रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी | Ya Jhopadit Majhya Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी | Ya Jhopadit Majhya Rasgrahan 9th Marathi


रसग्रहण : 1

(१) प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री :-  राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज.

(२) कवितेचा विषय :- -  अत्यंत साध्या राहणीतही परमोच्च सुख साठलेले असते. सुख व शांती माझ्या झोपडीत कशी मिळते, याचे निवेदन या कवितेत केले आहे.

(३) कवितेतील दोन शब्दांचे अर्थ :- - 
                (१) सौख्य सुख
                   (२) भूमी = जमीन
                  (३) नाम = नाव
                  (४) मज्जाव = मनाई
                  (५) भीती = भय
                  (६) मऊ == नरम
                  (७) बोजा = वजन, भार
                  (८) सदा == सतत.

(४) कवितेतून मिळणारा संदेश :- -  
श्रीमंतीचा, वैभवाचा हव्यास करू नये, जे प्राप्त परिस्थितीत मिळते, ते जास्त सुखकारक असते. शुद्ध मनाने गरिबीत जगताना समाधान मिळते, ही शिकवण मिळते.

(५) कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :- -  
कवितेच्या आशयाला पूरक असा सैलसा 'ओवी' हा पूर्वीचा लोकछंद या कवितेत आहे. ओवी छंदात तीनही चरणांत यमक साधलेले असते. प्रस्तुत रचनेचा सहजपणे तत्त्व बिंबवण्याचा गुण आहे. 

पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत; परंतु गरिबाच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय देतो हा संदेश इतक्या सोप्या शब्दांत मांडला आहे की, ओवी सहज ओठात रुळते. गुणगुणावीशी वाटते. प्रत्येक ओवीचा शेवट – 'या झोपडीत माझ्या' असा केल्याने आशयाची घनता वाढते.

(६) कवितेतून व्यक्त होणारा विचार :- -  
महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची तुलना या कवितेत केली आहे. झोपडीतल्या साध्या राहणीत सुखसमृद्धी व शांती मिळते, हे सांगितले आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी मनात ठसवली, तर मानसिक सुख लाभते.

(७) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ :- 
        पाहूनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
          शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या
 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झोपडीचे माहात्म्य सांगताना म्हणतात- झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रही मनात लाजतो. माझ्या सुखाचा इंद्राला हेवा वाटतो. माझ्या झोपडीत नेहमी सुखशांती नांदते. 

(८) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :- -  
राजालाही जी सुखे मिळत नाहीत, ती माझ्या झोपडीत आहेत. खुल्या निसर्गात, जमिनीवर पहुडताना मानाने, सुखासमाधानाने जगावे, हे अतिशय सहजपणे कवितेत बिंबवले असल्यामुळे ही कविता मला खूप आवडली.

Also Read: 
रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण

रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी 

रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी | Ya Jhopadit Majhya Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : 2

कवी :-   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

तथा माणिक बंडोजी ठाकूर

रचना प्रकार :-  भजन

काव्यसंग्रह :-  ग्रामगीता

मध्यवर्ती कल्पना :-  
ग्रामीण जनसमूहाचा विकास व सुस्थितीतील ग्रामजीवन हा संत तुकडोजी महाराजांच्या समग्र रचनांचाच पाया आढळतो.

कवीची लेखन वैशिष्ट्य :-  
ओघवती रसाळ भाषा व आजूबाजूला आढळणारी दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे कवितेला सामान्य लोकांच्या जवळ नेतात. तुकडोजी महाराज संत होतेच पण ते पुरोगामी विचारांचे व जातिभेद, अंधश्रद्धा याविरुध्द समाजाला जागं करणारे समाज सुधारक होते. 

ग्राम सुधारणा हाच देशसुधारणेचा पाया आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी रचलेले भजन दिल्ली राजघाटावर नियमित म्हटले जाते. त्यांना डाॅ राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी दिली.

व्यक्त होणारा स्थायीभाव :-  
भौतिक संपन्नता आणि सुख यांचा फारसा संबंध नसतो तर ते आपल्या मनोरचनेवर अवलंबून असते हे त्यांचे मत, आणि ते पटवून सांगणारी ही रचना. आर्थिक सुबत्ता सोयी देऊ शकते पण सुख साधेपणात आहे व त्यातच शांती समाधान मिळते असे त्यांना वाटते.


आवडलेली ओळ :-  
'भूमीवरी पडावे, तार्यांकडे पहावे ' या काव्यपंक्तीत असलेली कल्पनाच इतकी मोहक आणि सुखकारक आहे की जणू आपण त्याचा अनुभवच घेतो आहोत.

न आवडलेली ओळ :-  
न आवडण्यासारखा कोणताच विचार नाही.

भाषिक सौंदर्य :-  
अतिशय साधी, सर्व सामान्यांना आपलीशी वाटणारी व ग्रामजीवनाशी जवळीक साधणारी कवितेतली भाषा आहे.

काव्य सौंदर्य :-  
अतिशय साध्या, सामान्यांच्या दैनंदिन जगण्यातलं सौंदर्य कवितेच्या माध्यमातून स्पष्ट होतं.

आशय सौंदर्य :-  
बहुसंख्य लोकांच्या आर्थिक मागासलेपणाच्या दुःखाला सहजपणे बाजूला सारून शाश्वत सुखाची महती यात दिसून येते. चिरंतन सुखाचा राजमार्गच संत तुकडोजी महाराज आपल्याला खुला करतात.

रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी | Ya Jhopadit Majhya Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : 3

पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:- 

प्रश्न 1.
‘पाहून सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या’
उत्तर:- 
आशयसौंदर्य :-  
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी ‘या झोपडीत माझ्या’ या कवितेत महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची मार्मिकपणे तुलना केली आहे. 

श्रीमंतीचा, वैभवाचा बडेजाव न करता झोपडीतल्या साध्या राहणीत सुख-समृद्धी व शांती मिळते, हा आशय या कवितेत सहजपणे नोंदवला आहे.

काव्यसौंदर्य :-  
प्राप्त परिस्थितीत शुद्ध मनाने जगताना समाधान मिळते. खुल्या निसर्गात, जमिनीवर पहुडताना जे सुख मिळते, ते देवाच्या देवालाही मिळत नाही, असे या प्रस्तुत ओळींत सांगितले आहे.

 माझे झोपडीत राहण्याचे सुख पाहून देवेंद्रही लाजतो. त्याला माझ्या सुखाचा हेवा वाटतो; कारण देवेंद्रालाही न मिळणारी शांती माझ्या झोपडीत विराजमान झाली आहे. माझ्या झोपडीत निरामय शांती वसत आहे, असे कवींना म्हणायचे आहे.


भाषिक वैशिष्ट्ये :-  
कवितेच्या आशयाला पूरक असा सैलसा ‘ओवी’ हा प्राचीन लोकछंद या कवितेत आहे. ओवी छंदात तीनही चरणांत यमक साधलेले असते. प्रस्तुत रचनेचा सहजपणे तत्त्व बिंबवण्याचा गुण आहे. पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत; 

परंतु गरिबाच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय । झोपडीत माझ्या’ असा केल्याने आशयाची घनता वाढते. तसेच ‘या’ देतो हा संदेश इतक्या सोप्या शब्दांत मांडला आहे की, ओवी सहज , हा शब्द एकाच वेळी सार्वनामिक विशेषण व क्रियापद या दोन्ही ओठात रुळते. गुणगुणावीशी वाटते. प्रत्येक ओवीचा शेवट-‘या है अंगाने अर्थवाही झाला आहे.

रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी | Ya Jhopadit Majhya Rasgrahan 9th Marathi

राजास जी महाली,  सौख्ये कधी मिळाली  
ती सर्वप्राप्त झाली, या झोपडीत माझ्या 

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे 
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या 

पहारे आणि तिजोऱ्या, त्यांतूनि होती चोऱ्या 
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या 

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला 
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या

 महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने 
आम्हां जमीन माने, या झोपडीत माझ्या

 येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा 
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या 

पाहूनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे 
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्

रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी 


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post