रसग्रहण : भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी | Bharatvakya Rasgrahan Marathi Class 10th
प्रस्तुत कवितेचे कवी : मोरोपंत
प्रस्तुत कवितेचा विषय : सज्जन माणसाचे महत्त्व
प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :
(i) संगत ➡ सोबत
(ii) कलंक ➡ डाग
(iii) मती ➡ बुद्धी
(vi) मुख ➡ तोंड.
(iv) वियोग ➡ विरह
(v) चित्त ➡ मन
प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :
नेहमी संतसज्जनांच्या संगतीत राहावे. त्यांच्या सहवासामुळे चांगले वागण्याचे दर्शन घडते. त्यांच्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या विचारांसारखे विचार आपण अंगीकारू लागतो. तसेच नेहमी देवाचे नामस्मरण करीत राहावे. म्हणजे वाईट कल्पना, वाईट विचार आपल्या मनाला शिवत नाहीत.
प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :
माणसाने सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. दुरभिमान, गर्विष्ठपणा, वाईट विचार आपल्या मनातून नष्ट झाले पाहिजेत. चांगल्या विचारांचे वळण लागावे अशी मोरोपंत इच्छा व्यक्त करतात. चांगले वागणे म्हणजे हे समजून घेण्यासाठी सदोदित सज्जनांच्या संगतीत राहावे. लोकांनी सज्जनांचे वागणे, त्यांचे बोलणे, त्यांचे विचार अंगीकारावेत, काय, हा विचार या कवितेत मांडला आहे.
कवितेतील ओळींचा सरळ अर्थ :
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
उत्तर : चारित्र्यसंपन्न होण्यासाठी नेहमी सज्जन माणसांशी मैत्री करावी. सुविचार, सुवचने यांचे श्रवण करावे. बुद्धीमधील वाईट विचार नष्ट करावेत. कामभावनेची नावड निर्माण होवो.
प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :
- ही कविता आर्या या वृत्तात लिहिलेली आहे. या आर्याची चालही जनमानसात खूप लोकप्रिय झालेली आहे. कर्णमधुर चालीमुळे ही कविता गुणगुणत राहावीशी वाटते.
- या कवितेत ‘सुजनवाक्य’, ‘सदंघ्रिकमळी’, ‘कुजनविघ्नबाधा’, ‘सदुक्तमार्गी’, ‘स्वतत्त्व’, ‘कुशलधामनामावली’ यांसारखे संस्कृतप्रचुर शब्द आहेत.
- अशा शब्दांनी भारदस्तपणा येतो. त्याचबरोबर ‘घडो’, ‘पडो’, ‘जडो’, ‘मुरडिता’, ‘इटाने’, ‘ढळो’ यांसारखे अस्सल मराठी शब्दही या कवितेत आढळतात.
- त्यामुळे आशय सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते. भाषा आवाहक बनते. यमकप्रधानता असल्यामुळे सुंदर लय व खटकेबाज नादमयता निर्माण झाली आहे.
प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :
- ही कविता मला आवडते. कारण लहानपणापासून मी ती ऐकत आलो आहे. लहानपणी ती पाठही केली होती. आता मोठा झाल्यावर कवितेचा अर्थ कळला आहे.
- कवितेत चांगले वागण्याचा सल्ला दिला आहे. पण चांगले म्हणजे काय, हे सोप्या पद्धतीने सांगितले आहे. सज्जन माणूस जसे वागतो, बोलतो, विचार करतो, तसे म्हणजे चांगले, इतकी सोपी कल्पना वापरून आपले म्हणणे सांगितले आहे.
- पण या कवितेतील संस्कृतप्रचुर शब्दांमुळे अर्थ कळण्यात अडचणी येतात. ही एक कवितेविषयी नावड निर्माण करणारी बाब आहे.
रसग्रहण - 2 : भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी |
‘मुखीं हरि ! वसो तुझी कुशलधामनामावली,। 'क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली।
आशयसौंदर्य :
प्रस्तुत ओळ कवी मोरोपंतांच्या ‘केकावली’ संग्रहातील व ‘भरतवाक्य’ या रचनेतील आहे. या केकावल्यातून कवी मोरोपंत सद्गृहस्थ किंवा सज्जन माणसांच्या संगतीचे त्यांच्या विचारांच्या सान्निध्याचे महत्त्व सांगू पाहत आहेत. कोणत्याही लोभा-मोहाला बळी पडू नये, वृथा अभिमान सोडून भक्तिमार्ग आपलासा करावा आणि भगवद्भक्तीत मन रमवावे, असा आशय या केकावलीतून व्यक्त होतो.
काव्यसौंदर्य :
मोरोपंतांच्या प्रस्तुत केकावलीची भाषा संस्कृतप्रचुर, अलंकारयुक्त मराठी शब्दांनी सजलेली आहे. पंडिती काव्याचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य तिच्यात आढळते. सकलकामना, कुशलधामनामावली यांसारखे संस्कृतप्रचुर शब्द कवीने कवितेत ठिकठिकाणी पेरले आहेत. अशा शब्दांतून यमक अलंकार साधल्यामुळे या कवितेला एक गेयता प्राप्त झाली आहे. यात आर्यावृत्त वापरले गेले आहे. श्लोकांसारखी ओघवती, रसपूर्ण, प्रासादयुक्त भाषा वापरल्यामुळे हे काव्य श्रवणीय वाटते.
भाषिक वैशिष्ट्ये :
‘केका’ म्हणजे मोराचा टाहो आणि आवली म्हणजे पंक्ती. मोरोपंतांनी स्वतःस ‘मोर’ कल्पून, ईश्वराला मारलेल्या हाकांना, ईश्वराच्या केलेल्या आळवणीला ‘केकावली’ असे म्हटले गेले आहे. ज्याप्रमाणे नाटकात शेवटी भरतवाक्य म्हटले जाते त्याप्रमाणे केकावलीच्या उपसंहारातील शेवटच्या पयरचनेला ‘भरतवाक्य’ म्हणतात. हेही या रचनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
|
‘सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो.’
आशयसौंदर्य :
‘केकावली’ या काव्यग्रंथाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही ‘भरतवाक्य’ काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. तनामनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगीकारावे, याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे.
काव्यसौंदर्य :
‘सुसंगती’ म्हणजे चांगल्या, सज्जन व्यक्तीची मैत्री होय. गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगतीत सदैव राहावे, म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते, असा आशय उपरोक्त ओळींमध्ये व्यक्त झाला आहे. ‘सुजनवाक्य’ म्हणजे सुविचारांची धारणा जर केली, तर मन निर्मळ व प्रेमळ होते. असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे.
भाषिक वैशिष्ट्ये :
प्रस्तुत ओळींमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी, म्हणून दोन वर्तन-नियम सांगितले आहेत. साधकाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. प्रत्येक चरणात ११+१३ मात्रेची आवर्तने असणारी हे ‘केकावली’ नावाचे मात्रावृत्त आहे. यातील भाषा साधी, सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला थेट भिडणारी आहे. ‘घडो-जडो’ या यमकप्रधान क्रियापदांमुळे कवितेला सुंदर लय व नाद आला आहे.
रसग्रहण - 3 : भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी |
कवितेचे नाव - भरतवाक्य
कवी / कवयित्री - मोरोपंत
रचनाप्रकार - आर्या
कवितेचा विषय - सज्जन माणसाचे महत्व
कवितेचा काव्यसंग्रह - केकावलि
कवितेतून व्यक्त होणारा स्थायीभाव - सज्जन माणसाच्या सहवासात राहणे सुखकारक असते.
रसग्रहण :भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी | Bharatvakya Rasgrahan Marathi Class 10th |
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
सदंघ्रिकमळीं दडो; मुरडितां हटानें अडो;
वियोग घडतां रडो; मन भवच्चरित्रीं जडो ।।
न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनीं चळो; मति सदुक्तमार्गीं वळो; ।
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो ।।
मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली; ।
कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रगट हे निजाश्रितजनां सदा सांवरी ।।
भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी | Bharatvakya Rasgrahan Marathi Class 10th |
- दहावी मराठी भरतवाक्य कवितेच्या ओळींचे रसग्रहण
- दहावी मराठी भरतवाक्य कविता रसग्रहण
- भरतवाक्य कवितेचे रसग्रहण
- भरतवाक्य कवितेचे रसग्रहण कसे कराल?
- भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी
- Bharatvakya Rasgrahan Marathi Class 10th
- भरतवाक्य कवितेचे रसग्रहण
रसग्रहण दहावी मराठी
1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण
2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी
3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी
4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी
5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी
Tags:
रसग्रहण इयत्ता दहावी