खोद आणखी थोडेसे कविता 10वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
रसग्रहण दहावी मराठी
1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण
2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी
3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी
4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी
5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी
खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.
घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.
मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.
झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!
आशयसौंदर्य : ' खोद आणखी थोडेसे ' या कवितेमध्ये कवयित्रींनी संयम , जिद्द , आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवनध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे . माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे , हे समजावून सांगताना वरील ओळीमध्ये ' प्रयत्नांती परमेश्वर ' या उक्तीचा प्रत्यय दिला आहे . अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते .
काव्यसौंदर्य : कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये . खोल खोल मातीखाली निर्मळ झरा असतो . तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते . हतबल न होता , हिंमत न हारता प्रयत्नरत असावे . दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा , आनंदाचा अक्षय झरा असतोच म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये . अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते .
भाषिक वैशिष्ट्ये : साध्या , सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमकप्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे . नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यामुळे कवितेतील सौंदर्य प्राप्त झाले आहे . " झरा " या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णत : ठसवला आहे .
खोद आणखी थोडेसे कविता 10वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
प्रसिद्ध कवयित्री. त्यांचे ‘अनु मनु शिरू’, ‘ऋतुचक्र’, ‘टिक टॉक ट्रिंग’, ‘भिंगोऱ्या भिंग’ हे बालकविता संग्रह; ‘आकाश’, ‘आरसा’, ‘उत्तरार्ध’, ‘मी एक दर्शन बिंदू’, ‘लाहो’, ‘शपथ सार्थसहजीवनाची’, ‘स्त्री असण्याचा अर्थ’ हे कवितासंग्रह; ‘तरीही काहीबाकी राहील’, ‘बोल माधवी’, ‘लम्हा लम्हा’ हे अनुवादित कवितासंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे.
१९९० साली विशाखा पुरस्कार व १९९२ साली राज्य पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने कार्यरत रहावे लागते. चांगुलपणावर विश्वास ठेवणे आवश्यक असते. वास्तव आनंदाने स्वीकारावे आणि कोणत्याही भ्रमात राहू नये, उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरावी, असा संदेश कवितेतून व्यक्त होतो.
आपण जिथे थांबतो, तिथून चिकाटीने आणखी थोडेसेच पुढे गेले तर यश निश्चितच मिळते. ‘आणखी थोडेसे’ हा शब्द चिकाटी, जिद्द, आशावाद सूचित करणारा आहे.
खोद आणखी थोडेसे कविता 10वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
Tags:
मराठी कविता