रसग्रहण : उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण | Uttam Lakshan Rasgrahan 10th Marathi

रसग्रहण : उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण | Uttam Lakshan Rasgrahan 10th Marathi


प्रस्तुत कवितेचे कवी : संत रामदास.

प्रस्तुत कवितेचा विषय : उत्तम माणसाची लक्षणे.

प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :

  •  (i) होड ➡ पैज
  • (ii) दृढ ➡ ठाम.


प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :

  • प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचाच प्रयत्न केला पाहिजे.
  • त्यासाठी वाईट गुण कोणते व चांगले गुण कोणते हे स्पष्टपणे समजून घ्यावे.
  • प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करावा.
  • यातूनच चांगला व समर्थ समाज निर्माण होतो. 


प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :

  • प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी व्यक्तीने समाजात कसे वागावे याचे मार्गदर्शन केले आहे.
  • नेहमीच सावध मनाने वागावे.
  • इतरांना सहकार्य करावे.
  • कोणाशीही कपटाने वागू नये.
  • तोंडाळ, वाचाळ माणसांना टाळावे.
  • आळस झटकून टाकावा. पूर्ण विचार करून वागावे.
  • उपकाराची परतफेड करावी.
  • नेहमी उदारपणाने वागावे.
  • मनाचा मोठेपणा बाळगावा.
  • परावलंबी होऊ नये.
  • नेहमी सत्याने वागावे.
  • कुप्रसिद्धी टाळावी इत्यादी अनेक गुणांचे आचरण करण्यास या कवितेत संत रामदासांनी सांगितले आहे.


कवितेतील ओळींचा सरळ अर्थ :

जसे अपकीर्ति ते सांडावी सत्कीर्ति वाडवावी ॥

         विवेकें दृढ धरावी वाट सत्याची ।।
 उत्तर: रामदास श्रोत्यांना शिकवण देताना म्हणतात- आपली कुप्रसिद्धी टाळावी, चांगली कीर्ती वाढवावी. चांगल्या प्रकारे प्रसिद्ध व्हावे. सारासार विचाराने, विवेकशील वर्तन करून ठामपणे सत्याचा मार्ग आचरावा.


प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :

  • कवितेची रचना ओवी या छंदात केलेली आहे. ओवी हा उच्चारणाला सुलभ असा अत्यंत लवचीक रचनाप्रकार आहे.
  • त्यामुळे या कवितेतील भाषा ओवी या छंदाला साजेशी सुबोध व सर्वसामान्यांना सहज समजेल अशी आहे. म्हणून कवितेची आवाहन शक्ती वाढली आहे.
  • चुकीचे वर्तन व चांगले वर्तन या दोन्ही बाबी समर्थांनी स्पष्ट शब्दांत कोणतीही संदिग्धता न ठेवता सांगितल्या आहेत. समर्थांच्या या रचनेत प्रासादिकता आढळते.


प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची  कारणे :

  • मला ही कविता खूप आवडली. कवितेत मांडलेले विचार पटकन पटण्यासारखे आहेत. ही कविता उच्चारताना, वाचताना आनंद होतो.
  • उच्च, उदात्त विचार मनात घोळवल्याने मनही आनंदित होते. सर्व गुण-अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे परखडपणे सांगितले आहेत. कुठेही राज्यांचा बोजा नाही. प्रत्येक शब्दाणीक अर्थ स्पष्ट होत जातो.
  • मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे मार्गदर्शन घडत असल्याने कविता आपली, स्वतःची, स्वतःसाठी असलेली वाटत राहते.

उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण - 2

‘जनीं आर्जव तोडूं नये पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।

आशयसौंदर्य : 
‘उत्तमलक्षण’ या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी प्रस्तुत ओवीमध्ये तीन लक्षणांचा ऊहापोह केला आहे.

काव्यसौंदर्य : 
समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात- लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्यमार्ग आचारावा. कधीही पुण्यमार्गाने जाण्याचे सोडू नये.

भाषिक वैशिष्ट्ये : 
वरील ओवीमध्ये जनांसाठी खूप सुगम निरूपण केले आहे. ‘तोडू नये, जोडू नये, सोडू नये’ अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. ओवीछंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्त्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यांतील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.

उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण - 3

‘अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी । 
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची।।’ (नोव्हें. ‘२०)

आशयसौंदर्य : 
संत रामदासांनी ‘उत्तमलक्षण या कवितेत आदर्श गुणवान व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगताना या ओळींमधून सद्वर्तन कशा प्रकारे करावे, याची शिकवण दिली आहे.

काव्यसौंदर्य : 
संत रामदास म्हणतात लोक आपल्याला दूषणे देतील व निंदा करतील असे वर्तन कदापिही करू नये. ज्या वागण्याने आपली अपकीर्ती होईल, असे वागणे टाळावे. उलट आपल्या व्यक्तिमत्त्वाची कीर्ती पसरेल, अशी वागणूक करायला हवी. स्वतः चांगले वागून सत्कीर्ती वाढवायला हवी. त्यासाठी बुद्धीचा विवेक महत्त्वाचा ठरतो. सद्विचाराने, विवेकाने सत्याचा मार्ग ठामपणे आचरावा. विवेकबुद्धी ठोस असणे गरजेचे आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : 
सन्मार्गाचे लक्षण सांगताना जनसामान्यांना समजतील असे तीन मुद्दे या ओळीत सहजपणे सांगितले आहेत. अपकीर्ती व सत्कीर्ती तसेच सांडावी व वाढवावी या विरोधी शब्दांमुळे ओवीची खुमारी वाढली आहे. दृढ धरणे हा वाक्प्रचार चपखलपणे उपयोगात आणला आहे. जनमानसावर तत्त्व ठसवण्याची समर्थांची हातोटी समर्थपणे व्यक्त झाली आहे.

उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण - 4


सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथे जाऊं नये । 
कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ।।

आशयसौंदर्य : ‘उत्तमलक्षण’ या ‘श्रीदासबोधातील’ उपदेशपर रचनेतून संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याचा खुलासा त्यात केला आहे.

काव्यसौंदर्य : सत्याचा मार्ग कधीही सोडू नये, असत्याच्या वाटेवर कधीही जाऊ नये व खोटेपणाचा अभिमानही कधी बाळगू नये, असा संदेश प्रस्तुत काव्यपंक्तीतून मिळतो. सर्वज्ञपणा अंगी बाणवण्यासाठी या आदर्श गुणांची आवश्यकता असल्याचे संतकवी रामदास पटवून देतात. हे संतकाव्य वाचल्यावर शांतरसाचा अनुभव मिळतो.

भाषिक वैशिष्ट्ये : साडेतीन चरणांच्या या ओवीतील, पहिल्या तीन चरणांत ‘नये’ या शब्दाची पुनरावृत्ती होऊन अंत्ययमक साधले गेले आहे, त्यामुळे काव्याला नादमयता प्राप्त झाली आहे. तसेच, यात विरुद्ध अर्थांच्या शब्दांची योजना करून काव्यसौंदर्य साधले गेले आहे. 
उदाहरणार्थ, सत्यमार्ग सांडूं नये असत्य पंथे जाऊं नये।। ‘सत्यमार्ग’ यासारख्या सामासिक शब्दाची योजना करून एकाच नेमक्या शब्दात अचूक अर्थ वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. सांडू, पंथें, जाऊं अशी अनुस्वार असलेली शब्दांची जुनी भाषिक रूपे यात आढळतात. तत्कालीन मराठी संतकाव्यातील भाषेचे आशय व भावसौंदर्य यांत पाहायला मिळते. शांतरसाचा अनुभव देणारी ही रचना वैशिष्ट्यपूर्ण वाटते.

उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण - 5


कवितेचे नाव - उत्तम लक्षण

कवी / कवयित्री - संत रामदास

रचनाप्रकार - ओवी

कवितेचा विषय - उत्तम माणसाची लक्षणे

कवितेचा काव्यसंग्रह - श्रीदासबोध

कवितेतून व्यक्त होणारा स्थायीभाव - आदर्श माणसे घडविण्याचा ध्यास


उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास 

श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण । 
जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ।।१।।

वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ ओळखिल्याविण खाऊं नये । 
पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ।।२।।

जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । 
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।३।।

तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये । 
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ।।४।।

आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये । 
शोधिल्याविण करूं नये । कार्य कांही ।।५।।

सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये । 
पैज होड घालूं नये । कांहीं केल्या ।।६।।

कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये । 
परपीडा करूं नये । विश्वासघात ।।७।।

व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये । 
आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ।।८।।

सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये । 
कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ।।९।। 

अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी । 
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ।।१०।।

रसग्रहण : उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण | Uttam Lakshan Rasgrahan 10th Marathi

रसग्रहण : उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण | Uttam Lakshan Rasgrahan 10th Marathi

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वरती दिलेले उत्तम लक्षण याचे रसग्रहण कसे वाटले आपल्याला भरती दिलेल्या विषयांचे नीट रसग्रहण मिळाले का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

आपल्याला वरती दिलेल्या रसग्रहणापैकी अजून कोणतीही रसग्रहण माहिती असेल किंवा आपल्याला इतर कवितांची देखील रसग्रहण हवे असतील तर खाली दिलेल्या लिंक द्वारे आपण ते रसग्रहण अगदी सोप्या पद्धतीने मिळू शकतात इयत्ता दहावी यामध्ये रसग्रहण हे खूप महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे रसग्रहणावर इयत्ता दहावी मध्ये मराठी विषयात आपल्याला प्रश्न विचारला जातो त्यामुळे आपल्याला सर्व कवितांचे रसग्रहण करणे खूप आवश्यक आहे.

त्याकरिता आम्ही तुमच्यासाठी सर्वजणांना खाली खूप सारे रसग्रहण घेऊन आलेलो आहे एका पोस्टमध्ये आपल्याला दोन पेक्षा जास्त रसग्रहण पाहायला मिळतील जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त रसग्रहण लिहिता येतील पेपरला गेल्यानंतर आपण हे वाचलेले आपल्याला आठवेल आणि आपण नक्कीच चांगला पेपर लिहू शकाल खाली दिलेल्या बाकी link  द्वारे आपण बाकीचे सर्व रसग्रहण टाकू शकता एवढे बोलूनच आज मी या ठिकाणी हार्दिक संपवतो धन्यवाद.

  • दहावी मराठी उत्तमलक्षण कवितेच्या ओळींचे रसग्रहण
  • दहावी मराठी उत्तमलक्षण कविता रसग्रहण 
  • उत्तमलक्षण कवितेचे रसग्रहण
  • उत्तमलक्षण कवितेचे रसग्रहण कसे कराल?
  • Uttam Lakshan Rasgrahan 10th Marathi
  • उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण

रसग्रहण दहावी मराठी

1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण

2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी

3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी

4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी

5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी

6) तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी

7) खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी
 

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post