रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी | Mi Vachavtoy Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी | Mi Vachavtoy Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : 1 

(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री :-- सतीश काळसेकर.

(२) कवितेचा विषय :-- वेगाने बदलत जाणाऱ्या महानगरीय समाजाचे वास्तव चित्रण हा कवितेचा विषय आहे.

(३) कवितेतील दोन शब्दांचे अर्थ :--
(१) हाक = साद
(२) आई = माता
(३) विस्तव = आग
 (४) राख = रक्षा
(५) वारा = वात.

(४) कवितेतून मिळणारा संदेश :-- 
चांगली जुनी संस्कारक्षम मूल्ये हरवू नयेत; आईची बोली पारखी होऊ नये; भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होता कामा नये; हा संदेश प्रस्तुत कविता देते.

(५) कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :-- 
जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन महानगरीय बदलते वास्तव यांतील अंतर्विरोध कवींनी चपखल शब्दांत मांडला आहे. कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे. यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे. मुक्त गदय शैली आशयाला पूरक आहे. 

कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारी आहे. कवितेचा शेवट परिणामकारक झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात.

(६) कवितेतून व्यक्त होणारा विचार :-- 
यंत्रयुगातील नवीन बदलांमुळे जुनी मूल्ये ढासळत चाललीयत. ती वाचवणे व सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

(७) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ : :--
 हाकेतून हद्दपार होतेय आई हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
बदलत जाणाऱ्या वास्तवामध्ये मम्मी-डॅडी या परकीय शब्दांमुळे आईची मायेची हाक आता ऐकू येत नाही. गोठ्यातल्या गाईसुद्धा आता नैसर्गिक हंबरणे विसरत चालल्या आहेत.

(८) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :-- 
जुनी मूल्ये नामशेष होण्याची खंत कवींनी आर्तपणे व तेवढ्याच परखडपणे मांडली आहे. नवीन पिढीचा निरुद्देश चंगळवाद अधोरेखित केला आहे. आई, आईची बोली, भूमी व कविता वाचवण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला आहे. या सर्व कारणांमुळे ही कविता मला खूप आवडली.

Also Read: 
रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण

रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी 

रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी | Mi Vachavtoy Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : 2

प्रश्न 1.
पुढील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:
‘हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई.’
उत्तर:
आशयसौंदर्य: 
यंत्रवत असलेल्या महानगरीय जीवनात जुनी जीवनमूल्ये नष्ट होत आहेत. क्रय वस्तूंच्या बेगडी झगमगाटात जुनी चूल, जुने खेळ, बोली व संस्कृती यांचा नवीन पिढीला विसर पडत चालला आहे, या वास्तववादी आशयाचे विदारक चित्रण कवी सतीश काळसेकर यांनी ‘मी वाचवतोय’ या कवितेत केले आहे.

काव्यसौंदर्य: 
बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दांत चितारताना प्रस्तुत ओळींमध्ये कवी म्हणतात की ‘मम्मी-डॅडी’ या उसन्या परिभाषेमुळे ‘आई’. अशी हाक आता ऐकू येत नाही. जणू ती हाक सीमेबाहेर गेली आहे. गोठ्यातल्या मायेचा वारसा असलेल्या गाईसुद्धा आता नैसर्गिक हंबरणे विसरल्या आहेत. 

त्या आता आपल्या वासरांसाठी हंबरत नाहीत. म्हणजेच आई-लेकरांचे संबंध मायाममतेचे राहिले नाहीत, ही खंत कवींनी व्यक्त केली आहे. भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होते, याची बोचणी प्रस्तुत ओळींमध्ये स्पष्टपणे दर्शवली आहे.

भाषिक वैशिष्ट्ये: 
जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन महानगरीय बदलते वास्तव यांतील अंतर्विरोध कवीने चपखल शब्दांत मांडला आहे. कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे. यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे. मुक्त गदय शैली आशयाला पूरक आहे. 

कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारी आहे. योग्य परिणामकारकता शब्दाशब्दांत अभिव्यक्त झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात.

रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी | Mi Vachavtoy Rasgrahan 9th Marathi

रसग्रहण : 3

पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:
कविता - मी वाचवतोय.
SOLUTION:
मी वाचवतोय.
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री :  सतीश काळसेकर.

2. कवितेचा विषय : 
वेगाने बदलत जाणाऱ्या महानगरीय समाजाचे वास्तव चित्रण हा कवितेचा विषय आहे.

3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ : 

  • हाक = साद
  • आई = माता
  • विस्तव = आग
  • राख = रक्षा
  • वारा = वात.

4. कवितेतून मिळणारा संदेश : 
चांगली जुनी संस्कारक्षम मूल्ये हरवू नयेत; आईची बोली पारखी होऊ नये; भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होता कामा नये; हा संदेश प्रस्तुत कविता देते.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये: 
जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन महानगरीय बदलते वास्तव यांतील अंतर्विरोध कवींनी चपखल शब्दांत मांडला आहे. कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे. यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे. मुक्त गदय शैली आशयाला पूरक आहे. कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारी आहे. कवितेचा शेवट परिणामकारक झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार: 
 यंत्रयुगातील नवीन बदलांमुळे जुनी मूल्ये ढासळत चाललीयत. ती वाचवणे व सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
 बदलत जाणाऱ्या वास्तवामध्ये ममी-डॅडी या परकीय शब्दांमुळे
आईची मायेची हाक आता ऐकू येत नाही. गोठ्यातल्या गाईसुद्धा 3 आता नैसर्गिक हंबरणे विसरत चालल्या आहेत.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे : 
 जुनी मूल्ये नामशेष होण्याची खंत कवींनी आर्तपणे व तेवढ्याच परखडपणे मांडली आहे. नवीन पिढीचा निरुद्देश चंगळवाद अधोरेखित केला आहे. आई, आईची बोली, भूमी आणि कविता वाचवण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला आहे. या सर्व कारणांमुळे ही कविता मला खूप आवडली.

रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी | Mi Vachavtoy Rasgrahan 9th Marathi

 रसग्रहण : 4

कृतिपत्रिकेतील प्रश्न 2 [इ] साठी…
प्रश्न 1.
पुढील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

‘हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई.’

SOLUTION:
आशयसौंदर्य: 
यंत्रवत असलेल्या महानगरीय जीवनात जुनी जीवनमूल्ये नष्ट होत आहेत. क्रय वस्तूंच्या बेगडी झगमगाटात जुनी चूल, जुने खेळ, बोली व संस्कृती यांचा नवीन पिढीला विसर पडत चालला आहे, या वास्तववादी आशयाचे विदारक चित्रण कवी सतीश काळसेकर यांनी ‘मी वाचवतोय’ या कवितेत केले आहे.

काव्यसौंदर्य: 
बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दांत चितारताना प्रस्तुत ओळींमध्ये कवी म्हणतात की ‘मम्मी-डॅडी’ या उसन्या परिभाषेमुळे ‘आई’. अशी हाक आता ऐकू येत नाही. जणू ती हाक सीमेबाहेर गेली आहे. गोठ्यातल्या मायेचा वारसा असलेल्या गाईसुद्धा आता नैसर्गिक हंबरणे विसरल्या आहेत. 

त्या आता आपल्या वासरांसाठी हंबरत नाहीत. म्हणजेच आई-लेकरांचे संबंध मायाममतेचे राहिले नाहीत, ही खंत कवींनी व्यक्त केली आहे. भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होते, याची बोचणी प्रस्तुत ओळींमध्ये स्पष्टपणे दर्शवली आहे.

भाषिक वैशिष्ट्ये: जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन महानगरीय बदलते वास्तव यांतील अंतर्विरोध कवीने चपखल शब्दांत मांडला आहे. कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे. यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे. मुक्त गदय शैली आशयाला पूरक आहे. 

कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारी आहे. योग्य परिणामकारकता शब्दाशब्दांत अभिव्यक्त झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात.
 
रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी | Mi Vachavtoy Rasgrahan 9th Marathi

हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
हरवत चाललाय किराणा आणि भुसार
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर
लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा
निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट
कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली

मागच्या धगीवर रटरटणारी आमटी
राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर
बोलाचालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली
सुटीत आता खेळत नाहीत मुलं
विटीदांडू आणि लगोऱ्या
थांबून गेलाय त्यांचा दंगा,

आट्यापाट्या आणि पिंगा
परकऱ्या मुली खेळत नाहीत आता
आधीचे मातीतले खेळ
पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर
बघत क्रिकेटची मॅच
आणि उलगडत क्राइम-थ्रिलर

लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते
शब्द बापुडे केवळ वारा
तसे विरून जातायत
मी वाचवतोय माझी कविता
आणि माझी आई
आणि माझी बोली
आणि माझी भूमी
कवितेसोबत

मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी | Mi Vachavtoy Rasgrahan 9th Marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post