रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी | Nirop Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी | Nirop Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : 1
प्रश्न 1.
‘धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन!’
SOLUTION:
आशयसौंदर्य: 
रणांगणावर शत्रूशी लढायला जाणाऱ्या आपल्या मुलामध्ये वीरश्री जागृत करणाऱ्या वीरमातेच्या मनातील विविध भावनांचे आर्त चित्रण कवयित्री पद्मा गोळे यांनी ‘निरोप’ या कवितेत केले आहे.

 वीरमाउलीच्या मनोगतातून कवयित्रींनी प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना शौर्याची शिकवण दिली आहे. तसेच आईचे वात्सल्यपूर्ण मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते, या आशयाचीही अभिव्यक्ती केली आहे.

काव्यसौंदर्य: 
युद्धाला निघालेल्या आपल्या बाळाचे औक्षण करताना व त्याची वीरश्री जागृत करताना त्याला गतकालीन वीरांचे व महाराष्ट्रकन्यांचे स्मरण देते. या उज्ज्वल परंपरेचा तू पाईक आहेस. तुझ्या शस्त्रांना भवानीमाय शक्ती देईल, अशा भावपूर्ण उद्गाराने बाळाची आई त्याचे मन ओजस्वी करते. 

शेवटी माउली म्हणते - तू विजयी होऊन ये. माझ्यापोटी तू जन्म घेतलास याची धन्यता मला वाटेल; त्या वेळी मी प्रेमाने माझ्या हाताने तुला दूधभात भरवीन. प्रस्तुत है ओळींमध्ये वीरश्री व ममता यांचा अनोखा संगम आपल्या प्रत्ययास येतो.

भाषिक वैशिष्ट्ये: 
प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमकप्रधान असून, त्यामुळे या कवितेतून गेयता व नादानुकूलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. 

शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे.

Also Read: 
रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण

रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी 

रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी | Nirop Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : 2
कवितेचे नाव - निरोप

कवयित्री - पद्मा गोळे

कवितेचा विषय - 
रणांगणावर जाणाऱ्या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आपल्या मुलाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक आई आपल्या मुलाला निरोप देते अशी भावना या कवितेत व्यक्त केली आहे.

कवितेचा प्रकार- 
निरोप एक देशभक्ती दाखवणारी कविता आहे

कवितेचे वैशिष्ट्य- 
कवयित्रीने अतिशय सोप्या शब्दात एका आईच्या भावना व्यक्त केल्या आहेत

कवितेतून संदेश -
आपला मुलगा रणांगणावर जात असतांना डोळ्यातून अश्रु न काढता त्या मुलाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक आई त्याला अनेक गोष्टी सांगत आहे.
ती आपल्या मुलाला म्हणते तू खरंच भाग्यवान आहेस कारण तुला देश सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे . जा आणि शत्रूशी दोन हात करून यशस्वी होऊन परत ये. 
तू परत आल्यावर मी तुला दुध भात हाताने खाऊ घालेल असे ती म्हणते. आईचे मुलाखती असणारे प्रेम या कवितेतून व्यक्त केले आहे. मुलगा कुठेही कमी पडू नये म्हणून त्याचा आत्मविश्वास व बळ वाढवण्यासाठी आई त्याचा उत्साह वाढवते.

रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी | Nirop Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : 3

‘धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन!’

निरोप' या कवितेच्या कवयित्री पद्मा गोळे या आहेत. निरोप या कवितेत कवयित्रींनी रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयी असणाऱ्या भावना या कवितेत वर्णन केलेल्या आहेत.

आई आपल्या सैनिक मुलाला म्हणते तू माझ्या पोटी जन्म घेतला हे मी माझं भाग्य समजते. आता माझ्या जन्माचे सार्थक होऊ दे आणि रणांगणवरून विजयी होऊन परत ये तू परत आल्यानंतर मी तुला माझ्या हाताने दूधभात भरवीन असे आई आपल्या मुलाला सांगत आहे.

मुलगा कितीही मोठा असला तरी आई साठी लहानच असतो. आईच्या मनातील भावना या कवितेत कवींनी व्यक्त केलेल्या आहेत. आई आपल्या मुलाला विश्वास देताना सांगत आहे तू रणांगणावर गेल्यावर तुझे कर्तव्य पार पाड आणि विजयी होऊन परत ये. अशा पद्धतीने आई आपल्या मुलाला लढण्यासाठी बळ देत आहे. आणि दुसरीकडे ती मुलाला खूप माया देत आहे. या कवितेत वीरमातेचे आपल्या शूर मुलाबद्दलचे प्रेम दिसून येत आहे.

रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी | Nirop Rasgrahan 9th Marathi

बाळ, चाललास रणा
घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी
तुज करिते औक्षण.

याच विक्रमी बाहूंनी
स्वतंत्रता राखायची,
खांद्यावरी या विसावे
शांति उद्याच्या जगाची.

म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दु:खाचा;
मीहि महाराष्ट्रकन्या
धर्म जाणते वीराचा.

नाही एकहि हुंदका
मुखावाटे काढणार.
मीच लावुनि ठेविली
तुझ्या तलवारीला धार.

अशुभाची साउलीहि
नाही पडणार येथे;
अरे मीहि सांगते ना
 जिजा-लक्षुमींशी नाते.

तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ति देईल भवानी,
 शिवरायाचे स्वरूप
आठवावे रणांगणी
धन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन!

निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी | Nirop Rasgrahan 9th Marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post