रसग्रहण : आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी | Aakashi Zep Ghe Re Rasgrahan Marathi Class 10th

रसग्रहण : आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी | Aakashi Zep Ghe Re Rasgrahan Marathi Class 10th


1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण
2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी
3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी
4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी
5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी
6) तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी
7) खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी

 

प्रस्तुत कवितेचे कवीजगदीश खेबुडकर         


प्रस्तुत कवितेचा विषय : स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते.         

प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :               
(i) आकाश ➡ आभाळ 
(ii) सोने ➡ सुवर्ण 
(iii) वैभव ➡ समृद्धी 
(iv) माया ➡ प्रेम 
(v) काया ➡ शरीर 
(vi) विहार ➡ संचार
(vii) सामर्थ्य ➡ शक्ती 
(viii) डोंगर ➡ पर्वत 
(ix) सरिता ➡ नदी
(x) सागर ➡ समुद्र 
(xi) कष्ट ➡ श्रम 
(xii) व्यथा ➡ दुःख. 

प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :       
 • माणसाने कष्टावर, प्रयत्नावर विश्वास ठेवला पाहिजे. ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ असे मानू नये. नशिबाने काहीही मिळत नाही. 
 • प्रयत्नाने आपण आपले नशीब घडवत असतो. तसेच, केवळ देहाला तृप्त करणारी सुखे महत्त्वाची नसतात. ती तात्कालिक असतात. ती चिरकाल टिकत नाहीत. 
 • आपल्या प्रयत्नाने गगनात भरारी मारली पाहिजे. त्यातच खरे सुख असते; असा संदेश ही कविता देते.

प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :  
 • माणसे अनेकदा देवाच्या आहारी जातात. नशिबावर भरवसा ठेवतात. नशिबात असेल, तेच मिळेल; अधिक काहीही मिळणे शक्य नाही, अशी त्यांची ठाम समजूत असते. 
 • कवी जगदीश खेबुडकर ही समजूत दूर करायला सांगतात. त्यांच्या मते, माणसाने स्वतःचे सामर्थ्य ओळखले पाहिजे आणि कठोर परिश्रमांना सिद्ध झाले पाहिजे. 
 • कठोर परिश्रम केले, तर यश नक्कीच मिळते. प्रयत्नवाद हाच खरा विचार आहे.

कवितेतील ओळींचा सरळ अर्थ      
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा

उत्तर : कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. आयते सुख कधी मिळत नाही. तुला हे समजते पण वागणुकीत दिसत नाही. म्हणून मनातल्या मनात दुःख जळत राहते. त्यामुळे तुझा प्राण कावराबावरा होऊन घाबरतो.

प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये : 
 • ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 
 • पिंजरा हे पारतंत्र्याचे प्रतीक, तर पंख हे मुक्तपणे आकाशात विहार करण्याचे प्रतीक, दया डोंगर, सरिता सागर ही सर्व अडचणींची प्रतीके. 
 • सर्वसामान्य लोकांना सहज कळतील, आशय थेट मनाला भिडेल, अशी ही सोपी, साधी प्रतीके कवींनी वापरली आहेत. 
 • फळ रसाळ मिळते’ याप्रमाणे अनुप्रासांचा सुंदर उपयोग केलेला आहे. एकूण ही कविता रसाळ, प्रासादिक बनली आहे.
प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे : 
 • ही कविता म्हणजे एक गाजलेले चित्रपट गीत आहे. त्याची चाल, संगीत चांगले आहे. गीत ऐकत राहावे असे वाटते. गीत दमदारपणे गायलेले आहे. 
 • ते लक्षातही राहते. हे गीत माणसाला परावलंबित्वाचा त्याग करण्याची प्रेरणा देते. पारतंत्र्य जरी सुखाचे वाटत असले, तरी स्वसामर्थ्याने मोकळ्या आकाशात झेप घ्यावी आणि स्वकर्तृत्व गाजवावे, हे अगदी सहज-सोप्या शब्दांत या गीतामध्ये सांगितले आहे. म्हणूनच हे गीत, ही कविता मला आवडते.

रसग्रहण - 2 : आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी

कविता – आकाशी झेप घे रे.(जगदीश खेबुडकर)
‘घामातुन मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले.’

आशयसौंदर्य : 
सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची ‘आकाशी झेप घे रे’ ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे. स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे आणि उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे, हा अमूल्य संदेश ही कविता देते.


काव्यसौंदर्य : 
वरील ओळींमध्ये कवींनी श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न व काबाडकष्ट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये खपतो, तेव्हा त्याला मोत्यांसारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य त्याच्या घरी येते, तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात.


भाषिक वैशिष्ट्ये : 
ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ‘पिंजरा’ हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरले आहे आणि त्यात कैद झालेल्या मानवी मनाला ‘पक्षी’ म्हटले आहे. साध्या शब्दांत गहन आशय मांडला आहे. यमकप्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते.


रसग्रहण - 3 : आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी

‘तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने’


आशयसौंदर्य : 
‘आकाशी झेप घे रे’ कवितेद्वारे कवी जगदीश खेबुडकर यांनी स्वकष्टाचे महत्त्व अधोरेखित करून आपल्या भोवतीचे सुरक्षिततेचे व परावलंबित्वाचे कवच भेदण्याचा, तसेच स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून यशाची शिखरे सर करण्याचा संदेश दिला आहे.


काव्यसौंदर्य : 
प्रस्तुत काव्यपंक्तीत कवीने पिंजऱ्यातील पाखराचे प्रतीक वापरत मानवाला स्वसामर्थ्याने कर्तृत्व गाजवण्याची प्रेरणा दिली आहे. माणसाने आपल्या क्षमता ओळखाव्यात, कष्ट करावेत, जिद्दीने संकटांवर मात करत यश मिळवावे असा अतिशय प्रेरक संदेश या कवितेतून मिळतो. स्वकष्टाचे, स्वसामर्थ्याचे, स्वावलंबनाचे महत्त्व अतिशय साध्या सोप्या भाषेत ठसवणारी ही ओळ प्रेरणादायी आहे.


भाषिक वैशिष्ट्ये : 
सहज, सोप्या, पण आशयघन शब्दांमुळे ही संदेशपर कविता अतिशय अर्थपूर्ण झाली आहे. कवितेच्या भाषेत एक सहजता, गोडवा आहे. देवाने सामर्थ्याने अशा शब्दाद्वारे यमक अलंकार साधल्यामुळे काव्यास लयबद्धता प्राप्त झाली आहे. द, र अशा अक्षरांची पुनरावृत्ती होऊन ‘अनुप्रास’ अलंकार साधला गेला आहे. त्यामुळे, काव्यांशाचे नादमाधुर्य वाढले आहे.


रसग्रहण - 3 : आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी

कवितेचे नाव -  आकाशी झेप धे रे.

कवी / कवयित्रीजगदीश खेबुडकर   

रचनाप्रकारगीतरचना   

कवितेचा विषयस्वसामर्थ व स्वातंत्र्य मोलाचे असते.    

कवितेचा काव्यसंग्रहएक चित्रपट गीत    

कवितेतून व्यक्त होणारा स्थायीभाव - स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून स्वातंत्र्याचे मोल आणत जगण्याची प्रेरणा देणारा भाव

रसग्रहण : आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी | Aakashi Zep Ghe ReRasgrahan Marathi Class 10th
    
आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया

सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने

दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते

हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा
घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा


रसग्रहण : आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी | Aakashi Zep Ghe ReRasgrahan Marathi Class 10th

रसग्रहण : आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी | Aakashi Zep Ghe Re Rasgrahan Marathi Class 10th
 • दहावी मराठी आकाशी झेप घे रेकवितेच्या ओळींचे रसग्रहण
 • दहावी मराठी आकाशी झेप घे रेकविता रसग्रहण 
 • आकाशी झेप घे रेकवितेचे रसग्रहण
 • आकाशी झेप घे रेकवितेचे रसग्रहण कसे कराल?
 • आकाशी झेप घे रेकविता रसग्रहण दहावी मराठी
 • Aakashi Zep Ghe Re Rasgrahan Marathi Class 10th
 • आकाशी झेप घे रेकवितेचे रसग्रहण

रसग्रहण दहावी मराठी

1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण

2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी

3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी

4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी

5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी

6) तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी

7) खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी
 

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post