वस्तू कविता 10वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
रसग्रहण दहावी मराठी
1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण
2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी
3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी
4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी
5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी
वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.
वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना.
वस्तूंना वेगळी, स्वतंत्र खोली नको असते,
त्यांना फक्त ‘आपल्या मानलेल्या’ जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या.
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची,
हे हातांना लक्षात ठेवायला सांगा.
वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन.
त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह
नंतरच्या काळातही.
आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या
हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा
कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
शाबूत ठेवावा.
(भरून आलेले आकाश)
वस्तू |
प्रसिद्ध कवी. भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यांमुळे धामणस्कर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकूळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत.
कविता १९८० साली प्रथम ‘कविता दशकाची’ या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली. ‘प्राक्तनाचे संदर्भ’ व ‘बरेच काही उगवून आलेले’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली, की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तूयांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते.
त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात, हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडित स्नेह जपावा, ही भावना कवितेतून व्यक्त होते.
वस्तू कविता 10वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
Tags:
मराठी कविता