रसग्रहण : तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी | Tu Zalas Muk Samajacha Nayak Rasgrahan Marathi Class 10th

रसग्रहण : तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी | Tu Zalas Muk Samajacha Nayak Rasgrahan Marathi Class 10th


प्रस्तुत कवितेचे कवी : ज. वि. पवार.        

प्रस्तुत कवितेचा विषय : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे माहात्म्य.         

प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :               
(i) काळोख ➡ अंधार 
(ii) खळगा ➡ खड्डा 
(iii) सूर्य ➡ रवी
(iv)नायक ➡ कप्तान 
(v)युद्ध ➡ संग्राम 
(vi) संगीन ➡ बंदूक
(vii) पृथ्वी ➡ अवनी 
(viii)थंड ➡ गार.

प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :       
  • अज्ञान, दारिद्र्य, जातीयता यांच्या चिखलात रुतून पडलेल्या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर काढले. त्याला पृथ्वीच्या पाठीवर सन्मान मिळवून दिला. 
  • प्रखर आत्मविश्वास दिला. या लढ्याच्या काळात दलितांनी बाबासाहेबांना पूर्ण साथ दिली. पण आता मात्र दलित समाजामध्ये तेज मावळले आहे. 
  • तो थंड झाला आहे. तेव्हा या दलित समाजाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व ताकदीनिशी उठावे आणि पुन्हा एकदा विषमतेविरुद्ध लढ्याला सिद्ध व्हावे, अशी इच्छा कवी व्यक्त करतात. हाच या कवितेचा संदेश आहे

प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :  
  • पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य, दारिद्र्याच्या चिखलात खितपत पडलेल्या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर काढले. त्याला आत्मविश्वास दिला. 
  • स्वतःच्या पायावर उभे केले. संपूर्ण दलित समाज त्या वेळी बाबासाहेबांच्या पाठीशी उभा राहिला. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला दलित चळवळीला तेज प्राप्त करून दिले. 
  • पण आता मात्र तोच दलित समाज थंड झाला आहे. त्याचे बाबासाहेबांनी मिळवून दिलेले तेज आता विरून गेले आहे.. याविषयीची खंत कवींनी या कवितेत व्यक्त केली आहे.

कवितेतील ओळींचा सरळ अर्थ      
आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.

उत्तर : चवदार तळ्याच्या संग्रामाला पन्नास वर्षे उलटून गेल्यावर कवी डॉ. आंबेडकरांना उद्देशून म्हणतात- सुख-समृद्धीचे प्रतीक असलेली सूर्यफुले अजून तुमचा ध्यास घेत आहेत. संघर्षाला प्रवृत्त करणारा बिगूल अजून तुमची वाट पाहत आहे. संघर्ष मावळलेला आहे, कारण चवदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे. ते पुन्हा पेट घेईल.

प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये : 
  • कविता मुक्तछंदात आहे. ‘तू परिस्थितीवर स्वार झालास’, ‘इतिहास घडवलास’, ‘रणशिंग फुंकलेस’, ‘गुलामांच्या पायातल्या बेड्या तोडल्यास’, ‘आकाश हादरलं’, ‘पृथ्वी डचमळली’, ‘चवदार तळ्याला आग लागली’ यांसारख्या लढवय्या शब्दप्रयोगांनी कविता ओजस्वी बनली आहे. 
  • पूर्वी दलित समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली खवळून उठला होता. तथाकथित उच्चवर्णीयांमध्ये खळबळ माजली होती. 
  • हे ‘चवदार तळ्याला आग लागली’ या शब्दांतून प्रखरपणे व्यक्त होते, आता दलित समाज शांत झाला आहे, ही बाब ‘चवदार तळ्याचे पाणी थंड झालं’ या शब्दांतून व्यक्त होते.
प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे : 
  • ही कविता अतिशय चांगली आहे. ओजस्वी शब्दांनी भरलेली आहे. कविता वाचता वाचता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महानता स्पष्ट होत जाते.
  •  त्यांनी दलित समाजाला दिलेल्या तेजाचा प्रत्यय येतो. शेवटच्या कडव्यात मात्र कलाटणी आहे. शेवटच्या कडव्याच्या आधीच्या कडव्यात प्रखर तेजाचा प्रत्यय येत राहतो. 
  • मात्र आता तोच दलित समाज शांत, थंड झाल्याची दुःखद जाणीव व्यक्त होते. ही दुःखद जाणीव शेवटच्या केवळ चार ओळींमध्ये व्यक्त झाली असतानाही आधीच्या जाज्वल्य भक्तीच्या पार्श्वभूमीवर मनाला व्याकूळ करते. हा दुःखभाव हाच या कवितेचा आत्मा आहे.

रसग्रहण - 2 : तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी

‘तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’

आशयसौंदर्य : 
प्रस्तुत कविता कवी ज. वि. पवार यांच्या नाकेबंदी’ या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे. त्यात महाड येथील चवदार तळयाच्या सत्याग्रहाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवाप्रीत्यर्थ ही कविता लिहिली गेली आहे. 
रूढ धार्मिक, सामाजिक बंधनांना झुगारून नव्या समाजाची पायाभरणी करणाऱ्या कर्तृत्ववान नायकाला प्रस्तुत  कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे.

काव्यसौंदर्य : 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द महाकाव्ये जिथे थिटी पढावीत, लीन व्हावीत इतके तेजस्वी, ओजस्वी होते. चवदार तळयाच्या सत्याग्रहासमयी त्यांनी जनसमुदायाला जे आवाहन केले होते त्यातील शब्दसामर्थ्य अजोड होते.

त्यांनी उभारलेला मानवतेच्या हक्कांसाठीचा चवदार तळयाचा हा लढा असा होता, की साध्यासुध्या काठ्यांनाही जिथे संगिनीचे सामर्थ्य प्राप्त व्हावे; सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही आत्मभान येऊन स्वतःतील असामान्यत्वाची प्रचीती यावी, बळ यावे असा संघर्ष त्यानी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध उभारला होता.

भाषिक वैशिष्ट्ये : 
प्रस्तुत ओळीतून या घटनेचा इतिहास मांडताना. कवी रसिक वाचकाला वीररसाचा प्रत्यय आणून देतो. या समाजप्रबोधनपर कवितेची रचना मुक्तछंदातील आहे. कवितेचा आशय छंदोबद्ध रचनेत बंदिस्त न करता त्याच्या गरजेनुसार मुक्त ठेवल्याने कवितेतील कवीचे मनोगत पेट रसिक वाचकापर्यंत पोहोचते कवीने संवादपर शैलीत भाष्य केल्यामुळे जगू काही कवी डॉ. आंबेडकरांशी बोलत असल्याचा भास निर्माण होतो. 

या संवादशैलीमुळे कवितेच्या सौंदर्यात भर घातली गेली आहे.  काठ्या व संगिनी या प्रतीकांचा मोठ्या खुबीने वापर करून कवीने कवितेला एक आगळे परिमाण दिले आहे. अशा आशयघन शब्दरचनेतून बाबासाहेबांच्या संघर्षाची तीव्रता व महानता वाचकांपर्यंत पोहोचते.

रसग्रहण - 3 : तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी

‘तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.’ (सप्टें. ‘२१)

आशयसौंदर्य : 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित व पीडित जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा उभारला. मूकसमाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना ज. वि. पवार यांनी ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ या कवितेमध्ये त्यांच्या महत्कार्याचा गौरव करताना उपरोक्त ओळी लिहिल्या आहेत.


काव्यसौंदर्य : 
चवदार तळ्याच्या संग्रामाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाची थोरवी गाताना कवी म्हणतात- प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तुम्ही या वर्णव्यवस्थेने ग्रासलेल्या समाजाला जागृत केलेत. त्यांना नवविचारांची प्रेरणा देऊन नवीन इतिहास घडवला. अन्याय सहन करणाऱ्या जनतेचे तुम्ही महानायक झालात. बहिष्कृत असलेल्या पीडित समाजात नवचैतन्य निर्माण केलेत. त्यांच्यातील आत्मविश्वास जागवलात.


भाषिक वैशिष्ट्ये : 
मुक्तशैलीमध्ये लिहिलेली ही कविता त्यातील समर्पक शब्दांमुळे अर्थवाहक झाली आहे. ‘मूक समाज’, ‘बहिष्कृत भारत’ या संकल्पनांचा यथोचित वापर केल्यामुळे कविता परिणामकारक झाली आहे. सुयोग्य व ठाशीव शब्दकळा हे या कवितेचे बलस्थान आहे. थेट शब्दकळेमुळे ओज हा गुण दिसून येतो. आशयाला समर्पक अभिव्यक्तीची जोड मिळाल्यामुळे ओळी रसिकांच्या काळजाला भिडतात.


रसग्रहण - 4 : तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी

‘आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय. 

आशयसौंदर्य : 
दलितांवरील अन्यायाविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुकारलेला लढा हा ‘चवदार तळ्याचा संग्राम’ म्हणून प्रसिद्ध आहे. या लढ्याला पन्नास वर्षे उलटून गेल्यावर ज. वि. पवार यांनी ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ या कवितेमध्ये या महामानवाला अभिवादन केले आहे. उपरोक्त ओळींत आताच्या परिस्थितीचे विदारक वर्णन केले आहे.

काव्यसौंदर्य : 
पन्नास वर्षे झाल्यानंतर चवदार तळ्याच्या संग्रामाचा ऊहापोह करताना आणि लढा थंड झाल्याची खंत व्यक्त करताना कवी म्हणतात – सुख-समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती, ती सूर्यफुले अजून तुझा ध्यास घेतायत. परिस्थितीत बदल न झाल्यामुळे संघर्षाला प्रवृत्त करणारा बिगूल तुझी वाट बघत आहे. चवदार तळ्याचे पाणी आता थंड पडले आहे. संघर्ष मावळला असला, तरी पुन्हा पेटण्यासाठी पाणी आसुसलेले आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : 
 ही कविता मुक्तछंदात (मुक्तशैली) आहे. त्यामुळे भावनांचे व विचारांचे थेट प्रसारण योग्य शब्दांत झाले आहे. सूर्यफुले व बिगूल या प्रतीकांमुळे आशयघनता वाढली आहे. ‘चवदार तळ्याचं पाणी थंड पडणं’ या वाक्यखंडातून आताच्या विदारक परिस्थितीवर मार्मिकपणे बोट ठेवले आहे.


रसग्रहण - 5 : तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी

कवितेचे नाव -  तू झालास मूक समाजाचा नायक  

कवी / कवयित्री -  ज. वि. पवार 

रचनाप्रकारमुक्तछंद    

कवितेचा विषयडॉ. बाबासाहेब अबिडकर यांचे महात्म्य   

कवितेचा काव्यसंग्रहनाकेबंदी   

कवितेतून व्यक्त होणारा स्थायीभाव - सर्वहारलेल्या समाजात अशक्यप्राय वाटणारी जागृती करून त्याला स्वबळावर उभे केल्याबद्दल कृतनता गाव

रसग्रहण : तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी | Tu Zalas Muk Samajacha Nayak Rasgrahan Marathi Class 10th
    
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.

तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.

तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय


रसग्रहण : तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी | Tu Zalas Muk Samajacha Nayak Rasgrahan Marathi Class 10th

रसग्रहण : तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी | Tu Zalas Muk Samajacha Nayak Rasgrahan Marathi Class 10th
  • दहावी मराठी तू झालास मूक समाजाचा नायक कवितेच्या ओळींचे रसग्रहण
  • दहावी मराठी तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण 
  • तू झालास मूक समाजाचा नायक कवितेचे रसग्रहण
  • तू झालास मूक समाजाचा नायक  कवितेचे रसग्रहण कसे कराल?
  • तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी
  • Tu Zalas Muk Samajacha Nayak Rasgrahan Marathi Class 10th
  • तू झालास मूक समाजाचा नायक कवितेचे रसग्रहण

रसग्रहण दहावी मराठी

1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण

2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी

3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी

4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी

5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी

6) तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी

7) खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी
 

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post