रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण | Maharashtra Varuni Tak Ovalun Kaya Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण | Maharashtra Varuni Tak Ovalun Kaya Rasgrahan 9th Marathi

1. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘महाराष्ट्र मंदिरापुढती । पाजळे याशीची ज्योती
सुवर्णधरा खालती । निल अंबर भरले वरती
गड पुढे पोवाडे गाती । भूषवी तिला महारथी’
SOLUTION:

आशयसौंदर्य: 
महाराष्ट्र ही कर्तृत्वाची भूमी आहे. तिचे उपकार फेडण्यासाठी जीव कुर्बान करून टाका असे आवाहन शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी या कवितेत ओजस्वी शब्दांत केले आहे. 

महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण व मराठी मनाची दृढ एकजूट . हा आशय प्रत्ययकारी शब्दांत मांडला आहे.

काव्यसौंदर्य: 
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना शाहीर आवाहन करताना म्हणतात – महाराष्ट्रभूमी एक पवित्र मंदिर आहे. या मंदिरापुढे वीरपुरुषांनी आहुती दिलेल्या यज्ञाची ज्योत जळत आहे. महाराष्ट्र ही सोन्याची भूमी व त्यावर निळ्या आकाशाचे छत धरले आहे. 

म्हणजे ही नररत्नांची खाण आहे व त्यावर तारकांची छाया आहे. सर्व किल्ले महाराष्ट्राच्या यशाचे पोवाडे [स्तुतिगीते] गात आहेत. या भूमीला रथीमहारथी देशभक्तांनी सजवले आहे.

भाषिक वैशिष्ट्ये: 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दकळेत साकार केले आहे. बाहू स्फुरण पावतील, अशी आवाहनात्मक भाषेची वीण आहे. योग्य यमकांचा वापर करून गेयता आणली आहे. 

‘या सत्यास्तव मैदानि शिंग फुकाया’ अशा सुभाषितप्रचुर भाषेचा बाज कायम ठेवला आहे. वीरश्रीयुक्त शब्दरचनेतून संपूर्ण कवितेत वीररसाचे दर्शन होते. ‘महाराष्ट्रास्तव लढण्याचे’ आवाहन काळजाला भिडते.

Also Read: 
रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण

रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी 

रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण | Maharashtra Varuni Tak Ovalun Kaya Rasgrahan 9th Marathi

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
कंबर बांधून ऊठ घाव झेलाया
महाराष्ट्रावरूनी टाक आेवाळून काया ।
महाराष्ट्र मंदिरापुढती । पाजळे याशीची ज्योती ।
सुवर्ण धरा खालती । निल अंबर भरले वरती 
गड पुढे पोवाडे गाती । भूषवी तिला महारथी

तो अरबी सागर लागे जयाचे पाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।
ही मायभूमि धीरांची । शासनकर्त्या वीरांची
घामाची आणि श्रमाची । खुरप्याची आणि दोरीची
संतांची, शाहीरांची । त्यागाच्या तलवारीची

स्मरून धुरंधर आता त्या शिवराया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।
पहा पर्व पातले अाजचे । संयुक्त महाराष्ट्राचे
साकार स्वप्न करण्याचे । करी कंकण बांधून साचे
पर्वत उलथून यत्नाचे । सांधू या खंड की त्याचे

या सत्यास्तव मैदानि शिंग फुंकाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।
धर ध्वजा करी ऐक्याची । मनीषा जी महाराष्ट्राची
पाऊले टाक हिंमतीची । कणखर जणु पोलादाची
घे आण स्वातंत्र्याची । महाराष्ट्रास्तव लढण्याची

उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।

महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण 

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post