रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी | Dharila pandharicha Chor Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी | Dharila pandharicha Chor Rasgrahan 9th Marathi


रसग्रहण : 1

प्रश्न 1.
‘हृदय बंदिखाना केला।
आंत विठ्ठल कोंडिला।।’
उत्तर:
आशयसौंदर्य: 
श्रीविठ्ठलाचे प्रेम व जवळीक सदैव लाभावी म्हणून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कायम कोंडून ठेवणे, हा आशय व्यक्त करणारा ‘धरिला पंढरीचा चोर’ हा संत जनाबाई यांचा वेगळा अभंग आहे. 

भक्त आणि परमेश्वराचे दृढ नाते कसे असावे, याची शिकवण या अभंगातून जनसामान्यांना मिळते.

काव्यसौंदर्य: 
श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा म्हणून या पंढरीच्या चोराला मी पकडले आहे व त्याला माझ्या हृदयाच्या कैदखान्यात डांबून ठेवले आहे. असे संत जनाबाई निरागसपणे सहज म्हणतात. 

भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या ओळींमधून प्रत्ययाला येते. श्रीविठ्ठल निरंतर मनात राहावा, म्हणून हे लटके भांडण अतिशय लोभसवाणे झाले आहे.


भाषिक वैशिष्ट्ये: 
पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा ‘छोटा अभंगा’चा प्राचीन लोकछंद संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील चोर व हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे.

 चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत, शिवाय ‘सोहं शब्दाचा मारा केला’ यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.

Also Read: 
रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण

रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी 

रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी | Dharila pandharicha Chor Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : 2

प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री :- संत जनाबाई.

2. कवितेचा विषय :- विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी, म्हणून त्याला मनाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवणे.

3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ :- 
  • बेडी = साखळी
  • जीव = प्राण
  • पाय = पद
  • हृदय = जिव्हार.

कवितेतून मिळणारा संदेश :-
भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या अभंगातून प्रत्ययाला येते. परमेश्वर व भक्त यांचा संबंध अतूट असावा, केवळ नामस्मरण व जवळीक असावी, या भावनेचा परमोच्च बिंदू गाठला आहे.

कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :-पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा ‘छोटा अभंगा’चा लोकछंद प्रकार संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे.

 चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत, शिवाय ‘सोहं शब्दाचा मारा केला’ यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा, म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.

कवितेतून व्यक्त होणारा विचार :-
श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा व त्याच्याशी प्रेमळ संवाद व्हावा, म्हणून श्रीविठ्ठलाला चोर समजून हृदयाच्या बंदिखान्यात बंदिस्त करणे व त्याच्याशी लटके भांडण करणे. चोर-शिपाई या रूपकांतून श्रीविठ्ठलाचा निरंतर सहवास. 
विठ्ठल हृदयात कायम राहावा हा भक्तिभाव.


कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
 ‘सोहं शब्दाचा मारा केला।
विठ्ठल काकुलती आला ।।

संत जनाबाई यांनी श्रीविठ्ठलाला हृदयाच्या बंदिखान्यात कोंडून ठेवला. त्यावर अहंकारी शब्दांचा मारा केला. तेव्हा विठ्ठल जनाबाईंची व्याकुळ होऊन विनवणी करू लागला.

कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :- 
श्रीविठ्ठलाच्या गळ्यात दोर बांधून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कैद करणे, ही संत जनाबाईंची श्रीविठ्ठलाच्या बाबतीत असलेली प्रेमळ आसक्ती अतिशय उत्कटपणे साधली आहे. ‘प्राण गेला तरी तुला मी सोडणार नाही,’ या निवेदनातून विठ्ठल कायम मनात वसावा, ही आंतरिक ओढ सहजपणे व सार्थपणे या अभंगात व्यक्त झाली आहे. त्यामुळेच संत जनाबाईंचा हा अभंग मला फार आवडला.

रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी | Dharila pandharicha Chor Rasgrahan 9th Marathi

धरिला पंढरीचा चोर । 
गळां बांधोनियां दोर ।।१।।

 हृदय बंदिखाना केला । 
आंत विठ्ठल कोंडिला ।।२।। 

शब्दें केली जवाजुडी । 
विठ्ठल पायीं घातली बेडी ।।३।। 

सोहं शब्दाचा मारा केला । 
विठ्ठल काकुलती आला ।।४।। 

जनी म्हणे बा विठ्ठला । 
जीवें न सोडीं मी तुला ।।५।। 

Dharila pandharicha Chor Rasgrahan 9th Marathi


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post