उत्तमलक्षण कविता 10 वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण ।
जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ।।१।।
वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ ओळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ।।२।।
जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।३।।
तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये ।
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ।।४।।
आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिल्याविण करूं नये । कार्य कांही ।।५।।
सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।
पैज होड घालूं नये । कांहीं केल्या ।।६।।
कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये ।
परपीडा करूं नये । विश्वासघात ।।७।।
व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये ।
आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ।।८।।
सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये ।
कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ।।९।।
अपकीर्ति ते सांडावी । सत्कीर्ति वाडवावी ।
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ।।१०।।
संतकवी. संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते.
आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यानकाव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले. ‘दासबोध’ ही त्यांची संपूर्णस्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. ‘मनाचे श्लोक’ हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे.
संत रामदास यांनी या रचनेत आदर्शव्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत मार्गदर्शन केले आहे. सत्याचा मार्गस्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदास देतात.
उत्तमलक्षण कविता 10 वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
Tags:
मराठी कविता