) स्त्रियांबाबत असलेल्या पडदा पद्धतीला त्यांचा विरोध होता. पडदा पद्धतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने येतात, असे त्यांचे मत होते.
(४) ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मूर्तिपूजेची गरज नाही, असे रॉय यांचे मत होते; म्हणून त्यांनी मूर्तिपूजेस विरोध केला.
(५) ईश्वर एकच आहे, हा विचार त्यांनी मांडला. अनेकेश्वर वाघाला त्यांचा विरोध होता.
(६) सर्व धर्मांतील समान तत्त्वे शोधणाऱ्या आणि समाजातील अंधश्रद्धांवर आघात करणाऱ्या राजा राममोहन रॉय यांनी समाजसुधारणेचा सतत आग्रह धरला. आपल्या लेखनातून त्यांनी आधुनिक विचारांची पायाभरणी केली.
२. रामकृष्ण मिशन ने केलेले कार्य लिहा.
SOLUTION
स्वामी विवेकानंदांनी इसवी सन १८९७ मध्ये 'रामकृष्ण मिशन' या संस्थेची स्थापना केली. लोकसेवेला प्राधान्य देऊन रामकृष्ण मिशन ने पुढील कार्य केले -
(१) दुष्काळग्रस्तांना मदत केली.
(२) आजारी लोकांना औषधोपचाराची सुविधा दिली.
(३) समाजातील दीनदुबळ्यांची सेवा केली.
(४) स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री-शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. स्त्री-शिक्षणाचा आग्रह धरला.
(५) आध्यात्मिक उन्नतीला महत्त्व देऊन समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला.
(६) 'उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका' हा संदेश विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन द्वारे तरुणांना दिला.
अशा रितीने आत्मिक उन्नती, स्त्री-शिक्षण, दीन-दुबळ्यांचा उद्धार अशा विविध प्रकारच्या कामांतून रामकृष्ण मिशनने समाजोपयोगी कामे केली.
३. सर सय्यद अहमदखान यांनी केलेले कार्य लिहा.
SOLUTION
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय समाज प्रबोधन चालू होते. अनेक समाजसुधारक सामाजिक-धार्मिक सुधारणा करण्याचे कार्य करीत होते. मुस्लीम समाजातही सर सय्यद अहमद खान यांनी सामाजिक सुधारणेचे पुढील कार्य केले -
(१) त्यांनी १८६४ मध्ये मुस्लिमांसाठी 'सायंटिफिक सोसायटी' स्थापन केली.
(२) या संस्थेमार्फत इतिहास, विज्ञान व राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास केला जात असे. त्यांनी मुस्लीम समाजाला या विषयांची ओळख करून दिली.
(३) १८७५ मध्ये अहमद खान यांनी 'मुहम्मदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेज'ची स्थापना केली. पुढे या कॉलेजचे रूपांतर 'अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी' मध्ये झाले. या शैक्षणिक संस्थेमुळे मुस्लिमांमध्ये शिक्षणाची ओढ लागली. मुस्लीम मुले-मुली उच्च शिक्षण घेऊ लागली.
(४) अहमद खान यांनी 'मोहम्मदन सोशल रिफॉर्मर' या नावाचे नियतकालिक काढून त्याद्वारे आधुनिक विचार मुस्लीम समाजात रुजवले.
(५) अहमदखान यांनी आपल्या ग्रंथातून, नियतकालिकातून आणि शैक्षणिक संस्थांतून आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला.
(६) अबुल फैज याने सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवर लिहिलेल्या 'आइन-ए-अकबरी' या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले.
४. रामस्वामी नायकर यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा.
SOLUTION
प्रभावी वक्ते, लेखक आणि गांधीवादी विचारसरणीचे असणारे रामस्वामी नायकर यांनी समाजसेवेचे पुढील कार्य केले -
(१) महात्मा गांधींचा स्वदेशीचा विचार समाजात रुजवला.
(२) सर्व जातींना मंदिर-प्रवेश असावा, यासाठी प्रयत्न केले.
(३) अस्पृश्यांवरील निबंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या 'वायकोम सत्याग्रहा'त भाग घेतला.
(४) तमिळनाडूमध्ये त्यांनी स्वाभिमान आंदोलन सुरू केले.
(५) समाजातील वर्णव्यवस्था, बालविवाह या प्रथांच्या विरोधात लढा उभारला.
(६) स्त्रियांचे हक्क, संततिनियमन या विषयांवर आपले क्रांतिकारक विचार मांडून समाजाला सुधारण्याचा प्रयत्न केला. आपल्या समाजोपयोगी कार्यामुळे रामस्वामी नायकर यांना लोक 'पेरियार' म्हणजे महान आत्मा म्हणून ओळखू लागले.
भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा स्वाध्याय | Bharat samajik Ani dharmik sudharna swadhyay
- भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा स्वाध्याय |
- Bharat samajik Ani dharmik sudharna swadhyay
- वर्ग १२ वा इतिहास पाठ ५ . भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
- प्र.५.भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा | स्वाध्याय (प्रश्नोत्तरे
- वर्ग 12वी: भारत:सामाजिक व धार्मिक सुधारणा/ Bharat: samajik v
- प्र.५.भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा | समाजसुधारकांचे कार्य .
- Chapter 5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
- Maharashtra Board Class 12th इतिहास Chapter ५ भारत - सामाजिक व धार्मिक सुधारणा
- भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
- Bharat samajik Ani dharmik sudharna bhag -1 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा भाग -१
- भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळींचा इतिहास .
भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा स्वाध्याय | Bharat samajik Ani dharmik sudharna swadhyay
Balbharati solutions for History 12th Standard HSC Maharashtra State Board |
---|
Chapter 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास |
Chapter 2: युरोपीय वसाहतवाद |
Chapter 3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद |
Chapter 4: वसाहतवाद आणि मराठे |
Chapter 5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा |
Chapter 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष |
Chapter 7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण |