जय जय हे भारत देशा -
रसग्रहण दहावी मराठी
1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण
2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी
3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी
4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी
5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी
जय जय हे भारत देशा
तपोवनातुन तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी
मातीमधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी
जय युगधैर्याच्या देशा
जय नवसूर्याच्या देशा
तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा
बळापुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना
अन्यायाला भरे कापरे बघुनि शूर अभिमाना
जय आत्मशक्तिच्या देशा
तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा
श्रमांतुनी पिकलेली शेते पहा डोलती धुंद
घामाच्या थेंबांतुन सांडे हृदयातिल आनंद
जय हरित क्रांतिच्या देशा
जय विश्वशांतिच्या देशा
तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा
पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली
अंधाराला जाळित उठल्या झळकत लाख मशाली
जय लोकशक्तिच्या देशा
जय दलितमुक्तिच्या देशा
तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा
- प्रथितयश कवी. वृत्तबद्ध रचना, शब्दप्रभुत्व, गेयता ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘छोरी’,
- ‘उत्सव’, ‘विदूषक’, ‘सलाम’, ‘गझल’, ‘भटके पक्षी’, ‘बोलगाणी’ हे कवितासंग्रह; संत मीराबाई, संत कबीर आणि संत तुलसीदास
- काव्याचे भावानुवाद; ‘बोरकरांची कविता’ व ‘संहिता’ ही महत्त्वपूर्ण संपादने; ‘निंबोणीच्या झाडामागे’ हा ललित निबंधसंग्रह;
- ‘भोलानाथ’, ‘बबलगम’, ‘चांदोमामा’ हे बालगीतसंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. ‘वात्रटिका’ हा संग्रह त्यांच्या वाङ्मयीन
- व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू दाखवणारा आहे.
- प्रस्तुत गीतात देशप्रेम आणि एकात्मता यांचा आविष्कार झालेला दिसतो. जय जय हे भारत देशा
जय जय हे भारत देशा, इयत्ता 10वी Maharashtra state board, std - 10th, lesson no. 1, marathi medium
Tags:
मराठी कविता
![जय जय हे भारत देशा कविता 10वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] जय जय हे भारत देशा कविता 10वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgtPAQFc0GMd5apSdBsWwGCz5OuzzKsQrJBxNjS5YH4H3QGbAGr66DppzZn9PQa3xEajkm6eWcwYQyei3p9s0z7B2e9mowd6jvTVgdtX5Ut4sBvtA6okoIDilC96-NzO37eI7BhwjaXvIc/s16000-rw/%25E0%25A4%259C%25E0%25A4%25AF+%25E0%25A4%259C%25E0%25A4%25AF+%25E0%25A4%25B9%25E0%25A5%2587+%25E0%25A4%25AD%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25A4+%25E0%25A4%25A6%25E0%25A5%2587%25E0%25A4%25B6%25E0%25A4%25BE+10.jpg)