नाटक- साहित्यप्रकार-परिचय स्वाध्याय | Natak Sahitya Prakar Parichay 11th

 

 नाटक- साहित्यप्रकार-परिचय स्वाध्याय | Natak Sahitya Prakar Parichay 11th | Maharashtra State Board 11th Marathi Solution


नाटक- साहित्यप्रकार-परिचय स्वाध्याय | Natak Sahitya Prakar Parichay 11th

1. योग्य पर्याय निवडा.

प्रश्न अ. ……………………….. हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.
(a) नाटक, कथा
(b) नाटक, एकांकिका
(c) नाटक, काव्य
(d) नाटक, ललित
Solutionः
(b) नाटक, एकांकिका हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.


प्रश्न आ. नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ………………………………… .
(a) अभिनय करणारा उपस्थित असतो.
(b) नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो.
(c) नाटकाची जाहिरात होते.
(d) नाटकाची संहिता वाचता येते.
Solutionः
(b) नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो.

प्रश्न इ. नाटक ही दृकश्राव्य कला आहे कारण
(a) खूप पात्रे त्यात सहभागी असतात.
(b) डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते.
(c) दिग्दर्शक, कथालेखक, नेपथ्यकार असतो.
(d) नृत्य, नाट्य, संगीत यांचा आविष्कार असतो.
Solutionः
(b) नाटक ही दृक-श्राव्य कला आहे कारण डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते.

2. चुकीचे विधान शोधा.

प्रश्न अ.
(a) अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाट्यपरंपरेला गती दिली.
(b) विष्णुदास भावे यांनी १८४३ साली ‘सीतास्वयंवर’ नाटकाचा प्रयोग केला.
(c) रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते.
(d) संगीत नाटकातील पदे ही आशयाला धरून कथानकाला गती देणारी असतात.
Solutionः
(c) रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते.

प्रश्न आ.
(a) नाटकाचा प्रयोग म्हणजे औटघटकेची करमणूक.
(b) नाटकाचा प्रयोग म्हणजे अंतर्मुख करणारा.
(c) नाटकाचा प्रयोग म्हणजे मनाचा तळ धुंडाळणारा.
(d) नाटकाचा प्रयोग म्हणजे सारं मन सोलवटणारा.
Solutionः
(a) नाटकाचा प्रयोग म्हणजे औटघटकेची करमणूक.


प्रश्न इ.
(a) परस्परविरोधी स्वभावांतून संघर्ष निर्माण होतो.
(b) नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते.
(c) भूमिकांच्या नात्यात परस्पर संघर्ष दाखवता येतो.
(d) भूमिका व परिस्थिती यांतील संघर्षामुळे नाटक परिणामकारक ठरते.
Solutionः
(b) नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते.

प्रश्न ई.
(a) नाटकात संहिता महत्त्वाची असते.
(b) नाट्यसंहिता परिपूर्ण असावी.
(c) नाट्यसंहिता दर्जेदार असावी.
(d) नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते.
Solutionः
(d) नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते.

3. प्रश्न अ. फरक स्पष्ट करा.

(a)
  
Solution :


(b)
  
Solution :
नाटकइतर साहित्य प्रकार
1. नाटक हा समूहाचा आविष्कार असून त्यात संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला या सर्व कलांचा समावेश असतो.कथा, कादंबरी व कविता हे इतर साहित्यप्रकार हे वाचकनिष्ठ आहेत.
2. नाटकामध्ये अनेक लोकांचा सहभाग असून असंख्य प्रेक्षक एकाच वेळी त्याचा दृश्य स्वरूपात अनुभव घेऊ शकतात.कथा व कादंबरी या साहित्यप्रकारात फक्त लेखक व वाचक हे दोनच घटक असतात.
3. नाटक सामूहिकरित्या रंगमंचावर, कलाकारांना सादर करता येते.कथा, कवितांचे वाचन रंगमंचावर करता आले तरी त्याचे सादरीकरण करता येत नाही.

प्रश्न आ. खालील कृती करा.

(a)
  
Solution :
  

(b)
  
Solution :
  

 

(c)
  
Solution :
  

(d)
 
  Solution

(e)
  
Solution :
  

(f)
  
Solution :
  

 

प्रश्न इ. खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.


  
Solution :

घटना/कृतीपरिणाम
1. एखादया प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या होतो.नाट्य निर्माण होते.
2. नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखननाटकाचे यश खात्रीलायक.
3. नाटकात संघर्ष असला तरकथानकातील आशयातरंगत येते किंवा नाटक परिणामकारक वठते.
4. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ला आलेला अनुभव, आनंद, दु:ख सांगावेसे वाटते.साहित्याची निर्मिती होते.
4. स्वमत.

प्रश्न अ. ‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
Solutionः
नाटक हे दृकश्राव्य माध्यम असल्याने ते लिहिणारे, अभिनय करणारे कलाकार, तंत्रज्ञ, प्रेक्षक, समीक्षक अशा सर्वांच्या सहकार्यावर नाटकाची यशस्विता अवलंबून असते. नाटकाचे सादरीकरण रंगमंचावर केले जाते. नाटकाचा प्रयोग आशय व प्रयोग या दोन्ही दृष्टीने देखणा होण्यासाठी अनेक जणांचा समन्वय व प्रयत्न महत्त्वाचे असतात. कलावंत, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, दिग्दर्शक यांचा समावेश त्यांत असतो. पडदयामागील कलाकारांचे श्रेयही यात तेवढेच आहे.

दिग्दर्शक : लेखकाच्या संहितेएवढेच दिग्दर्शकाचे महत्त्वही नाटकात अनन्यसाधारण आहे. नाटकाची तांत्रिक व कलात्मक बाजू या दोन्ही दृष्टीने दिग्दर्शक एकात्मिक विचार करतो. नृत्य, अभिनय, संगीत या कलांचीही जाण त्याला असणे महत्त्वाचे असते. संहितेवर नोंदी करून त्या कलाकार व तंत्रज्ञाला त्याची कल्पना त्याला दयावी लागते.

नेपथ्यकार : नाटकातील स्थळ, काळ व कथानकाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या दृश्यांना योग्य पडदे, वस्तू यांची मांडणी नेपथ्यकार करतो. कलाकारांचे कपडे, विग्ज, झालरी व त्याला अनुरूप संगीत, प्रकाशयोजना या सर्व घटकांचा अंतर्भाव नेपथ्यामध्ये असतो. कथानकाला साहाय्य होईल अशी रंगमंचावरील वातावरणनिर्मिती म्हणजे नेपथ्य.

प्रकाशयोजना : प्रकाशयोजनेसाठी रंगमंचावर विविध साधनांचा उपयोग केला जाते. फ्लडलाइट्स, स्पॉटलाइट्स, डीमर इ. रात्रीच्या प्रसंगात रंगभूमीवर अंधार दाखवण्यासाठी डीमरचा उपयोग करतात. एखादया मुख्य कलाकाराचा प्रवेश (एण्ट्री) स्पॉटलाइटच्या मदतीने तसेच प्रवेशबदलाची सूचनादेखील प्रकाशयोजनेतून दिली जाते. पार्श्वसंगीतः कथानकातील प्रसंगांना अनुकूल, पात्रांची मनस्थिती अधोरेखित करण्यासाठी, नाटक गतिमान करण्यासाठी आणि वातावरणनिर्मितीसाठी नाटकातील पार्श्वसंगीताचा वापर केला जातो. यादृष्टीने ‘लेकुरे उदंड झाली’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ यांचा उल्लेख करावा लागेल.

रंगभूषा : नाटकात रंगभूषेला फार महत्त्व आहे. नाटकातील व्यक्तिरेखेचे वय, स्वभाव या गोष्टी लक्षात घेऊन कलावंतांचा चेहरा रंगवणे म्हणजे रंगभूषा. लांबच्या प्रेक्षकांनासुद्धा नटांचा चेहरा व्यवस्थित दिसावा या दृष्टीने रंगभूषाकार काम करत असतो. त्यामुळे नाटकाच्या सादरीकरणात मेकअप, (रंगभूषा), वेशभूषा व केशभूषा या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. नाटकात निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा कलावंत आपल्या संवादफेकीतून, आवाजातील चढ-उतारांतून, हावभावातून आपल्या अभिनयाद्वारे सशक्तपणे लोकांसमोर जिवंत करतात.

प्रेक्षक : या नाटकाचे सादरीकरण पाहण्यासाठी महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे प्रेक्षकवर्ग यांच्या उपस्थितीत आणि त्यांनी दिलेल्या प्रतिसादानेच हा खेळ रंगत असतो. म्हणूनच नाटक हे एकाचे काम नसून तो एक सांघिक आविष्कारच म्हणता येईल. त्या सर्वांवर नाटकाची सफलता असते.

प्रश्न आ. तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
1. नाटकाचे नेपथ्य
2. नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व
3. नाटकातील संवाद
4. नाटक अनेक कलांचा संगम
5. प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
Solutionः
1. नाटकाचे नेपथ्य : नेपथ्य म्हणजे नाटकाच्या कथानकाला साहाय्यकारी ठरेल अशी रंगमंचावरील वातावरणनिर्मिती होय. हे नेपथ्य जो करतो तो नेपथ्यकार. कथानकातील स्थळ, काळ यांना सुसंगत ठरतील अशा वस्तू, नाटकातील नटांचे कपडे, त्यांना भूमिकेनुरूप लागणारे विग्ज, रंगमंचावर (स्टेजला) लागल्या जाणाऱ्या झालरी, प्रकाशयोजना आणि पोषक संगीत इत्यादी सर्व गोष्टींचा अंतर्भाव हा नेपथ्यामध्ये असतो. दृश्यांना, संवादांना अनुकूल अशी मांडणी नेपथ्यकार करतो.

2. नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व : प्रकाशयोजनेसाठी रंगभूमीवर विविध प्रकारची साधने वापरली जातात. प्रकाशयोजना हा नेपथ्याचाच भाग असतो. स्पॉट्स, फ्लडलाइट्स, फूटलाइट्स या सर्वच प्रकारच्या दिव्यांचा प्रकाश कमी-अधिक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विदयुत उपकरणाला ‘डीमर’ असे म्हटले जाते. नाटकात एखादा रात्रीचा प्रसंग दाखवायचा असेल तर या डीमरच्या साहाय्याने रंगभूमीवर संपूर्ण अंधार केला जातो. या प्रकाशयोजनेच्या माध्यमातून एखादया प्रवेशबदलाची सूचनादेखील देता येते.

3. नाटकातील संवाद : मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यांमधील विविध भाव-भावनांचे, अनुकरण करणारे चित्रण म्हणजे नाटक. या चित्रणासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद होत. लेखकाने लिहिलेले संवाद नाटकांतील पात्रांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात त्यामुळे प्रेक्षकांना नाटकाचा आनंद घेता येतो. खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवून रसिक प्रेक्षकांच्या टाळ्याही घेतात. नाटकाच्या विषयाला साजेसे उत्तम संवाद नाट्यातील आशय अचूक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. पात्रांच्या संवादफेकीच्या शैलीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना समजतो.

4. नाटक अनेक कलांचा संगम : महाकवी कालिदासाने म्हटल्याप्रमाणे भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे. पूर्वी लळित, दशावतार, वगनाट्य, तमाशे असे मनोरंजनाचे प्रकार होते. यातूनच नंतर नाटक हा प्रकार उदयास आला जो समूहाचा आविष्कार असतो. नाटकाशी संगीत, नृत्य, वक्तृत्व, कलाकारांचा अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला, रंगभूषा अशा बहुतेक सर्व कला संबंधित आहेत. नाटक हे दृक-श्राव्य माध्यम असल्याने कथेनुरूप आलेल्या संगीत, नृत्य, काव्यात्म व अर्थपूर्ण संवाद यांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येतो आणि त्यामुळे कथेचा आशय उत्तमरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.

अशा तहेने अनेक कलांचा संगम नाटकामध्ये झाला असल्याने त्यामध्ये रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. रंगमंचावरील सादरीकरणामुळे प्रेक्षकांना या कलांचा आस्वाद घेता येतो. त्यांच्या अनुभूतीने प्रेक्षकांच्या मनावरील ताण कमी होऊन त्यांचे रोजचे धकाधकीचे जीवन आनंदी व अर्थपूर्ण, समृद्ध करण्यात या कलांचे फार मोठे योगदान आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हणूनच नाटकाचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे.

5. प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा : नाटक रंगभूमीवर सादर होण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात अंधश्रद्धा, अनेक रूढी परंपरा, चालीरीती यांसारखे अनेक अडथळे होते. स्त्रीजीवन धर्मबंधनांमुळे जखडले होते. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. विचारांचे स्वातंत्र्य नव्हते. पुरुषप्रधान संस्कृती असल्याने सामाजिक वातावरणही पोषक नव्हते. स्त्रियांना घराबाहेर पडण्याचेदेखील स्वातंत्र्य नव्हते. फक्त ‘चूल व मूल’ हेच तिचे आयुष्य होते. त्यामुळे नाटकात काम करणे ही तर फारच चौकटीबाहेरची गोष्ट होती. त्यामुळे स्त्रिया तयारही होत नसत. त्यासाठी घरच्यांची परवानगी मिळणे तर फारच कठीण. त्यामुळे नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा या पुरुष पात्रेच साकारत असत. त्याकाळी नाटकातील कलावंतांना आजच्यासारखी प्रतिष्ठाही नव्हती. अशा परिस्थितीत बालगंधर्व यांनी अनेक नाटकांमध्ये स्त्री व्यक्तिरेखा सशक्तपणे साकारल्या आणि आजही त्यांच्या नाटकांतील पदे लोकांना भुरळ घालतात. त्यांच्या भूमिका त्यामुळेच अजरामर ठरलेल्या आहेत.


प्रश्न इ. नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
Solutionः
लोकसंवाद व लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू आहेत. लेखकाला जो विषय सांगायचा तो लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. नाटकांतून बदलत गेलेल्या समाजाचे चित्रण विविध विषयांतून झालेले दिसते आणि ही परंपरा फार जुनी आहे. त्या त्या काळातील वास्तव चित्रण नाटकातून होते. सामाजिक समस्या मांडल्या जातात. मानवी भाव-भावना, स्वभाव यांमधील विविध छटांचे दर्शन नाटकांतून होते. माणसाच्या आयुष्यातील अवतीभवती घडणाऱ्या अनेक प्रसंगांमधून प्रेरणा घेऊन नाटक साकार होते. पूर्वी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, हुंडा पद्धती, केशवपन इत्यादी सामाजिक ज्वलंत प्रश्न नाटकांच्या प्रयोगातून सादर केले जात. गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत शारदा’ या नाटकात जरठकुमारी विवाह या अनिष्ट प्रथेवर मार्मिक टीका केली आहे तर अनेक नाटकांनी बालविवाह, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण यांसारखे विषय निवडून चांगले विचार लोकांमध्ये रुजवून त्यांचा प्रसार करून जनजागृतीचे काम केले आहे. नाटक या दृक-श्राव्य माध्यमातून मनोरंजनाच्या साथीने समाज जागृती घडवण्याचे काम खूप वर्षांपासून आजपर्यंत केले गेले आहे म्हणून नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे.

प्रश्न ई. संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Solutionः
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
  • मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर ‘बोट’ ठेवले जाते.
  • संगीत नाटकाची रचना ही रसिक प्रेक्षकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन केलेली असते.
  • संगीत नाटकांत संवाद कमी असून संगीतावर जास्त भर दिलेला असतो.
  • संगीत नाटकातील संगीत व अभिनय यांमधून रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते.
  • शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा समावेश संगीत नाटकात असतो.
  • संगीत नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वैविध्यपूर्ण गाणी.
  • संगीत नाटकातील पदे ही आशयाला अनुरूप व कथानकाला वेग/गती देणारी असतात.
  • लोकगायकी व ख्यालगायकी यांचा उत्तम मेळ साधणारे संगीत हे संगीत नाटकाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय.
  • संगीत नाटकामध्ये गायकाला साथ-संगत करणाऱ्या सर्व कलावंतांचाही मोठा सहभाग असतो.
  • आजदेखील मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून राष्ट्रीय पातळीवर संगीत नाटकाची ओळख आहे.

प्रश्न उ. नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.
Solutionः
नाटकात संहितेला महत्त्वाचे स्थान आहे. नाट्यसंहिता परिपूर्ण व दर्जेदार असेल तर नाटकाला हमखास यश मिळते. सशक्त कथानक नाटकाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. नाटककार एक कथाबीज घेऊन त्याभोवती घटना व पात्र गुंफतो आणि कथानकात वैशिष्ट्यपूर्ण रचनेद्वारे नाटक रंगतदार करतो. त्यासाठी कथानक उत्तम असणे आवश्यक आहे. नाटककार आपल्या नाटकातून समाजातील सर्व स्तरांतील लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय मांडतो. नाटकाचे ध्येय सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडवणे असून ते घडवताना माणसांच्या मनातील भाव-भावना, स्वभाव लक्षात घेणे आवश्यक ठरते.

पात्रांच्या मनातील वृत्ती-प्रवृत्तींचे दर्शन होण्यासाठी स्वगताचा परिणामकारकरित्या वापर केलेला असतो. त्यासाठी नाटकातील कथानकाला अनुरूप पात्ररचना नाटककाराला करावी लागते. नाटकाचा तोल सांभाळला जाईल अशा पद्धतीने नाटकातील पात्रांच्या शाब्दिक चित्रणाची जबाबदारीसुद्धा नाटककाराला पार पाडणे आवश्यक असते. परस्परविरुद्ध स्वभाव, कृती व भाव-भावनांमधील तणाव यांमधून संघर्ष निर्माण होऊ शकतो.

कथानकातील आशयात संघर्ष येणे महत्त्वाचे. भूमिकांच्या परस्पर नात्यांमधील संघर्ष तसेच भूमिका व परिस्थिती यांमधील संघर्ष यामुळे नाटक परिणामकारक होऊन त्याची रंगत वाढते. त्यासाठी खटकेबाज, चुरचुरीत नर्मविनोदी संवादांची आवश्यकता असते. नाट्यातील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम नाटकातील संवाद करतात. कथानकामधील प्रसंग, दृश्य, काळ यांमधील बदलांसंबंधित सूचना कंसातील रंगसूचनांमधून नाटककार देतो त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जातात आणि त्यातील संदर्भ स्पष्ट झाल्यामुळे कथानकाचा प्रवाह सहजरित्या पुढे जातो.

आशयाला अनुरूप अशी भाषाशैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देण्याचे काम करते. त्यातील भाषिक सौंदर्य संपूर्ण नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • व्यावसायिक नाटकाच्या माध्यमाद्वारे सामाजिक प्रश्न मांडले जातात.
  • व्यावसायिक नाटकांचे स्वरूप हे प्रामुख्याने बोधपर व मनोरंजनात्मक असते.
  • एखादे गंभीर विषयावरील नाटक पाहतानासुद्धा प्रेक्षकांच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होईल याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते.
  • नाटक आणि प्रेक्षक यांच्यामध्ये एक प्रकारचे नाते तयार होते. व्यावसायिक नाटके ही कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवर अधिक प्रमाणात असतात.
  • व्यावसायिक नाटकाची मांडणी प्रेक्षकांच्या आवडीनुसार केलेली असते.
  • व्यावसायिक नाटकातील संवाद हे विनोद, उपहास, श्लेष व शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांची करमणूक होईल असे असतात.
  • व्यावसायिक नाटकाची निर्मिती बोध, मनोरंजन प्रेक्षकांना आवडणारी असून व्यावसायिक हेतूनेच झालेली असते.

प्रश्न ऊ. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Solutionः
प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये पुढीलप्रमणे :
  • प्रायोगिक नाटकामध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडण्याचा प्रयत्न केलेला असतो.
  • प्रायोगिक नाटकाच्या आकृतिबंधात नाविन्यपूर्णता असते.
  • या नाटकांमध्ये आशय किंवा अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते.
  • स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय व तंत्र यांमध्ये जाणीवपूर्वक प्रयोग केले जातात.
  • नाट्यबीज, नाट्यविषय, आशय व रचना त्याबरोबरच नाट्यप्रयोग, नेपथ्य यांमध्ये पारंपरिक नाटकापेक्षा वेगळेपणा या नाटकात दिसून येतो.
  • प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता आणि परिचित नसलेली सूचकता यांचा कौशल्याने वापर केलेला दिसतो.
  • भाषिक प्रयोग केले जातात तसेच घटना सहज व नैसर्गिक करण्याकडे कल असतो.
  • या नाटकांमधील संवाद बरेचदा बोलीभाषेप्रमाणे असतात.
  • प्रायोगिक नाटकात आशयाला अनुरूप असणाऱ्या घटना, प्रसंगांवर भर दिलेला असतो.
  • या नाटकामध्ये आपल्याला वाटते ते आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस केलेले दिसते.
 

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ. ‘नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.
Solutionः
नाटक हा कथा, कादंबरी, कविता यांप्रमाणे एक वाङ्मय / साहित्य प्रकार आहे. परंतु तो इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे. बाकीचे साहित्यप्रकार हे वाचकनिष्ठ आहेत परंतु नाटक हा समूहाचा आविष्कार असतो. नाटकात संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा बहुतेक सर्व कलांचा अंतर्भाव होतो. कथा कादंबऱ्यांमध्ये लेखक व वाचक हे दोनच घटक असतात पण नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून लेखकाचे शब्द नट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. नाटक हे दृक-श्राव्य साहित्य प्रकार असून ते ऐकता, पाहता व वाचता येते. नाटक रंगमंचावर दिग्दर्शनाच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, कलाकारांनी प्रेक्षकांसमोर सादर करायचे असते.

प्रश्न आ. विदयार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विदयार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.
Solutionः
शिक्षक-पालक : कुणाल, शालांत परीक्षेत तू ९७.२०% मिळवून घवघवीत यश आज मिळवले आहेस. त्याबद्दल तुझे सर्वप्रथम मनःपूर्वक अभिनंदन! खूप आनंद झाला आहे ना.


स्वमत:

प्रश्न 1. ‘लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू आहेत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
Solution :
नाटक ही आपल्या संस्कृतीमधील अगदी प्राचीन कला आहे. ज्याचे स्वतःचे शास्त्र आहे, अभ्यास आहे. एकाच वेळी अनेक विषयांना बांधून ठेवणारा हा साहित्य प्रकार आहे. या माध्यमातून एकाच वेळी अनेक लोकांशी संवाद घडतो. यातन लोकांशी संवाद साधता साधता त्यांचे मनोरंजन करता येते. जेव्हा जेव्हा समाजात काही बदल, घडामोडी होत असतात तर त्याचे प्रतिसाद मनुष्य स्वभावावर, मानवी जीवनांवर होत असतात.


त्यातून भावनिक, मानसिक, सामाजिक राजकीय संघर्ष होतात. त्याची दखल नाटकाचा नाटककार घेत असतो. त्या नाटकातून समाजात बदल टिपण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र ते प्रेक्षकांसमोर पोहोचवताना तो सुखात्मिका वा शोकात्मिकेच्या आधारे ते पोहोचवेल. त्याकरता नट रंगमंचावर सादरीकरण करताना अभिनय करतो. कृती, संवाद, स्वगत, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा यांच्या आधारे नाटकातून लोकांशी संवाद साधल्याने केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधनदेखील होते.

कृती : २.

प्रश्न 1. प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू → [ ]
Solutionः
प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू → नाटकाचा विषय आणि सादरीकरण यात प्रयोग करणे

कृती : ३.

प्रश्न 1. चौकट पूर्ण करा.
नाट्यवाङ्मयात प्रायोगिकता या वर्षानंतर आली → [ ]
Solution :
नाट्यवाङ्मयात प्रायोगिकता या वर्षानंतर आली. → १९६०

उपयोजित कती

स्वमत:

प्रश्न 1. आजच्या काळात करमणुकींचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही नाटक जिवंत राहिले आहे’ या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
Solution :
आजच्या काळात करमणुकीची विविध माध्यमे लोकप्रिय आहेत. दृकश्राव्य माध्यमात चित्रपट, डी.व्ही.डी., दूरचित्रवाणी, नाटक यांचा समावेश होतो. परंतु नाटक पाहणाऱ्या लोकांची संख्या आजदेखील लक्षणीय असण्याचे कारण म्हणजे समाजातील चालीरीती काळानुसार बदलल्या असल्या तरी माणसाचा स्वभाव, मानवी भावभावना या कायम राहिल्या आहेत. या मानवी भावभावना, स्वाभावांतील विविध छटांचे दर्शन प्रेक्षकाला नाटकातून घडते. नाटकांची निर्मिती ही मुख्यत: मनोरंजनाच्या हेतूने केली जात असली तरी प्रेक्षक स्वत:च्या अनुभवांचे नाटकात घडणाऱ्या प्रसंगांशी नाते जोडत असतो.

त्यामुळे नाटक हे त्याला आपले वाटते. मानवी जीवनातील नाट्य प्रेक्षकांना नाटकातून पहायला मिळते. नाटकाचे सादरीकरण रंगमंचावर होत असल्यामुळे प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येतो. त्यामुळे प्रेक्षकांना आत्मिक समाधान मिळते. जे इतर करमणुकीच्या माध्यमांतून मिळत नाही. प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न नाटकातून केला जातो. त्यामुळे नाटकाच्या प्रेक्षकांची संख्या अधिक आहे आणि करमणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही नाटक हा कलाप्रकार जिवंत राहिला आहे.

 

नाटक- साहित्यप्रकार-परिचय प्रास्ताविक :

ललित साहित्यप्रकारांमध्ये नाटक हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ला आलेल्या सुख-दु:खाचा अनुभव सर्वांना सांगावासा वाटतो. त्यातूनच साहित्यनिर्मिती होते. लेखकाला प्रतिपादन करायचा विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा नाटकातील महत्त्वाचा भाग असून नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. लोकसंवाद व लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू असतात. मानवी भाव-भावना स्वभाव तसेच समाजाचेही वास्तव दर्शन नाटकांतून होते. नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. नाटक दृक-श्राव्य साहित्य प्रकार असून ते कलाकारांनी रंगमंचावर सादर करायचे असते. भरतमुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हटले जाते. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

नाट्यसंहितेचे स्वरूप :

नाट्यसंहिता परिपूर्ण, दर्जेदार असेल तर नाटकाचे यश खात्रीदायक. सशक्त कथानक नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेते. नाटककार एक कथाबीज घेऊन त्याभोवती घटना व पात्र गुंफतो. वैशिष्ट्यपूर्ण रचनेने तो नाटकात रंगत आणतो. नाटकातील कथानकाला अनुरूप पात्ररचना नाटककार करतो. कथानकातील आशयात संघर्षामुळे रंगत येते. भूमिकांच्या परस्पर नात्यांतील संघर्ष, परिस्थिती व भूमिका यांमधील संघर्षामुळे नाटक परिणामकारक होते. नाटकातील महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. नाट्यकृतीतील आशय योग्य रितीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम संवाद करतात. संवाद, रंगसूचना व स्वगत या त्रयींनी नाट्यसंहिता तयार होते.

नाटक या साहित्यप्रकाराचे वेगळेपण :

कथा, कादंबरी, कविता या साहित्यप्रकारांपेक्षा नाटक हा प्रकार वेगळा आहे. नाटक हा सामूहिक आविष्कार आहे तर इतर साहित्य प्रकारांमध्ये फक्त लेखक व वाचक हे दोन घटक असतात. विष्णुदास भावे यांचे ‘सीतास्वयंवर’ हे आधुनिक मराठी नाटकांतील पहिले नाटक तर महात्मा फुले लिखित ‘तृतीयरत्न’ ही लेखन स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता होय. त्याआधी लळित, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, तमाशा अशा अनेक कला होत्या ज्या नाटकाच्या उदयास पूरक ठरल्या.

संगीत नाटक :

अण्णसाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत शाकुंतल’ व ‘संगीत सौभद्र’ या नाटकांनी भाषासौष्ठव, पात्र हाताळणी, नाट्यमयता, नाट्यतंत्र व स्वाभाविक संवाद या सर्व बाबतील एक मापदंड तयार केला. संगीताचा वापर हा त्यांतील महत्त्वाचा घटक होता.

संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये 

या नाटकांमध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडले जातात. यात संवाद तुलनेने कमी असून अभिनय व संगीत यांच्याद्वारे रसिकांना खिळवून ठेवले जाते. या नाटकांमध्ये शास्त्रीय संगीताचा समावेश असतो. आशयानुरूप व कथानकाला पुढे नेणारी यातील पदे असतात. विविधतापूर्ण गाणी हे या नाटकाचे वैशिष्ट्य असून लोकगायकी व ख्यालगायकी यांचा उत्तम संयोग यांतील संगीतात असतो. गायक व कलावंत यांचा फार मोठा सहभाग या नाटकांमध्ये असतो. १९०० सालच्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित संगीत मानापमान या नाटकाला गोविंदराव टेंबे यांचे संगीत होते.

यातूनच संगीत दिग्दर्शक ही संकल्पना पुढे आली. त्या काळातील ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’, ‘बळवंत नाटक मंडळी’ व ‘बालगंधर्व नाटक मंडळी’ यांनी संगीत नाटकाला समृद्धता प्राप्त करून दिली. त्या काळात अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांमुळे स्त्रिया नाटकात काम करण्यासाठी तयार नसत त्यामुळे नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा पुरुष पात्र साकारत. बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा मात्र आजदेखील अजरामर ठरलेल्या आहेत.

 

प्रायोगिक नाटक :

नाटकाचा विषय व सादरीकरण यांत प्रयोग करणे हा या नाटकांचा मुख्य हेतू. आशय व अभिव्यक्तीमध्ये जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते. काळ बदलला, प्रसारमाध्यमांमध्ये वाढ झाली, करमणुकीचे इतरही पर्याय उपलब्ध झाले. तिकिटांचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे झाले. त्यामुळे संगीत नाटक मागे पडत गेले व प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटकांना सुरुवात झाली.

प्रायोगिक नाटकांचे स्वरूप व वैशिष्ट्ये :

या नाटकांमध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडली जाते. आकृतिबंधात नाविन्यपूर्णता असून आशय व अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते. स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय व तंत्र यांत जाणीवपूर्वक बदल केलेला असतो. नाटकांचे बीज, नाटकाचा विषय, आशय, रचना, नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा वेगळेपणा असतो. भाषिक प्रयोग केले जातात. या नाटकांतील संवाद बरेचसे बोलीभाषेत असतात. या नाटकांमध्ये आशयानुरूप होणारे प्रसंगांचे प्रमाण अधिक असते. आपल्याला वाटणारे, आपल्या पद्धतीने या नाटकात मांडता येते.

व्यावसायिक नाटक :

व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकाहून अधिक काळाची परंपरा आहे. हे नाटक व्यावसायिक हेतूने लिहिले जाते व त्याच हेतूने नाटकाचा प्रयोग केला जातो. समाजातील समस्या घेऊन अनेक व्यावसायिक नाटके निर्मिली गेली.

व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :

या नाटकांच्या माध्यमातून तत्कालीन समस्या मांडल्या जातात. व्यावसायिक नाटकांचे स्वरूप मनोरंजनात्मक असते. नाटक व प्रेक्षक यांच्यात एका नात्याची निर्मिती होते. कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक व ऐतिहासिक विषयांवर व्यावसायिक नाटकांची निर्मिती होते. विनोद, उपहास, शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांची करमणूक होणारे संवाद या नाटकात असतात. नाट्यप्रयोग हे एक सांघिक कार्य आहे.

नाटक लिहिणारे, अभिनय करणारे कलावंत, तंत्रज्ञ, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, रंगभूषाकार आणि महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षक आणि या नाटकांचे समीक्षक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून नाटक साकार होते. या सर्वांच्या सहकार्यावर प्रयोगाची यशस्विता अवलंबून असते. पडदयामागच्या कलाकारांचीही यात महत्त्वाची भूमिका असते. नाटक या साहित्यप्रकाराची व्याप्ती व इतिहास खूप मोठा आहे.

समानार्थी शब्द/पर्यायी शब्द :

प्रवृत्ती - स्वभाव (nature), परिचय - ओळख (introduction), संहिता - कथानक (script), आधुनिक - सध्याचे (modern), आस्वाद - चव, रुची (flavour, taste), खर्चिक - महागडा (expensive), प्राचीन - जुने (ancient, primitive).

 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

‘नाटक’ या साहित्यप्रकाराचा परिचय व्हावा, या हेतूने प्रस्तुत माहितीचा अभ्यास करावा. दृकश्राव्य साहित्यप्रकार म्हणून ‘नाटक’ या साहित्यप्रकाराचे वेगळेपण आहे. संगीत नाटक, प्रायोगिक नाटक व व्यावसायिक नाटक या प्रकारांचे स्वरूप व वैशिष्ट्ये या भागामध्ये नमूद केली असून, नाटकाशी संबंधित असणारे घटक व त्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या माहितीतून नाट्यक्षेत्रातील व्यवसायाची नवी क्षितिजे तुम्हांला समजू शकतील व भाषिक अंगाने तुम्ही ‘नाटक’ या साहित्यप्रकाराचा आस्वाद घेऊ शकाल.

 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

‘नाट्यभिन्नरूचेर्जनस्य बहुध्यापेकं समाराधनम्!’- इति महाकवी कालिदास महाकवी कालिदासाने म्हटल्याप्रमाणे, ‘भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा, नाटक हा एक श्रेष्ठ वाङ्मयप्रकार आहे.’ ललित साहित्याच्या प्रकारांमध्ये ‘नाटक’ हा लोकप्रिय साहित्यप्रकार आहे. आपण जे ऐकले, पाहिले ते दुसऱ्याला सांगावे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ला आलेला अनुभव, आनंद, दु:ख हे सगळे सांगावेसे वाटते. त्यांतूनच साहित्याची निर्मिती होते. ‘नाटक’ या साहित्यप्रकाराच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. 

लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू असतात. तथापि लेखकाचा प्रतिपाद्य विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यातील महत्त्वाचा भाग असतो. मराठी साहित्यातील ‘नाटक’ या साहित्यप्रकाराचा विचार केला तर त्यांतून बदलत गेलेल्या समाजाचे चित्रण झालेले दिसते. कोणत्याही समाजातील चालीरीती कालपरत्वे बदलल्या असल्या तरी माणसाचा स्वभाव, मानवी भावभावना या गेली अनेक वर्षे कायम राहिलेल्या आहेत. या मानवी भावभावना, स्वभाव यांतील विविध छटांचे दर्शन नाटकांतून घडते. त्याचबरोबर समाजाचेही वास्तव चित्रण नाटकांतून होत असते. समाजातील बदल नाटकाच्या माध्यमातून मांडण्याची परंपरा फार प्राचीन आहे. नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे. म्हणून आपण नाटक या साहित्यप्रकाराचा परिचय करून घेणार आहोत. 

नाट्य म्हणजे... नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या घडतो, तेव्हा नाट्य निर्माण होते. हा बदल आश्चर्यकारक असतो, खळबळजनक असतो. त्यामुळे वाचकाला, प्रेक्षकाला अनपेक्षित धक्का बसतो. कधी तो सुखद असतो तर कधी दु:खद असतो. निसर्गात आणि मानवी जीवनात असे ‘नाट्य’ पाहायला मिळते. त्याचेच प्रतिबिंब नाटकात दिसून येते. नाटक म्हणजे... लेखकाने लिहिलेले नाटक हे कलाकारांनी सादर करायचे असते. चित्र किंवा शिल्प हे घडताच दिसू लागते; पण नाटक हे प्रत्येक वेळी करून दाखवावे लागते. नाटक हे दृकश्राव्य असल्याने ते लिहिणारे, त्याचा प्रयोग करणारे, प्रत्यक्ष अभिनय करणारे, तंत्रज्ञ आणि तो प्रयोग पाहणारे अशा सगळ्यांच्या समन्वयावर आणि सहकार्यावर नाटकाच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असते. 

नाटक हा कथा, कादंबरी, कविता याप्रमाणे एक साहित्यप्रकार आहे. यामध्ये अभिनेता किंवा अभिनेत्री अभिनय करत असतात. लेखकाने लिहिलेले संवाद अभिनेत्यांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात. मुळात नाटक हा ‘दृकश्राव्य’ साहित्यप्रकार आहे. ते ऐकता, पाहता व वाचता येते. नाट्यवाचनातून अन्य साहित्यप्रकारांप्रमाणे आपल्याला नाटकाचा आनंद घेता येतो. नाटक रंगमंचावर सादर करता येते. भारतात प्राचीन काळापासून नाट्यकला अस्तित्वात होती. भरतमुनी यांना ‘भारतीय नाट्यकलेचे जनक’ असे म्हणतात. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा ‘नाट्यशास्त्र’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. 

त्यांच्या मते, ‘नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यांतील वेगवेगळ्या भाव-भावनांचे, वृत्ती-प्रवृत्तींचे व लोकव्यवहारांचे अनुकरण करणारे चित्रण आहे.’ ‘मानवी जीवनात अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगांतून, घटनांमधून, जाणवणाऱ्या माणसामाणसांतील गुण-अवगुणांमधून त्यांच्यातील भावनांची आंदोलने, वास्तवाधारित परंतु काल्पनिक कथानकात गुंफून, ते उत्तम संवादलेखनातून, दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली, कलाकारांच्या अभिनयाद्वारे, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजे ‘नाटक’ होय.’ 

नाटक पाहणे म्हणजे फक्त औट घटकेची करमणूक नाही. कधी हसवणारा, सुखावणारा, कधी रडवणारा, दुखावणारा, कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडाळणारा, असा हा नाटकाचा खेळ. नाटक हा लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या साहाय्याने रंगभूमीवर सादर होणारा आणि त्याचप्रमाणे नाट्यगृहात समूहाने एकत्रितरीत्या आस्वाद घेता येईल असा कलाप्रकार आहे. नाटक हे जीवनाचे चित्र असते आणि ते कलाकारांच्या माध्यमातून सादर केले जाते. डोळ्यांनी पाहायचे आणि कानांनी ऐकायचे म्हणून ही दृकश्राव्य कला आहे. नाटक हे सांघिक कार्य आहे. * नाट्यसंहितेचे स्वरूप- नाटकात महत्त्वाची असते ती संहिता! नाट्यसंहिता जितकी परिपूर्ण, दर्जेदार तितकेच नाटकाचे यश खात्रीलायक. 

शब्द आणि कथानक जितके सशक्त, तितके नाटक उंचीवर जाणार, हे निश्चित! एक कथाबीज घेऊन नाटककार त्याभोवती घटना व पात्र यांची गुंफण करतो. कथानकात नाटककार वैशिष्ट्यपूर्ण रचना करून नाटक रंगतदार करतो. यासाठी कथानक दमदार असावे लागते. समाजातील विविध स्तरांतील लोकांना जिव्हाळ्याचे वाटणारे विषय नाटककार मांडतो. सामाजिक स्थितीचे यथार्थ आणि रसपूर्ण दर्शन घडवणे हे नाटकाचे ध्येय असते. अशा स्थितीचे दर्शन घडवताना माणसांच्या मनोव्यापारांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. पात्रांच्या मनोव्यापाराच्या दर्शनासाठी नाटकातील स्वगताचा परिणामकारकपणे वापर केला जातो. त्यामुळे नाटकातील कथानकाला साजेशी पात्ररचना नाटककाराला करावी लागते.

 नाटकातील पात्रांचे असे शाब्दिक चित्रण करणे, की ज्यामुळे नाटकाचा तोल सांभाळला जाईल, ही जबाबदारीही नाटककाराला पार पाडावी लागते. कथानकातील आशयात संघर्षाशिवाय रंगत येत नाही. परस्परविरोधी स्वभावांतून, कृतींतून, भाव-भावनांच्या तणावातून संघर्षनिर्माण होऊ शकतो. भूमिकांच्या परस्पर नात्यातील संघर्ष, भूमिका व परिस्थिती यांतील संघर्ष यांमुळे नाटक परिणामकारकपणे वठते. नाटकातील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद! खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवतात. नाट्यविषयाला साजेसे संवाद नाट्यकृतीतील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. संवादफेकीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना कळतो. संवाद, रंगसूचना व स्वगत या त्रयींनी नाट्यसंहिता तयार होते. कथानकातील प्रसंगबदल, दृश्यबदल, बदललेला काळ इत्यादी संबंधीची सूचना नाटककार कंसातील रंगसूचनांमधून देतो.

 त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जाऊन संदर्भ स्पष्ट होतात आणि कथानकाचा प्रवाह सहजतेने पुढे जात राहतो. आशयाला साजेशी भाषाशैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देते. त्यांतील भाषिक सौंदर्य एकूण नाटकाला एक उंची देते. * नाटक या साहित्यप्रकाराचे वेगळेपण- मानवाने मनोरंजनासाठी, आत्मिक समाधानासाठी ललितकलांचे विश्व निर्माण केले. ज्या समाजात ‘नाटक’ हा साहित्यप्रकार उदयास आला, त्या समाजात राहणाऱ्या लोकांच्या भावभावना नाटकातून प्रकट झाल्या. त्यामुळे ‘नाटक’ हा साहित्यप्रकार ‘विषयांच्या’ दृष्टीने समृद्‌ध होत गेला. 63 ज्ञान आणि मनोरंजन यांबरोबरच प्रेक्षक स्वत:च्या अनुभवांचे नाटकात घडणाऱ्या प्रसंगांशी नाते जोडत असतो. त्यामुळे त्याला ते आपले वाटते.

 कथा, कादंबरी, नाटक या सर्वच साहित्यप्रकारांत समाजाची समकालीन चित्रेरेखाटण्याचे सामर्थ्यअसते; परंतु कथा, कादंबरी, कविता यांपेक्षा नाटक हा साहित्यप्रकार निराळा आहे. बाकीचे साहित्यप्रकार हे वाचकनिष्ठ आहेत. नाटक हा समूहाचा आविष्कार असतो. नाटकामध्ये संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा बहुतेक सर्व कलांचा समावेश होतो. कथा आणि कादंबऱ्यांमध्ये फक्त लेखक आणि वाचक हे दोन घटक असतात. पण नाटकामध्येमात्र लेखकाचे शब्द नट संवादांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. विष्णुदास भावे यांनी लिहिलेले ‘सीतास्वयंवर’ हे आधुनिक मराठी नाटकांतील कालमानदृष्ट्या पहिले नाटक! एक सरळ पौराणिक गोष्ट सांगणारे हे नाटक १८४३ सालचे! त्याचप्रमाणे १८५५ साली महात्मा फुले यांनी लिहिलेली ‘तृतीय रत्न’ ही लिखित स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता होय. 

त्यापूर्वी लळीत, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, तमाशे अशा अनेक कला महाराष्ट्रात नांदत होत्या, ज्या नाटक या साहित्यप्रकाराच्या उदयास पूरक ठरल्या. संगीत नाटक अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘संगीत शाकुंतल’ व ‘संगीत सौभद्र’ या नाटकांद्वारे ‘संगीत नाटक’ कलात्मक पातळीपर्यंत पोहोचले. भाषासौष्ठव, पात्र हाताळणी, नाट्यमयता आणि नाट्यतंत्र, सहजसोपे स्वाभाविक संवाद अशा सगळ्या बाबतीत या नाटकांनी एक मापदंड तयार केला. त्यातही सर्वात अधिक महत्त्वाचा होता तो त्यातला संगीताचा वापर! संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये 
(१) मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांवर ‘बोट’ ठेवले जाते. 
(२) रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली असते. 
(३) संवाद तुलनेने कमी असतात. 
(४) अभिनय आणि संगीत यांतून रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. 
(५) संगीत नाटकात शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा अंतर्भाव असतो. 
(६) वैविध्यपूर्ण गाणी हे संगीत नाटकाचे वैशिष्ट्य असते.
 (७) पदे ही आशयाला धरून व कथानकाला गती देणारी असतात. 
(८) लोकगायकी व ख्यालगायकी यांचा उत्तम संयोग साधणारे संगीत हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते. 
(९) गायकाला साथ-संगत करणाऱ्या कलावंतांचाही यांत मोठा वाटा असतो. 
(१०) आजही मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्णभाग म्हणून ‘संगीत नाटक’ राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते. 

१९११ सालच्या सुमारास कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेले ‘संगीत मानापमान’ हे नाटक खूप लोकप्रिय ठरले. बालगंधर्वयांच्या विनंतीवरून गोविंदराव टेंबे यांनी ‘संगीत मानापमान’ या नाटकाला संगीत दिले व ते प्रचंड लोकप्रिय झाले. यांतून संगीत नाटकात ‘संगीत-दिग्दर्शक’ ही संकल्पना उदयाला आली. संगीत नाटकांमुळे ख्यालगायकीची लोकप्रियता वाढली. त्या काळातील ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’, ‘बळवंत नाटक मंडळी’, ‘बालगंधर्व नाटक मंडळी’ या व अशा अनेक नाटक मंडळींनी ‘संगीत नाटक’ समृद्‌ध केले. बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, भार्गवराम आचरेकर, जितेंद्र अभिषेकी व शौनक अभिषेकी, वसंतराव देशपांडे, जयराम शिलेदार व जयमाला शिलेदार, आनंद भाटे, राहुल देशपांडे, महेश काळे या व अशा अनेक नट-गायकांनी संगीत नाटकांची परंपरा जपली. 

64 नाटक रंगभूमीवर सादर होण्याच्या अगदी प्रारंभीच्या काळात अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांसारखेसामाजिक अडसर होते. तत्कालीन सामाजिक वातावरण पोषक नसल्यामुळेनाटकात काम करण्यासाठी स्त्रिया तयार नसत. नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा या पुरुष पात्राद्वारेसाकारल्या जात असत. तसेच त्याकाळात नाट्य कलावंतांना म्हणावी तशी प्रतिष्ठा नव्हती. अशा परिस्थितीत बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा मात्र आजही अजरामर ठरल्या आहेत. आजच्या काळात करमणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही नाटक ‘जिवंत’ राहिलेआहे. त्याच्या सादरीकरण-स्वरूपात काळानुसार बदल होत गेले. ‘रात्र-रात्र’ चालणारी संगीत नाटकेआणि त्या नाटकाशी तादात्म्य पावणारे प्रेक्षक हे चित्र आता बदललेअसलेतरी नाट्यरसिकांची संख्या आजही लक्षणीय आहे. प्रायोगिक नाटक जागतिकीकरणाच्या रेट्यात काळ बदलला. 

प्रसारमाध्यमांचा पगडा वाढला. फुरसतीचा वेळ कमी झाला. करमणुकीचेअनेक पर्याय उपलब्ध झाले. आर्थिकदृष्ट्या या नाटकांचेप्रयोग करणेतुलनेनेखर्चिक झाले. त्याचे तिकिटाचेदरही सर्वसामान्य लोकांना परवडेनासेझाले. या व यांसारख्या अनेक कारणांमुळेसंगीत नाटक मागेपडत गेले व प्रायोगिक अाणि व्यावसायिक नाटकांची सुरुवात झाली. प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतूनाटकाचा विषय आणि सादरीकरण यात प्रयोग करणेहा असतो. प्रायोगिक नाटकेही व्यावसायिकरीत्या केली जाऊ शकतात. मनाशी काही हेतूधरून आशयात व अभिव्यक्तीत जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते. 
नाट्यवाङ्मयात १९६० नंतर प्रायोगिकता आली असेमानले जाते. प्रायोगिक नाटकाचेस्वरूप व वैशिष्ट्ये 
(१) नाटकाची विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयत्न प्रायोगिक नाटकात केला जातो. 
(२) आकृतिबंधात नावीन्य असते. 
(३) आशय/अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतलेजाते. 
(४) स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय, तंत्र यांत जाणीवपूर्वक बदल घडवलेला असतो. 
(५) नाट्यबीज,नाट्यविषय, आशय व रचना तसेच नाट्यप्रयोग,नेपथ्य यांमध्ये पारंपरिक नाटकापेक्षा काहीसे वेगळेपण प्रायोगिक नाटकात जाणवते. 
(६) प्रायोगिक नाटकात प्रतीकात्मकता, अपरिचित सूचकता यांचा खुबीने वापर केलेला आढळून येतो. 
(७) भाषिक प्रयोग केलेजातात. घटना सहज व नैसर्गिक राखण्याचा प्रयत्न केला जातो. 
(८) या नाटकांमधील संवादाची भाषा बरेचदा बोलीभाषेसारखी असते. 
(९) प्रायोगिक नाटकात आशयानुरूप येणाऱ्या प्रसंगांवर भर दिलेला असतो. 
(१०) प्रायोगिक नाटकात ‘आपल्याला वाटणारेआपल्या पद्धतीने’ मांडायचेधाडस असते.

 ‘रिंगणनाट्य’(लेखक व दिग्दर्शक-अतुल पेठे, राजूइनामदार)हे प्रायोगिक नाटकाचेअलीकडच्या काळातील ठळक उदाहरण देता येईल. व्यावसायिक नाटक एकोणिसाव्या शतकात मराठी रंगभूमी लोकाश्रयावरउभी राहिली. काहीअपवाद वगळता अन्य भारतीय भाषांमध्ये व्यावसायिक रंगभूमी नाही. व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकाहून अधिक काळची परंपरा आहे. लोकरंजन व लोकप्रबोधन या दोन्ही स्तरांवर मराठी रंगभूमी ‘नाटक’ या साहित्यप्रकाराच्या माध्यमातून प्रगल्भ होत आहे. 65 केवळ व्यावसायिक हेतूने लिहिले जातेव तोच हेतूसमोर ठेवून त्याचा नाट्यप्रयोग केला जातो. प्रेक्षकांना आवडेल ‘ते’ व ‘तसे’ देण्याचा प्रयत्न व्यावसायिक नाटकांतून केला जातो. समाजातील ज्वलंत समस्या घेऊन, वेगवेगळे विषय हाताळून अनेक व्यावसायिक नाटकांची निर्मिती झाली. 
व्यावसायिक नाटकाचेस्वरूप व वैशिष्ट्ये 
(१) व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून सामाजिक समस्या मांडल्या जातात. 
(२) व्यावसायिक नाटकांचे स्वरूप मुख्यत: बोधपर व मनोरंजनपर असते.
(३) गंभीर विषयावरील नाटक पाहतानासुद्धा प्रेक्षकांच्या मनावरचा ताण कमी व्हावा याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते. 
(४) नाटक आणि प्रेक्षक यांच्यात एक नाते निर्माण होते. 
(५) व्यावसायिक नाटकांचा भर कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा विषयांवर असतो.
(६) प्रेक्षकांच्या अभिरूचीनुसार व्यावसायिक नाटकाची मांडणी केलेली असते. 
(७) विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोट्या याद्वारे प्रेक्षकांचेमनोरंजन होईल असेसंवाद व्यावसायिक नाटकात असतात. 
(८) व्यावसायिक नाटकाच्या निर्मितीमागेबोध, रंजन, प्रेक्षकानुनय या प्रेरणांबरोबरच प्राधान्यानेव्यावसायिक हेतूअसतात. 

‘ऑल दि बेस्ट’ (लेखक व दिग्दर्शक- देवेंद्र पेम) या नाटकात गंभीर विषयाची मांडणी विनोदी अंगाने केल्यामुळेव्यावसायिकदृष्ट्या हेनाटक यशस्वी ठरले. विष्णुदास भावे यांनी १८४३ साली ‘सीतास्वयंवर’ नाटकाचा प्रयोग केला. मराठीतील श्रेष्ठ संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी यानाट्यपरंपरेला गती दिली. कालपरिवर्तनाला सामोरे जात ती परंपरा अखंडपणेचालू राहिली.

 मराठीतील काही प्रमुख नाटककार व त्यांच्या काही नाट्यकृतींची नावेखालीलप्रमाणेआहेत. गोविंद बल्लाळ देवल (संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ) श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (वीरतनय, मूकनायक) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (कीचकवध, भाऊबंदकी) राम गणेश गडकरी (प्रेमसंन्यास, भावबंधन, एकच प्याला) वि. दा. सावरकर- (संगीत सन्यस्त खड्ग, संगीत उत्तरक्रिया) प्र. के. अत्रे (साष्टांग नमस्कार, मोरूची मावशी) वसंत कानेटकर- (रायगडाला जेव्हा जाग येते, इथेओशाळला मृत्यू) वि. वा. शिरवाडकर- (नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला) पु. ल. देशपांडे- (सुंदर मी होणार, ती फुलराणी) विजय तेंडुलकर- (घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर) दत्ता भगत- (वाटा पळवाटा, खेळिया) प्रेमानंद गज्वी- (किरवंत, छावणी) जयवंत दळवी- (महासागर, बॅरिस्टर) इरावती कर्णिक- (गाशा, बाळकडू) मनस्विनी लता रवींद्र- (अमर फोटो स्टुडिओ, अलविदा) इत्यादी, इत्यादी ........ 

 नाटक- साहित्यप्रकार-परिचय स्वाध्याय | Natak Sahitya Prakar Parichay 11th

  • Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
  • Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय
  • 11th Marathi Digest Chapter 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Textbook Questions and Answers
  •  नाटक- साहित्यप्रकार-परिचय स्वाध्याय | Natak Sahitya Prakar Parichay 11th
  • Chapter 3: नाटक- साहित्यप्रकार-परिचय
  • Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board Chapter 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचयकृती
  • Class 11 Marathi Yuvakbharati -Bhag 3 Natak Sahitya Prakar Parichay/नाटक - साहित्यप्रकार - परिचय.
  • साहित्यप्रकार-परिचय – Maharashtra Board Solutions

 नाटक- साहित्यप्रकार-परिचय स्वाध्याय | Natak Sahitya Prakar Parichay 11th

भाग-1
Chapter 1 मामू
Chapter 2 प्राणसई
Chapter 3 अशी पुस्तकं
Chapter 4 झाडांच्या मनात जाऊ
Chapter 5 परिमळ
Chapter 6 दवांत आलिस भल्या पहाटीं

 भाग-२

Chapter 7 ‘माणूस’ बांधूया!
Chapter 8 ऐसीं अक्षरें रसिके
Chapter 9 वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
Chapter 10 शब्द
Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार
Chapter 12 पैंजण

भाग-३ साहित्यप्रकार

Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय
Bhag 3.1 हसवाफसवी
Bhag 3.2 ध्यानीमनी
Bhag 3.3 सुंदर मी होणार

भाग-४ उपयोजित मराठी

Bhag 4.1 सूत्रसंचालन
Bhag 4.2 मुद्रितशोधन
Bhag 4.3 अनुवाद
Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन
Bhag 4.5 रेडिओजॉकी

भाग-५ व्याकरण

Bhag 5.1 शब्दशक्ती
Bhag 5.2 काव्यगुण
Bhag 5.3 वाक्यसंश्लेषण
Bhag 5.4 काळ
Bhag 5.5 शब्दभेद

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post