माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ।।१।।
जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचे रंग थोडे ।
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।२।।
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।३।।
सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा ।
घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ।।४।।
नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी ।
ते म्हणती उघडली खाणी । रूपाची हे ।। ५।।
जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें ।
बोलु भुजाही आविष्करें । आलिंगावया ।।६।।
ऐशीं इंद्रियें आपुलालिया भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी ।
जैसा एकला जग चेववी । सहस्रकरु ।।७।।
तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण ।
पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ।।८।।
हें असोतु या बोलांचीं ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरिलीं ।
ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ।।९।।
आतां आत्मप्रभा नीच नवी । तेचि करूनि ठाणदिवी ।
जो इंद्रियांतें चोरूनि जेवी । तयासीचि फावे ।।१०।।
येथ श्रवणाचेनि पांगें- । वीण श्रोतयां होआवें लागे ।
हे मनाचेनि निजांगें । भोगिजे गा ।।११।।
(श्रीज्ञानेश्वरी, ६ वा अध्याय, ओवी क्र.१४ ते २४,
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रत)
Also Read :
ऐसी अक्षरे रसिकें ' या कवितेचे रसग्रहण करा .
उत्तर : ' ऐसी अक्षरें रसिकें ' या ओव्यांमधून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे गौरवगीत गायिले आहे . मराठी भाषेचे शब्दसामर्थ्य , कोवळिकता , रसमयता , सौंदर्यपूर्ण व भावपूर्ण अभिव्यक्ती मनोहारी दृष्टान्तातून साकार करणे , ही या रचनेची मध्यवर्ती कल्पना आहे . मराठी शब्दांचे व्यापकपण सिद्ध करणे , हा या ओवीरचनेचा स्थायिभाव आहे . अमृताहून गोड असलेली मराठी भाषा सर्व इंद्रियांचा आत्मीय , आस्वादक विषय ठरली आहे . ही सौंदर्याची खाण पाहताना डोळे दिपतात . सूर्याने सर्व जग उजळावे , तशी मराठी भाषेची आत्मप्रभा अभिजात आहे . मराठी भाषा सामान्य जनांपासून जाणकार रसज्ञांपर्यंत मनाला थेट भावते .
निष्काम कर्मयोग्यांसाठी कैवल्यरसाने भरलेल्या ताटाची मेजवानी मी अर्पण केली आहे , ती नि : संग मनाने आस्वादा , असा संदेश संत ज्ञानेश्वर रसिकांना देतात . संस्कृतातील भगवद्गीतेचा मराठी भाषेत भाष्यानुवाद करताना ' ज्ञानेश्वरी'च्या सहाव्या अध्यायामध्ये प्राचीन ओवीछंदात मराठी भाषेचा सार्थ अभिमान व्यक्त केला आहे . प्रस्तुत ओव्यांमध्ये मराठी भाषेच्या शब्दसामर्थ्यावरचा दृढ विश्वास व्यक्त करताना येथे ज्ञानेश्वरांनी कमालीची भावोत्कटता साकारली आहे . प्रसाद व माधुर्य हे काव्यगुण यांमध्ये प्रकर्षाने प्रकट झाले आहेत . मराठी भाषेची ही आल्हाददायक रचना आस्वादताना आपला ऊर मराठीच्या नितांत प्रेमाने भारावून जातो , इतकी सोज्ज्वळ व रसमय अभिव्यक्ती संत ज्ञानेश्वरमाउलींनी साकारली आहे .
मराठी भाषेचे हे एक नितांत जपावे असे ' देशिकार लेणे ' आहे .
श्रेष्ठ संत. प्रज्ञावंत तत्त्वज्ञ. अलौकिक प्रतिभावंत कवी. सर्व जगाला सन्मार्गाचा संदेश देणारे संतकवी. तत्त्वज्ञान,आत्मविचार, साक्षात्कार, काव्यसौंदर्य, कल्पनावैभव आणि रसाळपणा या दृष्टीने त्यांनी लिहिलेला अजोड ग्रंथ म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’ होय. ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’, ‘अभंगगाथा’ हे त्यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत.
ऐसीं अक्षरें रसिकें कविता 11वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
तत्त्वज्ञान, भक्ती आणि काव्य यांचा अपूर्व संगम संत ज्ञानेश्वरांच्या रचनांमध्ये आढळतो. संत ज्ञानेश्वरांच्या लेखनातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विलोभनीय दर्शन घडते. विनयशील वृत्ती, अतुलनीय गुरुभक्ती, असीम करुणा, मातृहृदयी वात्सल्य, अजोड रसिकता असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दिसून येतात.
प्रस्तुत ओव्यांतून मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त झाला आहे. अमृतापेक्षाही गोड असलेल्या मराठी भाषेविषयीची गौरवाची भावना आणि आपल्या शब्दसामर्थ्यावर असणारा सार्थ विश्वास व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘माझ्या मराठीतून अमृताशीही पैज जिंकणारी अशी रसाळ अक्षरे मी निर्माण करीन.’’ रसाळ बोलीत निर्माण केलेल्या या ओव्या म्हणजे मोठी मेजवानी आहे.
या ओव्यांमध्ये रसाळ बोलांना दिलेली सूर्याची उपमाही विशेष परिणामकारक आहे.
अनुक्रमणिका / INDIEX
पाठ कविता | स्वाध्याय LINK |
---|---|
01: जय जय हे भारत देशा (गीत) | Click Now |
02: बोलतो मराठी… | Click Now |
03: आजी : कुटुंबाचं आगळ | Click Now |
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) | Click Now |
05: वसंतहृदय चैत्र | Click Now |
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) | Click Now |
07: वस्तू (कविता) | Click Now |
08: गवताचे पाते | Click Now |
09: वाट पाहताना | Click Now |
10: आश्वासक चित्र (कविता) | Click Now |
11: आप्पांचे पत्र | Click Now |
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) | Click Now |
13: गोष्ट अरुणिमाची | Click Now |
14: भरतवाक्य (कविता) | Click Now |
15: कर्ते सुधारक कर्वे | Click Now |
16: काळे केस | Click Now |
17: खोद आणखी थोडेसे (कविता) | Click Now |
18: वीरांगना (स्थूलवाचन) | Click Now |
19: आकाशी झेप घे रे (कविता) | Click Now |
20: सोनाली | Click Now |
21: निर्णय | Click Now |
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) | Click Now |
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी | Click Now |
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) | Click Now |
10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download
Tags:
मराठी कविता