रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी | Santvani Jaisa Vruksha Nene Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी  | Santvani Jaisa Vruksha Nene Rasgrahan 9th Marathi


रसग्रहण : 1

(१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री :- संत नामदेव.

(२) कवितेचा विषय :- या कवितेत संतसज्जनांची महती सांगितली आहे.

(३) कवितेतील दोन शब्दांचे अर्थ :- (इथे सरावासाठी अनेक शब्दार्थ दिले आहेत.)

(१) वृक्ष = झाड

(२) चित्त = मन

(३) निंदा = नालस्ती

(४) सम= समान

(५) धैर्य = धीर

(६) जीव = प्राण.


(४) कवितेतून मिळणारा संदेश :- 
संतांचे वर्तन जसे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते, तशी आपली वागणूक ठेवावी. स्थिरबुद्धीने वागावे हा संदेश या अभंगातून दिला आहे.

(५) कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :- 
सर्वसामान्य माणसांना कळेल असा अभंग हा लोकछंद या रचनेत वापरला आहे. वृक्षाचे रूपक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय लोकांपर्यंत पोहोचवला आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत समक साधलेले आहे. पहिल्या तीन चरणांत प्रत्येकी सहा अक्षरे व चौथ्या चरणात चार अक्षरे ही मोठ्या अभंगाची वैशिष्ट्ये आहेत. लोकमानसाला परमार्थाची शिकवण सहजपणे देण्याचे कौशल्य साधले आहे. 

(६) कवितेतून व्यक्त होणास विचार :- 
संतसज्जन लोक हे झाडाप्रमाणे असतात. झाडाची पूजा केली किंवा त्याला तोडले तरी झाडाला मान-अपमान वाटत नाही. या झाडांप्रमाणे सज्जनांची वागणूक असते. निंदास्तुती त्यांना समान वाटते. अशा संतांची गाठ पडणे म्हणजे जिवाशिवाची, म्हणजेच साक्षात परमेश्वराचीच भेट होणे होय.

(७) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ :

निंदास्तुति सम मानिती जे संत ।
पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।

:-  निंदा व स्तुती जे समान लेखतात, ते संत असतात, असे साधुसंत संपूर्ण धैर्यवान असतात. निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही..

 (८) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :-  
जीवन जगताना आपण स्थिरचित्त कसे असावे, हे या कवितेत झाडाच्या प्रतीकातून शिकवले आहे. संतांची थोरवी सांगणारी व जीवनमूल्यांची शिकवण देणारी ही अभंगरचना असल्यामुळे ती मला खूप आवडली.

Also Read: 
रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण

रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी 

रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी  | Santvani Jaisa Vruksha Nene Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : 2

संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील संतकवी.नामदेव हे ‘मराठीतील' पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.आयुष्यभर त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला.

आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी आपल्या लिखाणातून केले.

रसग्रहण : संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी  | Santvani Jaisa Vruksha Nene Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : 3

2. दिलेल्या पंक्तींचे रसग्रहण करताना पुढील तीन मुद्द्यांना अनुसरून तीन परिच्छेदांत रसग्रहण करणे अपेक्षित आहे:

1. आशयसौंदर्य: 
यामध्ये कवीचे/कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी. प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन पंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच राहतील.

2. काव्यसौंदर्य: 
यामध्ये दिलेल्या पंक्तींतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना यांविषयी लिहावे. ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे. त्यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासावा.

3. भाषिक वैशिष्ट्ये: 
यामध्ये कवींची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे (ग्रामीण, बोलीभाषा, संवादात्मक, निवेदनात्मक, चित्रदर्शी यांपैकी कोणती); तसेच आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार आदी मुद्दयांना धरून माहिती यावी. हे मुद्देही प्रत्येक कवितेसाठी साधारणपणे सारखेच असतील.

वरील मुद्द्यांना अनुसरून प्रस्तुत कवितेसाठी सर्वसाधारण रसग्रहणाचा ढाचा कसा असावा, हे पुढे मार्गदर्शनार्थ दिले आहे. तो अभ्यासून कवितेतील अन्य कोणत्याही दोन पंक्तींसाठी रसग्रहण लिहिण्याचा सराव विदयार्थ्यांनी करावा.

संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी 

रसग्रहण : 4

पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
“निंदास्तुति सम मानिती जे संत।
पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे ।।
उत्तर:

आशयसौंदर्य: 
‘जैसा वृक्ष नेणे’ या अभंगामध्ये संत नामदेव यांनी झाडाचे प्रतीक वापरून संत-सज्जनांची महती सांगितली आहे. संतांचे वागणे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते. तशी आपली वागणूक ठेवावी स्थिर चित्ताने वर्तन करावे, हा संदेश या अभंगातून दिला आहे.

काव्यसौंदर्य : 
झाडाची पूजा केली किंवा झाड तोडले तरी झाडाला दुःख होत नाही. त्याला मान-अपमान वाटत नाही. संतसज्जन झाडासारखे असतात. निंदा व स्तुती त्यांना समान वाटते. स्तुतीने ते हुरळून जात नाहीत अथवा निंदेने नाराज होत नाही. ते पूर्ण धीरवंत व स्थिरबुद्धीने वागतात. अशा धैर्यवंत साधूंची गाठ पडणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची भेट होणे असते.

भाषिक वैशिष्ट्ये: 
‘अभंग’ या प्राचीन लोकछंदात ही रचना आहे. पहिल्या तीन चरणात सहा व चौथ्या चरणात चार अक्षरे असा हा ‘मोठा अभंग’ छंद आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणात यमक साधले आहे. झाडाचे सर्वमान्य प्रतीक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. नेमके तत्त्व सांगून लोकमानसाला योग्य शिकवण सहजपणे देण्याची विलक्षण हातोटी शब्दांनी साधली आहे.

रसग्रहण : संतवाणी - (अ) जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी  | Santvani Jaisa Vruksha Nene Rasgrahan 9th Marathi


Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post