भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण स्वाध्याय | भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण
प्र.१ (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.
१. गोवा येथे इ.स. १९४६ मध्ये ______ यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले.
OPTIONS
डॉ.राम मनोहर लोहिया
डॉ.टी.बी.कुन्हा
डॉ.पी.पी.शिरोडकर
डॉ.राम हेगड़े
गोवा येथे इसवी सन १९४६ मध्ये डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले.
२. हैदराबाद संस्थानाच्या मुक्तिलढ्याचे नेतृत्व ______ यांनी समर्थपणे केले.
OPTIONS
राजा हरिसिंह
स्वामी रामानंद तीर्थ
पंडित महादेवशास्त्री जोशी
केशवराव जेधे
SOLUTION
हैदराबाद संस्थानाच्या मुक्तिलढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी समर्थपणे केले.
३. भारतामध्ये ______ यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली.
OPTIONS
जयंतराव टिळक
सरदार वल्लभभाई पटेल
पंडित जवाहरलाल नेहरू
डॉ.टी.बी.कुन्हा
SOLUTION
भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली.
ब. पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.
'अ' गट | 'ब' गट |
१. हैदराबाद संस्थान विलिनीकरण | -स्वामी रामानंद तीर्थ |
२. काश्मीर संस्थानचे विलिनीकरण | -शेख अब्दुल्ला |
३. गोवा मुक्तिलढ्यातील मोलाचे योगदान | -मोहन रानडे |
४. पुदुच्चेरी येथील कामगार नेते | -व्ही.सुबय्या |
दुरुस्त केलेली जोडी :
(२) काश्मीर संस्थानचे विलीनीकरण - राजा हरिसिंग.
प्र.२ ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
१. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान - ______
SOLUTION
भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान - जूनागढ़
२. गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख - ______
SOLUTION
गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख - डॉ. टी. बी. कुन्हा
प्र.३ खालील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
SOLUTION
भारताच्या वायव्य दिशेकडे पाकिस्तान हे राष्ट्र आहे.
गोवा हे पोर्तुगिजांचे भारतातील सत्ताकेंद्र होते.
फ्रेंचांची पूर्व किनारपट्टीवर चंद्रनगर, यानम, पुदुच्चेरी, कारिकल ही सत्ताकेंद्रे होती.
भारताच्या दक्षिणेस श्रीलंका हे राष्ट्र आहे.
प्र.५ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
१. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
SOLUTION
(१) निजामाच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या रझाकार संघटनेने हिंदूवर आणि मुस्लिमांवरही अत्याचार केले.
(२) लोकशाही चळवळीला पाठिंबा देणाऱ्या प्रजेवर रझाकार संघटनेने अत्याचार केले.
(३) भारत सरकारने निजामाशी सामोपचाराची बोलणी करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याकडे त्याचा कल होता.
अखेरीस भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई करून निजामाला शरण यायला भाग पाडले आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
२. पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला.
SOLUTION
(१) पुदुच्चेरीमधील जनतेची आंदोलने आणि भारत सरकारची आग्रही मागणी यांमुळे जून १९४८ मध्ये फ्रान्स व भारत सरकारमध्ये करार होऊन पुदुच्चेरी या भारतातील विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला.
(२) १३ ऑक्टोबर १९५४ रोजी उभय सरकारांमध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया निश्चित झाली. विधिमंडळ व नगरपालिकांमध्ये विलीनीकरणाच्या बाजूने मतदान झाले.
(३) १ नोव्हेंबर १९५४ रोजी पुदुच्चेरीसह सर्व फ्रेंच वसाहतींचा भारताने ताबा घेतला.
(४) १९६२ रोजी विलीनीकरणाच्या कराराला फ्रेंच संसदेने मान्यता दिली आणि १९६३ मध्ये पुदुच्चेरी हा भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला.
प्र.६ तुमचे मत नोंदवा
१. हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली.
SOLUTION
(१) हैदराबाद हे भारतातील सर्वांत मोठे संस्थान होते.
(२) या संस्थानात तेलुगु, कन्नड व मराठी भाषक प्रांतांचा समावेश होता.
(३) निजामाच्या एकतंत्री राजवटीत नागरी व राजकीय अधिकारांचा अभाव होता.
(४) आपले अधिकार आपल्याला मिळावेत, अशी या सर्व भाषिकांची मागणी होती.
(५) यासाठी त्यांना संघटित होण्याची गरज भासू लागली.
(६) या जाणिवेतूनच संस्थानातील तेलुगु भाषकांनी तेलंगण भागात आंध्र परिषद, मराठी भाषकांनी मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद आणि कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्थांची स्थापना केली.
२. इ.स.१९६१ पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली.
SOLUTION
(१) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पोर्तुगिजांनी भारतातील वसाहतींना स्वातंत्र्य देणे अपेक्षित होते; परंतु गोवा सोडण्यास त्यांनी नकार दिला.
(२) गोवा मुक्तीसाठी तेथील जनतेने काही संघटना स्थापन केल्या. डॉ. टी. बी. कुन्हांसारख्या अनेक नेत्यांनी सत्याग्रह केले, आंदोलने केली.
(३) पोर्तुगीज सरकारने या नेत्यांना तुरुंगात टाकले, जनतेवर अत्याचार केला.
(४) अखेरीस गोव्यातील जनतेच्या लोकभावनेची दखल केंद्र सरकारला म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरूंना घ्यावी लागली.
(५) त्यांनी 'ऑपरेशन विजय' ही लष्करी कारवाई करून गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला.
(६) संस्थानांच्या विलीनीकरणाच्या मानाने पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतींचे भारतात फार उशिरा विलीनीकरण झाले.
भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण स्वाध्याय | भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण
Balbharati solutions for History 12th Standard HSC Maharashtra State Board |
---|
Chapter 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास |
Chapter 2: युरोपीय वसाहतवाद |
Chapter 3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद |
Chapter 4: वसाहतवाद आणि मराठे |
Chapter 5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा |
Chapter 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष |
Chapter 7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण |
Thanks for Comment