रसग्रहण : खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी | Khod Ankhi Thodese Rasgrahan Marathi Class 10th

रसग्रहण : खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी | Khod Ankhi Thodese Rasgrahan Marathi Class 10th

1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण
2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी
3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी
4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी
5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी
6) तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी
7) खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी

 

प्रस्तुत कवितेचे कवी : आसावरी काकडे. 

प्रस्तुत कवितेचा विषय स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते.          

प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :               
(i) पाणी ➡ जळ 
(ii) धीर ➡ धैर्य  
(iii) सारी ➡ सर्व
(vi) तळे ➡ तलाव 
(iv) गाणे ➡ गीत 
(vii) झरा ➡ निर्झर
(viii) उमेद ➡ जिद्द 
(ix) बळ ➡ शक्ती
(v) पान ➡ पर्ण

प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :       
आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाने व यशाने भरलेला नसतो. खरे तर सदोदित अडचणीच असतात. या अडचणींना घाबरून आपण खचून जाता कामा नये. 
थोड्याशा प्रयत्नानेही यश मिळेल, असा सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. जग अगदीच वाईट नाही; किंवा सगळीकडे वाईटपणा वा खोटेपणाच भरलेला आहे, असे मानू नये. प्रयत्न करीत राहिले पाहिजे, असा संदेश या कवितेतून मिळतो.


प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :  
जीवनात खूप कष्ट उपसावे लागतात, तरीही अनेकदा यश हुलकावणी देते. कधीही प्रयत्न केल्याबरोबर वा कष्ट घेतल्याबरोबर लागलीच यश मिळत नसते. माणसे त्यामुळे नाउमेद होतात. असे माणसाने कधीच नाउमेद होऊ नये. सतत प्रयत्न करीत राहावे. आपल्याला यश मिळेलच अशी आशा बाळगावी, असा विचार या कवितेतून व्यक्त केला आहे.


कवितेतील ओळींचा सरळ अर्थ      
झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे !

उत्तर : खोलवर आणखी थोडे खोद म्हणजे तुला निर्मळ झरा नक्कीच लाभेल. उमेदीने जगण्यासाठी मनाची शक्ती हवी. समृद्ध जीवन जगण्यासाठी आत्मबळ गरजेचे आहे.

प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये : 
  • प्रत्येक चरणात आठ अक्षरे, दुसऱ्या व चौथ्या चरणांत यमक आणि प्रत्येक कडव्यात चार चरण अशी या ओवीची रचना असते. कवितेला आपोआपच गेयता लाभली आहे. नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यांमुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे.
  •  ‘सारी खोटी नसतात नाणी या शब्दांतून आशावाद व्यक्त होतो. संपूर्ण कविताच आशावाद भारलेली आहे. ‘मरणाचे कष्ट घ्या’, ‘प्राण गेले तरी चालेल’ अशा शब्दांतून प्रयत्न करायला सांगितले तर दडपण येते.
  •  ‘जरासा प्रयत्न कर, थोडेसे कष्ट घे’, असे सांगितले की माणूस कष्ट करायला सिद्ध होतो. या कवितेतील प्रत्येक कडव्यातील शेवटच्या दोन ओळी मनात अशी उमेद निर्माण करतात.
प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे : 
  • ही कविता मला खूप खूप आवडली आहे. ही कविता वाचता वाचता मनातील निराशेचे मळभ दूर होत. प्रयत्न करीत राहण्यातच यशाचा मार्ग आहे, हे मनोमन पटते. 
  • थोड्याशा प्रयत्नाने, थोड्याशा बळानेही उमेद निर्माण होते. या शब्दांनी मनाला उभारी येते. ही कविता माणसाला चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देते.
रसग्रहण - 2 : खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी

‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’

आशयसौंदर्य : 
‘खोद आणखी थोडेसे’ या कवितेमधून कवयित्रींनी संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवनध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे, हे समजावून सांगताना वरील ओळीमध्ये ‘प्रयत्नांती परमेश्वर’ या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते.

काव्यसौंदर्य : 
 कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल खोल मातीखाली निर्मळ झरा असतो. तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिंमत न हारता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा, आनंदाचा अक्षय झरा असतोच. म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये. अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते.

भाषिक वैशिष्ट्ये : 
साध्या, सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमकप्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे. नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यांमुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. ‘झरा’ या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णतः ठसवला आहे.

रसग्रहण - 3 : खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी

धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी.

आशयसौंदर्य : 

कवयित्री आसावरी काकडे यांच्या ‘खोद आणखी थोडेसे’ या कवितेतून जिद्द, चिकाटी व उमेद बाळगून कष्टाची कास धरली, तर यश प्राप्त होतेच हा अतिशय सकारात्मक संदेश या कवितेतून  प्राप्त होतो.

काव्यसौंदर्य : 
अपयशाने हार न मानता, आशावादी राहून अधिकाधिक प्रयत्न केल्यास आपले ध्येय साध्य करता येते. धीर न सोडता आपण उमेदीने पुढे गेले पाहिजे कारण प्रत्येक वेळेला अपयशच हाती येईल असे नसते, तसेच प्रत्येक वेळेस आपण फसवलेच जाऊ असे नसते. असे कवयित्री यातून सूचित करत आहेत. प्रयत्न, जिद्द, आशावाद ही मूल्ये अधोरेखित करण्यासाठी कवयित्रीने येथे नाण्याचा संदर्भ वापरला आहे.


भाषिक वैशिष्ट्ये : 
अल्पाक्षरत्व हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. कवयित्रीने येथे कमीत कमी शब्दांतून अर्थगर्भ आशय व्यक्त केला आहे. अतिशय सूचक व समर्पक उदाहरणाद्वारे कवयित्रीने आशावादी विचार मांडला आहे. यमक अलंकार व गेयेतेने सजलेल्या हया कवितेतून आशावादी, भावनेची रुजवणूक होते.



रसग्रहण - 4 : खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी

कवितेचे नाव खोद आणखी थोडेसे   

कवी / कवयित्रीआसावरी काकडे  

रचनाप्रकारअष्टाक्षरी छंद    

कवितेचा विषयप्रयत्न व सकारात्मकता याचे महत्व   

कवितेचा काव्यसंग्रह -  लाहो  

कवितेतून व्यक्त होणारा स्थायीभाव - चिकाटी, जिद, आशावाद यामुळे मनाला उमेद मिळते

रसग्रहण : खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी | Khod Ankhi Thodese Rasgrahan Marathi Class 10th
    
खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.

झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!


रसग्रहण : खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी | Khod Ankhi Thodese Rasgrahan Marathi Class 10th

रसग्रहण : खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी | Khod Ankhi Thodese Rasgrahan Marathi Class 10th
  • दहावी मराठी खोद आणखी थोडेसे  कवितेच्या ओळींचे रसग्रहण
  • दहावी मराठी खोद आणखी थोडेसे  कविता रसग्रहण 
  • खोद आणखी थोडेसे  कवितेचे रसग्रहण
  • खोद आणखी थोडेसे   कवितेचे रसग्रहण कसे कराल?
  • खोद आणखी थोडेसे  कविता रसग्रहण दहावी मराठी
  • Khod Ankhi Thodese Rasgrahan Marathi Class 10th
  • खोद आणखी थोडेसे  कवितेचे रसग्रहण

रसग्रहण दहावी मराठी

1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण

2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी

3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी

4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी

5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी

6) तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी

7) खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी
 

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post