वसाहतवाद आणि मराठे स्वाध्याय | वसाहतवाद आणि मराठे notes | Vasahatvad ani marathe swadhyay

वसाहतवाद आणि मराठे स्वाध्याय | वसाहतवाद आणि मराठे notes | Vasahatvad ani marathe swadhyay

वसाहतवाद आणि मराठे स्वाध्याय | वसाहतवाद आणि मराठे notes | Vasahatvad ani marathe swadhyay

प्र.१ (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.

१. मराठ्यांनी पोर्तुगिजांना ______ च्या वेढ्यात पराभूत केले.
OPTIONS
वेंगुर्ला
फोंडा
सुरत
राजापूर
SOLUTION
मराठ्यांनी पोर्तुगीजांना फोंडा च्या वेढ्यात पराभूत केले.

२. शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम ______ या प्रकरणात आला.
OPTIONS
कुडाळ स्वारी
अफजलखान
फाजलखान
राज्याभिषेक
SOLUTION
शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम अफजलखान प्रकरणात आला.


३. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे ______ यांचा पराभव केला.
OPTIONS
इंग्रज
फ्रेंच
डच
पोर्तुगीज
SOLUTION
थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीज यांचा पराभव केला.

४. पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि ______ यांच्यात झाले.
OPTIONS
इंग्रज
अब्दाली
अहमदखान बंगश
नजीबखान
SOLUTION
पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि अब्दाली यांच्यात झाले.


(ब) पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

'अ' गट

'ब' गट

१. कास्मो-द-ग्वार्द

- पोर्तुगीज इतिहासकार

२. गोंसालू मार्तीस

- पोर्तुगीज वकील

३. फ्रांस्वाँ मार्टिन

- डच वखारीचा प्रमुख

४. हेन्री रेव्हिंग्टन

- इंग्रज अधिकारी


SOLUTION
दुरुस्त केलेली जोडी : 
(३) फ्रांस्वाँ मार्टिन - फ्रेंचांचा पाँडिचेरी गव्हर्नर जनरल.


प्र.२(अ) ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.


१. भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय - ______
SOLUTION
भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय - पोर्तुगीज

२. पोर्तुगिजांचा दारूगोळा असलेले ठिकाण - ______
SOLUTION
पोर्तुगिजांचा दारूगोळा असलेले ठिकाण - पनवेल

३. वखारीचे संरक्षण आणि परवान्यासाठी शिवाजी महाराजांना नजराणा देणारे - ______
SOLUTION
वखारीचे संरक्षण आणि परवान्यासाठी शिवाजी महाराजांना नजराणा देणारे - डच

४. जैतापूरचा इंग्रज दलाल - ______
SOLUTION
जैतापूरचा इंग्रज दलाल - वेलजी

(ब) दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या. कारण -
OPTIONS
(अ) पोर्तुगिजांना विरोध करण्यासाठी
(ब) इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी
(क) स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी
(ड) वसाहतवादयांना विरोध करण्यासाठी
SOLUTION
छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या; कारण इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी.


प्र.३ तुमचे मत नोंदवा.

१. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले.
SOLUTION
(१) व्यापाराच्या निमित्ताने युरोपीय देशांचे व्यापारी भारतात आले. आपल्या वखारी त्यांनी येथे स्थापन केल्या.
(२) परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी येथील प्रदेशही काबीज केला. आपल्या वखारींना, प्रदेशाला संरक्षण मिळावे म्हणून तटबंदी आणि किल्ले बांधले.
(३) या युरोपीय राष्ट्रांचा प्रवास प्रथम तराजू, नंतर तलवार व अखेरीस तख्त असा चाललेला आहे, हे शिवरायांनी वेळीच ओळखले.
(४) सर्वांत प्रथम भारतात आलेल्या पोर्तुगिजांचे आरमार प्रबळ होते. त्यांच्या जहाजांवर तोफाही होत्या.
(५) समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील, स्वराज्य सुरक्षित राहील, याची त्यांना जाणीव झाली.
(६) या जाणिवेतूनच त्यांनी आरमार व नौदल उभारले. जलदुर्ग बांधले आणि सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज अशा सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूला तोंड दिले.


२. मराठी सत्तेचे धोरण वसाहतवादविरोधी होते.
SOLUTION
(१) युरोपीय राष्ट्रांचे व्यापारी भारतात व्यापारासाठी आले; परंतु त्यांचा प्रवास प्रथम तराजू म्हणजे व्यापार करणे, नंतर तलवार म्हणजे आपले सामर्थ्य वाढवणे व तख्त म्हणजे राज्याची सत्ता मिळवणे या मार्गाने झाला.
(२) हा त्यांचा मार्ग व त्यांचे छुपे हेतू प्रथम शिवरायांनी ओळखले.
(३) परकीयांच्या या वसाहतवादाला प्रतिकार करण्यासाठी त्यांनी नौदल उभारले, जलदुर्गांची बांधणी केली.
(४) इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी मिठावर जकात बसवली.
(५) संभाजी महाराजांनीही पोर्तुगिजांविरुद्ध तीव्र संघर्ष करून वसाहतवाद्यांना प्रखर विरोध केला.
(६) थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांचा पराभव केला.
त्या काळातील अन्य भारतीय राजे युरोपियन यापुढे माघार घेत असताना त्यांचा पराभव करणारी एकच मराठी सत्ता भारतात होती. मराठी सत्तेचे घोरण नेहमीच वसाहतवाद विरोधी होते.


प्र.४ खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

१. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाऱ्यांविषयी धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा.
SOLUTION
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्र यातून आपल्याला त्यांनी युरोपीय व्यापाऱ्यांविषयीच्या घेतलेल्या धोरणातील पुढील बाबी स्पष्ट होतात -
(१) पोर्तुगीज, डच, इंग्रज हे व्यापारी सावकारांप्रमाणे नसून; त्यांना येथील प्रदेशावर राज्य स्थापन करायचे आहे.
(२) हे व्यापारी आपल्या राज्यकर्त्यांच्या मदतीनेच आपल्या प्रदेशात येऊन जम बसवतात.
(३) युरोपीय व्यापारी हट्टी व निश्चयी असल्याने एकदा मिळालेला प्रदेश ते सोडत नाहीत.
(४) म्हणून या व्यापाऱ्यांशी कामापुरताच संबंध ठेवावा.
(५) त्यांना जलदुर्गाजवळ जागा देऊ नये.
(६) वखारीसाठी त्यांना जागा देणे आवश्यकच असेल; तर खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्रकिनाऱ्यालगतची जागा देऊ नये.
(७) जागा दयायचीच झाली तर समुद्रकिनाऱ्यापासून लांब गावाजवळ दयावी.
(८) हे व्यापारी आपल्या आरमार, तोफा यांच्या ताकदीवर बंदराच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात. म्हणून बंदरांच्याजवळ त्यांना जागा देऊ नये.
(९) या व्यापाऱ्यांच्या मार्गात आपण आडवे जाऊ नये व त्यांनाही आपल्या मार्गात आडवे येऊ देऊ नये.
(१०) शत्रूच्या मुलखात आपण स्वारी केल्यावर एखादा युरोपीय व्यापारी सापडल्यास त्याच्याकडून दंड वसूल करून त्यांना त्यांच्या जागी परत पाठवावे. त्यांच्याशी शत्रूसारखे वागू नये.


२. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करा.
SOLUTION
 (१) छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली. अनेक धोके पत्करून स्वराज्याचा विस्तार केला.
(२) परकीयांचे छुपे हेतू वेळीच ओळखून त्यांना प्रतिकार केला.
(३) नौदल उभारले, जलदुर्ग बांधले, परकीयांच्या वसाहतवादाला विरोध करून स्वराज्याचे सार्वभौमत्व कायम टिकवले.
(४) इंग्रजांचा स्वराज्यातील मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यावर जकात बसवून स्वराज्यातील व्यापाराला संरक्षण दिले.
(५) परकीय सत्तेला स्वराज्यात व्यापार करण्याचा परवाना दिला; तरी त्यावर अडीच टक्के जकात बसवली.
(६) राज्याभिषेकासाठी आलेल्या हेन्री ऑक्झिंडेन याने शिवरायांशी केलेल्या तहाने त्यांनी स्वराज्यात इंग्रजांना वखारी उघडण्यास संमती दिली. परंतु;
(७) इंग्रजी शिक्क्याची नाणी मराठ्यांच्या राज्यात चालणार नाहीत, अशी भूमिका घेतली.
(८) याच तहात जहाजे फुटून किनाऱ्यास लागलेला इंग्रजांचा माल त्यास परत मिळावा, ही इंग्रजांची अट त्यांनी फेटाळून लावली.
(९) जंजिऱ्याच्या सिद्दीशी तह करावा व त्याची जहाजे बुडवू नयेत, ही अटही शिवरायांनी अमान्य केली.
(१०) स्वराज्याच्या धोरणात, कारभारात अन्य कोणाचा हस्तक्षेप शिवरायांनी कधीही सहन केला नाही. मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे त्यांचे धोरण यातून दिसून येते. 


३. भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता का संपुष्टात आली?
SOLUTION
भारतातील सर्वांत प्रभावी असलेल्या मराठी सत्तेच्या अंताची कारणे -
(१) नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळे त्यांना मराठ्यांच्या राज्यकारभारात प्रवेश मिळाला.
(२) रघुनाथराव यांनी पेशवेपदासाठी इंग्रजांकडे मदत मागितली व ते इंग्रजांच्या आश्रयाला गेले.
(३) नाना फडणविसाने इंग्रजांविरुद्ध उभ्या केलेल्या चतुःसंघातून इंग्रजांनी निजामाला फोडून आपल्या गोटात घेतले.
(४) मराठ्यांनी खड्याच्या लढाईत निजामाचा पराभव केला तरीही या लढाईत मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा अभ्यास करून त्या आधारे लॉर्ड वेलस्ली याने मराठ्यांचा पराभव केला.
(५) हिंदुस्थानात इंग्रजांची सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांचा पराभव केला पाहिजे, असे वॉरन हेस्टिंग्जच्या लक्षात आल्यावर, त्याने त्याप्रमाणे योजना आखल्या.
(६) मराठा सरदारांना एकत्र आणून मुत्सद्दीपणाने कारभार करणाऱ्या नाना फडणविसांचा मृत्यू झाला.
(७) दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांना एकत्र ठेवू शकला नाही.
(८) इंदौरचे होळकर व पेशवा यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे यशवंतराव होळकर याने पुण्यावर आक्रमण केले.
(९) दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन त्यांच्याशी वसईचा तह केला.
(१०) शिंदे-होळकर यांना हा तह अमान्य होऊन १८०३ साली झालेल्या दुसऱ्या इंग्रज-मराठे युद्धात मराठा सरदारांचा पराभव झाला.
(११) १८१७ साली झालेल्या तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. १८१८ साली मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.


प्र.५ खालील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

वसाहतवाद आणि मराठे स्वाध्याय | वसाहतवाद आणि मराठे notes | Vasahatvad ani marathe swadhyay

१. भारताच्या पश्चिम समुद्रकिनारपट्टीवर डचांच्या वसाहती कोठे होत्या?
२. पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोठे वसाहती उभारल्या?
३. आग्रा आणि अलाहाबाद येथे कोणाची वखार होती?
SOLUTION
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकणात वेंगुर्ला येथे व कर्नाटकात पोर्टो नोव्हो (परंगी पेट्टाई) व तेगना पट्टम (देवनापट्टिनम्) येथे वखारी होत्या.
पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी पुदुच्चेरी (पाँडिचेरी) येथे वसाहत उभारली होती.
या वखारींचा उल्लेख नकाशात केलेला नाही. या भागावर मुघलांची सत्ता होती.

वसाहतवाद आणि मराठे स्वाध्याय | वसाहतवाद आणि मराठे notes | Vasahatvad ani marathe swadhyay

  • वसाहतवाद आणि मराठे स्वाध्याय | वसाहतवाद आणि मराठे notes | Vasahatvad ani marathe swadhyay
  • Balbharati solutions for History 12th Standard HSC Maharashtra State Board [इतिहास इयत्ता १२ वी] chapter 4 - वसाहतवाद आणि मराठे [Latest edition]
  • Maharashtra Board Class 12th इतिहास Chapter ४ वसाहतवाद आणि मराठे
  • इतिहास पाठ ४ वसाहतवाद आणि मराठे स्वाध्याय , Vasahatvad Ani Marathe.
  • वसाहतवाद आणि मराठे एच.एस.सी. इतिहास प्रकरण 4 स्वाध्याय vasahatvad aani marathe swadhyay.
  • प्र४.वसाहतवाद आणि मराठे | स्वाध्याय (प्रश्नोत्तरे) इतिहास १२ वी
  • प्रकरण 4 || स्वाध्याय || वसाहतवाद आणि मराठे || Connectivism India

वसाहतवाद आणि मराठे स्वाध्याय | वसाहतवाद आणि मराठे notes | Vasahatvad ani marathe swadhyay

Balbharati solutions for History 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास
Chapter 2: युरोपीय वसाहतवाद
Chapter 3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद
Chapter 4: वसाहतवाद आणि मराठे
Chapter 5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
Chapter 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
Chapter 7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post