आकाशी झेप घे कविता 11वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा

तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा

कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा

कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा

घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा

जगदीश खेबुडकर (१९३२-२०११) :
प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार. पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यांसाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. साधे, सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट् होत. मह ये ाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना अकरा वेळा सन्मानित करण्यात आले आहे. 

त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. 
कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवावा.

 कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या, असा संदेश देतात.

आकाशी झेप घे कविता 11वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]अनुक्रमणिका  INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
02: बोलतो मराठी… Click Now
03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
05: वसंतहृदय चैत्र Click Now
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
07: वस्तू (कविता) Click Now
08: गवताचे पाते Click Now
09: वाट पाहताना Click Now
10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
11: आप्पांचे पत्र Click Now
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
13: गोष्ट अरुणिमाची Click Now
14: भरतवाक्य (कविता) Click Now
15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
16: काळे केस Click Now
17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
20: सोनाली Click Now
21: निर्णय Click Now
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

 10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post