रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी । Apule Jagne Apuli Olakh Rasgrahan 9th Marathi

आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी । Apule Jagne Apuli Olakh Rasgrahan 9th Marathi


1. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:
प्रश्न 1. ‘कर्तृत्वाचे घडवी वेरुळ, कर्तव्याला मुकु नको मातेसह मातीचे देणे फेडायाला चुकू नको!’
SOLUTION:
आशयसौंदर्य
तरुण पिढीने आपली वागणूक कशी ठेवावी व कोणत्या सकारात्मक गोष्टी कराव्यात नि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे डोळस मार्गदर्शन कवी संदीप खरे यांनी ‘आपुले जगणे… आपुली ओळख!’ या कवितेत केले आहे. 

आपले जगणे मूल्यवान असावे. माणुसकी जपावी. कर्तृत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याची शिकवण ही कविता देते.

काव्यसौंदर्य: 
कवितेत नवीन तरुण पिढीला नेमके व सखोल मार्गदर्शन करताना कवी म्हणतात-आपले जीवन मूल्यवान व अर्थपूर्ण करून स्वाभिमानाने जगावे. उपरोक्त ओळीत त्यांनी वेरूळच्या लेण्याचा संदर्भ दिला आहे. वेरूळचे लेणे हे महाराष्ट्राचे भूषणावह शिल्प आहे. 

अशा प्रकारे आयुष्यात कर्तृत्वरूपी वेरूळची लेणी घडवावी. उत्तुंग कर्तृत्व करावे. कर्तव्याला कधी नाकारू नये. या मातृभूमीचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. त्या उपकारांची परतफेड करायला चुकू नये.


भाषिक वैशिष्ट्ये : 
या कवितेत ‘फटका’ या पूर्वापर चालत आलेला छंदप्रकार वापरला आहे. काय करावे व काय करू नये, याचे थेट संवादात्मक वर्णन फटक्यात केलेले असते. उपदेशात्मक गाभा असतो, जो या कवितेत तंतोतंत पाळला आहे. कुठेही प्रतीकांच्या व प्रतिमांच्या जंजाळात ही कविता अडकलेली नाही. 

थेट संवाद साधण्याची विलक्षण हातोटी यात आहे. भाषा परखड व ओघवती असल्यामुळे हृदयाला जाऊन भिडते. यमकप्रधान कविता असूनही एक संथ, लांबलचक अंतर्गत लय कवितेला पोषक ठरली आहे.

आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी । Apule Jagne Apuli Olakh Rasgrahan 9th Marathi

आपुले जगणे... आपुली ओळख! उपरे, अर्धे जोडु नको 
दिवा होऊनि उजळ जगाला... चाकू होऊन कापु नको!

 नित्य घडावे वाचन, लेखन... क्षण कार्याविण दवडु नको 
 नित्य परवचा, व्यायामाविण झोप घ्यावया पडु नको! 

पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरु नको 
शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको! 

नम्र रहावे, सौम्य पहावे; उगा कुणास्तव अढी नको 
उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको!

 नको फुकाची ‘हांजी हांजी’... लोचट, बुळचट काहि नको
 परंतु दिसता उदात्त काही; ताठर माथा मुळि नको! 

पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊनी छळु नको 
नको उगाचच वाद परंतु कुणि धमकवता पळु नको! 

अपुल्या अपुल्या दु:खासाठी नयनी अश्रु ठेवु नको 
पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा; व्यर्थ कोरडा राहु नको! 

तुडवित राने खुशाल जावे, नव्या पथाला भिउ नको
 ज्यावर श्रद्धा प्राणाआतुन ते केल्याविण राहु नको! 

जेथे वाटा, तेथे काटा! उगा भेदरुन अडु नको 
करता हिंमत, जगात किंमत ! भेकड, गुळमुळ रडु नको! 

कर्तृत्वाचे घडवी वेरुळ, कर्तव्याला मुकु नको 
मातेसह मातिचे देणे फेडायाला चुकु नको!

आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी । Apule Jagne Apuli Olakh Rasgrahan 9th Marathi

Also Read: 
रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण

रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी 

रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post