आश्वासक चित्र कविता 10 वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
रसग्रहण दहावी मराठी
1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण
2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी
3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी
4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी
5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी
उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून
नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत.
मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित.
तशी हसून म्हणते ती, ‘आता तू.’
मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर.
दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम;
मग शोधतो पातेलं भाजीसाठी...
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.
माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं
जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र.
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
खेळते आहे एक मुलगी केव्हाची.
मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून.
ती मांडीवर घेते बाहुलीला
एका हातानं थोपटत तिला, चढवते आधण भाताचं
भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर.
बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन
खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात.
मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे.
अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या.
मुलगा दाखवतो तिला, आपलं कसब पुन्हा एकदा.
मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे
तेव्हा तो हसून म्हणतो,
‘तू भाजी बनव छानपैकी पाल्याची.’ ती म्हणते,
‘मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?’
स्त्रीवादी कवयित्री, कथालेखिका. त्यांचे ‘निरन्वय’, ‘वेणा’, ‘स्त्रीगणेशा’, ‘निरर्थकाचे पक्षी’ हे कवितासंग्रह; ‘जे दर्पणी बिंबले’, ‘ओल हरवलेली माती’ हे कथासंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘कवी केशवसुत’, ‘इंदिरा संत’ तसेच ‘भैरू रतन दमाणी’ इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत.
प्रस्तुत कवितेत स्त्री-पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे. स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे.
कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य सर्वविद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे, या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केला आहे.
आश्वासक चित्र कविता 10 वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
Tags:
मराठी कविता
![आश्वासक चित्र कविता 10 वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] आश्वासक चित्र कविता 10 वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhyElmqnVhkJeZHOdISNEN9J7hA127c0Y1pvCqGfyFe3DN5NJzMhHp9KJ9n1s2oNFTJ_GBvt0EgUR0FD9ucCe4A_DAdofDD3C6fhWgI1Am3uUoXA4YchYZc9M_cmPfCFBNnnQH950zYFxI/s16000-rw/%25E0%25A4%2586%25E0%25A4%25B6%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B8%25E0%25A4%2595+%25E0%25A4%259A%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A4%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0+%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25A4%25E0%25A4%25BE+10+%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A0%25E0%25A5%2580+%255B+%25E0%25A4%2595%25E0%25A5%2583%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2580+%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A7%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AF+%25E0%25A4%25B5+%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B8%25E0%25A4%2597%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25A3+%255D.png)