रसग्रहण : आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी | Aashwasak Chitra Rasgrahan Marathi Class 10th
प्रस्तुत कवितेचे कवी : नीरजा.
प्रस्तुत कवितेचा विषय : स्त्री-पुरुष समानता
प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :
(i) हात हस्त
(ii) कसब कौशल्य
(iii) आभाळ आकाश
(iv) आश्चर्य नवल
प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :
आजपर्यंत आपण स्त्रियांना दुय्यम मानून वागत आलो. हे आता खूप झाले. आता हे थांबले पाहिजे. येणारा काळ हा स्त्री-पुरुष समानतेचा काळ आहे. त्या काळाला साजेसे जीवन जगण्यासाठी आपल्याला आता स्त्री पुरुष समानतेचे तत्त्व अंगीकारावे लागणार आहे.
प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :
अजूनही समाजाने पूर्णपणे स्त्री-पुरुष समानता अंगीकारलेली नाही. हे निराशाजनक आहे. परंतु भावी काळ हा स्त्री-पुरुष समानतेचाच हे असणार आहे. म्हणून सर्वांनी स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व आतापासूनच मान्य करून ते अंगीकारले पाहिजे, असा विचार या कवितेतून मांडला आहे.
कवितेतील ओळींचा सरळ अर्थ :
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.
उत्तर : तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळणेही हळूहळू शिकेल. हळूहळू पुरुष संसारातील घरगुती कामेही करतील, असा आशय व्यक्त होतो.
प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :
- ही मुक्तछंदातली कविता आहे. मुक्तछंदामुळे दैनंदिन व्यवहारातली भाषा कवितेत वापरली गेली आहे. साध्या विधानांतून कवयित्री खोलवरचे विचार मांडतात. लहान मुलांच्या खेळाचे चित्रण हे या कवितेतील सुंदर प्रतीक आहे.
- या प्रतीकातून आधुनिक जगातील स्त्री-पुरुष समानता हा फार मोठा विचार अगदी सहजपणे व्यक्त होतो. ‘हातात हात असेल’ या वाक्यखंडातून कवितेतील मुलगा व मुलगी यांच्या भावी आयुष्यातील सामंजस्य प्रत्ययकारकतेने प्रकट होते.
- प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे ही कविता मला खूप आवडली आहे. ही आजची, आमच्या पिढीची कविता आहे.
- आमच्या मनातला भाव, आमचे विचार या कवितेतून व्यक्त होतात. आम्ही आपापसात वागतो, तेव्हा मुलगा-मुलगी असा भेदच आमच्या मनात नसतो.
- श्रेष्ठ-कनिष्ठभाव न बाळगता आम्ही वावरत असतो. आमच्या मनातला हा भावच ही कविता व्यक्त करते.
रसग्रहण - 2 : आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी |
मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे
तेव्हा तो हसून म्हणतो,
‘तू भाजी बनव छानपैकी पाल्याची.’
आशयसौंदर्य :
आश्वासक चित्र या कवयित्री नीरजा यांच्या कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र रेखाटले असून ते भविष्यात प्रत्यक्ष साकार होईल असा विचार मांडला आहे.
काव्यसौंदर्य :
भातुकली व चेंडू हे खेळ स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक कामांचे प्रतिनिधित्व करतात. प्रस्तुत काव्यपंक्तींत मुलीने मुलाकडे चेंडू मागताच मुलगा हसून तिची चेष्टा करत म्हणतो – ‘तू छानपैकी पाल्याची भाजी बनव’ कारण त्याला वाटत असते, की आपल्याप्रमाणे हिला चेंडूचा खेळ जमणार नाही. (भाजी करणे हे तुझे काम ! तुला अशी पुरुषी कामे काय जमणार?) यातून त्याची पुरुषी मानसिकता अधोरेखित होते.
भाषिक वैशिष्ट्ये :
संवादात्मक भाषेच्या माध्यमातून व भातुकली, चेंडू यांसारख्या प्रतिमांच्या वापरातून ही कविता आपल्याला चिंतनशील बनण्यास प्रवृत्त करते. मुक्तछंदातील या कवितेत साध्या सोप्या भाषेतून स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.
|
‘भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.’
आशयसौंदर्य :
कवयित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र’ या कवितेमधून स्त्री-पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरीत्या कसे साकारले जाईल, याची दिशा खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतीकांतून योग्यपणे दाखवली आहे.
काव्यसौंदर्य :
भातुकलीतले जग हे स्वप्नाळू असते. त्यातला संसार हा लुटुपुटीचा असतो. मोठेपणी प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी असतात. त्यामुळे भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागेल. स्त्री-पुरुष यांची परस्परांना स्नेहाची साथ असेल, तर समजूतदारपणाने व सहकार्याने ते जगात वावरतील. स्त्री-पुरुष परस्परांची कामे मिळून करतील, असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपरोक्त ओळींतून साकारले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये :
या ओळींमधून लहान मुलांच्या खेळातून विचारगर्भ चिंतनाची प्रचिती येते. कवयित्रींनी साध्या विधानातून विचारगर्भ आशय थेट मांडला आहे. ‘स्त्री-पुरुष समानता’ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे. भविष्यकालीन दोघांमधील सामंजस्याचे लोभस परंतु प्रगल्भ चित्र ‘हातात हात असेल’ या वाक्यखंडातून प्रत्ययकारीरीत्या प्रकट झाले आहे. स्वप्न व सत्य यांची योग्य सांगड तरल शब्दांत व्यक्त झाली आहे.
रसग्रहण - 3 : आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी |
कवितेचे नाव - आश्वासक चित्र
कवी / कवयित्री - नीरजा
रचनाप्रकार - मुक्तछंद
कवितेचा विषय - स्त्री-पुरुष समानता
कवितेचा काव्यसंग्रह - निरर्थकाचे पक्षी
कवितेतून व्यक्त होणारा स्थायीभाव - स्त्री-पुरुष समानता येणारच, हा कवयित्रींच्या मनातला आशावाद
रसग्रहण : आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी | Aashwasak Chitra Rasgrahan Marathi Class 10th |
उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून
नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत.
मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित.
तशी हसून म्हणते ती, ‘आता तू.’
मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर.
दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम;
मग शोधतो पातेलं भाजीसाठी...
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.
माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं
जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र.
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
खेळते आहे एक मुलगी केव्हाची.
मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून.
ती मांडीवर घेते बाहुलीला
एका हातानं थोपटत तिला, चढवते आधण भाताचं
भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर.
बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन
खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात.
मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे.
अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या.
मुलगा दाखवतो तिला, आपलं कसब पुन्हा एकदा.
मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे
तेव्हा तो हसून म्हणतो,
‘तू भाजी बनव छानपैकी पाल्याची.’ ती म्हणते,
‘मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?’
मुलगा देतो चेंडू तिच्या हातात.
आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी | Aashwasak Chitra Rasgrahan Marathi Class 10th |
- दहावी मराठी आश्वासक चित्र कवितेच्या ओळींचे रसग्रहण
- दहावी मराठी आश्वासक चित्र कविता रसग्रहण
- आश्वासक चित्र कवितेचे रसग्रहण
- आश्वासक चित्र कवितेचे रसग्रहण कसे कराल?
- आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी
- Aashwasak Chitra Rasgrahan Marathi Class 10th
- आश्वासक चित्रकवितेचे रसग्रहण
रसग्रहण दहावी मराठी
1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण
2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी
3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी
4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी
5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी
Tags:
रसग्रहण इयत्ता दहावी