रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी | Vanvasi Rasgrahan 9th Marathi
रसग्रहण : 1
1. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:
प्रश्न 1.
‘आम्ही डोंगरराजाची
पोहं कळसू आईची
आम्ही उघडी बोडकी
बाळं परवरा माईची’
उत्तर:
आशयसौंदर्य:
सह्याद्रीच्या डोंगररांगांतील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण कवी तुकाराम धांडे यांनी ‘वनवासी’ या कवितेत केले आहे. डोंगरदऱ्यांत आनंदाने व मुक्तपणे नैसर्गिक जीवन जगणाऱ्या वनवासी मुलांच्या भावनांचे चित्रण करणे हा या कवितेचा आशय आहे.
काव्यसौंदर्य:
डोंगरदऱ्यांत, उघड्या निसर्गात मुक्तपणे व निर्भयपणे निसर्गाचेच घटक होऊन राहणाऱ्या वनवासी लेकरांचे अनोखे विश्व उपरोक्त ओळींमध्ये साकारले आहे. निसर्गातील वन्य प्राण्यांप्रमाणे जगणारी ही मुले आत्मविश्वासाने सांगतात की, डोंगर आमचा राजा आहे. आम्ही डोंगरराजाची मुले आहोत.
कळसूबाई शिखराच्या भवतालचा प्रदेश आमची आई आहे. उघडीबोडकी स्वच्छंदपणे बागडणारी आम्ही प्रवरा नदीची बाळे आहोत. भयमुक्तता व नैसर्गिक जीवनाची ओढ या भावनांचे चित्रण उपरोक्त ओळींत केले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये:
सैल अष्टाक्षरी छंदात ही कविता आहे. ग्रामीण बोलीभाषेतील जिवंत चैतन्य या कवितेच्या शब्दकळेत भारलेले दिसते. कळसूआई व प्रवरामाई यांची ही बाळे, हातात भाकरी-भाजी घेऊन खडकावर बसून खाणारी ही मुले, वाऱ्याच्या संगतीत खेळणारी व आभाळ पांघरणारी, सूर्याचंद्राशी बोलणारी आणि पक्ष्यांची बोली कंठात असणारी व चांदण्या हातात आणण्याची जिद्द असणारी ही पोरे – या सर्व नवीन व ताज्या प्रतिमांनी ही कविता सजलेली आहे.
सहज जीवनशैलीची सहज भाषा उत्कटपणे कवींनी कवितेत मांडली आहे. वाघाचे लवण, वांदार नळी, उंबरमाळी, तिकिड्या हे नक्षत्र असल्या अपरिचित पण जिवंत संकल्पना नव्याने कवितेत आल्या आहेत.
Also Read:
रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी
रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी
रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी
रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी
रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण
रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी
रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी
रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी
रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी
रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी
रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी
रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी
रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण
रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी
रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी
रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी
रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी | Vanvasi Rasgrahan 9th Marathi
रसग्रहण : 2
1) कवी:- तुकाराम धांडे.
2) विषय:-
कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवरा नदीच्या खोऱ्यतील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण आदिवासी बोलीत करणे,हा कवितेचा विषय.
3) संदेश:-
आपल्या सभोवती निसर्गात जगणाऱ्या मानवाच्या जिवणशैलीचा परिचय व्हावा व त्यांच्या जगण्याशी आपण समरस होऊन सह- अनुभूती घ्यावी.
4) आवडन्याची कारणे:-
आदिवासी लेकरांचे अनोखे भावविश्व या कवितेत मांडले आहे. संवेदनशील मनाला भावेल असे वेगळे जिवदर्शन व वेगळी जीवन दृष्टी देणारी ही कविता असल्यामुळे ग्रामीण बोलीतील ही सहजसुंदर कविता मला आवडली.
रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी | Vanvasi Rasgrahan 9th Marathi
आम्ही डोंगरराजाची
पोऱ्हं कळसू आईची
आम्ही उघडी बोडकी
बाळं परवरा माईची.
घेऊ हातावं भाकर
वर भाजीला भोकर
खाऊ खडकावं बसून
देऊ खुशीत ढेकर.
खेळू टेकडी भवती
पळू वाऱ्याच्या संगती
वर पांघरू आभाळ
लोळू पृथ्वीवरती.
आम्ही वाघाच्या लवणाचे
आम्ही वांदार नळीचे
गाव वहाळापल्याड
आम्ही उंबर माळीचे.
बसू सूर्याचं रुसून
पहू चंद्राकं हसून
बोलू वाज तिंकिड्याशी
नाचू घोंगडी नेसून.
डोई आभाळ पेलीत
चालू शिंव्हाच्या चालीत
हिंडू झाडा-कड्यांवरी
बोलू पक्ष्यांच्या बोलीत.
आम्ही सस्याच्या वेगानं
जाऊ डोंगर यंगून
हात लाऊन गंगना
येऊ चांदण्या घेऊन.
रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी | Vanvasi Rasgrahan 9th Marathi
Tags:
रसग्रहण इयत्ता नववी