मनक्या पेरेन लागा
एक बी जमीम गडचं
जमीती ओरो नातो जुडचं
धुड वोनं लगाडछं जीव
आसो कांयी घडचं
पाणी-पावस
उंदाळो-वरसाळो
आंधी-आंघोळो
दुष्काळेती लडचं
एक दन वोनं झाड करनच छोडचं
चालो
आपणबी मनक्या पेरेन लाग जावा.
माणसं पेरायला लागू
एक बी मातीत पडतं
मातीशी त्याचं
घट्ट घट्ट नातं जडतं
माती त्याला लावते जीव
अशी काय घडते
ऊन-वारा
पाऊस-पाणी
वारं-वावधान
दुष्काळाशी लढते
एक दिवस त्याला
झाड करूनच सोडते
चला आपणही
माणसं पेरायला लागू.
- आधुनिक काळातील कवी. ‘सेन सायी वेस’, ही बंजारा भाषेतील प्रार्थना व ‘पिढी घडायेरी वाते’ हा बंजारा बोलीभाषेतील
- कवितासंग्रह प्रकाशित. त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा ‘राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा
- पुरस्कार २०१५’ मिळाला आहे. सामाजिक कार्यात सहभागी होऊन मानवतावादी दृष्टीने भटके, विमुक्त, वंचित, दलित यांच्या प्रश्नांवर त्यांनी लेखन केले आहे.
- त्यांच्या बंजारा भाषेतील ‘मनक्या पेरेन लागा’ या कवितेचे विनायक पवार यांनी मराठी भाषेत रूपांतर केले आहे.
- कवीला व्यक्त होताना भाषेचा अडसर नसतो. बी मातीत पडून तिचं झाड होईपर्यंतचा प्रवास सांगताना, ‘माणसं पेरायला हवीत’, हा विचार कवितेतून व्यक्त झाला आहे.
- कवी अभिव्यक्त होत असताना त्याच्या कवीमनावर झालेले भाषिक संस्कार व त्याची उपजत प्रतिभा यांचा कस लागत असतो.
- विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेतून अभिव्यक्त होऊन सहज व सोप्या पद्धतीने एखाद्या विषयाची
- काव्यरूपात गुंफण करावी, या उद्देशानेच या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.
मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) इ.10 वी
Tags:
मराठी कविता