अशी पुस्तकं स्वाध्याय | Ashi Pustak Swadhyay 11th | Maharashtra State Board 11th Marathi Solution
विद्यार्थी मित्रांनो आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये अशी पुस्तक या धड्याची प्रश्न उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्ही या अशी पुस्तकं या प्रश्नोत्तरांचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि जास्तीत जास्त मराठीचा अभ्यास करावा म्हणून आम्ही ही ब्लॉग पोस्ट घेऊन आलो आहेत तुम्हाला मी सांगू इच्छितो की आम्ही अशाच नवीन नवीन प्रकारच्या स्वाध्यायाची ब्लॉग पोस्ट घेऊन येत आहोत म्हणजेच तुम्ही आमच्या या निर्णयाकडे मी ऑफिशिअल वेबसाईट वर पाहू शकतात की आम्ही अकरावी विषयी खूप साऱ्या धड्याचे प्रश्न उत्तर यांच्या ब्लॉग पोस्ट घेऊन आलो नाही तुम्ही या सर्वांचा नीट सराव करून आपल्या इयत्ता अकरावी मराठीचा पेपर साठी तयारी करावी
निर्मळे अकॅडमी तुमच्या साठी खूप कष्ट करत आहेत कारण हीच निर्माण केले मी तुमच्यासाठी खूप सार्या प्रकाश जाम अभ्यासाविषयी लेख घेऊन येण्याचा दिवस रात्र एक करून प्रयत्न करत आहेत तरी तुम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल ते आम्हाला विचारू शकतात म्हणजेच तुमच्या एका कमेंट मुळे आम्हाला सर्व विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम समजण्यास मदत होईल चला तर पाहूया अशी पुस्तके स्वाध्याय इयत्ता अकरावी
कृती 1. अ. तुलना करा.
SOLUTION:
‘पुस्तकरूपी’ मित्र | ‘मानवी’ मित्र |
उत्तेजक, आनंददायी | मित्र दुरावतात. |
प्रेम, भावना, विचारांनी ओसंडणारं | मित्रांना कधी कधी प्रेमाची विस्मृती होते. |
विशाल अंत:करण, निःस्वार्थीपणा | वैर, स्वार्थीपणा या भावनेत अडकतात. |
उत्कट अनुभूती देणारे | विश्वासघातकी असतात. |
आ. कारणे लिहा.
प्रश्न अ. ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण……….
SOLUTION:
लेखक हा ग्रंथप्रेमी वाचकाप्रमाणे पुस्तकांवर मनापासून प्रेम करणारा आहे. त्यामुळे पुस्तकांची हेळसांड करणारे, पुस्तकांकडे व्यवहारी दृष्टीने पाहणारे लोक यांच्याविषयी लेखकालाही चीड आहे. तोही ग्रंथप्रेमी वाचकाप्रमाणे गंथांना आपल्या कपाटात जिवापाड जपून ठेवतो. म्हणून ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत.
प्रश्न आ. प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक दयायचं नाही असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला कारण …
SOLUTION:
पुस्तक प्रेमीने अतिशय प्रेमाने, जिवापाड जपलेली दोन कवितेची पुस्तकं एका कवीला वाचण्यासाठी दिली. पण पंधरा दिवस झाले तरी त्याने ती पुस्तके परत केली नाहीत. उलट मी ती पुस्तके नेलीच नाहीत. असा कांगावा त्याने केला. या कटू अनुभवामुळे प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक दयायचं नाही असा निश्चय पुस्तकप्रेमीने केला.
प्रश्न इ. रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहेट कारण…..
उत्तर :
रसिकता ही एक वृत्ती आहे. त्यामुळे तिचं अस्तित्व हे वयावर नव्हे तर मनावर अवलंबून असते. कलात्मक-आशयामधून साहित्य आपल्याला समृद्ध करतं. आपल्या जाणिवा त्यामुळे विस्तारतात, वैचारिक क्षमता वाढतात. रसमय पुस्तकांमुळे चित्तवृत्ती प्रसन्न होतात. या सर्व भावनेचा अनुभव घेऊन आपली रसिकवृत्ती अधिक बहरते. पुस्तके माणसाला कलात्मक आनंद देतात. माणसाच्या मनाला ताजेतवाने करतात. हा अनुभव कोणत्याही वयात घेता येतो. कारण वाचन संस्कृती ही कालातीत आहे. तिला वेळ-काळ-स्थळ-वय यांचे बंधन नाही म्हणूनच रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिक आहे.
इ. कृती करा.
प्रश्न 1.
उत्तर :
प्रश्न 2.
उत्तर :
2. अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न अ. दुधाने तोंड पोळल्याने ताक कुंकून पिणे
उत्तर :
दुधाने तोंड पोळल्याने ताक कुंकून पिणे – एका वाईट अनुभवामुळे दुसऱ्या तशाच प्रकारच्या अनुभवाला सामोरे जाताना, प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.
प्रश्न आ. पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे .
उत्तर :
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे – आईच्या घरी आल्यासारखे वाटणे.
3. व्याकरण :
अ. सूचनेनुसार सोडवा.
प्रश्न 1. ‘चवदार’ सारखे शब्द लिहा. …………… ………… …………….. …………..
उत्तर :
धारदार, फौजदार, डौलदार, लज्जतदार
प्रश्न 2. जसे विफलताचे वैफल्य, तसे –
अ. सफलता → ……….
आ. कुशलता → ……….
इ. निपुणता → ……….
SOLUTION:
अ. सफलता → साफल्य
आ. कुशलता → कौशल्य
इ. निपुणता → नैपुण्य
आ. शब्दाच्या शेवटी ‘क’ असलेले चार शब्द लिहा. उदा. ‘उत्तेजक’
प्रश्न आ. शब्दाच्या शेवटी ‘क’ असलेले चार शब्द लिहा. उदा. ‘उत्तेजक’
……… ……….. ……… ……….. ………..
SOLUTION:
प्रोत्साहक, मारक, प्रायोजक, आयोजक, समन्वयक
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं
इ. या शब्दगटातील विशेषणे ओळखा.
प्रश्न 1. या शब्दगटातील विशेषणे ओळखा.
SOLUTION:
4. स्वमत :
प्रश्न अ. वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.
SOLUTION:
‘अशी पुस्तकं’ या पाठाद्वारे लेखक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते असे सांगितले आहे. पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना वैचारिक साहित्य हे मानवी मनाला नेहमी प्रेरणा देते असा व्यापक दृष्टिकोन लेखकाने येथे व्यक्त केला आहे. वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव हे वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेरणादायी असतात. माणसाला जगण्याचे बळ देतात. मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण कसं असावं हे पुस्तकं सांगतात.
वैचारिक साहित्याद्वारे विविध मूल्यांची शिकवण माणसाला मिळते. माणुसकी, न्याय, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची वृत्ती, समता, बंधुता, सहृदयता अशा विविध मूल्यांची शिकवण वैचारिक साहित्यामुळे माणसाला मिळते. माणसाचे मन व्यापक व उदार बनवण्यात वैचारिक साहित्याचा फार मोठा वाटा असतो, वैचारिक साहित्य हे प्रबोधनपर व मार्गदर्शनपर असते. वैचारिक साहित्यामुळे विचारांची पायाभरणी मजबूत होते. एकूणच मानवी जीवन अर्थपूर्ण, समृद्ध करण्यास वैचारिक साहित्य सहकार्य करते.
प्रश्न आ. पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION:
‘अशी पुस्तक’ या पाठातून डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असे सांगितले आहे. पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे. पुस्तके ही माणसाची जगण्याची हिंमत वाढवतात. प्रेरणा देतात. पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात.
जगातील सर्वांत सुंदर वस्तू म्हणजे पुस्तक असा व्यापक दृष्टिकोन लेखकाचा आहे. आपल्याजवळ जे काही चांगलं आहे ते सगळं देण्याची वृत्ती पुस्तकांची असते. पुस्तके माणसाला भरभरून प्रेम देतात. लेखकाची पुस्तकांवर आत्यंतिक निष्ठा आहे. लेखकाच्या मते पुस्तके ही माणसाला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात. जीवनाला नवचैतन्य देतात.
लेखकाच्या मते कोणतेही साहित्य हे नवे जुने नसते. पुस्तके ही नेहमी मनाला मंत्रमुग्ध करणारी, हसवणारी, रडवणारी, अंतरंगाला भिडणारी असतात, जगण्याचा अर्थ पुस्तकं सांगतात. एकूणच पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तकांविषयीचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे.
प्रश्न इ. हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
SOLUTION:
क्रूर नियती व दुर्बल परंतु महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यामध्ये कधीही न संपणारे युद्ध वर्षानुवर्षे चालत आलेले आहे. जीवन एक संघर्ष आहे. नियती क्रूर आहे असं आपण अनेकवेळा म्हणतो ते अगदी खरं आहे. आज जगण्या-मरण्याचा खेळ अखंड चाललेला आहे. स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. मरणाच्या, संकटाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळ टाकलं तरी ते आपण तोडून, फेकून दयायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर संचार करायचा.
परिस्थितीशी झुंज देत आयुष्याचा आनंदाने उपभोग घ्यायचा असं प्रत्येकाला वाटतं पण घडतं वेगळंच, कारण निष्ठुर नियती आड येते. पण निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली तरी, त्याच्या मार्गात अनेक संकटे, अडचणी निर्माण करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की, दुर्बल वाटणारा माणूस नियतीचा पराभव करून विजयाच्या दिशेने घोडदौड करणार आहे. कारण दुर्दम्य विश्वास, आशा व संघर्ष करण्याची तयारी यांच्या बळावर माणूस नियतीशी कायमच लढत आला आहे.
अभिव्यक्ती :
प्रश्न अ. उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
SOLUTION:
‘अशी पुस्तकं’ या पाठातून लेखक डॉ.निर्मलकुमार फडकुले यांनी माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण असुन उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. अशी व्यापक भूमिका मांडली आहे. महात्मा गांधीजींची आत्मकथा, व्हिक्टर ह्यूगो आणि मून्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रनाथ टागोरांची ‘गार्डनर’ व ‘गीतांजली’, शेक्सपिअरची नाटकं ‘संत तुकारामांचे अभंग’, ‘संस्कृत महाकवी’ कालिदासाचे मेघदूत, टॉलस्टॉपची ‘अॅना करनिना,’ जी.ए. कुलकर्णी यांच्या कथा, हेमिंग्वेचं ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ अशा विविध प्रकारांच्या रसमय साहित्याशी माणसाचे नाते जोडले जाते. उत्तम साहित्य वाचनाने माणसांचा एकाकीपणा दूर होतो.
पुस्तकांच्या जगात शिरले की मनावरचे मळभ दूर होते. आयुष्यात आलेल्या दुःखमय प्रसंगात दुःखी, निराश विचार दूर करण्याचे तसेच मनातील अंधार दूर करून चैतन्य निर्माण करण्याचे काम पुस्तके करतात. पु.ल.देशपांडे यांच्या अनेक पुस्तकांनी वाचकांच्या मनावरील ताणतणाव कमी करून दुःख विसरायला लावून आपले आयुष्य हसरे केले आहे.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं
प्रश्न आ. निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले आहेत. हे विधान स्पष्ट करा.
SOLUTION:
‘अशी पुस्तकं’ या पाठाद्वारे डॉ.निर्मलकुमार फडकुले यांनी पुस्तकांचे महत्त्व वर्णन करण्याबरोबर पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोनही सांगितला आहे. लेखकाच्या मते जगातील सर्वात सुंदर वस्तू म्हणजे पुस्तकांवर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं या जगात आहेत. पुस्तकांवर उदंड प्रेम करणारी माणसं दुसऱ्याला पुस्तकं देताना चिंतीत होतात.
पुस्तकांची हेळसांड करणारी, पुस्तकांकडे व्यवहारी दृष्टीने पाहणाऱ्या माणसांचा पुस्तकप्रेमी लोकांना राग येतो, पुस्तकप्रेमी माणसे पुस्तकांवर आपल्या अपत्याप्रमाणे (मुलांप्रमाणे) प्रेम करतात. अशा पुस्तक प्रेमी लोकांना वाचायला भरपूर ग्रंथ असले तर त्यांना जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदमय वाटते, पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा स्मशानासारखा वाटतो. अनेक प्रसिद्ध लेखकांची नावेही आजच्या तरुण पिढीला माहीत नाहीत. एकूणच पुस्तकांवर स्वतःच्या जीवापेक्षा उदंड प्रेम करणारे पुस्तकांवर निष्ठा, श्रद्धा असणारे वाचक आता फारच कमी होत चालले आहेत अशी खंत लेखकाने व्यक्त केली आहे.
शब्दसंपत्ती :
पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
प्रश्न अ. पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारे : ………..
SOLUTION:
पाक्षिक
प्रश्न आ. ज्याला एकही शत्रू नाही असा : ………
SOLUTION::
अजातशत्रु
प्रश्न इ. मंदिराचा आतील भाग : ……….
SOLUTION:
गाभारा
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं
प्रश्न ई. गुडघ्यापर्यंत हात लांब असणारा : ………….
SOLUTION:
आजानुबाहु
प्रश्न उ. केलेले उपकार न जाणणारा : ……….
उत्तर:
कृतघ्न
प्रकल्प.
प्रश्न 1. जी. ए. कुलकर्णी, भा. द. खेर, दुर्गा भागवत, व्यंकटेश माडगूळकर या साहित्यिकांची माहिती व यासंबंधीचे संदर्भसाहित्य वाङ्मय कोशातून शोधून लिहा.
खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.
खालील कृती सोडवा.
प्रश्न 1.
SOLUTION:
प्रश्न 2.
SOLUTION:
प्रश्न 3.
SOLUTION:
चौकट पूर्ण करा.
प्रश्न 1.
SOLUTION:
परिणाम लिहा.
प्रश्न 1
SOLUTION:
पुस्तकांना स्पर्श केला की आपले अंत:करण विचारांनी आणि भावनांनी ओसंडून जाते.
उपयोजित कृती
खालील पठित गदध उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.
प्रश्न अ. ‘काळजीपूर्वक’ या शब्दापासून चार शब्द तयार करा.
SOLUTION:
- काळ
- पूर्व
- कळ
- काक
प्रश्न आ. ‘अंतरंग’ या शब्दापासून चार शब्द तयार करा.
SOLUTION:
- अंत
- रंग
- तरंग
- गत
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं
प्रश्न इ. ‘विश्वासघातकी’ या शब्दापासून चार शब्द तयार करा.
SOLUTION
- विश्वास
- श्वास
- घात
- घास
खालील वाक्यातील विशेषण ओळखा.
प्रश्न 1. आत्यंतिक प्रेम करणारी माणस मी पाहिली आहेत.
SOLUTION:
आत्यंतिक.
खालील शब्दासाठी योग्य समानार्थी शब्दांचा पर्याय निवडा.
प्रश्न 1. वैर – शत्रुत्व, क्रूर, अपमान, विरस
SOLUTION:
शत्रुत्व.
गटात न बसणारा शब्द ओळखा.
प्रश्न 1. अंतरंग, मन, चित्त, अर्थ
SOLUTION
अर्थ
प्रश्न 2. विस्मृती, विसर, विस्मरण, स्मरण
SOLUTION
स्मरण
स्वमत :
प्रश्न 1. माणसाच्या जडणघडणीत असलेल्या पुस्तकाची भूमिका तुमच्या शब्दात व्यक्त करा.
SOLUTION
‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती जुनी असली तरी त्या उक्तीचे महत्त्व आताच्या जमान्यातही तसूभर कमी झालेले नाही. कारण माणसाचा सर्वागीण विकास होण्यासाठी पुस्तकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. वाचनाची आवड लहानपणीच मुलांमध्ये रुजवली तर मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होते. त्यांची विचारप्रवृत्ती वाढते. आकलन व स्मरणशक्ती दोन्हीचा विकास होतो.
आत्मविश्वास वाढतो. जिद्दीने काम करण्याची नवी प्रेरणा मिळते. वाचनाचा छंद जोपासल्याने आपल्याला मानसिक समाधान मिळते. पुस्तकातील समृद्ध विचार आपल्याला जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याची दृष्टी देतात, किमान साक्षरता समाजात नसेल तर जनजागृतीचा प्रयत्न फसतो. ज्या समाजात निरक्षर व्यक्ती अधिक असतात त्या समाजात गुन्हेगारी, दंगली वाढीस लागतात. वाचनकौशल्यात मागे असणारे लोक बऱ्याच वेळा बेकार राहतात व गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात.
लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी वाचन-लेखन इ.गोष्टी नागरिकांना येणे फार गरजेचे आहे. वाचन दुर्बलता किशोरवयीन मुलांच्या विकासावर परिणाम करते. वाचनाअभावी भावनिक दुर्बलता निर्माण होते. अशी बालके ‘माणूस’ म्हणून संवेदनशीलता वाचनाअभावी हरवून बसतात. थोडक्यात पुस्तके वाचण्याचे व्यक्तिगत व सामाजिक असे दोन्ही फायदे आहेत. उत्तम प्रशासक, उत्तम शिक्षक, कार्यक्षम, सुसंस्कारीत भावी पिढी ही वाचनातूनच तयार होते.
संवेदनशील मनाच्या वाढीसाठी हे विचार कारणीभूत ठरतात, त्यामुळे इतरांचा आपण माणूस म्हणून विचार करायला लागतो, चांगले संस्कार होण्यासाठी, समाजाबाबत आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान येण्यासाठी पुस्तकांची भूमिका मोलाची ठरते, माणुसकी, समता, न्याय, बंधुत्व, सहृदयता या मूल्यांची शिकवण आपल्याला पस्तकामुळे मिळते. कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी वाचन करून नवीन ज्ञान व माहिती आत्मसात करणे गरजेचे आहे. अशा त-हेने माणसाच्या जडाघडणीत पुस्तकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
सुखदुःखाच्या प्रसंगी पुस्तकांमुळे आपल्या मनावरील ताण कमी होतो. पुस्तके जगण्याची हिंमत वाढवितात.
प्रश्न 2. ‘माझी पुस्तक हीच माझी अपत्यं’ हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
डॉ. निर्मलकुमार फडकुले यांनी माणसांच्या जडणघडणीत पुस्तकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते हे सांगितले आहे. पुस्तके ही माणसाला जन्मभर सोबत करतात. एका ग्रंथप्रेमी वाचकाने ‘माझी पुस्तकं हीच माझी अपत्यं आहेत’ अशी प्रतिक्रिया लेखकाजवळ व्यक्त केली. ग्रंथप्रेमीचे पुस्तकांवर अतिशय प्रेम होते. आपल्याकडे असणाऱ्या पुस्तकांना त्याने जिवापाड सांभाळले होते. आपण आपल्या अपत्यावर जिवापाड प्रेम करतो. त्यांचा सांभाळ करतो.
त्याला काही दुखल-खुपलं तर आपण व्याकुळ होतो तसेच ग्रंथप्रेमी वाचक आपले जिवापाड जपून ठेवलेले पुस्तक लेखकाला देताना व्याकुळ झाला होता. लेखकाला पुस्तक देण्याआधी ग्रंथप्रेमीने अनेक सूचना केल्या. पुस्तक काळजीपूर्वक वापरा, त्याची पाने दुमडू नका, पुस्तकावरचं कव्हर काढू नका. पुस्तकांशी निर्दयी चाळा करू नका. अशा अनेक सूचना केल्या. कारण त्याचं त्याच्या पुस्तकांवर मुलांप्रमाणेच प्रेम होतं. या आधी एका व्यक्तीला दिलेलं पुस्तक त्यांच्याकडे परत आले नव्हते. प्रत्येक व्यक्तीला आपली मुले म्हणजे सर्वस्व असते त्याना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तो खूप काळजी घेत असतो.
तेवढेच प्रेम ग्रंथप्रेमीचे पुस्तकांवर होते. आपली मुले आपल्याबरोबर असली की आपण नेहमीच आनंदी असतो आणि ती आपल्या सोबत नसतील तर आपले कोठल्याही गोष्टीत लक्ष लागत नाही. तेवढ्याच उत्कटतेने ग्रंथप्रेमी आपल्या पुस्तकांशी आपुलकीने वागतो म्हणून तो म्हणतो माझी पुस्तकं हीच माझी अपत्यं.
अशी पुस्तकं स्वाध्याय | Ashi Pustak Swadhyay 11th ( मराठी युवकभारती )
डॉ. निर्मलकुमार फडकुले(१९३० ते २००६) :
संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, प्रसिद्ध वक्ते. त्यांनी लिहिलेली अनेक स्वतंत्र व संपादित पुस्तके प्रसिद्ध. ‘कल्लोळ
अमृताचे’, ‘चिंतनाच्या वाटा’, ‘प्रिय आणि अप्रिय’, ‘सुखाचा परिमळ’ हे साहित्य;
‘संतकवी तुकाराम : एक चिंतन’, ‘संत
चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना’, ‘संतांचिया भेटी’, ‘संत वीणेचा झंकार’, ‘संत तुकारामांचा जीवनविचार’ ही संत
साहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके तसेच ‘
समाजपरिवर्तनाची चळवळ : काल आणि आज’, ‘साहित्यातील प्रकाशधारा’ हे
लेखसंग्रह प्रसिद्ध. संतसाहित्य हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय होता. ‘प्रबोधनातील पाऊलखुणा’ आणि ‘निवडक
लोकहितवादी’ या संपादित पुस्तकांतून एकोणिसाव्या शतकातील सुधारणाविषयक चळवळीसंबंधीचा त्यांचा व्यासंग प्रकट होतो.
‘भैरू रतन दमाणी’ साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.
प्रस्तुत पाठातून माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकांची भूमिका व्यक्त झाली आहे. पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना
पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिंमत
वाढवतात आणि प्रेरणा देतात. पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात, हा विचार प्रस्तुत पाठातून व्यक्त करताना
लेखकाने ‘जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक’ हा व्यापक दृष्टिकोन मांडला आहे.
अशी पुस्तकं | Ashi Pustak 11th ( मराठी युवकभारती )
काही पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात.
अंत:करणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची
त्यांच्यात शक्ती असते. अशी पुस्तकं कधी विसरता येत
नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात
दरवळत राहतात. उत्तम साहित्यकृतींचं वाचन करत राहणं
यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायक काही असेल
का?
मॅकबेथ आणि किंग लियर या नाटकांतले काही संवाद
इतके काव्यात्म, इतके अर्थगर्भ आणि इतके भावस्पर्शी
आहेत, की प्रत्येक वाचनाच्या वेळी अधिक उत्कट
अनुभूती देत राहतात. अशा वाचनाची नशा और असते.
सुखाविषयीच्या माझ्या कल्पनेतून पुस्तकं वगळली तर सारं
सुखच संपुष्टात आलं असं म्हणावं लागेल. जवळचे मित्र
दुरावतात. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनाही त्या प्रेमाची
विस्मृती होते आणि वैराचा अग्नी ते पेटवत ठेवतात. हातात
आलेला पैसा कसा आणि केव्हा नाहीसा होतो ते कळतही
नाही; पण पैसा आणि माणसं यांच्याप्रमाणं पुस्तकं कधीच
विश्वासघातकी असत नाहीत. त्यांना स्पर्श करण्याचा
अवकाश, भावनांनी आणि विचारांनी ओसंडणारं आपलं
अंत:करण ते उघडं करतात. ‘माझ्या अंतरंगात त्या थोर
लेखकानं साठवलेलं हे भांडार तुझंच आहे. जे आवडेल ते
खुशाल घेऊन जा’ असंच जणू पुस्तक आपल्याला सांगत
असतं. पुस्तकांवर आत्यंतिक प्रेम करणारी माणसं मी
पाहिली आहेत. आपल्या कपाटात जिवापाड जपून ठेवलेलं
पुस्तक दुसऱ्याला देताना ती अगदी व्याकूळ झालेली
असतात.
एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून दोन दिवसांसाठी
एक पुस्तक मी वाचायला आणलं होतं. ते देताना तो ग्रंथप्रेमी
मला काकुळतीनं सांगत होता, ‘‘अतिशय काळजीपूर्वक
वापरा. दुसऱ्याच्या हाती देऊ नका. पुस्तकाची पानं मुडपू
नका. कोणताही मजकूर पेन्सिलीनं किंवा शाईनं अधोरेखित
करू नका, वरचं कव्हर काढू नका. तिसऱ्या दिवशी
कटाक्षानं मला पुस्तक परत करा.’’
त्या सूचना मला
अपमानकारक वाटल्या नाहीत. हातात पडलेल्या कोणत्याही
पुस्तकाशी निर्दय-चाळा करणारे अनेक पुस्तकशत्रू मी
पाहिले आहेत. त्यांच्या हिशेबी छापलेलं एक चोपडं म्हणजे
पुस्तक. त्याला कसलं महत्त्व द्यायचं? पुस्तकाचा उपयोग
तरी किती? भूक लागल्यावर ते शिजवून थोडंच खाता येतं?
वेडे लोक वाङ्मयात अनेक रस असतात असं म्हणतात.
तहान लागल्यावर तुमच्या कालिदासाच्या ‘शाकुंतलातील’
रस पिणं शक्य आहे काय? फार तर एकदा वाचावं किंवा
चाळावं आणि मग येईल त्या भावानं फुंकून टाकावं.
ही विचारसरणी अनेकांची असते; पण त्या पुस्तकप्रेमीनं मला
ज्या अटी घातल्या होत्या त्या खरोखरच अत्यंत सयुक्तिक
होत्या.
माझ्या हाती पुस्तक देताना त्यानं त्यावरून मायेनं
अलगद हात फिरवला. मी त्याला म्हणालो, ‘‘कसलीही
काळजी करू नका. माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला
माहेरी आल्यासारखंच वाटेल. त्याला सासुरवास सहन
करावा लागणार नाही. ते अगदी ‘योग्य स्थळी’ तुम्ही देत
आहात.’’
तो हसला. त्याचं समाधान झालं असावं. मी
म्हणालो, ‘‘एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे,
‘मूर्खहस्ते न दातव्यम्एवं वदति पुस्तकम्’ मूर्खाच्या हाती
मला देऊ नका, असंपुस्तकाचं म्हणणं आहे. माझ्या हाती
ते देताना तुम्हांला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली
नाही ना?’’ आता तो खळखळून हसला आणि म्हणाला,
‘‘अहो, दुधानं तोंड पोळल्यामुळं मी ताक फुंकून पितो
आहे. काही दिवसांपूर्वी एका कवीनं माझी दोन पुस्तकं
नेली. मीपंधरा दिवस वाट पाहिली. पुस्तकं मागायला गेलो
तेव्हा त्यानं चक्क कानावर हात ठेवले.
आपण पुस्तकं
आणलीच नाहीत असं त्याचं म्हणणं आहे. आता काय
करणार? पुस्तकं गिळंकृत करणं म्हणजे माझ्या दृष्टीनं
भयानक प्रकार आहे. तेव्हापासून मी ठरवून टाकलं, की
प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही.
माझी पुस्तकं हीच माझी अपत्यं. वाचायला भरपूर ग्रंथ
असले तर मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदानं सहन
करीन; पण पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा मला
स्मशानासारखा वाटेल.’’ सहज माझ्या मनात विचार
आला- असे निष्ठावंत वाचक आता दुर्मीळ झाले.
परवा मी बी. ए. च्या वर्गातल्या वाङमय ्विषयाच्या
विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, ‘‘जी. ए. कुलकर्ण्यांचा
एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे काय?
संग्रह
जाऊद्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात
आली आहे काय?’’ साहित्य या विषयाचे रसिक
विद्यार्थी-विद्यार्थिनी माना खाली घालून बसले होते.
कदाचित जी. ए. कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांना फारसं
परिचित नव्हतं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ
कथालेखकाचं नावही सुशिक्षितांच्या, अभ्यासकांच्या
कानापर्यंत पोहोचलं नाही या कर्माला काय म्हणावं?
एक गोष्ट मात्र खरी, की उत्तम साहित्यकृती
आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. मनाला धीर देतात.
जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्यानं
न्हाऊ घालतात. मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्नं
दाखवतात. काही दिवसांपूर्वी ऐंशी वर्षांचे एक साहित्यप्रेमी
सद्गृहस्थ भेटले. मी त्यांना सहज विचारलं, ‘‘सध्या कशाचं
वाचन चाललं आहे?’’ ते म्हणाले, ‘‘गेले दोन दिवस,
‘मेघदूत’ वाचत होतो. नुकतंच ते संपवलं. आता
टॉलस्टॉयची ‘ॲना कॅरेनिना’ ही कादंबरी हाती घेतली
आहे.’’ मी काहीशा आश्चर्यानं त्यांना म्हणालो, ‘‘या
वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते?’’ ते थोडेसे
रागावून म्हणाले, ‘‘रसिकतेचा अाणि वयाचा संबंध जोडणं
हेच अरसिकपणाचं आहे.
कलात्मक आनंद देणारं श्रेष्ठ
साहित्य मला म्हातारा होऊ देत नाही. गांधीजींची
आत्मकथा, व्हिक्टर ह्यूगोची आणि मुन्शी प्रेमचंदाची
कादंबरी, रवींद्रांची ‘गीतांजली’, शेक्सपिअरची नाटकं,
तुकारामांचे अभंग असं विविध प्रकारचं आणि अनेक
रंगाढंगांचंपण रसमय साहित्य वाचण्याचा मी जन्मभर शौक
केला. नवं पुस्तक दिसलं, की ते केव्हा हस्तगत होईल
अशी बेचैनी आजही मला वाटते.
या पुस्तकांनी तर मला
जिवंत ठेवलं आहे. शेक्सपिअरची सर्व नाटकं माझ्या
संग्रहात आहेत याचा मला अभिमान वाटतो. अहो, सुंदर
सुंदर पुस्तकांवरून नुसता हात फिरवणंसुद्धा केवढं सुखाचं
आहे!
कधी कधी बऱ्याच दिवसांत चांगलंपुस्तक वाचायला
मिळत नाही, अशा वेळी मी सुद्धा जुन्या साहित्याकडं
वळतो. खरं सांगायचं तर साहित्यात जुनं आणि नवं असं
काही असत नाही. केवळ काळाच्या अपेक्षेनं हे शब्द
आपण योजतो. ज्ञानेश्वरांचे अभंग कोणत्या अर्थानं ‘जुने’
आहेत? आणि कुसुमाग्रजांची कविता कोणत्या दृष्टीनं
‘नवी’ आहे? आपल्या सोईसाठी आपण हे शब्द वापरतो.’’
मी एके दिवशी अत्यंत विमनस्क अवस्थेत होतो.
त्या
दिवशी माझा एक कलावंत मित्र एका अपघातात मरण
पावला होता. जगण्यासाठी त्याच्याजवळ कितीतरी सुंदर
सामग्री होती. कलावंताचं जिवंत मन असलेला हा भाबडा
हळवा माणूस अचानक एका मोटार अपघातात ठार झाला.
सबंध दिवसभर मी अस्वस्थ होतो. रात्री कपाटातलं हेमिंग्वेचं
‘द ओल्ड मॅन अँड द सी’ हे छोटेखानीपुस्तक बाहेर काढलं.
त्याच्यावरची धूळ झटकली आणि ते वाचायला सुरुवात
केली. पुस्तकावरची धूळ ज्याप्रमाणे मी झटकली त्याप्रमाणं
माझ्या मनावर साचलेली दु:खी, निराश विचारांची धूळ त् पुस्तकानं झटकून टाकली. पहिल्या दोन-तीन पानांतच त्या
छोट्या कादंबरीनं मला खिळवून ठेवलं.
अर्नेस्ट हेमिंग्वे हा एक विलक्षण प्रतिभेचा लेखक
होऊन गेला.
साहजिकच त्याची जीवनदृष्टी त्याच्या साहित्यातून
प्रकट झाली आहे. ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ ही कादंबरी
याच बलदंड वृत्तीनं भारलेली आहे. एक म्हातारा कोळी
देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात आपली
होडी ढकलतो. त्याला सामान्य मासे नको होते. देवमाशाला
जिंकण्याचे धाडसी मनसुबे मनात रचून हा काटक म्हातारा
होडी वल्हवत कित्येक मैल अंतरावर गेला. पोटात अन्न
नव्हतं.
तहानेनं त्याला शोष पडला होता; पण मागं फिरायचं
नाही हा त्याचा बाणा होता. त्याच्या थकलेल्या हाडांत
अजूनही खवळलेल्या लाटांबरोबर झुंजण्याची आणि
सागरावर मात करण्याची जिद्द होती. कधी न सापडलेला
महाप्रचंड देवमासा आज आपण मिळवायचा या आकांक्षेनं
रोमारोमांतून पेटून निघालेला हा कणखर आशावादी म्हातारा
पुढेपुढेच चालला होता.
देवमासा मिळण्याचे चिन्ह दिसत
नव्हते. उपाशी पोट कुरकुरत होतं. थकलेले हातपाय होडी
मागे घेण्याचा सल्ला देत होते; पण हटवादी मन परतायला
तयार नव्हतं. तो तसाच होडी वल्हवत पुढे चालला.
एकाएकी प्रचंड खळबळ झाली. म्हाताऱ्याच्या जाळ्यात
तो महाकाय देवमासा सापडला होता. आपल्या बुलंद
मुसंडीनं जाळं तोडून तो सहज सुटून गेला असता; पण आता
म्हाताऱ्याच्या हातात वज्राचं बळ आलं.
जिवाची शर्थ
करून हातातल्या भाल्यानं देवमाशाला त्यानं तास-दोन
तासांत झुंजून ठार केलं. ते धूड होडीला बांधून विजयोन्मादाने
तो परतू लागला. आज त्याला जाळ्यात कधीच न
सापडलेला आणि आपल्या शेपटीच्या तडाख्यानं
मोठमोठ्या होड्या उलथून टाकणारा महाबलिष्ठ देवमासा
त्याच्या पराक्रमानं सापडला होता. किनाऱ्याकडं परतताना
शार्क माशांच्या टोळीनं त्या देवमाशावर हल्ले चढवले. ते
त्याचे लचके तोडू लागले.
त्यांच्याशीही म्हाताऱ्याला
झुंजावं लागलं. तो परतला आणि उन्मादानं आरोळी ठोकून
म्हणाला, ‘‘अरे, मी देवमाशाची शिकार केली. तुम्हांला ते
कधी जमलं नाही; पण आज मी तो पराक्रम केला. मी
देवमासा पकडला.’’ पण म्हाताऱ्याला हे समाधान फार वेळ
मिळालं नाही. देवमाशाचं बहुतेक मांस शार्क माशांनी
मटकावलं होतं. आता उरला होता तो त्याच्या हाडांचा प्रचंड सांगाडा.
देवमासा जाळ्यात सापडूनही आणि त्याची
शर्थीनं शिकार करूनही तो मिळाल्याचा आनंद उरला
नव्हता. म्हातारा थोडासा हसला. पुन्हा एकदा हा प्रयत्न
करायचा असं म्हणून तो निघून गेला.
बस्स! इथं कादंबरी संपली; पण यातून हेमिंग्वेला
काय सांगायचं आहे? अतिबलाढ्य, क्रूर नियती आणि
दुबळा महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो, लाखो
वर्षांपासून कधीच न संपणारं एक सनातन व चिरंतन द्वंद्व
युद्ध चालू आहे. नियती जबरदस्त असेल; पण दुबळ्या
माणसातही अदम्य आकांक्षेची आणि संघर्षशीलतेची
ज्वाला पेटलेली आहे. जयिष्णू वृत्तीनं तो माणूस आपल्या
प्रारब्धाशी झगडत आहे.
निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या
देत असली आणि त्याचा तेजोभंग करत असली तरी एक
क्षण असा येणार आहे, की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला
पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार
आहे, असं तर हेमिंग्वेला सुचवायचं नाही ना? ते काहीही
असो; पण या छोट्या कादंबरीनं माझ्या मनातलं वैफल्य
आणि उदव्िग्नता पार धुऊन टाकली. मी पुन्हा ताजा
टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो, जगण्या-मरण्याचा
खेळ तर अखंड चाललेलाच आहे. मरणाच्या जाळ्यात
आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळं टाकलं तरी ते
तोडून, फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात
स्वैर संचार करायचा.
हेमिंग्वेला कदाचित हीच भूमिका
अभिप्रेत असेल. त्याच्या कादंबरीनं मला झपाटून टाकलं हे
मात्र खरं! अशी मंत्रमुग्ध करणारी, गदागदा हलवणारी,
हृदयाच्या हृदयाला कडकडून दंश करणारी, आनंदाच्या
आणि उन्मादाच्या अस्मानात बेहोष भराऱ्या घ्यायला
लावणारी, हसवणारी आणि रडवणारी, जीवनाचा सुगंध
उधळणारी, नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात आणि त्यांच्या
माध्यमातून महान लेखक कवींच्या अंतरंगाला भिडण्यात
केवढा तरी आनंद सामावलेला आहे. अशी पुस्तकं
जगण्याचा अर्थ सांगतात. जगण्याला एक सुवासिक स्पर्श
देतात.
ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव
वैशिष्ट्यपूर्ण तर असतातच; पण त्यांतून काही नव्या प्रेरणा
वाचकाला आवाहित करतात. जीवन कसं आहे एवढंच
सांगणं हे पुस्तकाचं काम नाही. ते कसं असावं हेही
समर्थपणानं सांगणारी पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत
देतात. माणुसकीचा पक्ष घेऊन उभी राहिलेली, न्यायाचा जयजयकार करणारी, माणसाच्या पायांतले साखळदंड
तोडायला दंड थोपटून उभी राहिलेली काही बंडखोर पुस्तकं
मी जेव्हा वाचतो तेव्हा माणसावरचा विश्वास वाढायला
लागतो.
पुस्तकं वेळ घालवण्यासाठी वाचायची ही
हास्यास्पद कल्पना मला चुकीची वाटते. पुस्तकं आपल्याला
घडवतात. काही वेळा उद्ध्वस्तही करतात. पुस्तकं म्हणजे
प्रतिभावंतांची, विचारवंतांची फुललेली स्वप्नं असतात. या
स्वप्नांतूनच उद्याचं वास्तव जन्माला येत असतं. म्हणूनच
जगातल्या सौंदर्यपूर्ण वस्तूंत मी तरी पुस्तकांचा समावेश
करतो. अशी पुस्तकं आनंदही देतात आणि दु:खही देतात.
दुसऱ्यांच्या दु:खानं दु:खी होण्यासाठी मन व्यापक आणि
उदार असावं लागतं. ही किमया पुस्तकं करत आली आहेत.
पुस्तकांचा अवीट सुगंध मनाच्या गाभाऱ्यात दरवळत
राहिला म्हणजे जीवनाची सतार मस्त झंकारत राहते.
(जगायचं कशासाठी?)
अशी पुस्तकं स्वाध्याय | Ashi Pustak Swadhyay 11th | Maharashtra State Board 11th Marathi Solution
स्वाध्यायासाठी कृती
तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकाविषयी तुमचे मत मांडा.
‘वाचाल तर वाचाल’ याविषयी तुमचे विचार व्यक्त करा.
‘जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक’ यातील व्यापक दृष्टिकोन तुमच्या शब्दात व्यक्त करा.
तुम्हाला आवडलेल्या एखादया पुस्तकाविषयी 10 ते 12 ओळीत माहिती लिहा.
अशी पुस्तकं Summary in Marathi
प्रस्तावना :
मराठी संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक, संपादक व वक्ते म्हणून डॉ. निर्मलकुमार फडके प्रसिद्ध आहेत. ललित लेखन आणि संतसाहित्याच्या लेखनाबरोबरच त्यांची ‘आस्वाद समीक्षा’ साहित्य जगतात कौतुकास पात्र ठरली होती. त्यांनी लिहिलेली अनेक स्वतंत्र व संपादित पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘कल्लोळ अमृताचे’, ‘चिंतनाच्या वाटा’, ‘प्रिय आणि अप्रिय’, ‘सुखाचा परिमळ’ अशी ही विविध साहित्यसंपदा आहे.
‘संतकवी तुकाराम : एक चिंतन’, ‘संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना’, ‘संतांचिया भेटी’, ‘संत वीणेचा झंकार’, ‘संत तुकारामांचा जीवनविचार’ ही संत साहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके तसेच ‘समाजपरिवर्तनाची चळवळ : काल आणि आज’, ‘साहित्यातील प्रकाशधारा’ हे लेखसंग आहेत. डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा संतसाहित्य हा विशेष आस्थेचा विषय होता.
‘प्रबोधनातील पाऊलखुणा’ आणि ‘निवडक लोकहितवादी’ या संपादित पुस्तकातून एकोणिसाव्या शतकातील सुधारणाविषयक चळवळीसंबंधीचा त्यांचा व्यासंग दिसून येतो. या त्यांच्या साहित्य सेवेबद्दल ‘भैरू रतन दमाणी’ या साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. तसेच नाशिक येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गंभीरता, अंतर्मुखता, चिंतनशीलता हे त्यांच्या साहित्याचे लेखनविशेष आहेत.
पाठाचा परिचय :
माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकांची भूमिका प्रस्तुत पाठात मांडली आहे. पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकाने व्यक्त केला आहे. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवून प्रेरणा देतात. पुस्तके ही मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात, हा विचार व्यक्त करताना लेखकाने ‘जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक हा व्यापक दृष्टिकोन मांडला आहे.
पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत देतात, पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात. जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. पुस्तके आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात. आपल्याला जी पुस्तके विशेषत्वाने आवडतात ती हृदयाच्या कण्यात जपून ठेवायला हवी. मनाची सुदृढ आणि सशक्त वाढ होण्यासाठी पुस्तके वाचावीत. आपल्या जीवनप्रवासात पुस्तकं एक मार्गदर्शक म्हणून उभी राहतात. ग्रंथ हे गुरु आहेत हा विचार या पाठात अधोरेखित झाला आहे.
पुस्तकं आपल्याला झपाटून टाकतात, अंत:करणात भावनांची प्रचंड खळबळ उडवून देण्याची त्यांच्यात शक्ती असते. अशी पुस्तके कधी विसरता येत नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ती पुस्तकं मनात दरवळत राहतात. उत्तम साहित्यकृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायी काहीही नाही. यावरून लेखकांचे ग्रंथप्रेम दिसून येते.
लेखकांने एकदा एका ग्रंथप्रेमी वाचकाकडून एक पुस्तक आणले होते. ते पुस्तक देताना या ग्रंथप्रेमीने लेखकाला “अतिशय काळजीपूर्वक वापरा, दुसयांच्या हाती देऊ नका, पुस्तकाची पानं मुडपू नका, कोणताही मजकूर पेन्सिलीनं किंवा शाईनं अधोरेखित करू नका, बरचं कव्हर काढू नका, तिसऱ्या दिवशी कटाक्षानं पुस्तक परत करा.” अशा सूचना दिल्या. त्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत कारण त्या अटी खरोखरच अत्यंत सयुक्तिक होत्या, कारण ग्रंथप्रेमी व्यक्ती पुस्तकाला स्वत:ची अपत्ये समजतात. उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. मनाला धीर देतात. जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्य प्राप्त करून देतात. मनातल्या अंधाराला स्वप्नं दाखवून मनाला ताजे आणि टवटवीत करतात.
उदा. ‘मेघदूत-कालिदास’, ‘टॉलस्टॉयची अॅना कॅरेनिना’ ही कादंबरी, गांधीजींचे आत्मचरित्र, व्हिक्टर ह्यूगोची आणि मुन्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रनाथ टागोरांची ‘गार्डनर’ व ‘गीतांजली’, शेक्सपिअरची नाटकं, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांचे अभंग इत्यादी, अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘द ओल्ड मॅन अण्ड द सी’ कादंबरीतील एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात पोटात अन्नाचा कण नसताना आपली होडी ढकलतो, देवमाशाला जिंकण्याचे धाडस ठेवून हा काटक म्हातारा होडी वल्हवत कित्येक मैल सागराच्या आत जातो.
त्याच्यात लाटांबरोबर झुजण्याची जिद्द, कणखर आशावाद, आकांक्षा, हटवादी मन, विजयोन्माद असतो. या कादंबरीतून निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली तरी एक क्षण असा येणार आहे, की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजय प्राप्त करणार आहे असे हेमिंग्वेला सुचवायचं आहे. ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण असून त्यातून नव्या प्रेरणा वाचकाला मिळतात.
समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :
- उत्तेजक – हुरूप आणणारे, प्रोत्साहक – (stimulant)
- कोळी – मासेमारी करून निर्वाह करणारा – (a fisherman)
- वज़ – इंद्राचे आयुध – (thunderbolt)
- विमनस्क – उद्विग्न, खिन्न, गोंधळलेला – (depressed)
- प्रेरणा – स्फूर्ती – (inspiration)
- विजय – यश – ( victory)
- मूर्खहस्ते न दातव्यम एवं वदति पुस्तकम् – पुस्तक म्हणते मला मुर्खाच्या हाती देऊ नका
- साहित्य – ग्रंथसंपदा – (literature)
- तेज – प्रकाश – (light)
- प्रारब्ध / नियती – नशीब – (destiny)
- होडी – नाव – (boat)
- अपत्य – मुले – (an offspring, child)
- माणुसकी – मानवता – (huminity)
- शिकार – पारध – (hunt)
- किमया – जादू – (magic)
- बंडखोर – क्रांतिकारी – (rehel)
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :
- दुधाने तोंड पोळल्यामुळे ताक कुंकून पिणे – एका वाईट अनुभवामुळे दुसऱ्या तशाच प्रकारच्या अनुभवाला सामोरे जाताना, प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.
- खिळवून ठेवणे – मन गुंतवून ठेवणे.
- आरोळी ठोकणे – मोठ्याने हाक मारणे.
टिपा :
- शेक्सपिअर – सुप्रसिद्ध इंग्रजी कवी, नाटककार, मॅकवेध, किंग लियर ही त्यांची प्रसिद्ध नाटके.
- अर्नेस्ट हेमिंग्वे – अमेरिकन साहित्यिक.
- व्हिक्टर हयूगो – फ्रेंच कवी, लेखक व नाटककार,
- मुन्शी प्रेमचंद – थोर हिंदी कथाकार व कादंबरीकार.
- लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक.
- कवी कालिदास – संस्कृत महाकवी यांची मेघदूत व शाकुंतल नाटके प्रसिद्ध.
- जी.ए. कुलकर्णी – एक आधुनिक श्रेष्ठ कथालेखक.
अशी पुस्तकं स्वाध्याय | Ashi Pustak Swadhyay 11th | Maharashtra State Board 11th Marathi Solution
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं
September 27, 2021 by Bhagya
Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 3 अशी पुस्तकं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 अशी पुस्तकं
11th Marathi Digest Chapter 3 अशी पुस्तकं Textbook Questions and Answers
- अशी पुस्तके
- अशी पुस्तके स्वाध्याय इन मराठी
- अशी पुस्तके स्वाध्याय
- ११थ मराठी अशी पुस्तकं स्वाध्याय
- अशी पुस्तक
- अशी पुस्तक स्वाध्याय इयत्ता अकरावी
- अशी पुस्तके स्वाध्याय अकरावी
- ashi pustak
अशी पुस्तकं स्वाध्याय | Ashi Pustak Swadhyay 11th | Maharashtra State Board 11th Marathi Solution
मित्रांनो तुम्हाला ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अशी पुस्तकं स्वाध्याय आहे का आणि तसेच अशी पुस्तके पाठ तुम्हाला कसा वाटला हे देखील तुम्ही आम्हाला सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारची अडचण असेल ते देखील आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी त्या अडचणीवर नवीन लेख घेऊन येण्याचा प्रयत्न करूया ही ब्लॉग पोस्ट म्हणजे हा लेख तुम्ही तुमच्या सर्व मित्र परिवाराचे नक्की शेअर करावा जेणेकरून त्यांना देखील या अशी पुस्तके स्वाध्याय लिहिण्यात तसेच या पाठाचा अभ्यास करण्यास मदत होईल धन्यवाद तुमचे अकरावीचे वर्ष चांगले जावो हीच निर्मळे अकॅडमी ची प्रार्थना