रसग्रहण : वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी | Vastu Kavita Rasgrahan Marathi Class 10th

रसग्रहण : वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी |  Vastu Kavita Rasgrahan Marathi Class 10th


प्रस्तुत कवितेचे कवी :  द. भा. धामणस्कर

प्रस्तुत कवितेचा विषय :  निर्जीव वस्तूंचा सजीवपणा

प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :

(i) स्नेह प्रेम

(ii) हक्क अधिकार

(iii) मनचित्त

(iv) सेवक चाकर

(v) काळसमय

(vi) आयुष्य जीवन


प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :

 •      माणसाने वस्तूंशी प्रेमानेच वागले पाहिजे. आपण वापरलेल्या वस्तूंच्या रूपाने आपले अस्तित्व मार्ग शिल्लक राहते.
 •      वस्तूंचा उपयोग संपला की वस्तूंना टाकून देऊ नये. त्यांना टाकून देणे म्हणजे आपले अस्तित्व आपण स्वतः संपवून टाकणे. हे टाळण्यासाठी आपण वस्तूंशी स्नेहाने, संवेदनशीलतेने वागले पाहिजे.   

 

प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :

 •     निर्जीव वस्तूंना आपण मन नसते असे म्हणतो. कवींच्या मते, त्यांना मन असते,भावना असते. त्या संवेदनशीलही असतात.
 •      त्यांच्या दर्शनाने त्या वापरणाऱ्याचे व्यक्तिमत्त्व लक्षात येते.
 •      म्हणून माणसाने वस्तूंशी प्रेमाने, आत्मीयतेने वागले पाहिजे, आपण माणसांशी वागतो, तसेच वस्तूंशी वागले पाहिजे, असा महत्त्वाचा विचार या कवितेतून मांडला आहे.

 

कवितेतील ओळींचा सरळ अर्थ :

वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही.

उत्तर :

 •      कवी म्हणतात वस्तूंना जीव असतो, मन असते. म्हणून त्यांना जपणे गरजेचे आहे.
 •      त्यापुढे त्यांचे आपण लाडही करावेत कारण पुढच्या काळात आपल्यातले प्रेम त्याच कायम जिवंत ठेवणार आहेत.


प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :

 • या कवितेची रचना मुक्तछंदातील आहे. मुक्तछंदामुळे लेखनशैली मुक्त राहते
 • शब्द निवडण्यावर कोणतीही बंधने येत नाहीत.
 • त्यामुळे दैनंदिन व्यवहारातील भाषा सहजगत्या वापरता येते.
 • या कवितेत तसेच घडले आहे. दैनंदिन व्यवहारातील भाषेमुळे या कवितेचा वाचकांशी सहजसंवाद घडतो.
 • साध्या पण आवाहक शब्दांतून मोठे तत्त्व येथे व्यक्त होते.
 • अत्यंत हळुवार, संवेदनशील भावना कवी नेहमीच्याच साध्या शब्दांतून व्यक्त करतात.

 

प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे : 

 • ही कविता सुंदर आहे. आधुनिक जगात वावरणाऱ्या कोणालाही ही कविता आवडेल अशी आहे.
 • एक वेगळाच चाकोरीबाहेरचा विचार कवींनी या कवितेतून मांडला आहे.
 • सहसा आपण वस्तू व ती वापरणारा माणूस यांना वेगळे वेगळे मानतो.
 • वापरकर्त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वस्तूचे स्वरूप घडते.
 • म्हणजे वस्तूवरून वापरकर्त्याचे मन कळते. आपण वस्तूशी प्रेमाने वागतो. म्हणजे स्वतःशीच प्रेमाने वागत असतो, असा वेगळा नावीन्यपूर्ण भाव या कवितेतून व्यक्त होतो. म्हणून ही कविता मला आवडते.

रसग्रहण - 2 : वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी

‘वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात.’

आशयसौंदर्य : 
वस्तू’ या कवितेत कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणिमात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात, हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे आणि त्यांना प्रेमाने वागवायला हवे, असे प्रतिपादन केले आहे.

काव्यसौंदर्य : 
बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात आणि त्यांच्याशी निर्दयतेने वागतात. त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळींत कवी म्हणतात की, कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे, असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो. त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत, अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील.

भाषिक वैशिष्ट्ये : 
मुक्तशैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळींतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दांत मोठे तत्त्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळुवार पद्धतीने कवींनी दिला आहे. 


रसग्रहण - 3 : वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी


वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन, त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही.

आशयसौंदर्य : 
‘भरून आलेले आकाश’ या काव्यसंग्रहातील ‘वस्तू’ या कवी द. भा. धामणस्कर लिखित कवितेतून निर्जीव वस्तू यासुद्धा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक असतात व या वस्तूंची आपण प्रेमाने, स्नेहाने जपणूक केली पाहिजे असा विचार मांडला आहे.

काव्यसौंदर्य : 
वस्तूंना जरी मानवी भावना नसल्या, तरीही त्यांना मानाने, लाडाने वागवावे, जपावे व त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता बाळगावी असे कवीं म्हणतात. वस्तूंमुळे आपल्या गरजा भागतात. त्यामुळे, त्या वस्तूंची काळजी घेतली पाहिजे, वस्तूंचे आपल्या आयुष्यातील मोल लक्षात घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे व त्यांची मानाने, स्नेहाने जपणूक केली पाहिजे. माणसाचे आयुष्य क्षणभंगुर आहे; परंतु वस्तूंमधून आपला स्नेह जिवंत ठेवणे शक्य असते. अशाप्रकारे, निर्जीव गोष्टींबद्दलही कृतज्ञताभाव व स्नेह जपण्याचा संदेश यातून व्यक्त होतो.

भाषिक वैशिष्ट्ये : 
मुक्तछंदातील प्रस्तुत पदयपंक्तीत चिंतनशीलता, भावोत्कटता व प्रांजळपणा हे विशेष जाणवतात. साध्या, सोप्या भाषेतून ‘वस्तूंनाही भावना असतात’ हा अनोखा आशय कवीने मांडला आहे. 

‘वस्तू’ या निर्जीव घटकावर लाडावून ठेवणे यासारख्या मानवी गुणाचा आरोप झाल्यामुळे येथे चेतनगुणोक्ती अलंकार साधला गेला आहे. त्यामुळे काव्यसौंदर्यात भर पडली आहे. 


रसग्रहण - 4 : वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी

आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क.

आशयसौंदर्य : 
‘भरून आलेले आकाश’ या काव्यसंग्रहातील वस्तू’ या कवी द. भा. धामणस्कर लिखित कवितेतून निर्जीव वस्तू यासुद्धा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक असतात व या वस्तूंची आपण प्रेमाने, स्नेहाने जपणूक केली पाहिजे असा विचार मांडला आहे. जरी त्यांना मानवी भावना नसल्या, तरीही त्यांना मानाने, लाडाने वागवावे, जपावे व त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता बाळगावी असे कवी म्हणतात.

काव्यसौंदर्य : 
एखादया वस्तूची कार्यक्षमता संपुष्टात आली, ती वापरण्यास अयोग्य झाली, की तिला घराबाहेर काढले जाते; पण वर्षानुवर्षे आपल्या घरात राहिलेल्या या वस्तूंना कृतज्ञतापूर्वक निरोप देण्याचा त्यांचा हक्क आपण जपला पाहिजे, असा संदेश प्रस्तुत काव्यपंक्तींतून व्यक्त होतो.

भाषिक वैशिष्ट्ये : 
ही कविता मुक्तछंदातील आहे. चिंतनशीलता, भावोत्कटता व प्रांजळपणा हे विशेष यातं जाणवतात. साध्या, सोप्या भाषेतून अनोखा आशय कवीने मांडला आहे. संवेदनशील मनाला येणारी व्याकुळता कवीने अतिशय संयमाने निवेदनात्मक स्वरूपात व्यक्त केली आहे.

वस्तूंवर (अचेतन गोष्ट) मानवी गुणांचा (सचेतन गोष्टीचा) आरोप केला असल्यामुळे येथे चेतनगुणोक्ती अलंकार तयार झाला आहे. त्यातून अनोखे भावसौंदर्य आकाराला आले आहे. 

रसग्रहण - 5 : वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी

कवितेचे नाव - वस्तू

कवी / कवयित्री - द . भा. धामणस्कर

रचनाप्रकार - मुक्तछंद

कवितेचा विषय - निर्जीव वस्तूंचा सजीवपणा

कवितेचा काव्यसंग्रह - भरून आले आकाश

कवितेतून व्यक्त होणारा स्थायीभाव - निर्जीव वस्तूंमधून खरे तर मानवी जीवनच व्यक्त होते.


रसग्रहण : वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी |  Vastu Kavita Rasgrahan Marathi Class 10th

वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.

वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना.
वस्तूंना वेगळी, स्वतंत्र खोली नको असते,
त्यांना फक्त ‘आपल्या मानलेल्या’ जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या.
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची,
हे हातांना लक्षात ठेवायला सांगा.

वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन.
त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह
नंतरच्या काळातही.

आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या
हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा
कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
शाबूत ठेवावा.
(भरून आलेले आकाश)
रसग्रहण : वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी | Vastu Kavita Rasgrahan Marathi Class 10th

   रसग्रहण : वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी |  Vastu Kavita Rasgrahan Marathi Class 10th       

विद्यार्थी मित्रांनो आपण वरती दिलेले वस्तू या कवितेचे रसग्रहण आपण पाहिलेच आहे या रसग्रहणामध्ये आपल्याला कवितेमध्ये कोणकोणते घटक आहे या सर्व गोष्टींचे आपल्याला अंदाज आलेलाच असेल. रसग्रहण लिहीत असताना आपल्याला सर्व गोष्टींचा अंदाज आलेला दिसतो आपल्याला जर अजून कोणत्याही प्रकारचे रसग्रहण हवे असतील तर आपण खाली दिलेल्या link  चा वापर करून मिळवू शकता.

वस्तू ही कविता खूप चांगले आणि अभ्यास करण्याला ते खूप सोपे अशी कविता या कवितेचे  आपल्याला रसग्रहण भेटायला आले तर आपण अगदी सोप्या पद्धतीने ते लिहू शकाल त्याच पद्धतीने वस्तू या कवितेवर कोणतेही प्रश्न आले ते देखील आपण घेऊ शकाल याची खात्री मी आपल्याला आत्ताच करून देतो कारण आपण आपल्या या वेबसाईटवर या लेखांमध्ये रसग्रहण पाहत आहोत.

त्याच पद्धतीने आपण रसग्रहणानंतर कवितेचे प्रश्न उत्तरे देखील आम्ही टाकलेले आहे त्यामुळे आपल्याला इतर अभ्यास करावासा वाटत असेल तो आपण आपल्या या वेबसाईटवरूनच करू शकाल एवढं बोलूनच आज मी या ठिकाणी वस्तू कविता इयत्ता दहावी रसग्रहण हा लेख संपवतो धन्यवाद.

 • दहावी मराठी वस्तू कवितेच्या ओळींचे रसग्रहण
 • दहावी मराठी वस्तू कविता रसग्रहण 
 • वस्तू कवितेचे रसग्रहण
 • वस्तू कवितेचे रसग्रहण कसे कराल?
 • वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी
 • Vastu Kavita Rasgrahan Marathi Class 10th
 • वस्तू  कवितेचे रसग्रहण

रसग्रहण दहावी मराठी

1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण

2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी

3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी

4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी

5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी

6) तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी

7) खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी
 

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post