9th रसग्रहण : इयता नववी मराठी कुमारभारती कवितेचे रसग्रहण | Kaviteche Rasgrahan Std 9th Marathi

रसग्रहण : इयता नववी मराठी कुमारभारती कवितेचे रसग्रहण | Kaviteche Rasgrahan Std 9th Marathi

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण नववीच्या सर्व कवितांचे रसग्रहण बघणार आहोत या लेखांमध्ये सर्व कवितांचे रसग्रहण उपलब्ध आहेत तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या लेखावर जाण्याची गरज पडणार नाही फक्त मी खालील दिलेल्या नावावर म्हणजेच तुम्हाला जी कविता हवी आहे त्यावर तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला त्या कवितेचे रसग्रहण समोर येऊन जाईल.

  1. रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी
  2. रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी
  3. रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी
  4. रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी
  5. रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण
  6. रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी
  7. रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी 
  8. रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण मराठी 9वी | 9th Marathi Rasagrhan

9th रसग्रहण : इयता नववी मराठी कुमारभारती कवितेचे रसग्रहण | Kaviteche Rasgrahan Std 9th Marathi


मी खाली काही थोडक्यात कवितेविषयी माहिती दिली आहे तर तुम्हाला ज्या कवितेची माहिती हवी असेल त्यावर तुम्ही क्लिक करा तुम्हाला पूर्ण मोठ्या प्रमाणात रसग्रहण तेथे येऊन जाईल.

१. रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी

संतवाणी - जैसा वृक्ष नेणे या कवितेचे कवी संत नामदेव आहेत या कवितेमध्ये संत सज्जनांची महती सांगितली आहे. संत सज्जन लोक हे झाडाप्रमाणे असतात झाडाची पूजा केली किंवा त्याला तोडले तरी झाडाला मान अपमान वाटत नाही या झाडांप्रमाणे सज्जनांची वागणूक असते निंदास्तुती त्यांना समान वाटते अशा संतांची गाठ पडणे म्हणजे जीवा शिवाची म्हणजेच साक्षात परमेश्वराची भेट होय.

२. रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी

संतवाणी -धरला पंढरीचा चोर या कवितेच्या कवयित्री संत जनाबाई या आहेत या कवितेचा विषय विठ्ठलाचे प्रेम व चळवळीक लाभावी म्हणून त्याला मनाच्या बंदी खाण्यात कोंडून ठेवणे हे आहे. श्री विठ्ठलाचा कायमसहवास मिळावा व त्याची प्रेमळ संवाद व्हावा म्हणून विठ्ठलाला चोर समजून हृदयाच्या बंदी खाण्यात बंदिस्त करणे व त्याच्याशी लटके भांडण करणे चोर शिपाई या रूपकांतून श्री विठ्ठलाचा निरंतर सहवास विठ्ठल हृदयात राहावा हा भक्ती भाव.

३. रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी

या झोपडीत माझ्या या कवितेचे कवी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे आहेत. या कवितेचा विषय म्हणजे अत्यंत साध्या राहणीतही प्रमोदच्या सुख साठलेले असते सुख व शांती माझ्या झोपडीत कशी मिळते याचे निवेदन या कवितेत केले आहे.

५. रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी

मी वाचतोय या कवितेचे कवी सतीश काळसेकर. कवितेचा विषय म्हणजे वेगाने बदलत जाणाऱ्या महानगरीय समाजाचे वास्तव्य चित्रण हा कवितेचा विषय आहे. जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन महानगरीय बदलते वास्तव यांतील अंतर विरोध कवींनी मांडला आहे कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्ट आहे यातील भावनांची आवाहकता प्रशासनीय आहे.

६. रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण

महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ही कविता शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली आहे. महाराष्ट्र ही कर्तृत्वाची भूमी आहे तिचे उपकार फेडण्यासाठी जीव कुर्बान करून टाका. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण व मराठी मनाची दृढ एक जुड हा आशय प्रत्येकारी शब्दात मांडला आहे.

७. रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी

निरोप या कवितेच्या कवयित्री पद्मा गोळे या आहे. रणांगणावर शत्रूशी लढायला जाणाऱ्या आपल्या मुलांमध्ये वीरश्री जागृत करणाऱ्या वीर मातेच्या मनातील विविध भावनांचे अर्थ चित्रण या कवितेत केले आहे.

८. रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी 

वनवास ही कविता तुकाराम धांडे यांनी लिहिलेली आहे. सह्याद्रीच्या डोंगरांतील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी प्रवारा नदीच्या खोऱ्यातील आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण या कवितेत केलेले आहे.

९. रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी

आपले जगणे आपली ओळख ही कविता संदीप खरे यांनी लिहिली आहे. तरुण पिढीने आपली वागणूक कशी ठेवावी व कोणत्या सकारात्मक गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे या कवितेमध्ये लिहिलेले आहे आपले जगणे मूल्यवान असावे माणुसकी जपावी कर्तुत्वाचे शिखर उभारून आदर्शवत पवित्र जीवन जगण्याची शिकवण ही कविता देते.

मित्रांनो वरील सर्व कवितांचे रसग्रहण आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत तुम्हाला यातील कुठली कविता रसग्रहण हवे असेल तर तुम्ही त्यावर क्लिक करा आणि त्या कवितेच्या रसग्रहणावर प्रवेश करा.

तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी फार फार शुभेच्छा आणि तुम्हाला तुमच्या शैक्षणिक जीवनाबद्दल काही माहिती हवी असेल कुठल्या अभ्यासाविषयी माहिती हवी असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद.

9th रसग्रहण : इयता नववी मराठी कुमारभारती कवितेचे रसग्रहण | Kaviteche Rasgrahan Std 9th Marathi

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post