वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष स्वाध्याय | Vasahatavadavirush bharatiyancha sangharsha swadhyay

वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष स्वाध्याय  | Vasahatavadavirush bharatiyancha sangharsha swadhyay 

वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष स्वाध्याय  | Vasahatavadavirush bharatiyancha sangharsha swadhyay

प्र.१(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा.

१. हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य ______ जिल्ह्यात होते.

OPTIONS
  • सातारा
  • नांदेड
  • पुणे
  • नागपूर
SOLUTION
हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य नांदेड जिल्ह्यात होते.

२. बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर ______ लागवडीची सक्ती करत.

OPTIONS
निळीच्या
चहाच्या
कॉफीच्या
उसाच्या
SOLUTION
बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर निळीच्या लागवडीची सक्ती करीत.

३. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष ______ होते.

OPTIONS
द्वारकानाथ टागोर
व्योमेशचंद्र बॅनर्जी
दादाभाई नौरोजी
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
SOLUTION
भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते.


(ब) पुढील संचामधील 'ब' गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा.

'अ' गट

'ब' गट

१. कुवरसिंह

- लखनौ

२. नानासाहेब पेशवे

- कानपूर

३. राणी लक्ष्मीबाई

- झाशी

४. चिमासाहेब

- कोल्हापूर


SOLUTION
दुरुस्त केलेली जोडी : 
(१) कुंवरसिंह - बिहार.


प्र.२ ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीचे नाव लिहा.

१. १९४२ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रतिसरकारचे कार्यक्षेत्र - ______

SOLUTION
१९४२ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रतिसरकारचे कार्यक्षेत्र - सातारा
२. १९४३ मध्ये आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून जिंकून घेतला भारतीय बेटे - ______
SOLUTION
१९४३ मध्ये आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून जिंकून घेतला भारतीय बेटे - अंदमान-निकोबार


प्र.३ टीपा लिहा.

१. जहाल विचारसरणी 

SOLUTION
(१) स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व्यापक जनआंदोलन उभे करून अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे, या विचारांच्या राष्ट्रीय सभेतील कार्यकर्त्यांच्या गटाला 'जहालवादी' असे म्हणतात.
(२) एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात 'आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा' हा वाद सुरू झाला. स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल, ही जहाल गटाची विचारसरणी होती.
(३) आपले घर आपण आधी ताब्यात घेऊ, मग हव्या त्या सुधारणा करू, असे जहालवाद्यांचा म्हणणे होते.
(४) स्वातंत्र्य मिळवणे हे मवाळवादी व जहालवादी या दोन्ही गटांचे ध्येय एकच असले तरी दोन्हींच्या कार्यपद्धतींबाबत त्यांच्यात मतभेद होते. अर्ज-विनंत्या अगर भाषणे करून इंग्रजी सत्ता बधणार नाही, असे जहालवाद यांचे मत होते.
(५) मवाळवाद्यांच्या सनदशीर मार्गावर जहालवादयांचा विश्वास नव्हता.

२. आझाद हिंद सेना

SOLUTION
(१) दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशांत जे भारतीय सैनिक पकडले होते, त्यातूनच रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.
(२) रासबिहारी बोस यांच्या आमंत्रणावरून सुभाषचंद्र बोस जपानला गेले व त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
(३) त्यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने आराकानचा प्रदेश व आमच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली.
(४) अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढले.

३. प्रतिसरकार

SOLUTION
(१) १९४२ साली सुरू झालेल्या जनआंदोलनाच्या काळातच देशाच्या विविध भागांत भूमिगत चळवळी सुरू झाल्या आणि प्रतिसरकारे सुरू झाली.
(२) बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया येथे प्रतिसरकारे स्थापन झाली.
(३) महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे १९४२ साली प्रतिसरकार स्थापन केले. या सरकारने या भागात ब्रिटिशांचे शासन संपुष्टात आणून जनतेचे सरकार स्थापन केले.
(४) कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, खटल्यांचा निर्णय देणे, गुन्हेगारांना शिक्षा देणे इत्यादी कामे हे प्रतिसरकार करीत असे.

प्र.४ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

१. १८२२ च्या अखेरीस लेफ्टनंट औट्रॅम भिल्लांचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला.

SOLUTION
(१) १८१८ साली खानदेश इंग्रजांच्या ताव्यात गेल्यावर सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील भिल्लांनी गोंदाजी व महिपा यांच्या नेतृत्वाखाली उठाव केले.
(२) १८२२ च्या दरम्यान 'हरिया' या भिल्लांच्या म्होरक्याने केलेला उठाव मोडून काढण्यात आला.
(३) लेफ्टनंट औट्रॅम याने भिल्लांचा उठाव मोडून काढतानाच भिल्लांमध्ये राहून त्याने त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जंगल सोडून शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला.
(४) माफीचे जाहीरनामे, जमिनी देणे, तगाई, मागील गुन्ह्यांना माफी, सैन्यात भरती अशा योजना त्याने राबवल्या.
या उपायांमुळे भिल्लांच्या उठाव करण्याच्या प्रमाणात घट झाली. या मार्गाने औट्रम भिल्लांचे उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला.

२. रवींद्रनाथ टागोर यांनी 'सर' या पदवीचा त्याग केला.

SOLUTION
(१) रौलट कायद्या विरोधात पंजाबमध्ये सत्याग्रह लढ्याने उग्र स्वरूप धारण केले होते. १३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखी निमित्त हजारो लोक जालियनवाला बागेत सभेसाठी एकत्र जमले होते.
(२) सभाबंदीच्या हुकमाची कल्पना नसलेल्या जमावावर जनरल डायरने पूर्वसूचना न देताच गोळीबार केला.
(३) या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व जखमीही झाले.या घटनेमुळे भारतभर संतापाची लाट उसळली.
रवींद्रनाथ टागोर यांनी या हत्याकांडाचा निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या 'सर' या पदवीचा त्याग केला.

प्र.५ तुमचे मत नोंदवा.

१. वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापारवृद्धीचा परिणाम होता.

SOLUTION
(१) युरोपीय राष्ट्रांनी आपल्या सामर्थ्यावर अन्य राष्ट्रांचा भूप्रदेश बळकावून वसाहती स्थापन केल्या. व्यापारात वाढ करणे हा त्यांचा हेतू होता.
(२) एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर अन्य राष्ट्रांत औद्योगिक क्रांती झाली.
(३) औद्योगिक क्रांतीने या राष्ट्रांच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली.
(४) अंतर्गत बाजारपेठांमध्ये हे उत्पादन विकले जाणे अशक्य असल्याने त्यांना अन्य बाजारपेठांची आवश्यकता भासू लागली.
(५) व्यापारातून अतिरिक्त नफा, अतिरिक्त नफ्यातून गुंतवणूक व गुंतवणुकीसाठी वसाहती मिळवणे हे चक्र सुरू झाले.
(६) युरोपीय देशांच्या व्यापारात वाढ झाल्याने त्यांना हक्काच्या बाजारपेठांची गरज भासू लागली. या गरजेतूनच वसाहतवादाचा उदय झाला.

२. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वा. सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते.

SOLUTION
(१) १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाला इंग्रज 'शिपायांचे बंड' असे म्हणत असत. आपले लोकही 'शिपायांचा उठाव' असे म्हणतात.
(२) स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र या लढ्याला पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवले आहे. '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' या नावाचे पुस्तकच लिहून त्यांनी आपल्या इतिहासकारांची या घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे.
(३) या लढ्याच्या आधी भारतात इंग्रजांविरुद्ध एवढ्या व्यापक प्रमाणात लढा लढला गेला नव्हता.
(४) हा लढा राजांनी लढलेला नव्हता; तर सामान्य जनता, शेतकरी, सैनिक यांनी हा लढा दिलेला होता. या लढ्यात भिल्ल, रामोशी, आदिवासी, सर्व जाती-धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते.
(५) आपल्या धर्मावरील, भाषेवरील, संस्कृतीवरील, आपल्या अस्तिमेवरील इंग्रजांचे होणारे आक्रमण त्यांना रोखायचे होते.
(६) ब्रिटिशांच्या जुलमी, अन्यायी सत्तेतून मुक्ती मिळवणे हा लढ्याचा मुख्य हेतू होता.
या लढ्यामुळेच जनतेत राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला, त्यामुळे १८५७ चा लढा हे 'पहिले स्वातंत्र्ययुद्ध' होते हे स्वा. सावरकरांचे मत सार्थ ठरते.

वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष स्वाध्याय  | Vasahatavadavirush bharatiyancha sangharsha swadhyay 

  • वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष स्वाध्याय 
  • Chapter 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष -
  • Maharashtra Board Class 12th इतिहास Chapter ६ वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष स्वाध्याय 
  • साध्याय वर्ग १२ वा इतिहास ६ वसाहतवादाविरूद्ध भारतीयांचा संघर्ष I ...
  • प्र.६.वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष | स्वाध्याय (प्रश्नोत्तरे ...
  • 6. वसाहतवाद विरुद्ध भारतीयांचा संघर्ष......स्वाध्यायप्र.६.वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष | मवाळ-जहाल विचारसरणी ...
  • वसाहतवाद विरुद्ध भारतीयांचा संघर्ष "स्वाध्याय" 

वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष स्वाध्याय  | Vasahatavadavirush bharatiyancha sangharsha swadhyay 

Balbharati solutions for History 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास
Chapter 2: युरोपीय वसाहतवाद
Chapter 3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद
Chapter 4: वसाहतवाद आणि मराठे
Chapter 5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
Chapter 6: वसाहतवादविरुद्ध भारतीयांचा संघर्ष
Chapter 7: भारत : निर्वसाहतीकरण ते एकीकरण

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post